राजीव साने, 2, स्नेह क्लासिक्स्, 7/1 एरंडवणे, पाडळे पॅलेससमोरील रस्ता, पुणे 411004 चौसाळकरांना उमजलेला मार्क्स : काही प्रश्न आजचा सुधारकच्या नोव्हेंबर 2010 च्या अंकात सुधीर बेडेकर यांनी लिहिलेले परीक्षण (मार्क्सवाद-उत्तरमार्क्सवाद ले. प्रा. अशोक चौसाळकर) वाचले. त्यातून बऱ्याच आशा पल्लवित झाल्या. परंतु पुस्तक वाचल्यावर मात्र निराशा झाली. पहिली दोन प्रकरणे खुद्द मार्क्सवर आहेत. या दोन प्रकरणात इतक्या घसरड्या जागा निघाल्या की त्यावर प्रश्न उपस्थित करण्यातच प्रस्तुत लेख खर्ची पाडावा लागला. पुस्तकाच्या पुढील भागातही आक्षेपार्ह असे बरेच काही आहे पण ते या लेखाच्या मर्यादेत घेणे शक्य नाही.
विषय «इतर»
बहुजनहितासाठी नवे राजकारण
[मायकेल सँडल यांचे चौथे व शेवटचे व्याख्यान ‘बहुजनहितासाठी नवे राजकारण’ ह्या विषयार होते. हे व्याख्यान अमेरिकेच्या राजधानीत, जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीत झाले. व्याख्यानाची पूर्वपीठिका अशी, की इंग्लंड व अमेरिका हे दोन्ही बलाढ्य देश लोकशाहीचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात. परंतु असे असले तरी ह्या दोन्ही देशांचे राजकारण सकृत्दर्शनी परस्परविरोधी दिसणाऱ्या टोकांमध्येच, म्हणजे प्रत्यक्षात एकाच रिंगणात अडकून पडले होते. कालांतराने आता ह्या दोन्ही देशांमधील लोकशाही व सांसदीय राजकारण यांच्या मर्यादा हळूहळू हग्गोचर होऊ लागल्या आहेत. गेल्या वर्षीपासून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी असलेले बराक ओबामा यांनी आता ह्या राजकीय तोचतोपणामधून उंच भरारी घेऊन एका नव्या जगाचे स्वप्न आपल्या सर्वांना दाखविले आहे.
अंधश्रद्धानिर्मूलनार्थ (भाग १)
[आमचे जुने वर्गणीदार व हितचिंतक सीताराम दातार यांनी अंधश्रद्धेबाबत विवेकवादी भूमिका श्लोकबद्ध केली आहे. मूळ संस्कृत रचना ‘अन्धश्रद्धाविनाशाय’ या नावाने असून तिचे समश्लोकी मराठी रूपांतर ‘अन्धश्रद्धा निर्मूलनार्थ’ या नावाने आहे. याशिवाय ‘For the eradication of superstitions’ नावाने इंग्रजीत गद्यरूपात प्रत्येक श्लोकाचा अर्थ विशद केला आहे. या प्रचंड परिश्रमाबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. हे काम पूर्ण होताच श्री दातारांनी आम्हाला हा मजकूर पाठवून योग्य वाटेल तसा उपयोग करण्याची परवानगीही दिली, याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. येत्या काही अंकांमधून आम्ही या काव्याचा मराठी भाग प्रकाशित करत आहोत.
कठीण समय येता….
ज्यांची देवाच्या अस्तित्वावरच नव्हे तर देवाच्या चांगुलपणावर व दयाळूपणावरदेखील श्रद्धा आहे ते लोक सहसा प्रतिपादन करतात की संकटसमयी ही श्रद्धा अनेकांसाठी दिलासाकारक ठरते. ह्या प्रतिपादनाचा जरा खोलात जाऊन विचार करू या.
जेव्हा आयुष्यात अडचणी येतात, जेव्हा जगण्यातला आनंदच हरवला आहे असे वाटते, तेव्हा स्वतःची समजूत काढण्याचे वेगवेगळे मार्ग लोक वापरतात. एक प्रकारची माणेस स्वतःला सांगतात, “सध्याच्या दुःखभोगामागे सर्वशक्तिमान परमेश्वराची अंतिमतः माझ्या भल्यासाठीच काही योजना असेल. मला कदाचित ती समजू शकत नसेल, तेव्हा प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करून दुःख आणि वेदना निमूटपणे सोसाव्यात हेच माझ्या हिताचे आहे.”
पुस्तक-परिचय : महागाईची जन्मकुंडली
आपल्याला दैनंदिन गरजा भागविण्यासाठी बाजारात पाय टाकल्याशिवाय पर्याय नसतो. आणि बाजारात पाय टाकला की आपण महागाईचे चटके अनुभवतो आणि मग स्वतःशीच पुटपुटतो. “काय ही महागाई’. महागाई वाढण्याचे कारण काय असेल तर बाजारात वस्तूंचा तुटवडा, असे ढोबळ उत्तर देत आपण सामान्य लोक बाजारातून काढता पाय घेतो.
आज महागाई हा शब्द आपण रोज ऐकतो. महागाई म्हणजे काय? महागाईस कोण जबाबदार? देशातल्या कोणत्या घटकाला या महागाईचा फटका बसतो? हा महागाईचा प्रश्न सुटायला हवा असे वाटत असेल तर यावरचा उपाय काय? महागाईचा शेतकऱ्यांशी काय संबंध?
पुस्तक-परिचय : प्रोमीथियन अग्नी
पुस्तकाचे नाव Promethean Fire : Reflections on the Origin of the Mind आहे. (लेखक – चार्ल्स जे लुम्स्डेन व इ.ओ. विल्सन, हार्वर्ड युनि. प्रेस, 1983) [ ग्रीक पुराणांमध्ये देवांकडून अग्नी चोरून आणणाऱ्या प्रोमीथियस नावाच्या योद्ध्याची कथा आहे. तिच्या आधाराने ‘देवत्व पावण्याचा हव्यास’ याचे रूपक म्हणून प्रोमीथियसचे मिथक वापरले जाते. – सं.]
जितके नाव जड, तितकेच पुस्तकही वाचायला जड आहे. बहुतांश संदर्भ जीवशास्त्र आणि जनुकशास्त्रामधले, ज्याचा आणि माझा दहावीनंतर कधीही संबंध आला नव्हता. बरे, जेवढे कळत होते तेवढेही कितपत कळलेले आहे याबद्दल शंकाच आहे!
पत्रसंवाद
राजीव जोशी, ‘तत्त्वबोध’, नेरळ माथेरान रोड, कल्याण कर्जत हायवे, नेरळ, जि. रायगड – 01. फोन 02148 238652, 9923103301 (dr..rjeevjoshi@yahoo.com)
सप्टेंबर 2010 च्या अंकातील कार्यकारी संपादकांच्या टिप्पणीबाबत : “मूळ प्रश्नांना हात घालण्याची तयारी आणि मानसिकता…. नाही” हे तुम्ही मान्य केले आहेच. आता “मूळ प्रश्न कोणते?” याबाबतचे मत प्रामाणिक आहे? (आणि त्याच्या चर्चेसाठी मन खुले आहे) किंवा ते एका मानसिकतेने केलेला जाणीवपूर्वक देखावा आहे. हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. चिदंबरन, राहुल गांधी यांनी टीका केलेल्या ‘RSS’ आणि ‘सिमी’ च्या भगव्या हिरव्या दहशतवादाच्या दडपणाखालीसुद्धा मानसिकता बदलू शकते.
जनुकी आणि नीतितत्त्वे
23 जून 2009 ह्या दिवशी ‘रीथ लेक्चर्स’ ह्या भाषणमालिकेचा भाग म्हणून हार्वर्ड महाविद्यालयाचे प्रो. मायकेल सँडल् हे आनुवंशिकी-जनुकी म्हणजेच ‘जेनेटिक्स’ – आणि नैतिकता ह्या विषयांवर बोलले. व्याख्यानाच्या सुरुवातीला प्रास्ताविक म्हणून स्यू लॉली ह्या संयोजिकेबरोबर पुढीलप्रमाणे चर्चा झाली.
स्यू लॉली : मायकेल, तू प्रेसिडेंट जॉर्ज बुशच्या जैविक नैतिकता समितीवर – Bioethics commitee वर चार वर्षे होतास. त्या समितीत बऱ्याच उलटसुलट चर्चा व्हायच्या, की ते तसे रूढिवादी लोक होते?
मायकेल सँडल् : प्रे. बुशनीच त्यांचे नियोजन केलेले असल्यामुळे ते रूढिवादीच होते. म्हणूनच मला त्यांनी बोलावल्याचे मला आश्चर्य वाटले.
संपादकीय तुमच्याशिवाय नाही (भाग 3)
समाजाच्या एका भागाला लाभदायक आणि आवश्यक वाटणाऱ्या कृती दुसऱ्या एखाद्या भागाला जाचक ठरतात. दुसऱ्याला त्रास देणे, हा पहिल्या गटाचा हेतू नसतो. पण तो अटळ उपपरिणाम मात्र असू शकतो. असे विषमतेला जन्म देणारे, तीव्र करणारे उपपरिणाम अखेर मुळात कोणाला तरी लाभदायक वाटणाऱ्या हेतूंनाच बहकावून नेतात. हे ओळखून असे घातक उपपरिणाम टाळून मूळ हेतू जास्त व्यापक करणे, हाच दूरदृष्टीचा स्वार्थ. यालाच नीतीने वागणे, असेही म्हणतात; आणि विवेकाने वागणे, असेही म्हणतात.
आपण असे समजतो की ही दूरदृष्टी, ही नीतीची जाण, हा विवेक शासनयंत्रणा दाखवेल परंतु दूरदृष्टीने कृती निवडणे सोपे नसते.
पुस्तक परीक्षण : विसाव्या शतकातील मार्क्सवाद
अशोक चौसाळकर यांचे ‘मार्क्सवाद उत्तरमार्क्सवाद’ हे पुस्तक विसाव्या शतकातील मार्क्सवादी विचारांचा विस्तृत पट आपल्यासमोर उलगडून ठेवते. विशेषतः आजच्या घडीला याचे विशेष महत्त्व आहे व उपयोग आहे. भारतात व महाराष्ट्रात मार्क्सवादावर आधारलेल्या चळवळी आज बऱ्याचशा मंदावलेल्या आहेत व कुंठित अवस्थेला आलेल्या आहेत. दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला व इतर काही देश वगळता जगभरसुद्धा हीच परिस्थिती दिसत आहे. केवळ या ना त्या नेतृत्वाच्या चुकांमुळे किंवा अमुक अपप्रवृत्तींची लागण झाल्यामुळे हे घडलेले नाही. तसेच, जणू काही एक अमोघ व परिपूर्ण असे मार्क्सवादी-लेनिनवादी सिद्धान्तन तयारच आहे; फक्त त्याच्या चुकीच्या उपयोजनामुळे हे घडत आहे असे म्हणणेही बरोबर नाही.