विषय «इतर»

धर्मांतराविषयी

[धर्मांतर आणि त्याला विरोध करण्यातून उद्भवलेली हिंसा आज अनेक प्रांतांना, देशांना छळते आहे. ५ ऑक्टो. २००८ या लोकसत्ता त सुधींद्र कुळकर्णी (अनुवादः स्वा. वि. ओक) यांचा धर्मांतरावर चर्चा का नाही? हा लेख होता. त्याचा महत्त्वाचा अंश असा]
देशात विविध ठिकाणी चर्चेसवर तसेच ख्रिश्चन समुदायावर होत असलेल्या हिंसक हल्ल्यांचे समर्थन कुणीही विचारी भारतीय नागरिक करणार नाही. कायदा पाळणाऱ्या कोणत्याही समाजात हिंसाचार आणि लुटालुटीच्या प्रवृत्तीला, विशेषतः धार्मिक विद्वेषातून जन्माला आलेल्या हिंसाचाराला स्थान असू शकत नाही.
मात्र या हिंसक घटनांना प्रसारमाध्यमांनी (देशातील आणि आंतरराष्ट्रीयही) जी प्रसिद्धी दिली, सेक्युलर बुद्धिमंत आणि राजकीय पंडितांनी त्यावर जे एकांगी भाष्य केले आहे ते चिंता करायला लावणारे आणि अस्वस्थ करणारे आहे.

पुढे वाचा

कार्यरत लोकशाहीची लक्षणे

सामाजिक न्यायासाठी काय करायला हवे याची चर्चा काटेकोर विवेकानेच व्हायला हवी. काय करायची निकड आहे, हे कसे ठरवायचे? मला वाटते की आपण दोन दृष्टिकोणांमधला फरक समजून घ्यायला हवा. एक दृष्टिकोण व्यवस्थांवर लक्ष केंद्रित करतो, तर दुसरा परिणामांना महत्त्व देतो. कधी कधी ‘न्याय्य काय?’ हे ठरवायला संस्था, संरचना, नियमावल्या वगैरेंकडे लक्ष द्यावे लागते अमुक तमुक संस्था असणे नियम असणे, ही न्यायाची खूण मानली जाते. त्या संस्था असल्या, ते नियम असले, त्यांच्या घडणीवर विचार झालेला असला, की न्यायही असतो. पण येवढेच पुरे आहे का?

पुढे वाचा

समाजाप्रति जबाबदेही

एकीकडे शासनव्यवस्था आणि दुसरीकडे घर-कुटुंबे, यांच्यामधले सामाजिक संघटनाचे क्षेत्र म्हणजे ‘नागर समाज’ किंवा अधिक सोप्या रूपात ‘एन्जीओ’ज. १९९०-२००० च्या दशकात हे क्षेत्र चांगल्या प्रशासनासाठी आवश्यक आहे, आणि ते शासनव्यवस्थेच्या बऱ्याच जबाबदाऱ्या घेऊ शकते, असे मत लोकप्रिय झाले. याला पार्श्वभूमी होती नव-उदारमतवादी संकल्पनांची. शासनव्यवस्था स्वभावतःच भक्षकवृत्तीची असते; प्रशासक नोकरशाही अपरिहार्यपणे (शासकीय) मालमत्तेचे ‘भाडे’ खाणारी असते; राजकारणी नेहेमीच सत्तेच्या मार्गाने नफा कमावणारे हावरट असतात; अश्यावेळी नागरिकांनी स्वतःचा सांभाळ करायला नागर समाज घडवणे हेच चांगले ठरते; अश्या ह्या संकल्पना होत्या. त्या अर्थातच फार आकर्षक वाटत असत.

पुढे वाचा

स्वयंसेवी संस्थांचे कार्य: चिकित्सक दृष्टीची गरज

कोणत्याही गोष्टीच्या सर्वसाधारण आकलनासाठी तिच्याकडे इतिहासाच्या चौकटीतून पाहणे फायद्याचे ठरते. त्याप्रमाणे स्वयंसेवी संस्थांचा उदय, त्यांचे चरित्र, त्यांत आलेले बदल इत्यादि गोष्टींच्या सारासार आकलनासाठी त्यांच्याकडे ऐतिहासिक दृष्टिक्षेप टाकणे आवश्यक आहे. स्वयंसेवी संस्था संकल्पनेच्या पातळीवर खूप प्रचलित असू शकतात. पण त्यांचा वर्तमान स्वरूपातील उदय हा १९ व्या शतकात झालेला दिसतो. त्या काळात त्या गुलामगिरीविरुद्ध आणि स्त्रियांच्या मतदान-हक्कासाठी चाललेल्या चळवळींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होत्या. त्यांचे ‘बिगर सरकारी संघटना’ (Non-Governmental Organisation- NGO) हे नामकरण संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या स्थापनेनंतर म्हणजे १९४५ सालानंतर प्रचलित झालेले आहे.
या दोन शतकांतील स्वयंसेवी संस्थांच्या कामाकडे दृष्टिक्षेप टाकला तर त्यांना तीन प्रवर्गांमध्ये (Catagories) विभागता येते.

पुढे वाचा

N.G.O.s व सामाजिक परिवर्तन

लोकविज्ञान-चळवळ, आरोग्य-चळवळ व डावी चळवळ यांतील एक कार्यकर्ता म्हणून मी सुमारे २५ वर्षे पूर्ण वेळ काम केले.आता १९९९ पासून मी मुख्यतः एका N.G.O. चे काम करतो व उरल्यावेळात चळवळीचे काम करतो. या माझ्या अनुभवाच्या आधारे एन.जी.ओंचे सामाजिक परिवर्तनातील योगदान ह्याबद्दल काही विचार चर्चेसाठी मांडत आहे.
N.G.O.s कोणाला म्हणायचे हे आधी स्पष्ट करूया. सामाजिक कार्याचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या ज्या संघटना लोकवर्गणीच्या/सभासद वर्गणीच्या/वैयक्तिक देणगीच्या आधारे चालत नाहीत तर मुख्यतः एकरकमी स्वरूपात मिळणाऱ्या सरकारी/बिनसरकारी, देशी/परदेशी आर्थिक पाठबळावर चालतात त्यांस N.G.O.असे मी समजतो. सरकारचे समाजकल्याण खाते किंवा “आम्ही सामाजिक कामच करतो’ असा दावा करणारी नव्या प्रकारची तथाकथित धर्मादाय इस्पितळे, ट्रेड युनियन्ससारख्या संघटना, सहकारी संस्था व अर्थात विविध राजकीय संस्था संघटना ह्यांपेक्षा N.G.O..

पुढे वाचा

स्वयंस्फूर्त-समाजहितैषी कामः काल, आज व उद्या

या लेखातील मुख्य विवेचनाकडे वळण्यापूर्वी एका मूलभूत मुद्द्याचा येथे उल्लेख करायला हवा. मुख्यप्रवाही राजकारण, कामगार संघटन, सहकार या क्षेत्रांबाहेर केल्या गेलेल्या व्यापक समाजहितैषी कामाला उद्देशून ‘स्वयंसेवी’ कार्य ही संज्ञा वापरली जाते. स्वातंत्र्यपूर्वकाळ, स्वातंत्र्योत्तर १९६० पर्यंतचा काळ, १९६० ते १९८० चा काळ, व१९८० पश्चात, असे कालखंड भारतातील ‘स्वयंसेवी’ कामाचा अभ्यास करताना केले जातात. ह्या विविध कालखंडांत जे समाजहितैषी काम झाले, त्यासाठी जे संस्थात्मक आकृतिबंध व व्यूहनीती वापरल्या गेल्या या साऱ्यांत लक्षणीय म्हणावी इतकी विविधता आढळते. ती विविधता पाहता त्या कामाला ‘स्वयंसेवी’ (व्हॉलंटरी), गैरसरकारी (नॉनगव्हर्नमेंटल), किंवा ना-नफा (नॉनप्रॉफिट) या संज्ञा सुयोग्य वाटत नाहीत.

पुढे वाचा

स्वयंसेवी संस्था: एक भांडवली षडयंत्र

स्वयंसेवी संस्थांचा विचार करताना त्यांच्या चांगल्या बाजू कोणत्या व वाईट बाजू कोणत्या किंवा त्यावरचे आक्षेप काय आहेत असा विचार करून चालणार नाही. त्याऐवजी प्रस्थापित व्यवस्था मान्य आहे की अमान्य, यासंदर्भात याचा विचार करावा लागेल. कारण स्वयंसेवी संस्था चांगल्या की वाईट हा प्रश्न ज्यावेळी आपण करतो, तेव्हा ही व्यवस्था हवी की नको हा प्रश्न बाजूला पडतो. त्यामुळे ही व्यवस्था मान्य केली तर त्यामध्ये स्वयंसेवी संस्थांचे स्थान काय असेल व जर व्यवस्था अमान्य केली तर त्यामध्ये स्वयंसेवी संस्थांचे स्थान काय असेल असा विचार केला पाहिजे.

पुढे वाचा

स्वयंसेवी संस्थाः काही विचार

गेली तीस वर्षे मी स्वयंसेवी क्षेत्रात काढली, त्यातल्या शेवटच्या पाच वर्षांत फार उद्विग्नता वाट्याला आली आणि ‘अर्थ काय स्वयंसेवी संस्थांचा ह्या विश्वचक्री ?’ असे वाटू लागले. संपूर्णपणे पुन्हा पहिल्यापासून स्वच्छ, साधा आणि मोकळा विचार करावा असे जाणवू लागले. तसा विचार सुरू केला पण अजूनही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे ‘स्वयंसेवी संस्था : सद्यःस्थिती आणि आह्वाने’ ह्यावर काही लिहिण्याइतपत आपला विचार पूर्ण झालेला आहे, असे अगदी खरोखरच वाटत नाही. दिवसेंदिवस मी जसा जसा विचार करतो आहे आणि अनुभव करतो आहे, तेव्हा वाटते, काय ह्या स्वयंसेवी क्षेत्रांनी स्वतःची वाट लावून घेतली.

पुढे वाचा

जागतिकीकरणाच्या युगात ‘स्वयंसेवी’: संस्था आणि चळवळ

‘स्वयंसेवी क्षेत्र अथवा संस्था ही “एकजिनसी” बाब नाही’, म्हणजे, सर्व स्वयंसेवी संस्थांना ‘सब घोडे बारा टक्के’ असे एका मापाने मोजू नये, अथवा त्यांची विभागणी ‘चांगल्या’ व ‘वाईट’ अशी केली पाहिजे अशा बाळबोध अर्थाने अथवा सद्भावनेने आलेले हे वाक्य नाही. किंवा, यात असेही गृहीत नाही की मुळात सद्भावनेने प्रेरित असलेल्या या क्षेत्रात आता काही ‘विकृती’ शिरल्याने नवे भेद तयार झाले आहेत!
तर मुद्दा असा, की ‘स्वयंसेवी’ या पाटीखाली संस्थात्मक/संघटनात्मक अर्थी अनेक प्रकार येतात, ते वेगवेगळ्या भूमिका अदा करतात, त्यांचे कार्य व स्वरूप यांतही फरक आहेत.

पुढे वाचा

श्रीकांत कारंजेकरः निर्वैर, निराग्रही, निःसंग

श्रीकांत कारंजेकरची माझी मैत्री चांगली एकोणतीस वर्षांपासून आहे. १९८२ च्या सप्टेंबरमध्ये मी वर्ध्याच्या ग्रामोपयोगी विज्ञान केंद्रात दाखल झालो, तेव्हा पहिली मैत्री श्रीकांतशीच झाली. नंतर माझ्या आग्रहावरून तारक काटेही तिथेच आला. श्रीकांत मी तारक असे अभेद्य त्रिकूट इतकी वर्षे होते, त्यामुळे आम्ही परस्परांना गृहीत धरायला सुरुवात केली होती. मी वर्धा सोडून मुंबईला गेलो; सव्वीस वर्षे तिथे राहिलो. वाशी असणारा माझा संपर्क काहीसा क्षीण झाला. पण आमच्या मैत्रीत कधीच अंतर पडले नाही. आत्ता-आत्ता मी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला, ‘धरामित्र’शी काही प्रमाणात बांधला गेलो, त्यापासून ते ‘आजचा सुधारक’च्या डार्विन विशेषांकाच्या आखणीपर्यंत प्रत्येक योजनेत श्रीकांतचा समावेश होता.

पुढे वाचा