विषय «इतर»

पुस्तक-परिचय : महागाईची जन्मकुंडली

आपल्याला दैनंदिन गरजा भागविण्यासाठी बाजारात पाय टाकल्याशिवाय पर्याय नसतो. आणि बाजारात पाय टाकला की आपण महागाईचे चटके अनुभवतो आणि मग स्वतःशीच पुटपुटतो. “काय ही महागाई’. महागाई वाढण्याचे कारण काय असेल तर बाजारात वस्तूंचा तुटवडा, असे ढोबळ उत्तर देत आपण सामान्य लोक बाजारातून काढता पाय घेतो.

आज महागाई हा शब्द आपण रोज ऐकतो. महागाई म्हणजे काय? महागाईस कोण जबाबदार? देशातल्या कोणत्या घटकाला या महागाईचा फटका बसतो? हा महागाईचा प्रश्न सुटायला हवा असे वाटत असेल तर यावरचा उपाय काय? महागाईचा शेतकऱ्यांशी काय संबंध?

पुढे वाचा

पुस्तक-परिचय : प्रोमीथियन अग्नी

पुस्तकाचे नाव Promethean Fire : Reflections on the Origin of the Mind आहे. (लेखक – चार्ल्स जे लुम्स्डेन व इ.ओ. विल्सन, हार्वर्ड युनि. प्रेस, 1983) [ ग्रीक पुराणांमध्ये देवांकडून अग्नी चोरून आणणाऱ्या प्रोमीथियस नावाच्या योद्ध्याची कथा आहे. तिच्या आधाराने ‘देवत्व पावण्याचा हव्यास’ याचे रूपक म्हणून प्रोमीथियसचे मिथक वापरले जाते. – सं.]

जितके नाव जड, तितकेच पुस्तकही वाचायला जड आहे. बहुतांश संदर्भ जीवशास्त्र आणि जनुकशास्त्रामधले, ज्याचा आणि माझा दहावीनंतर कधीही संबंध आला नव्हता. बरे, जेवढे कळत होते तेवढेही कितपत कळलेले आहे याबद्दल शंकाच आहे!

पुढे वाचा

पत्रसंवाद

राजीव जोशी, ‘तत्त्वबोध’, नेरळ माथेरान रोड, कल्याण कर्जत हायवे, नेरळ, जि. रायगड – 01. फोन 02148 238652, 9923103301 (dr..rjeevjoshi@yahoo.com)

सप्टेंबर 2010 च्या अंकातील कार्यकारी संपादकांच्या टिप्पणीबाबत : “मूळ प्रश्नांना हात घालण्याची तयारी आणि मानसिकता…. नाही” हे तुम्ही मान्य केले आहेच. आता “मूळ प्रश्न कोणते?” याबाबतचे मत प्रामाणिक आहे? (आणि त्याच्या चर्चेसाठी मन खुले आहे) किंवा ते एका मानसिकतेने केलेला जाणीवपूर्वक देखावा आहे. हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. चिदंबरन, राहुल गांधी यांनी टीका केलेल्या ‘RSS’ आणि ‘सिमी’ च्या भगव्या हिरव्या दहशतवादाच्या दडपणाखालीसुद्धा मानसिकता बदलू शकते.

पुढे वाचा

जनुकी आणि नीतितत्त्वे

23 जून 2009 ह्या दिवशी ‘रीथ लेक्चर्स’ ह्या भाषणमालिकेचा भाग म्हणून हार्वर्ड महाविद्यालयाचे प्रो. मायकेल सँडल् हे आनुवंशिकी-जनुकी म्हणजेच ‘जेनेटिक्स’ – आणि नैतिकता ह्या विषयांवर बोलले. व्याख्यानाच्या सुरुवातीला प्रास्ताविक म्हणून स्यू लॉली ह्या संयोजिकेबरोबर पुढीलप्रमाणे चर्चा झाली.

स्यू लॉली : मायकेल, तू प्रेसिडेंट जॉर्ज बुशच्या जैविक नैतिकता समितीवर – Bioethics commitee वर चार वर्षे होतास. त्या समितीत बऱ्याच उलटसुलट चर्चा व्हायच्या, की ते तसे रूढिवादी लोक होते?

मायकेल सँडल् : प्रे. बुशनीच त्यांचे नियोजन केलेले असल्यामुळे ते रूढिवादीच होते. म्हणूनच मला त्यांनी बोलावल्याचे मला आश्चर्य वाटले.

पुढे वाचा

संपादकीय तुमच्याशिवाय नाही (भाग 3)

समाजाच्या एका भागाला लाभदायक आणि आवश्यक वाटणाऱ्या कृती दुसऱ्या एखाद्या भागाला जाचक ठरतात. दुसऱ्याला त्रास देणे, हा पहिल्या गटाचा हेतू नसतो. पण तो अटळ उपपरिणाम मात्र असू शकतो. असे विषमतेला जन्म देणारे, तीव्र करणारे उपपरिणाम अखेर मुळात कोणाला तरी लाभदायक वाटणाऱ्या हेतूंनाच बहकावून नेतात. हे ओळखून असे घातक उपपरिणाम टाळून मूळ हेतू जास्त व्यापक करणे, हाच दूरदृष्टीचा स्वार्थ. यालाच नीतीने वागणे, असेही म्हणतात; आणि विवेकाने वागणे, असेही म्हणतात.

आपण असे समजतो की ही दूरदृष्टी, ही नीतीची जाण, हा विवेक शासनयंत्रणा दाखवेल परंतु दूरदृष्टीने कृती निवडणे सोपे नसते.

पुढे वाचा

पुस्तक परीक्षण : विसाव्या शतकातील मार्क्सवाद

अशोक चौसाळकर यांचे ‘मार्क्सवाद उत्तरमार्क्सवाद’ हे पुस्तक विसाव्या शतकातील मार्क्सवादी विचारांचा विस्तृत पट आपल्यासमोर उलगडून ठेवते. विशेषतः आजच्या घडीला याचे विशेष महत्त्व आहे व उपयोग आहे. भारतात व महाराष्ट्रात मार्क्सवादावर आधारलेल्या चळवळी आज बऱ्याचशा मंदावलेल्या आहेत व कुंठित अवस्थेला आलेल्या आहेत. दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला व इतर काही देश वगळता जगभरसुद्धा हीच परिस्थिती दिसत आहे. केवळ या ना त्या नेतृत्वाच्या चुकांमुळे किंवा अमुक अपप्रवृत्तींची लागण झाल्यामुळे हे घडलेले नाही. तसेच, जणू काही एक अमोघ व परिपूर्ण असे मार्क्सवादी-लेनिनवादी सिद्धान्तन तयारच आहे; फक्त त्याच्या चुकीच्या उपयोजनामुळे हे घडत आहे असे म्हणणेही बरोबर नाही.

पुढे वाचा

पुस्तक-परीक्षण : इट टेक्स अ व्हिलेज…..

जगाच्या पाठीवरचे कुठलेही मूल आईबापांच्या वाटेनेच जगात आलेले असले तरी तेवढ्यावरच वाढत नाही. त्याच्या वाढण्यात भोवतालच्या प्रत्येक गोष्टीचा – माणसांचा जनावरांचा घरांचा – बागांचा रस्त्यांचा पुलांचा संस्थांचा व्यवस्थांचा – संशोधनांचा – बाजारांचा जाहिरातींचा त्यामागे असणाऱ्या मानवी मेंदूंचा – त्यांच्या क्षमतांचा, कमीअधिक समजुतदारीचा परिणाम असतो. आणि ह्या सगळ्यांमुळेच मुलांची जी काय व्हायची ती वाढ होत असते.

हेच सांगणारे एक पुस्तक – इट टेक्स अ व्हिलेज…. (लिहिले आहे, श्रीमती हिलरी रोधाम क्लिंटन ह्यांनी (रोधाम हे बाईंच्या माहेरचे आडनाव आहे, तर क्लिंटन हे सासरचे).

पुढे वाचा

चित्रपट-परीक्षण : नटरंग : नाच्याच्या जीवनाची शोकांतिका

आनंद यादव यांच्या ‘नटरंग’ या ग्रामीण कादंबरीवर प्रदर्शित झालेला चित्रपट, तमाशा कलावंतांच्या जीवनाची शोकांतिका मांडतो. तमाशाकडे आजही टाकाऊ कला म्हणून पाहिले जाते. त्यात काम करणारे कलावंत उपेक्षित राहतात. त्यांची भटकंती चालूच असते. या कला व कलावंतांकडे बघण्याची दृष्टी बदलावी, असा संदेश हा चित्रपट देतो.

बाळू मांगाच्या पोटी जन्मलेला गुणा हा तमाशाच्या वेडाने झपाटलेला आहे. तमाशात राजा होऊन झकास वग लावावा, आपल्या कलेने लोकांना मंत्रमुग्ध करावे, हे त्याचे स्वप्न असते. परंतु त्याला नाच्या व्हावे लागते. नाच्या म्हणून त्याला लोकांनी स्वीकारल्यानंतर ते त्याला अर्जुनाच्या भूमिकेत स्वीकारत नाहीत.

पुढे वाचा

पत्रसंवाद

संजीवनी चाफेकर, ब-5, सुहृद सोसायटी, मेहेंदळे गॅरेजसमोर, एरंडवणे, पुणे 411004. Sanjeevani@gmail.com ज्या स्त्रियांवर बाळंतपण लादलेले असते (मग त्या विवाहित असोत किंवा बलात्कारित) त्या स्वतःच्याच (जनुकीय) अपत्याच्या सरोगेट मदर (सेल्फ सरोगसी) नव्हेत काय? लादलेले गर्भारपण असले तर, केवळ बीज स्वतःचे आहे म्हणून त्याविषयी आत्मीयता वाटणार नाही. भारतासारख्या देशात अशा गुलामी/दास्याने पीडित असणाऱ्या असंख्य स्त्रिया आहेत. सँडेल यांना कदाचित ही परिस्थिती माहीत नसावी. त्यामुळे ते दासी / गुलाम म्हणून अत्यंत वाईट स्थितीत असलेल्या सेल्फ सरोगेटचा विचार न करता फक्त करारान्वये सरोगसी करणाऱ्या स्त्रियांविषयी भाष्य करत आहेत.

पुढे वाचा

अणुकचरा आणि जैतापूर प्रकल्पः वास्तव व त्यासंदर्भातील एकवीस वैज्ञानिक प्रश्न

दै. लोकसत्ता दि.२१ जुलै २०१० मध्ये माजी शास्त्रज्ञ रवींद्र काळे यांनी ‘अणुकचरा : भीती व वास्तव’ हा लेख लिहिला आहे. या विषयावर वैज्ञानिक चर्चा होणे, विशेषतः जैतापूरच्या संदर्भाने, हे खरोखरच अत्यंत आवश्यक आहे. यापूर्वीच्या काळात भारताच्या अणुकार्यक्रमाबाबत काटेकोर व परिपूर्ण वैज्ञानिक चर्चा गुप्ततेच्या कारणांमुळे कधीच होऊ शकली नाही हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. जैतापूर हा नागरी ऊर्जाप्रकल्प आहे आणि त्यामुळे त्यात गुप्ततेची आवश्यकता नाही. अशा प्रकल्पांबाबत गुप्तता राखणे हे लोकहिताचेही नाही. अशा कोणत्याही प्रकल्पाच्या सर्व अंगांबाबत परिपूर्ण वैज्ञानिक चर्चा झाल्याशिवाय असा प्रकल्प पुढे जाणे देशहिताचेही नाही.

पुढे वाचा