विषय «इतर»

बाल-सुरक्षा कायदा: बालकेंद्री पण अपूर्ण!

स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांनी आलेला हा कायदा बालकांची लैंगिक कुचंबणा, त्यांच्यावर होणारे अत्याचार टाळण्यासाठी उपयोगी पडावा, अशी जर आपली इच्छा असेल, तर ‘कायदा आला रे आला’ या आनंदापलीकडे जाऊन त्यात असलेल्या त्रुटी दूर करण्याचाही विचार आणि प्रयत्न करणे आवश्यक आहे. अन्यथा ढोबळ आणि भोंगळ मांडणीमुळे इतर अनेक कायद्यांप्रमाणेच त्यातल्या फटी बालकाला न्याय मिळवून न देता गुन्हेगारांसाठी निसटून जायला वाट देणाऱ्या ठरतील. अगदी नावापासून बघितले, त्यात सुरक्षेचा उल्लेख आहे, पण प्रत्यक्षात मात्र अत्याचार घडल्यावर गुन्हेगाराला शासन कसे व्हावे, न्यायालयीन प्रक्रियेत अत्याचारित बालकाला आणखी क्लेश होऊ नयेत, याची काळजी कशी घ्यावी यासाठी रचनात्मक तरतूद त्यात केलेली दिसते.

पुढे वाचा

इतर

मी हे पुस्तक लिहिलं नसतं तर माझ्यासाठी बरं झालं असतं. फार फार बरं झालं असतं. हे लिहिणं मला नको इतकं महागात पडतंय.किती प्रयत्न करते आहे, आठवायचा, पण आठवतच नाहीय, माझ्यावरपहिल्यांदा अत्याचार कधी झाला. मला जे आठवतं आहे, तीच पहिली वेळ होती की त्याआधीही असं घडलं होतं, आणि मी ते बाहेर येऊच दिलेलं नव्हतं. या विचारांना काही अर्थ नाही, आणि ते आता महत्त्वाचेही नाहीत, हे कळतं मला; पण हे पुस्तक लिहिताना प्रत्येक वेळी मला माझ्या या विचारांशी लढावं लागतं, आणि ते माझा घात करतात.

पुढे वाचा

परिचयः पुस्तक/नाटक/सिनेमा ‘धागेदोरे’च्या निमित्ताने

काही आठवड्यांपूर्वी ‘झी टॉकीज्’वर ‘धागेदोरे’ हा सिनेमा दाखविला गेला. स्त्रियांच्या संदर्भात त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सध्या वातावरण प्रचंड तापलेले आहे. व ते योग्यही आहे. परंतु ह्या प्रश्नाची दुसरी बाजू, जी संख्यात्मकदृष्ट्या स्त्रियांवरील अत्याचारांच्या संख्येपेक्षा बरीच छोटी असू शकेल, ह्या चित्रपटात यथार्थपणे अधोरेखित केलेली आहे. त्यासंबंधी थोडे विश्लेषण व चिंतन आवश्यक आहे. श्रीमंत आईवडिलांच्या मर्जीविरुद्ध लग्न केलेल्या आपल्या मुलीला तिच्या नवऱ्याने मुद्दाम खिडकीतून खाली ढकलले व त्यामुळे तिचा मृत्यू झाला असा आरोप तिचे आईवडील करतात. केस कोर्टात उभी राहते. आरोपीची वकील मैत्रीण – जी त्याच्या मृत झालेल्या बायकोचीही बालमैत्रीण असते – त्याची केस कोर्टात लढवून त्याची आरोपातून मुक्तता करते.

पुढे वाचा

मानवी अस्तित्व (११)

माणूस प्राणी नामशेष होणार का?

अमरत्वाचे स्वप्न पाहणाऱ्या मानवाला मृत्यूच्या बरोबरच्या झोंबाझोंबीत अजूनही म्हणावे तसे यश मिळालेले नाही. उलट हा लढा माणसाला गोत्यात आणत आहे. परंतु आता आपल्याला वैयक्तिक मृत्यूबद्दलचा (स्वार्थी!) विचार करायचा नसून संपूर्ण मानववंशाच्या अस्तित्वाबद्दल काळजी करायची आहे. विशिष्ट दिवशी हा मानव वंश नामशेष होणार, मानवासकट जगातील समस्त प्राणिवंश नष्ट होणार, महाप्रलय येणार, याबद्दलची भाकिते अधूनमधून वाचायला मिळत असतात. आजकाल असल्या अवैज्ञानिक भाकितांची भीती वाटेनाशी झाली आहे. आजच्या मानवाऐवजी दुसरा एखादा मानवसदृश प्राणी उत्क्रांत होत असल्यास त्याची भीती बाळगण्याचेही कारण नाही.

पुढे वाचा

आकडेबाजी (४): आकडेबाजीतून अपेक्षाभंग

वास्तव काय आहे याबद्दल आपल्या काही कल्पना असतात, अंदाज असतात. कधीकधी या अंदाजांना, या अपेक्षांना ठोस आणि थेट आधार नसतो. काही अर्थी अंतःप्रेरणा, ळपीळींळेप वगैरे नावांनी ओळखली जाणारी नेणीवच काम करत असते. जर प्रत्यक्ष परिस्थिती तपासताना कल्पनेने, अंदाजाने उभारलेल्या अपेक्षांपेक्षा काही वेगळे चित्र दिसले, तर ? तर नुसताच अपेक्षाभंग होत नाही, तर वास्तवाची आपली समजच चुकीची ठरते. हे जग आपण समजत होतो तसे नाही, असे जाणवते.
ए का स्नेह्याने मे २०१३ च्या सुरुवातीला एक पी. साईनाथांचा लेख पाठवला. त्यात शेतकरी आणि शेतीवर ज्यांची उपजीविका अवलंबून आहे ते लोक, या दोन गटांधल्या फरकावर बरीच चर्चा होती.

पुढे वाचा

मोरपीस तळ ढवळतानाः एक आकलन

१९८० नंतरच्या काळात लहू कानडे यांची कविता पुढे आली. आत्मभानाचा सशक्त आविष्कार करणाऱ्या या कवितेची नाळ विद्रोही युगजाणिवेशी आहे. लहू कानडे यांच्या कवितेला असणारा स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या लोकशाही मूल्यव्यवस्थेचा संदर्भ या कवितेचा महत्त्वाचा गुणविशेष आहे. क्रांतिपर्व (१९८३ आणि टाचा टिभा हे लहू कानडे यांचे सुरुवातीचे दोन कवितासंग्रह याची साक्ष देतात. याचाच पुढचा टप्पा म्हणजे त्यांचा अलीकडे २०१२ मध्ये प्रकाशित झालेला ‘तळ ढवळताना’ हा कवितासंग्रह होय.
ज्ञान-संपत्ति-अधिकारांपासून दूर ठेवण्यात आलेल्या वर्गाला भारतीय राज्यघटनुळे मानवी अधिकार मिळाले. त्यांच्या कर्तृत्वाला संधी मिळून त्यांच्या अभिव्यक्तीची कवाडे खुली झाली.

पुढे वाचा

अनवरत भंडळ (४)

मेंदूचे अंतरंग
डॉ. जिल टेलर या अमेरिकेतील सुप्रसिद्ध मेंदूरचना शास्त्रज्ञ (neuroscientist) आहेत. मानवी मेंदूतील पेशींचा मनोविकारांशी ने का काय संबंध असतो, या बाबतीत संशोधन करत असताना वयाच्या अवघ्या सदोतीसाव्या वर्षी डॉ. टेलर यांना स्वत:लाच ब्रेन स्ट्रोक आला. त्यांच्या मेंदू ध्ये रक्तस्राव होऊन मेंदूची डावी बाजू दुखापतग्रस्त झाली व त्यामुळे शरीराचा उजवा हिस्सा पांगळा झाला. त्यांच्या मेंदूची शल्यक्रिया करून लिंबाच्या आकाराची साकळलेल्या रक्ताची गाठ काढून टाकण्यात आली. त्यानंतर विलक्षण जिद्द, चिकाटी व परिश्रमांच्या परिणामी डॉ. टेलर सुमारे आठ वर्षानंतर पूर्ववत् (नॉल) होऊ शकल्या.

पुढे वाचा

हिंसाचार व मार्क्सवाद

गेल्या महिन्यात छत्तीसगडमध्ये जे हत्याकांड झाले, ते माणुसकीला काळिमा फासणारे होते. त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. हिंसाचार आणि दहशतवादाचे समर्थन होऊच शकत नाही. छत्तीसगडमधील हिंसाचार भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी लेनिनवादी) – यांना माओवादी किंवा नक्षलवादी असेही म्हणतात – यांनी केला असल्यामुळे साधारणपणे समाजात हे कृत्य मार्क्सवाद मानणाऱ्या, माओत्सेतुंग विचाराच्या, स्वतःला मार्क्सवादी लेनिनवादी (नक्षलवादी) म्हणवून घेणाऱ्या लोकांनी केले आहे असे चित्र उभे राहणे स्वाभाविक आहे, परंतु ते तसे नाही. वस्तुस्थिती बरीच वेगळी आहे. मार्क्सने मानवी स्वतंत्र्याचे जे उत्तुंग स्वप्न पाहिले त्यात हे कुठेच बसत नाही.

पुढे वाचा

टिप्पणीविना: स्वच्छतेची झळी

गेल्या दोन वर्षांपासून पुणे येथील कचरावेचक संघटना सॅनिटरी पॅड तयार करणाऱ्या कंपन्यांचे लक्ष वेधू पाहात आहेत. ह्या संघटना सॅनिटरी पॅडही उचलतात, परंतु त्यांनी शेवटपर्यंत ह्या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यामुळे स्वच्छ पुणे सहकारी संस्था मर्यादित ह्या संस्थेला एक आगळे पाऊल उचलावे लागले. ह्या कामातील प्रॉक्टर गॅबल्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, जॉन्सन जॉन्सन आणि किंबले क्लार्क लिव्हर ह्या चारही कंपन्यांना, वापरलेल्या सॅनिटरी पॅडचे गट्ठे बांधून त्यांनी चक्क परत पाठवले. आम्ही ह्याचे काय करायचे ते सांगा, असा त्यांचा खडा सवाल आहे.
आपल्या वस्त्रांध्ये होऊ लागलेला कृत्रिम धाग्याचा बेसुार वापर आणि प्रजननक्षम वयातील युवतींना बराच वेळ घराबाहेर राहण्याची करियरसक्ती ह्यांळे सॅनिटरी पॅड आजच्या युगात अनिवार्य मानले गेले आहेत.

पुढे वाचा

कर्मयोगातील हानी

कर्मयोगातील हानी
— विनोबा
… आपल्या संस्थांचा जीवनरस उडून जात आहे, त्याचे कारण स्वाध्यायाचा अभाव हे आहे. आपण कर्मयोगात पडलो आहोत. कर्मयोगात लाभाबरोबर हानीहि होते. शंकराचार्य, रामानुज, बुद्ध, महावीर आदींच्या अनुयायांचे जे काही दोष होते, ते आपण सुधारले आहेत ही गोष्ट खरी. आपण कर्मयोगावर जास्त जोर दिला. ही सुधारणा जरुरीची होती. परंतु ते लोक आत्मज्ञानात जितके खोल उतरत होते, तितके खोल आपण उतरत नाही. यामुळे कार्याच्या विकासाबरोबर आपली विचारनिष्ठा नि तत्त्वनिष्ठा घटत जाते. आपल्या कामाचा बोजा वाढत जातो, पण त्यातील तत्त्व नष्ट होत आहे.

पुढे वाचा