विषय «इतर»

पत्रसंवाद

श्याम कुलकर्णी, sgk664@gmail.com
वाढता हिंसाचार व स्त्रीपुरुषसंख्येतील असमतोल
श्री. रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ यांच्या लेखातील विचार एकांगी वाटतात. प्रत्यक्षात बलात्काराच्या वाढत्या घटना व स्त्रीगर्भाची हत्या करण्याची प्रवृत्ती या दोन्ही गोष्टी अतिशय तिरस्करणीय व दंडनीय आहेत. परंतु या दोन्ही गोष्टींकडे जितक्या गांभीर्याने राज्यकर्त्यांनी पहायला हवे तितक्या गांभीर्याने त्यावर विचार केला जात नाही हेच या समस्योगील मूळ कारण आहे. किंवा राज्यकर्त्या जमातीतील काही व्यक्ती त्यात सामील असल्यामुळेच अशा गुन्ह्यांना अतिशय कठोर शिक्षाच काय पण शिक्षाच होण्याची शक्यता दिसत नाही. अश्या व्यक्ती लैंगिक भूक न भागल्यामुळे नाही तर केवळ सहज उपलब्ध होतात व नंतर त्याचा कोणास पत्ताही लागत नाही याची खात्री असल्यामुळेच अशा संबंधांना चटावतात.

पुढे वाचा

ऊर्जाक्षेत्राचे भवितव्य

ऊर्जाक्षेत्राचे भवितव्य
जनतेला ऊर्जासेवा देण्यासाठी अनेकविध तंत्रविज्ञानात्मक संधी आता उपलब्ध आहेत. त्यामुळे विकसनशील देश विकसित देशांनी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळून सरळ पुढच्या टप्प्यावर पोहोचू शकतात. त्यांच्या सर्जनशील प्रयत्नांमधून जगाला लक्षवेधी वाटावे असे तंत्रज्ञानही निर्माण होऊ शकते.
विकसित देशांत नवीन ऊर्जा प्रतिमान अंमलात आणले गेले तर कमी ऊर्जावापराची शक्यता निर्माण होईल व त्याद्वारे विकसित व विकसनशील देशांच्या ऊर्जावापरातील दरी कमी होत जाईल.
मुख्य म्हणजे आजवरच्या सामान्य समजुतींपेक्षा वेगळा असला तरी समुचित उद्दिष्टांवर आधारित योग्य धोरणात्मक दृष्टिकोण ठेवला तर आपल्याला दिसून येईल की ऊर्जाक्षेत्राचे भवितव्य हे नियतीवर नसून आपल्या निवडीवरच अवलंबून आहे.

पुढे वाचा

संपादकीय

भारतीय अर्थव्यवस्थेच्या आधारभूत संरचनेमध्ये ऊर्जाक्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे. 1980 पर्यंत भारतीय ऊर्जाक्षेत्रात भरीव प्रगती झाली, परंतु त्यानंतरच्या काळात जवळजवळ सर्व राज्यांच्या वीज मंडळांच्या कामकाजात आर्थिक, तांत्रिक, शासकीय पाळ्यांवर अपयश येऊ लागले. 1990मध्ये राज्यसरकारच्या मदतीने खाजगी कंपन्यांनी वीज-उत्पादन-क्षेत्रात प्रवेश केला, परदेशी वित्तसंस्थांच्या मदतीने अनेक राज्य वीजमंडळांची पुनर्रचनाही करण्यात आली.
हे करूनही पुरेसे यश पदरात पडले असे नाही. त्याउलट या सुधारणांच्या काळातच एन्रॉन घोटाळा, ओडिशातील सुधारणांना आलेले सर्वमान्य अपयश असे घडत गेले आहे. नवीन धोरणे व त्यांची तंत्रे याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न-शंका उभ्या राहिल्या, त्यानंतर सरकारतर्फे नवीन शासनपद्धती, नवी व्यूहरचना व नवे वीजदर-धोरण ठरवण्यात येत आहे.

पुढे वाचा

ऊर्जासंकटावर उपाय

अनुवाद : नीलिमा सहस्रबुद्धे
स्वस्त देशी खनिज कोळसा गरिबांच्या ऊर्जागरजांसाठी राखीव ठेवावा. श्रीमंतांना मात्र पुनर्निर्मितिक्षम ऊर्जास्रोतच वापरण्यास भाग पाडावे.
मोटारीने 35 कि.मी. प्रवास करायला जितकी ऊर्जा खर्च होते, तेवढ्याच ऊर्जेत एक LED ट्यूबलाईट वर्षभर रोज चार तास वापरता येतो.
जगातल्या बहुसंख्य देशांना, त्यातल्या समाजांना आप्पलपोटेपणाने ऊर्जावापर करत राहाण्याची सवय जडलेली आहे. गेल्या काही काळातच आपले त्याकडे लक्ष जायला लागलेले आहे. हा मंदीचा काळ असल्यामुळे आणि आपल्याला सर्वांनाच पर्यावरणीय संकटांची चाहूलही लागलेली असल्याने ऊर्जावापर कमी करणे आता अगदी अत्यावश्यक झालेले आहे. असे असूनही संपूर्ण जगाचा ऊर्जावापर गेल्या दहा वर्षात अगदी जोरकस वेगाने वाढतच चाललेला आहे.

पुढे वाचा

आर्थिक विकास आणि ऊर्जा-नियोजन: काही मिथ्ये आणि तथ्ये

प्रयास ह्या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक विश्वस्त आणि प्रयास ऊर्जा गटाचे समन्वयक गिरीश संत यांचे 2 फेब्रुवारी 2012 रोजी अकस्मात निधन झाले. गिरीश संत यांनी ऊर्जाक्षेत्रात सलग वीस वर्षे भरघोस काम केले. ऊर्जाक्षेत्रावर समाजाचे नियंत्रण असावे, त्यातील कमतरता भरून निघाव्यात, याचा फायदा मुख्यतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातल्यांना मिळावा ह्या उद्देशाने त्यांनी प्रयास ऊर्जागटाच्या माध्यमातून काम केले. सकस विश्लेषणावर आधारलेल्या अपेक्षा मांडून सरकारी व्यवस्थांमध्ये बदल घडवून आणता येतो असे त्यांनी दाखवून दिले. अनेक तरुण संशोधकांना ऊर्जा धोरण व प्रशासन या विषयात संशोधन करण्यास उद्यक्त करून सातत्याने प्रेरणा देण्यातही गिरीश संत यांनी फार मोलाची भूमिका बजावली.

पुढे वाचा

प्रस्तावित औष्णिक वीजप्रकल्पांची बेसुमार वाढ

वीज कायदा 2003 अंमलात आल्यानंतर वीज-निर्मिती प्रकल्पांसाठीच्या नियमांमध्ये अनेक बदल झाले. यांतील मुख्य बदल म्हणजे नवीन प्रकल्प उभारण्यासाठी उद्योजकांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे, कुठल्याही परवान्यांची आता त्यांना गरज राहिलेली नाही. अशा परिस्थितीत नेमके किती औष्णिक प्रकल्प प्रस्तावित आहेत व तेही कुठल्या भागात, याची एकत्रित माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्रालय वगळता, इतर कुठल्याही यंत्रणेकडे उपलब्ध नाही. प्रयासने मे 2011 मध्ये पर्यावरण मंत्रालयाच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीचा अभ्यास केल्यावर जे अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले, ते पुढीलप्रमाणे –
1. आपल्या गरजेपेक्षा कितीतरी जास्त प्रकल्पांना पर्यावरणीय मंजुरी दिली गेलेली आहे व त्याहूनही कितीतरी जास्त प्रकल्प पर्यावरणीय मंजुरीच्या विविध टप्प्यांवर आहेत.

पुढे वाचा

सौदेबाजीतून महाविघातक अणुविजेला निमंत्रण

अणु-ऊर्जा ही स्वस्त, सुरक्षित व स्वच्छ असा खोटा दावा करत भारत सरकार 63000 मे.वॅ. क्षमतेचे अणुवीजनिर्मितीचे प्रकल्प हाती घेण्याची स्वप्ने पाहत आहे. भारताजवळ एवढी प्रचंड क्षमता उभी करण्याची कुवत नाही असे कारण पुढे करून आयात इंधन व आयात अणुभट्ट्यांच्या खरेदीचे समर्थन केले जात आहे. खरे तर या निर्णयास अमेरिका व बहुराष्ट्रीय कंपन्या यांचा “दबाव” मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. अणुभट्ट्यांची घातकता व खर्चिकता या कारणांमुळे बहुतेक पाश्चात्त्य देश आज नवीन प्रकल्प तर उभारत नाहीतच पण जर्मनी, स्विट्झरलंड आदि देश चालू अणुभट्याही क्रमशः बंद करून शाश्वत ऊर्जास्रोतांकडे वळत आहेत.

पुढे वाचा

जीवाश्म-इंधनाचे अनुशासन

प्रस्तावना
मृत जैविक अवशेषांचे लाखो वर्षांपूर्वी प्राणवायुरहित विघटन होऊन जे ज्वलनशील पदार्थ तयार झाले, (त्यांचा आपण आता इंधन म्हणून उपयोग करतो), त्यांनाच जीवाश्म-इंधन म्हणतात. त्यात दगडी कोळसा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू याचा सर्वदूर उपयोग केला जातो. या पदार्थांत ऊर्जा ठासून भरलेली असते. ही इंधने पृथ्वीच्या पोटातून बाहेर काढून त्यांचा कार्यक्षमतेने उपयोग करण्याचे तंत्रज्ञान विकसित करतानाच औद्योगिक क्रांती आणि यंत्रयुगाची बीजे पेरली गेली, पण ही इंधने पथ्वीच्या पोटातन बाहेर काढन त्यांचा उपयोग करताना काही विघातक परिणामही जरूर होतात, जसे – खाणीच्या तोंडाशी आणि ज्वलनाच्या जागी होणारे पर्यावरणाचे आत्यंतिक प्रदूषण, ज्वलनानंतर उत्पन्न होणारे हरितगृह वायू इ.

पुढे वाचा

महाराष्ट्रातील वीजक्षेत्राची गेली दोन दशके : आढावा व आह्वाने

कुठल्याही राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम व सशक्त वीजक्षेत्र अपरिहार्य असते. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. मात्र महाराष्ट्रातील वीजक्षेत्राची गेली दोन दशके म्हटली की आठवतो तो एन्रॉनचा कुप्रसिद्ध प्रकल्प व त्यानंतर वाढत्या टंचाईमुळे मागे लागलेला लोड शेडिंगचा त्रास. हे जरी खरे असले, तरी नियामक आयोगाची स्थापना झाल्यापासून व वीज-कायदा 2003 अंमलात आल्यापासून या क्षेत्रात व विशेषतः वितरणक्षेत्रात काही नवीन प्रयोगही राबविण्यात आले आहेत. ह्या गेल्या वीस वर्षांच्या काळात राज्यातील वीजक्षेत्रात काय काय महत्त्वाच्या घडामोडी झाल्या, परिणामी आज परिस्थिती काय आहे व येत्या काळात वीज-क्षेत्राला कोणकोणत्या समस्यांना व आह्वानांना सामोरे जावे लागणार आहे.

पुढे वाचा

पुनर्निर्मितिक्षम ऊर्जा : भविष्यातील ऊर्जाप्रणालीचा पाया

मानवाच्या विकासासाठी व उपजीविकेसाठी पुरेशी, किफायतशीर व अप्रदूषित ऊर्जा अत्यावश्यक आहे. मानवाला सुस्थितीत सन्मानाने जगण्यासाठी ज्या मूलभूत सोयी लागतात त्यासाठी ऊर्जा गरजेची आहे. परंतु भारतातील ऊर्जेची परिस्थिती या दृष्टीने खचितच समाधानकारक नाही. विविध ऊर्जानिर्मिती करताना होणारे प्रदूषण आपल्याला माहीत आहे. या अंकातील इतर लेखांमध्येही त्याबद्दल मांडणी आलेली आहे. प्रदूषण न करणारी म्हणून पुनर्निर्मितिक्षम ऊर्जेबद्दल बोलले जात आहे.
पुनर्निर्मितिक्षम ऊर्जेबद्दल विस्ताराने चर्चा करण्यापूर्वी ऊर्जेच्या स्रोतांविषयी जाणून घेऊ या. निसर्गात दोन प्रकारचे ऊर्जास्रोत आढळतात, 1) ऊर्जेचे साठे उदा. कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू व युरेनियम, 2) ऊर्जेचे प्रवाह उदा.

पुढे वाचा