आपल्याला दैनंदिन गरजा भागविण्यासाठी बाजारात पाय टाकल्याशिवाय पर्याय नसतो. आणि बाजारात पाय टाकला की आपण महागाईचे चटके अनुभवतो आणि मग स्वतःशीच पुटपुटतो. “काय ही महागाई’. महागाई वाढण्याचे कारण काय असेल तर बाजारात वस्तूंचा तुटवडा, असे ढोबळ उत्तर देत आपण सामान्य लोक बाजारातून काढता पाय घेतो.
आज महागाई हा शब्द आपण रोज ऐकतो. महागाई म्हणजे काय? महागाईस कोण जबाबदार? देशातल्या कोणत्या घटकाला या महागाईचा फटका बसतो? हा महागाईचा प्रश्न सुटायला हवा असे वाटत असेल तर यावरचा उपाय काय? महागाईचा शेतकऱ्यांशी काय संबंध?