चंपारणचा नीळविरोधी सत्याग्रह इ.स.1917 चा आहे. दक्षिण आफ्रिकेतन गांधीजी 1915 साली भारतात परतले. त्यावेळी ते महात्मा झाले नव्हते. दक्षिण आफ्रिकेतील बावीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी बौद्धिक आदांना व्यावहारिक रूप दिले होते. रस्किनची Unto this Last पुस्तिका वाचून स्वतःची जीवनशैली बदलली होती. फिनिक येथे आश्रम स्थापून त्यांनी शेतकऱ्याची जीवनशैली अंगीकारली होती. द. आफ्रिकेतील लढ्यांमुळे कच्चे लोखंड पोलादात बदलले होते. व्यक्तिगत जीवन व मानवसंबंध यांबाबतचे व्यापक जीवनदर्शन त्यांच्यात विकसित झाले होते. तसेच समाजाची अर्थव्यवस्था व सरकारचे कर्तव्य यांबाबतही त्यांचे विचार स्पष्ट झाले होते.
गांधीजी भारतात परतले तेव्हा गुरुवर्य गोपाळ कृष्ण गोखल्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सार्वजनिक जीवात भाग न घेता केवळ भारत पाहण्याचे ठरविले होते.
Category «इतर»
भगवद्गीतेचे भारतात पुनरुज्जीवन
भगवद्गीता शाळेमध्ये मुलांना शिकवली जावी ह्यासाठी भारतीय जनता पार्टीचे राज्य असलेल्या कर्नाटक व मध्य प्रदेश ह्या राज्यांनी तशी विधेयके आणून ती सम्मत करून घेतली आहेत. कर्नाटकचे मंत्री कागेरी ह्यांनी तर अल्पसंख्यक धर्मांना – बुद्ध, ख्रिश्चन, मुसलमान यांना अशी समज दिली की गीता शाळेत शिकवणे मान्य करा अथवा भारतातून निघून जा(1) मध्यप्रदेशातील कथोलिक बिशप कौंसिल यांनी नुसतीच गीता न शिकवता साऱ्या धर्मांचा सारांश शिकवावा असा अर्ज केला. पण त्यावर म. प्र. उच्च न्यायालयाने, गीता हा काही धार्मिक ग्रंथ नाही, त्यामुळे गीता शिकवण्यास आपत्ती नसावी असा निकाल दिला.
पुस्तकपरिचय गेम्स इंडियन्स प्ले (व्हाय वी आर द वे वी आर) – लेखक – वी. रघुनाथन
एखाद्या पुस्तकाचे नावच आपल्याला इतके वेधक वाटते की वाचावेसेच वाटते, आणि एकदा वाचू लागलो की सिंदबादच्या म्हाताऱ्यासारखे ते आपल्याला सोडत नाही. गेम्स इंडियन्स प्ले हे पुस्तक या प्रकारचे आहे.
आपण भारतीय माणसे असे का वागतो? असे म्हणजे कसे, तर भर रस्त्यावर कुणाला मारले जाते, कुणावर बलात्कार केला जातो, पण एकही माणूस अडवायला तर जात नाहीच, पण नंतर साक्षही द्यायला तयार नसतो. आपण एखाद्या रांगेत उभे असतो; अचानकपणे कुणी स्थानिक पुढारी त्याच्या चार-पाच कार्यकत्यांसह तिथे येतो. रांगेची शिस्त, न्याय वगैरे गोष्टी त्याच्या खिजगणतीतही नसतात.
कुंटणकबिला
कुटुंबाची आपली कल्पनाच पतिपत्नी आणि त्याच्या आगमागच्या नातेसंबंधांशी जोडली गेलेली आहे. या नातेसंबंधांत आईवडील, सासूसासरे, भाऊबहीण, नणंदामेव्हण्या, दीरमेव्हणे, भाचेपुतण्ये, जावा, मामामावश्या, काकाआत्या, चुलत-मामे-आते-मावस भावंडे आणि अर्थातच संबंधित पतिपत्नींची मुलेबाळे, नातवंडे, सुनाजावई असा सारा गोतावळा येतो. किंवा यावा अशी अपेक्षा असते. या गोतावळ्यातले कुणी अविवाहित किंवा लग्न मोडलेले असू शकते. कुणाचा जोडीदार किंवा जोडीदारीण मयत झालेले असू शकतात. पण असे डावे माणूसही त्या कुटुंबाचाच एक हिस्सा असते. त्याला किंवा तिला स्वतःचे नाव, बापाचे किंवा नवऱ्याचे नाव आणि आडनाव असतेच असते.
बहुतांश कुटुंबातली माणसे बोलताना ‘आमच्या घरात, आमच्या घराण्यात, आमच्यात’ असे शब्दप्रयोग वारंवार आणि सहज करत असतात.
एकोणिसाव्या शतकातील भारतीय स्त्रीशिक्षणाचा औपचारिक आरंभ
स्त्रियांना शिक्षणाचा शताकनुशतके नाकारला गेलेला जन्मसिद्ध हक्क त्यांना नुकताच प्राप्त होऊ लागला आहे. स्त्रीशिक्षण हा शब्द आणि संकल्पना एकोणिसाव्या शतकारंभी औपचारिकदृष्ट्या रूढ झाली. पाश्चात्त्य वाङ्मय आणि संस्कृतीच्या परिशीलनाने एकोणिसाव्या शतकातील विचारवंतांनी स्त्रीशिक्षणाच्या प्रयत्नांना सुरुवात केली. स्त्रीशिक्षणाच्या अभावातच स्त्रीजीवनातील गुलामगिरीची बीजे रुजली असल्याची जाणीव या विचारवंतांत हळूहळू दृढ होत गेली. भंग्याची मुलगी राष्ट्राध्यक्ष व्हावी असे महात्मा गांधींनी त्यामुळेच म्हटले होते. एका स्त्रीच्या शिकण्याने सारे कुटुंब सुशिक्षित बनते; आणि कुटुंब हा समाजजीवनाचा पाया स्त्रीशिक्षणाच्या अभावी रोवला जाणार नाही अशा विचारांची खूणगाठ तत्कालीन विचारवंतांनी निश्चित केली.
पत्रसंवाद
विनायक श्रीकृष्ण महाजन, अर्थ, मु.पो.कुडावळे, ता. दापोली, जि.रत्नागिरी-415712
आजचा सुधारकच्या ऑक्टो. 2012 च्या अंकामधील ‘कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आजच हलाखीच्या स्थितीवर उपाय’ हा दिवाकर मोहनी यांचा लेख वाचला. या विषयावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा त्यानी सुरुवातीसच व्यक्त केली आहे. चर्चेमध्ये सहभाग म्हणून काही गोष्टी लिहीत आहे. सर्वसमावेशक विकास असा धोशा लावणाऱ्या अर्थतज्ज्ञ पंतप्रधानांच्या काळात काय घडते आहे हे आपण सर्वजण पहात आहोत. अनुभवत आहोत.
आपला देश हा कृषिप्रधान आहे. इंग्रजांच्या राजवटीत देशाचे काय झाले यापेक्षा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काय घडत आहे हे पहाणे औचित्याचे. आपण स्वतंत्र झालो तेव्हा देशाच्या एकूण उत्पन्नात 50% वाटा शेतीचा होता.
हिंदूच्या देवळांची उत्पत्ती
हिंदूच्या देवळांची उत्पत्ती
इसवी सनाच्या दुसऱ्या व तिसऱ्या शतकापर्यंत हिंदुजनांत व हिंदुस्थानात देवळे घुसलेली नव्हती. आत्मवर्चस्वाभिमानी भटांच्या भिक्षुकशाहीने नवमतवादी बौद्धधर्माचा पाडाव करून भटी वर्चस्वस्थापनेसाठी महाभारताच्या व रामायणाच्या जुन्या आवृत्त्या मनसोक्त घालघुसडीच्या फोडणीने फुगविल्या आणि मनुस्मृतीला जन्म दिला. मात्र त्या काळच्या कोणत्याही वाङ्मयात देव आणि देवळे आढळून येत नाहीत. नाही म्हणायला, बौद्धधर्मी अशोक सम्राटाच्या आमदनीपासून बौद्ध भिक्षूच्या योगक्षेमासाठी आणि स्वाध्यायासाठी ठिकठिकाणी मोठमोठे विहार, लेणी, गुहा, संघ, मंदिरे ही अस्तित्वात आलेली होती. पुढे पुढे या संघमंदिरांत महात्मा बुद्धाच्या मूर्ती स्थापन करून त्यांच्या पूजाअर्चा बौद्धाच्या हीनयान पंथाने सुरू केल्या.
मानवी अस्तित्व (७)
माणसात ‘स्वत्व’ (self) असे काही असते का?
आपण जेव्हा झोपतो तेव्हा ती नाहीशी होते. जागे होतो तेव्हा परत आपोआप आलेली असते. काही वेळा स्वप्नात येते. काही वेळा स्वप्नच गायब झालेले असतात. हे शरीर माझेच आहे व मीच त्याचे नियंत्रण करत आहे याची जाणीव देणारे असे काही तरी आपल्यात असावे. त्यामुळे आपण आपली वेगळी ओळख पटवून देत असतो. हीच ओळख आयुष्यभर आपली सोबत करते; काही वेळा अनुभवांच्या आठवणीतून व काही वेळा भविष्यात डोकावून. हे सर्व एखाद्या गाठोड्यासारखे वाटते. तेच कदाचित आपल्यातील ‘स्व’ची जाणीव असू शकेल.
आत्मा आणि पुनर्जन्म : सत्य की कपोलकल्पित? (भाग-२)
बहिर्गमन ही काय भानगड आहे?
गर्भनलिकेमध्ये जेव्हा वडिलांकडून आलेले पुंबीज आणि आईकडून आलेले स्त्रीबीज (Ovum) यांचा संयोग होतो तेव्हा आत्मा त्यात प्रवेश करतो आणि माणसाच्या मृत्यूच्या वेळी तो बाहेर पडतो अशी कल्पना आहे. ही कल्पना शास्त्राद्वारे चुकीची सिद्ध करण्याचा हा प्रयत्न:
1) एका वीर्यामध्ये (साधारण पाव चमचा) सहा ते बारा दशलक्ष शुक्राणू असतात. वीर्यपतनाच्या वेळी साधारण 3-4 घनसेंमी वीर्य पडते म्हणजे एका समागमाच्या वेळी दोन ते तीन कोटी इतके शुक्राणू मातेच्या योनिमार्गात सोडले जातात. त्यांतील फक्त एक शुक्राणू स्त्रीबीज फलित करतो.
नास्तिकाची जडणघडण
कोवळे, शेंदरी कवडसे आधी आले. त्या लोभस उन्हात कवडेही ‘जगायला’ उतरले. त्यांना दाणे हवे होते आणि पाणी तर लागणारच होते. आम्ही त्यांच्या दाण्यापाण्याची सोय करू, करतोच, पण आम्हाला महागाई कणाकणाने फस्त करते आहे. त्याचे काय? येस्-फेस् करत, फेसबुकवर खिदळत, गुण उधळत जवान लोक सोन्यासारखा दिवस वाया घालवतानाही दिसतात. त्यांचे कुठे वनराईकडे लक्ष आहे? राईत देव नसेल, तर तिचे रक्षण कोण करेल? देव आहे असे मानावे तर अनाचाराचे अनार थुई थुई करतानाच दिसतात. आसपास त्या चटकचांदण्याच चमकते तुषार उडवत असतात. सणाचा धूरही विषारीच आहे.