मूळ लेखक : मायकेल सँडेल
रीथ व्याख्यानमालेतील दुसरे व्याख्यान राजकारणातील नैतिकता (Morality in Politics) ह्या विषयावर होते. व्याख्यान ऑक्सफर्ड विद्यापीठातून प्रसारित करण्यात आले; जिथे मायकेल सँडल होड्स् स्कॉलर म्हणून काही काळ राहिले होते. सार्वजनिक क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक असलेले सत्य आणि धैर्य (Truth and Courage) हे गुण असलेल्या विद्यार्थ्यांना होड्स् स्कॉलरशिप दिली जाते. समाजाबाबत नागरिकांची कर्तव्ये कोणती हाच सँडल ह्यांच्या व्याख्यानमालेचा गाभा असल्याने ऑक्सफर्डच्या ‘होड्स् हाऊस’मधून त्यातील एक व्याख्यान प्रसारित होणे उचित होते.
सुरुवातीच्या प्रास्ताविकात स्यू लॉली ह्या संयोजिकेने सँडल लॉस एंजलीसमध्ये शाळेत शिकत असताना घडलेली एक घटना सांगितली.