गोष्ट पासष्टीची, ले. शांता किर्लोस्कर, वितरक – मौज प्रकाशन गृह, गिरगांव, मुंबई -४, किंमत रु. १५०/
किर्लोस्कर खबर १९२० च्या जानेवारीत निघाले तेव्हा ते अक्षरशः चारपानी चोपडे होते. त्याच्या ३०० प्रती काढल्या आणि ‘आप्तमित्र, ग्राहकबंधूंना वाटल्या. जगप्रसिद्ध फोर्ड या मोटार कारखान्याचे फोर्ड टाइम्स हे मासिकपत्र पाहून शंकररावांना स्फूर्ती झाली आणि ही खबर निघाली. पुढे हे मासिक वाढतच गेले. दहा वर्षांनी स्त्री आणि आणखी चार वर्षांनी चौतीस साली मनोहर असा परिवार वाढला. मासिकांच्या विकासाची ही कहाणी मोठी आहे. चांगली पासष्ट वर्षांची. १९८४ साली सामाजिक परिवर्तनाचे एवढे काम केलेली ही संस्था एखाद्या मालमत्तेसारखी विकली गेली.
Category «इतर»
सुधारणा झाल्या?
प्रश्न : स्त्रिया… डॉक्टर-इंजीनिअर झाल्या आहेत, विमानेसुद्धा चालवण्याचे प्रयोग झाले आहेत, तरी तुम्हाला स्त्रीजीवनात सुधारणा झाली असं वाटत नाही. सुधारणा म्हणजे नेमके कोणते बदल तुम्हाला अपेक्षित आहेत?
गीता साने : हे विशिष्ट वर्गात-मध्यमवर्गात झालेले बदल आहेत. … मध्यमवर्गात शिक्षण वाढलं, विचार वाढला, जीवनसंघर्षही वाढला, यातून विशिष्ट वर्तुळात काही सुधारणा झाल्या. पण मध्यमवर्गाचं प्रमाण फक्त आठ टक्के आहे. बाकीचा सगळा खालचा वर्ग आहे. या वर्गात परिवर्तन झाल्याशिवाय पूर्ण चित्र बदलणार नाही. या बायकांना कोणतंही स्वातंत्र्य मिळालेलं नाही. कायदे तुम्ही वाटेल ते करा, त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाहीत….
तत्त्वज्ञानाची ओळख (भाग-१)
तत्त्वज्ञान का शिकले पाहिजे?
तत्त्वज्ञान का शिकले पाहिजे? या प्रश्नाला सामान्यपणे पुढील उत्तर दिले जाईल. ‘तत्त्वज्ञान शिकण्याची काहीच आवश्यकता नाही. तत्त्वज्ञान म्हणजे घटपटाची निरर्थक झटापट करणारा उद्योग. रिकामटेकड्या लोकांनी वेळ घालविण्याकरिता निर्माण केलेला एक खेळ. त्याचा जीवनात कसलाही उपयोग नाही. जीवनाच्या कोणत्याही समस्येशी त्याचा कोणताही संबंध नाही. ज्याला हिंदीत ‘बाल की खाल निकालना’, म्हणजे केसाची साल काढणे, म्हणतात, ते करणारा व्यवसाय. केस ही मुळात किती बारीक वस्तु, तिची साल काढल्यावर शिल्लक काय उरणार? म्हणजे जिथे कसलाही भेद नाही तिथे भेद उकरून काढणारा हा विषय आहे.’
विवाहाविषयी आणखी थोडे
श्री संपादक, आजचा सुधारक, यांस,
आपल्या ऑक्टोबर १९९२ च्या अंकामध्ये विवाह आणि नीती ह्या विषयावर आपण आपली स्वतःची भूमिका मांडली आहे. नोव्हेंबर-डिसेंबरच्या अंकात स्त्री उवाच ह्या वार्षिकाचा परिचय अनुराधा मोहनी ह्यांनी करून दिला आहे, त्यात विवाह हा विषय आहे, आणि त्याच अंकात श्री. गं.र. जोशी ह्यांचे ‘समतावादी कुटुंब!’ ह्या शीर्षकाचे पत्र त्याच विषयावर आपण प्रकाशित केले आहे. त्यांपैकी श्री गं.र. जोशी ह्यांच्या पत्राविषयी माझे मत.
लग्न ह्या विषयाचा आवाका फार मोठा आहे. त्याचे अगणित पैलू आहेत. ती आपल्या सध्याच्या कुटुंबसंस्थेची आधारशिला असल्यामुळे तो संपूर्ण मानवजातीच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
संभ्रमात टाकणारे इतिहास-संशोधन
‘श्रीरामाची अयोध्या उत्तरप्रदेशात नसून अफगाणिस्थानात असावी’ असा दावा बंगलोर येथील इन्डियन इन्स्टिस्टूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सचे डॉ. राजेश कोछर यांनी केल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इन्डियाच्या दि. २० ऑक्टोबर १९९२ च्या अंकात प्रसिद्ध झाले आहे. दुसरी अशाच प्रकारची बातमी नागपूरच्या हितवाद च्या दि. २३ नोव्हेंबर १९९२ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. त्या बातमीत म्हटले आहे की, डॉ. आर.के. पाल नावाच्या हौशी प्राच्यविद्या संशोधकाने गौतम बुद्ध हा मेसोपोटेमियात होऊन गेला, असा शोध लावला. दोन्ही शोध निश्चितच पारंपरिक मताला धक्के देणारे आहेत. जुनी कागदपत्रे, शिलालेख वा पुरातत्त्वीय अवशेष यांच्या नवीन उपलब्धीमुळे नवीन प्रमेये मांडली जातात आणि इतिहासावर नवा प्रकाश पडतो.
आम्हांलाही पूर्वाचार्यांएवढेच अधिकार
पूर्वेतिहास आणि पूर्वाचार हे पुनःपुन्हा पुढे आणून त्यांचे फिरून अवलंबन करा, असे सांगत न बसतां, अलीकडील न्यायाच्या भात्यांतून तीव्र बाण काढून त्यांचा त्यांवर संपात केला पाहिजे. कोणतेहि आचार घालण्यास पूर्वीच्या ऋषींस जितका अधिकार होता तितकाच आम्हांसहि आहे. पूर्वकालीन आचार्यांवर ईश्वराची जितकी कृपा होती, तितकीच आम्हांवरहि आहे, व त्यांच्याशी त्यांचा जितका संबंध होता तितकाच आम्हांसहि आहे. बर्या-वाईटाची निवड करण्याची जितकी बुद्धि त्यांना होती तितकी, तीहून अधिक आम्हांसहि आहे. सृष्टिविषयक ज्ञान जितकें त्यांना होते, तितकें, किंबहुना त्याहून अधिक ज्ञान आम्हांस आहे. सबब त्यांनी घालून दिलेल्या नियमांपैकी जेवढे हितकारक असतील तेवढ्यांचंच आम्ही पालन करणार आणि जे अपायकारक असतील ते टाकून देऊन त्यांचे जागी आम्हांस निर्दोष वाटतील असे नवीन घालणार.
धारणात् धर्म इत्याहुः
गेली काही वर्षे धर्म या विषयावर बरेच विचारमंथन चालू आहे. त्यात एक नवा विचार प्रामुख्याने पुढे येत आहे. तो विचार म्हणजे असा की ‘धर्म म्हणजे religion नव्हे. हिंदुराष्ट्रवादी विचारवंतांकडून यासंबंधात असा युक्तिवाद केला जातो की ‘धर्म म्हणजे religion मानल्याने सेक्युलरिझम (secularism) या विषयासंबंधी मोठा गोंधळ माजून राहिला आहे. ‘Secular’ विरुद्ध ‘ religious’ असल्यामुळे, आणि ‘religious’ म्हणजे धार्मिक असे मानले गेल्यामुळे, ‘सेक्युलर’ म्हणजे ‘निधर्मी, धर्मनिरपेक्ष’ असे अर्थ निष्पन्न झाले आहेत. पण हे चूक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रा. मा. गो.
श्रद्धेपुढे शहाणपण चालत नाही- सावरकर ते भाजप ह्या पुस्तकाच्या निमित्ताने
डॉ. स. ह. देशपांडे ह्यांनी अत्यन्त अभ्यासपूर्वक लिहिलेला सावरकर ते भा. ज. प. हिन्दुत्वविचाराचा चिकित्सक आलेख हा ग्रन्थ माझ्या नुकताच वाचनात आला. ग्रन्थ वाचल्यानंतर माझ्या मनात पुष्कळ विचार आले. त्यांपैकी काही येथे संक्षेपाने मांडण्याचा प्रयत्न करतो.
मुस्लिम विरोधात हिन्दुत्व
हिन्दुत्वविचाराचा आलेख मांडताना डॉ. देशपांडे (सहदे) ह्यांनी फक्त मुस्लिमविरोधात हिन्दुत्व अशी त्याची मांडणी केली असल्यामुळे ग्रंथ वाचून माझे तरी समाधान झाले नाही. लेखकाने मनाशी काही एक निष्कर्ष आधीच काढून ठेवला असून त्या निष्कर्षाला पूरक अशीच अवतरणे (उद्धरणे) त्यांनी प्रचुर मात्रेमध्ये जमविली आहेत असे मनात आल्यावाचून राहिले नाही.
लोकहिताचे विवेकी भाष्यकार : लोकहितवादी
उणीपुरी दोन वर्षे आपण महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी उत्सवाने काढीत आहोत. आपला समाज ज्यावेळी गलितगात्र, स्तंभित आणि संवेदनाहीन होऊन पडला होता त्यावेळी त्यांनी आपल्या आयुष्याच्या कशा मशाली पेटवल्या आणि त्याला चेतवले याचे संस्मरण करणे आपले कर्तव्यच आहे. याच भावनेने आपण आणखीही एका पणतीची आठवण ठेवली पाहिजे. ही आठवण करणे हे जेवढे सौजन्याचे तेवढेच औचित्याचे आणि कृतज्ञपणाचेही होणार आहे. त्या मिणमिणत्या पणतीने पुढे मोठमोठ्या दीपस्तंभांना ज्योत पुरविली आहे. आणि आज तिची गरज आपल्याला मुळीच उरली नाही असेही नाही.
महाराष्ट्रीयांस अनावृत पत्र
अशा मनुष्याच्या लेखात कितीही प्रमाद होत असले व केवढीही कटुता असली तरी ते समंजस मनुष्याच्या स्वल्प आदरास, निदान थोड्याशा अनुकंपेस तरी पात्र झाले पाहिजे. हा वेडा पीर इतके हाल, संकटे व लोकापवाद सोसून ज्या अर्थी इतकी धडपड करीत आहे त्या अर्थी ती लोकांस अंती हितावह होईल अशी निदान याच्या मनाची तरी खात्री असावी असा विचार लोकांच्या मनात येऊन त्यांनी त्याच्या दोषाबद्दल त्यास क्षमा केली पाहिजे. लोकांनी तसे केले तर ठीकच आहे. पण नाही केले तरी त्यास (या लेखकास) विशेषसे वाईट वाटण्याचा संभव नाही; कारण सारे जग त्यावर उलटले तरी प्रसिद्ध संस्कृत कवीच्या विचाराप्रमाणे तो म्हणेल, की खरोखरीच जे या गोष्टीत आमची निर्भर्त्सना करतात त्यांना काहीच समजत नाही व त्यांच्याकरिता हा आमचा प्रयत्नही नाही.