Category «इतर»

मेकॉलेचे चारित्र्यहननः एक लाजिरवाणा अध्याय

ऐतिहासिक घटना किंवा व्यक्ती यांचे विश्लेषण करताना आपण बरीच माहिती गोळा करतो. ते करताना एक महत्त्वाचा दंडक पाळावा लागतो, तो म्हणजे माहिती तत्कालीन संबद्ध व्यक्तींनी लिहिलेली असावी व ती व्यक्तीही विश्वासार्ह असावी. माहितीवर आधारलेल्या व्यक्तिगत मतापेक्षा त्या व्यक्तीने घटनेचे केलेले चक्षुर्वैसत्यं वर्णन महत्त्वाचे असते. घटना घडून काही वर्षे गेल्यावर आठवणीप्रमाणे लिहिलेले वर्णन कमी विश्वासार्ह असते. आज प्रत्यक्षात अनेक लेखक ही पथ्ये पाळत नाहीत त्यामुळे हास्यास्पद निष्कर्ष काढतात. काही वेळा असा प्रकार अज्ञानातून होतो व ते क्षम्यही आहे. पण बऱ्याच वेळा तद्दन खोटा प्रचार जाणूनबुजून केला जातो व ते अश्लाघ्य आहे.

पुढे वाचा

पुन्हा ‘सुप्रजनन’!

[हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ ? हे एडवर्ड ॲल्बीचे बहुचर्चित नाटक (थहे ळी अषीरळवष तळीसळपळर थेश्रष?, Edward Albee, Pocket Books, १९६२) व नंतर अनेक आवृत्त्या). त्यावर १९६५ च्या सुमाराला एक चित्रपटही निघाला (रिचर्ड बर्टन, एलिझाबेथ टेलर).
एक विनापत्य, पराभूत वयस्क जोडपे : जॉर्ज हा इतिहासाचा प्राध्यापक, वय ४६ वर्षे आणि मार्था, विद्यापीठाच्या अध्यक्षाची मुलगी, वय ५२ वर्षे. एका रात्री या जोडप्याकडे दोन पाहुणे येतात : निक् हा जीवशास्त्राचा प्राध्यापक, वय २८ वर्षे; आणि त्याची पत्नी हनी, वय २७ वर्षे. मार्था निक्कडे आकर्षित झालेली असते.

पुढे वाचा

‘प्रायव्हेट प्रॉपर्टी’

कार्ल मार्क्सने सुमारे दीडशे वर्षांपूर्वी म्हटले होते की, बाजारपेठ ही विनिमय व नियमनाची बाब आहे, पण जेव्हा बाजारपेठ हे जीवनाचे तत्त्वज्ञान होते आणि ‘प्रायव्हेट प्रॉपर्टी’, म्हणजे खासगी संपत्ती हेच सर्व मानवी व्यवहाराचे ‘चलन’ होते, तेव्हा समाजच रानटी स्थितीत जातो. त्या रानटी स्थितीतून समाज बाहेर पडत गेला तेव्हा नैतिकता आणि सांस्कृतिकता जन्माला आली. त्या प्रवासातच साहित्य-संगीत-कला निर्माण झाले. ‘कल्चर’ आणि ‘सिव्हिलायझेशन’ निर्माण झाले. कारण जीवनाचे तत्त्वज्ञान बाजारशक्तींपासून मुक्त झाले. विक्रेय वस्तू आणि अमूल्य वस्तू हा भेद आवश्यक होता. ‘ज्ञान’ ही संकल्पना उदात्त मानली गेली ती त्यामुळेच.

पुढे वाचा

‘व्हॉटेव्हर’

मध्ययुग – अंधकारयुगानंतर आपण विवेकाचे युग (The Age of Reason) घडवून आपले जग बदलून टाकले. अधूनमधून आपण रक्तलांच्छित युद्धेही लढलो, पण सोबतच साहित्य, कला, विज्ञान, वैद्यक यांत उत्तम कामेही केली. कायद्याचे राज्य बऱ्याच पृथ्वीतलावर प्रस्थापित झाले. बऱ्याच जागी लोकशाही व्यवस्थाही घडल्या. आपल्या एका पिढीत ऐहिक दारिद्र्याचे परिणाम ज्या प्रमाणात कमी झाले, तेवढे आधीच्या संपूर्ण मानवी इतिहासात झाले नव्हते. राजकीय व आर्थिक व्यवस्थांच्या वापराने आपण नात्झी व सोविएत हुकुमशाह्यांवर मात केली. हे सारे असूनही आज आत्मविश्वासाचा अभाव, आपल्या कृतींच्या परिणामकारकतेवरचा विश्वास क्षीण होणे, निराशावाद, अशाने आपला समाज ग्रस्त आहे.

पुढे वाचा

‘माझा पैसा’ आणि डावा आदर्शवाद

न्याय्य समाज म्हणजे काय ?
[६ फेब्रुवारी २०१० ला मिलिंद मुरुगकरांनी लोकसत्तात ‘माझा पैसा आणि डावा आदर्शवाद’ नावाने काही मांडणी केली. १६ फेब्रुवारीला लोकसत्तातच राजीव सान्यांनी करदात्यांचा पैसा आणि भाग्याचे फेरवाटप या नावाने मुरुगकरांच्या मांडणीवर आक्षेप घेतले. त्यासोबत या आक्षेपांना उत्तर देताना मुरुगकरांचा न्याय्य समाजाची अढळ संकल्पना हा लेखही प्रकाशित झाला. या तिन्ही लेखांचा संपादित अंश खाली देत आहो.]
निवडणुकांच्या काळात राजकीय पक्ष देत असलेल्या सवंग आश्वासनांसंदर्भात बोलताना, माझा मित्र चिडून म्हणाला, ‘माझा पैसा (करांच्या स्वरूपातील) लोकांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी वापरला जात असेल तर माझी हरकत नाही.

पुढे वाचा

इतिहासजमा ?

(नुकतेच मरण पावलेले विंदा करंदीकर यांच्या १९९७ च्या महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवन-गौरव पुरस्कार स्वीकारतानाच्या भाषणातला हा अंश, आपले वायय वृत्त (एप्रिल २०१०) मधून, साभार) सामान्यतः सुशिक्षित, यशस्वी व सुखवस्तू समाजात वावरत असताना त्यातील माझे काही मित्र मला म्हणतात, “करंदीकर, तुमचे ते मार्क्स व गांधी हे आता इतिहासजमा झाले हे मान्य करा.” हे बोलत असताना ‘शेवटी इष्ट ते घडले’ याचा त्यांना होणारा सात्त्विक आनंदही मला दिसत असतो. पण ते मान्य करण्याच्या अवस्थेत मी अजूनही नाही; अजूनही मी मुख्यतः मार्क्सवादी व थोडासा गांधीवादी आहे.

पुढे वाचा

करदात्यांचा पैसा आणि भाग्यांचे फेरवाटप

युक्तिवादात, बेमालूमपणे ‘ट्रॅक’ बदलणे व अर्धे सत्य अधोरेखित करून अर्धे अनुल्लेखित ठेवणे हे लेखातील दोष आहेत. समता म्हणजेच न्याय हे गृहीतकही विवाद्य आहे. ‘माझा पैसा’ म्हणणारे नवश्रीमंत हे यशात भाग्याचाही वाटा असतो याकडे दुर्लक्ष करणारे असतीलही परंतु या योगायोगाचा फायदा घेत मुरुगकरांनी ‘करदात्यांचा पैसा’ हा कळीचा मुद्दा ‘माझा पैसा’ या संकुचित मुद्द्यात रूपांतरित केला. विशेषतः अनुरंजनवादी राजकारण्यांनी सार्वजनिक वित्तव्यवस्थेत आज जो टोकाचा बेजबाबदारपणा (व त्यातून अंतिमतः गरिबांचाच घात) चालविला आहे त्याला आवर घालण्यासाठी ‘करदाता’ या समूहाची (ज्यात भारतात गरीबही मोडतात) एक राजकीय ओळख उभी करण्याची गरज आहे.

पुढे वाचा

प्रोमीथियन अग्नी

पुस्तकाचे नाव “Promethean Fire Reflections on the origin of the mind’ आहे. लेखक – Charles S. Lumsden & Edward O. Wilson. नाव तर जड आहे. [ ग्रीक पुराणांमध्ये देवांकडून अग्नी चोरून आणणाऱ्या प्रोमीथियस नावाच्या योद्ध्याची कथा आहे. तिच्या आधाराने ‘देवत्व पावण्याचा हव्यास’ याचे रूपक म्हणून प्रोमीथियसचे मिथक वापरले जाते. – सं.]
जितके नाव जड, तितकेच पुस्तकही वाजायला जड आहे. बहुतांश संदर्भ जीवशास्त्र आणि जनुकशास्त्रामधले, ज्याचा आणि मासा १० वी नंतर कधीही संबंध आला नव्हता. बरे, जेवढे कळत होते तेवढेही कितपत कळलेले आहे याबद्दल शंकाच आहे!

पुढे वाचा

न्याय्य समाजाची अजब संकल्पना

आर्थिक यश हे भाग्य व कर्तृत्व यावर अवलंबून असते या माझ्या मुद्द्यातील ‘भाग्य’ हे मोजता येत नसल्यामुळे ते विचारातच न घेता फक्त कर्तृत्वक्षेत्रातील अन्यायाबद्दलच बोलले पाहिजे असा सानेंचा मुख्य मुद्दा आहे. पण जे अचूकपणे मोजता येत नाही ते वास्तवात असत नाही, हे खरे नाही व भाग्याचा मोठा भाग निश्चितपणे मोजता येतो. भारतासारख्या कमालीच्या विषम समाजात तर ते अतिशय उघड आहे. भारतातील संपत्तीचे वाटप इतके कमालीचे विषम आहे की कोण कोणाच्या पोटी जन्मतो याने त्याच्या आर्थिक यशाची मर्यादा निश्चित होते, अपवाद असतातच; पण अपवादाने नियम सिद्ध होतो.

पुढे वाचा

निवडणुका, खरे स्वरूप व मध्यमवर्ग (भाग-१)

[आपल्या देशाचे क्षेत्रफळ जगात पाचव्या क्रमांकाचे क्षेत्रफळ आहे, लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकाची आहे आणि राज्यपद्धती ‘लोकशाही’ ही जगात प्रथम क्रमांकाची आहे. आपल्या देशात सुमारे ७० कोटी नोंदविलेले मतदार आहेत. आपला कार्यक्षम ‘निवडणूक आयोग’ या सर्व मतदारांचे मतदान एका कार्यकाळात घेऊ शकतो, मतदानातले सर्व संभाव्य गैरप्रकार न होतील, अशी काळजी घेऊन! जगातल्या प्रगत देशांतल्या लोकांना मोठे आश्चर्य वाटते, कारण त्यांनी आपल्या देशाविषयी बरेच गैरसमजूतीमधूनचे बोलणे ऐकलेले असते. मुळातच हा अवाढव्य व पराकोटीचा विविधता – सांस्कृतिक, भाषांची उद्योगांची, जमिनीच्या सुपीकतेची, त्यामुळे पिकांची, पर्यावरणाची, हवामानाची विविधता; असे असलेला देश कसा चालतो याचेच त्यांना आश्चर्य वाटत असते.

पुढे वाचा