सामाजिक संकेत हीच ‘सारतत्त्वे’? आणि जनुकासुर मातू नये म्हणून
एखाद्या गोष्टीचे सारतत्त्व म्हणजे काय? हे सांगण्यासाठी सँडेल यांनी दिलेले बासऱ्यांचे वाटप करण्याचे उदाहरण पूर्णतः फसलेले आहे. सँडेल सांगतात की, चांगल्या बासऱ्या उत्तम बासरी वादकांना मिळाव्यात कारण ते चांगले संगीत निर्माण करू शकतील, असे आपण सामान्य माणसे म्हणू, “पण अरिस्टॉटलचे उत्तर वेगळे आहे.” (6/238) चांगले वाजवले जाणे हेच बासऱ्यांचे, (संगीतसभांचेही) प्रयोजन आहे म्हणून चांगल्या बासऱ्या चांगल्या वादकांना मिळायला हव्यात. आता ह्यात पॅसिव्ह व्हाईस सोडून वेगळे काय आहे? जे बोलून चालून इन्स्ट्रूमेंटच आहे त्याचे सार तत्त्वही इन्स्ट्रुमेंटलच असणार!