विषय «इतर»

चर्चा – पंतप्रधान कोणी व्हावे?

संपादक, आजचा सुधारक यांस,
जून ९९ च्या अंक वाचला. यावेळी नेहमीची तर्कसंगती व विचारांची सुसूत्रता त्यात जाणवली नाही. म्हणून त्याविषयी काही विचार मांडीत आहे.
१) भारतातील सुशिक्षित व अशिक्षित असे दोन्ही प्रकारचे मतदार लोकशाही प्रक्रियेस कसे अयोग्य आहेत यावर दोन परिच्छेद लिहिल्यावर पुढे एके ठिकाणी आपण म्हणता की पंतप्रधान कोणी व्हावे हा जनतेचा प्रश्न नसून जो पक्ष निवडून येईल त्याची ती डोकेदुखी आहे. निवडून आलेला पक्ष हा मतदारांनीच निवडून दिलेला असतो. तेव्हा अशा “अयोग्य” (म्हणजेच आपल्या म्हणण्याप्रमाणे अप्रबुद्ध) मतदारांनी निवडलेल्या पक्षाने सर्व देशावर एखादी व्यक्ती पंदप्रधान म्हणून लादावी हे योग्य कसे?

पुढे वाचा

विवेकवाद म्हणजेच आप्तवाक्यप्रामाण्यनिषेध?

संपादक, आजचा सुधारक यांस,
मी आपले सर्व अंक पुरेसे काळजीपूर्वक वाचतो. प्रतिक्रियाही निर्माण होतात. त्यांची तपशीलवार मांडणी करण्यापेक्षा काही निष्कर्प फक्त नोदवीत आहे.
१. आपल्या वहुताश लेखकांचा त्यांच्या मनावद्दलचा शागही आत्मावश्वास अजव वाटतो. विश्वातील संपूर्ण व अंतिम सत्य आपणास समजले आहे असा अविर्भाव त्यात मला दिसतो.
२. जुलै ९९ च्या संपादकीयांतील पान १०० परिच्छेद – २ चा शेवट व पान १०१ परिच्छेद १ चा शेवट यांत ‘अन्याय दूर करण्याचा’ व ‘वास्तव बदलण्याचा तुमचा संकल्प हा फारच महत्त्वाकांक्षी वाटतो. आपले ग्राहक / वाचक यांची संख्या २५०० ते ३००० च्या पुढे नसावी.

पुढे वाचा

सर्वांना शुद्धलेखनाचे प्रशिक्षण हवे

संपादक, आजचा सुधारक यांस,
आपल्या अनावृत पत्रात आपण उपस्थित केलेले सर्वच मुद्दे महत्त्वाचे व विचारांना चालना देणारे आहेत. त्या सर्वांचा समग्र विचार करून ऐकमत्य साधणे नितांत आवश्यक झाले आहे. ही प्रक्रिया लवकर व्हावयास हवी. उशीर झाल्यास मराठीची अवस्था आणखी दयनीय होईल आणि मग तिच्यात चैतन्य आणणे आणखी कठीण होईल, असे आपल्याप्रमाणे मलाही वाटत आले आहे. आपल्या अनेक वर्षांच्या व्यावसायिक अनुभवामुळे आपण लिखित मराठीचे दुखणे बरोबर हेरले आहे. समग्र महाराष्ट्रात आणि अन्यत्र प्रमाण मराठीची जाण वाढणे याची आज नितान्त
आवश्यकता आहे.
मराठीच्या अनेक प्रादेशिक बोलीही महाराप्ट्रात विखुरल्या आहेत.

पुढे वाचा

श्रद्धा

संस्कृत तथा प्राकृत भाषेमध्ये श्रद्धा ह्या शब्दाचा सर्वत्र उपयोग केला जातो. परंतु ह्याचा निश्चित अर्थ दिसत नाही. जो काही मिळतो त्याचा हा असा प्रकार आहेः ‘श्रद्धा = गुरुपु शास्त्रेषु निरतिशयः विश्वासः शास्त्राचार्योपदिष्टऽथै अननुभूतेऽपि एवमेव एतदितिविश्वासः, एवं विश्वासः- वंचकत्वाभावसंभावना.’ हे विवरण समाधानकारक नाही. वचन विश्वासानुयायी आहे. …..
“विश्वास हा अनुभव व अनुमान या दोहोंचा परिणाम आहे. अनुभवाला परीक्षण (बुद्धि व शक्ति) अनुमानाला विवेक (बुद्धि) लागते. अनुभवाचे निरीक्षणपूर्वक परीक्षण पाहिजे व अनुमानाला पूर्वानुभव मदतीला घ्यावा लागतो. या दोन गोष्टींशी व्यस्त प्रमाणात विश्वास उत्पन्न होतो.

पुढे वाचा

भांडण शब्दप्रामाण्याशी

मागच्या महिन्याच्या अंकामध्ये तीन मोठमोठे लेख आम्ही प्रसिद्ध केले. त्यांतील शेवटचा जो लेख होता-अनिलकुमार भाटे ह्यांचा तो आम्ही प्रकाशित करावयाला नको होता असे सांगणारी अनेक पत्रे आली तसेच दूरभाषदेखील आमच्याकडे आले. तो लेख का छापला त्याची कारणे आधी आणि नंतर त्या लेखासंबंधी.
श्री. भाट्यांच्या पत्रांत सतत आरोप होत होता की त्यांची वाजू आम्ही दडवून ठेवतो. प्रतिपक्षाला आम्ही आपले मत मांडू देत नाही; आम्ही एकाच पक्षाचा प्रचार करतो. त्यांची एकामागून एक अशी तीन पत्रे आली. आम्ही त्यांचे तिसरे पत्र प्रसिद्ध केले नाही.

पुढे वाचा

अकादमीय विद्वज्जन आणि युटोपिया

विसाव्या शतकातील सर्वांत दूरगामी परिणाम घडवणारी वौद्धिक क्रांती घडली मात्र संथ, शांत गावांमध्ये. केंब्रिज, कोपनहेगन, म्युनिक, पॅरिस, गॉटिंगेन, अशी ही, गावे. गॉटिंगेन हे गाव हे भौतिकीतज्ज्ञांचे खरे केंद्र. गावाचा आत्मा म्हणजे तिथले प्राचीन जॉर्जिया ऑगस्टा विद्यापीठ. इतर गावांना त्यांच्या नरवीरांचा, त्यांच्या पदकांचा गर्व असायचा. गॉटिंगेनकरांना विद्यापीठातल्या विद्यार्थांच्या आणि अध्यापकांच्या पदव्यांचा आणि जगभरातल्या वैज्ञानिक संघटनांच्या सभासदत्वाचा गर्व वाटायचा. १९२० साली रात्री घरी परतणा-या विद्यार्थ्यांनी ‘करमणूक’ जास्त झाल्याने केलेला दंगा गावक-यांच्या सवयीचा होता – तसेच याच विद्यार्थ्यांनी वौद्धिक उत्तेजनेतून रात्री उशीरापर्यंत रस्त्यामध्ये उभे राहून चर्चा करणेही सवयीचे होते.

पुढे वाचा

चर्चा

भांडवलाचे वास्तव स्वरूप
(आजचा सुधारक – जून १९९९)
– श्री. वि. खांदेवाले
आपण वरील स्फुटात भांडवलाची नवी व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. त्यासंबंधी माझी प्रतिक्रिया नोंदवीत आहे. ज्या ओघात आपण विचार मांडले त्यांना क्रमांक देऊन टिप्पणी करीत आहे.
१. उत्पादनासाठी भांडवल, श्रम, भूमी आणि कच्चा माल लागतो असे आपण म्हटले. परंतु कच्चा माल हा कृषि-उत्पादनांच्या (अन्नधान्ये, तेलविया, ज्यूट, ऊस, कापूस इत्यादी आणि खनिज पदार्थ, जंगलांपासून मिळणारी उत्पादने इत्यादींच्या) स्वरूपात निसर्गापासून (मूलतः) विनामूल्य मिळतो म्हणून त्याचा समावेश भूमी ह्या घटकात केला जातो. त्यामुळे भूमी व कच्चा माल हे आपण समजता त्याप्रमाणे वेगळे घटक मानले जात नाहीत.

पुढे वाचा

शरीराला जोडलेला आत्मा

मे ९९ च्या अंकातील दि.य. देशपांड्यांच्या सुमारे पाच पानी लेखावर जुलै ९९ च्या अंकात अनिलकुमार भाट्यांचे नऊ पानी उत्तर आहे; संतप्त आणि विस्तृत उत्तर आहे.
१) भाट्यांना दियदेंचे आत्म्याबाबतचे विवेचन पटत नाही. पण भाटे कशाला आत्मा म्हणतात हेही समजत नाही. ते फक्त सांगतात की “माझ्या ‘मी’ पणाच्या सर्व (कल्पनांचा) माझ्या आत्म्याशी काही संबंध नाही”. मग आत्मा आहे कशाशी संबंधित? असे काहीतरी मानवी व्यवहाराचे अंग असणारच, की ज्याच्या वर्णनासाठी ‘आत्मा’ हा शब्द घडवावा लागला आहे. आणि त्याचा माझ्याशी संबंध हवाच-जर आत्मा माझा असेल तर.

पुढे वाचा

प्रचंड गोंधळ भाट्यांचाच

जुलै १९९९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आ. सु. च्या अंकात अमेरिकानिवासी श्री. अनिलकुमार भाटे नावाच्या एका वाचकाची प्रतिक्रिया वाचनात आली. प्रा. देशपांडे ह्यांनी आपल्या लेखातून आत्मा, पुनर्जन्म, कर्मसिद्धान्त अशा भारतीय आस्तिक दर्शनशास्त्रातील संकल्पनांचे खंडन केले आहे. त्या संकल्पनांचे मंडन करण्यासाठी भाटे ह्यांनी जो काय तर्कशास्त्राचा अभ्यास केला असेल किंवा हेगेल, हुसेर्ल, हायडेगर. या हकाराच्या वाराखडीतील युरोपी विद्वानांच्या नावाची जंत्री पाठ केली असेल ते सारे निरर्थक ठरतात. प्रा. देशपांड्यांचा विचार भारतीय दर्शनशास्त्राशी संबंधित आहे. तो नास्तिक दर्शनाशी जिव्हाळ्याचे नाते सांगणारा आहे. त्याच्या खंडनार्थ श्री.

पुढे वाचा

आत्म्याचा अनुभव सार्विक नाही

आजचा सुधारक च्या जुलै १९९९ च्या अंकात “दि. य. देशपांडे ह्यांचा प्रचंड वैचारिक गोंधळ’ या शीर्षकाखाली श्री. अनिलकुमार भाटे यांचे विचार वाचण्यात आले. श्री. देशपांडे यांचा “वैचारिक गोंधळ” आणि त्यांचे “अज्ञान” श्री. भाटे यांनी उघड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्री. देशपांडे यांच्या “अज्ञानातून” वाचकाला ज्ञानाच्या वाटेवर आणण्याचा श्री. भाटे यांचा स्तुत्य प्रयत्न आहे. त्यांच्या ह्या प्रयत्नाने श्री. देशपांडे यांचे “अज्ञान” स्पष्ट झाले की नाही याबरोबरच वाचकांना कितपत “ज्ञानवोध” झाला हेसुद्धा लक्षात घेणे उपयुक्त ठरेल. श्री. भाटे यांच्या मतानुसार श्री. देशपांडे यांनी अनेक चुकीची विधाने केलेली आहेत.

पुढे वाचा