हल्ली विज्ञानातील संशोधनाचा प्रचंड आवाका आणि वेग जगात सार्वत्रिक क्रांती घडवीत असून, मानवी संस्कृतीच्या ५००० वर्षांच्या ज्ञात इतिहासात एवढी मूलगामी स्थित्यंतरे केवळ अभूतपूर्वच म्हटली पाहिजेत. या वैज्ञानिक संशोधनाचा उगम प्रामुख्याने पाश्चात्त्य प्रगत देशात असला तरी पृथ्वीतलावरील कोणताही मानव समाज या स्थित्यंतरापासून अलिप्त राहू शकत नाही. भौतिक शास्त्रांतील संशोधनामुळे मानवाच्या सुखसोयी वाढल्या व मानवी जीवन अधिक सुसह्य आणि गतिशील (dynamic) झाले. परंतु जीवशास्त्रांतील (Life Sciences) आधुनिक संशोधनामुळे मात्र मानवी जीवनाच्या अनेक सांस्कृतिक व सामाजिक परंपरा आणि मान्यता क्षीण होऊ लागलेल्या दिसतात. विशेषतः जैविक तंत्रविद्येच्या (Bio-technology) विकासामुळे तर मानवी जीवनाचे सूर व लय बदलू लागली आहे.
विषय «इतर»
पुस्तक-परिचय : भारताची फाळणी टाळता आली असती?
India’s Purtition: Process, Strategy and Mobilization,
संपादक मुशीरुल हसन. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, १९९३. मूल्य रु. ४८५/-
विसाव्या शतकातील भारतातील घडामोडींकडे नजर टाकली, तर फाळणीने इतिहासकारांसमोर जेवढी प्रश्नचिन्हे निर्माण केली, तेवढी क्वचितच दुसर्या कोणत्या घटनेने केली असतील. स्वातंत्र्याचा सुवर्णक्षण दृष्टिपथात येत असतानाच पाहता पाहता तोआनंद एका भीषण, रक्तरंजित घटनेने काळवंडला जावा, ही एक शोकांतिकाच होती. विघटनाच्या या कड्यापर्यंत देश पोहोचलाच कसा?१९४० पर्यंत निष्प्रभ असलेली मुस्लिम लीग अचानक प्रबळ होऊन निर्णयप्रक्रियेच्या मोक्याच्या स्थानी कशी आली?१९३० पर्यंत धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्रवादी अशी प्रतिमा असलेले बॅ.
ज्योतिषशास्त्र की वदतोव्याघात?
ज्या विषयाशी आपली धड तोंडओळखसुद्धा नाही त्या विषयावर टीका करणे योग्य नाही. परंतु मी असे अनेक बुद्धिप्रामाण्यवादी (किंवा विवेकवादी) लोक पाहिले आहेत जे अनेक प्रसंगी असे बोलून जातात की, ज्योतिषशास्त्रातले आम्हाला जरी काही कळत नसले तरी ते एक थोतांड आहे हे आम्हाला ठाऊक आहे. असे बोलणे विवेकवादी म्हणवणाऱ्यांना शोभत नाही. त्यांनी हा विषय निदान ढोबळ मानाने तरी समजून घ्यावा असे मला वाटते. या विषयाद्दल फार मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा बाळगणारे लोक आहेत. ही अंधश्रद्धा साधार युक्तिवाद करून दूर करणे समाजहिताचे आहे, व ते विवेकवादी लोकांचे कर्तव्य आहे.
चर्चा -खरी स्त्रीमुक्ती कशात आहे?
ऑगस्ट ९४ च्या सुधारकातील “खरी स्त्रीमुक्ती कशात आहे” या लेखाद्वारे स्त्रीमुक्तीच्या संदर्भातील एका महत्त्वाच्या मुद्द्यावरील चर्चेस सुरुवात केल्याबद्दल दिवाकर मोहनी यांना धन्यवाद.
या लेखात व्यक्त करण्यात आलेली काही मते अधिक स्पष्ट व्हावयास हवी होती, असे वाटते. उदा.
मोहनींनी स्त्रीपुरुष संबंधाच्या संदर्भात पुढील दोन मुद्दे मांडले आहेत –
(अ) स्त्रीपुरुषांना लैंगिक संबंधाचे स्वातंत्र्य असावे,
(ब) एकपतिपत्नीव्रत ही आदर्श व्यवस्था नव्हे; अर्थात् बहुपत्नीक किंवा बहुपतिक कुटुंबे असण्यास हरकत नसावी.
एकाच पतिपत्नीचे कुटुंब असून प्रसंगी त्या स्त्रीपुरुषांनी इतरही पुरुष-स्त्रियांबरोबर लैंगिक संबंध ठेवल्यास हरकत नसावी, ही एक गोष्ट झाली.
स्त्री-पुरुष समता व स्त्री-मुक्तीसंबंधी सर्वेक्षण प्रश्नावलीचा मसुदा (स्त्रियांसाठी)
[आमचे मित्र डॉ. र. वि. पंडित ह्यांनी स्त्रीपुरुष समता व स्त्रीमुक्ती संबंधी एक सर्वेक्षण opinion poll) करावे अशी सूचना केली आणि त्यांनीच त्यासाठी एका प्रश्नावलीचा मसुदा करून आमच्याकडे पाठविला आहे. तो सोबत देत आहोत. त्यामध्ये काहीफेबदल करावयाचा असल्यास तो आमच्या वाचकांनी सुचवावा आणि त्याला परिपूर्ण स्वरूप प्राप्त करून देण्यास साहाय्य करावे. त्याचप्रमाणे ते प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यास साहाय्य करावे अशी आमची आपणांस विनन्ती आहे.]
(१) आपले नाव व वय (ऐच्छिक)
(२) आपले शिक्षण किती?
(३) घरातील सर्वाचे मिळून एकूण वार्षिक उत्पन्न
(४) नोकरी/व्यवसाय करीत असल्यास स्वतःचे वार्षिक उत्पन्न
(५) कुटुंबातील व्यक्तींची संख्या व प्रत्येकाचे शिक्षण
(६) घरामध्ये वाहन आहे काय?असल्यास
ईश्वरावरील श्रद्धा आवश्यक?
आम्हाला नांदेडचे श्री सुभंत रहाटे यांचे पुढे दिलेले पत्र आले आहे.
प्रा. दि. य. देशपांडे
देव असो वा नसो, देवावर विश्वास ही कित्येकांची मानसिक गरज असते. आपल्या दुःखाचे व काळजीचे ओझे देवाच्या डोक्यावर टाकले की आपला भार हलका होतो. देवावर श्रद्धा असणारा माणूस ऐहिक अडचणींनी खचून जात नाही. मानसिक ताण कमी करण्यापुरते देवाचे अस्तित्व कबूल करणे आवश्यक बनते, अशी एक मांडणी केली जाते. या मांडणीत ग्राह्यांश नाही का? विवेकवाद्यांचे या प्रतिपादनाला काय उत्तर आहे?
सुभंत रहाटे
रोहिणी सदन, कैलासनगर
वर उल्लेखिलेले मत फार मोठ्या प्रमाणावर व्यक्त केले जाते.
अतीतवाद, विवेकवाद व विज्ञान
मे १९९४ च्या आजचा सुधारक च्या अंकात प्रा. मे. पुं. रेगे यांनी सातारा येथील संमेलनात केलेल्या अध्यक्षीय भाषणाच्या संदर्भात प्रा. दि. य. देशपांडे यांचा “अतीत व विवेकवाद” हा व प्रा. प्र. ब. कुळकर्णी यांचा “प्रा. रेग्यांची अतीतवादी मीमांसा’ हे दोन विचारप्रवर्तक लेख आले आहेत. यात प्रा. कुळकर्णी यांनी विज्ञानाविषयी बरीच स्पष्ट विधाने केली आहेत. प्रा. देशपांडे यांचा लेख वाचताना शीघ्र संदर्भ म्हणून उपयोगी पडावा हा प्रा. कुळकर्णी यांच्या लेखाचा उद्देश आहे. प्रा. रेग्यांचे संपूर्ण भाषण व वरील दोन लेख वाचल्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोनातून आलेले काही विचार मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
पर्यावरणवादाचा अन्वयार्थ
(१)
मानव-निसर्ग संबंधाच्या अभ्यासाचा इतिहास जुना असला तरी पर्यावरणवादाचा विकास ही अलीकडच्या काळातील घटना आहे. निसर्गातील काही घटकांचे माहात्म्य मानवाने बर्यावच आधीपासून जाणले होते. निसर्गातील विविध घटकांची त्याच्या सुखकर जीवनासाठी आवश्यकता त्याला समाजजीवनाच्या सुरुवातीपासूनच प्राथमिक स्वरूपात का होईना ज्ञात होती. असे असले तरी या संबंधाच्या आणि या अभ्यासाच्या मुळाशी एकीकडे मानव व दुसरीकडे उरलेला निसर्ग असा मानवसापेक्ष दृष्टिकोन होता. सुरुवातीला निसर्गातील उर्वरित घटकांच्या तुलनेत माणसाचे अस्तित्व नगण्यच होते. मानवासकट सर्वघटकांची एक व्यवस्था म्हणजे पर्यावरण ही मानवनिरपेक्ष संकल्पना अलीकडली आहे.
ह्या संकल्पनेचा विकास अपरिहार्यपणे आधुनिक वैज्ञानिक प्रगतीशी निगडित आहे.
चर्चा- श्रीरामकृष्ण परमहंस आणि साक्षात्कार
जून ९४ च्या आजचा सुधारकमध्ये प्रसिद्ध झालेल्या माझ्या वरील विषयावरील लेखावर आक्षेप घेणारे श्री. न. ब. पाटील यांचे पत्र संपादकांनी माझ्या अवलोकनास पाठविले आहे. या पत्रातील सर्वच मजकूर अपेक्षित वळणावरच आहे. ज्यांची साक्षात्कारावर श्रद्धा आहे, त्यांच्यावर माझ्या विवेचनाचा काही परिणाम होईल अशी अपेक्षा मी केली नाही. कारण श्रद्धा ही मुळात पुराव्यावर आधारलेली नसते, त्यामुळे विरुद्ध पुराव्याने ती नष्ट होण्याचा संभव नसतो. श्री. पाटील यांच्या सात पानी पत्रात श्रीरामकृष्णांचे साक्षात्कारी समजले गेलेले वर्तन मिर्गीच्या व्याधिताचे होते हे त्यांच्याच आईबापांचे व डॉक्टरांचे निदान चूक होते असे दाखवणारी कोणतीच तथ्ये मांडली नाहीत.
इतर
जून १९९४ च्या आजचा सुधारकमध्ये श्री. नी. र. व-हाडपांडे यांचा ‘श्रीरामकृष्ण परमहंस आणि साक्षात्कार’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यावर अनेक अंगांनी प्रतिक्रिया व्यक्त करणे आवश्यक आहे. एक मनोविकारतज्ज्ञ म्हणून त्यातील वैद्यकीय व मानसशास्त्रीय प्रतिपादनावर मत नमूद करावेसे वाटते. हे मत मांडताना श्रीरामकृष्णांबाबत श्री. व-हाडपांडे यांच्या लेखात दिलेली माहितीच मी विचारात घेत आहे. त्यांचे लिखाण त्यांचेच मुद्दे सिद्ध करण्यास अपुरे आणि सदोष वाटते.
मिर्गीच्या व्याधीमुळे होणारे भास
(१) श्री. वऱ्हा डपांडे यांच्या मते श्रीरामकृष्ण परमहंसाना होणारे देवीचे दर्शन व ‘भावानुभूती’ हा मिर्गीचाच प्रकार होता.