विषय «इतर»

(ग) जातः एका राष्ट्रात दुसरे राष्ट्रः रक्तविहीन क्रांतीसाठी कृती

‘अखंड हिंदु समाज’ हा एक भ्रम असून त्यातील जात मात्र वास्तव आहे. हीच वास्तवता बिहार व उत्तर प्रदेश या राज्यांत प्रकर्षाने जाणवत आहे. राजकीय क्षेत्रात जातीचे प्राबल्य वाढत असून राजकीयरीत्या प्रतिनिधित्व नसलेल्या जाती समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला एकाकी पडत आहेत.
‘जात हेच राष्ट्र’ असे निःसंदिग्धपणे वक्तव्य करणारे, ‘ए नेशन विदिन नेशन’ या पुस्तकाचे लेखक, व्ही.टी.राजशेखर एका महत्त्वाच्या विषयाकडे वाचकांचे लक्ष वेधू इच्छितात. त्यांच्या मते जात हाच रक्तविहीन क्रांतीकडे घेऊन जाऊ शकणारा एकमेव मार्ग आहे. भारतीय मानववंशाच्या एका सर्वेक्षणाच्या अहवालानुसार आपल्या देशात सुमारे २८०० जाती व उपजाती आहेत.

पुढे वाचा

(घ) सेमिनार मासिकाचे आरक्षण व दलित विशेषांक

कोणताही एक विषय खोलात जाणून समजावून घ्यायचा असेल तर अशा विषयावर वेगवेगळ्या अभ्यासकांची (scholars) व त्या त्या विषयातील तज्ज्ञांची मते एकत्र मांडून चर्चा केली जाते. सेमिनार हे दिल्लीहून प्रकाशित होणारे असेच एक मासिक आहे जे दर महिन्याला एक विषय ठरवून तज्ज्ञांचे लेख एकत्र प्रसिद्ध करत असते. जात-आरक्षणाच्या संदर्भात या मासिकाने एकूण चार विषयांवर चर्चासत्रे घडवली आहेत. ते विशेषांक असे
१) आरक्षण डिसेंबर १९८१
२) दलित नोव्हेंबर १९९८
३) आरक्षण आणि खाजगी क्षेत्र मे २००५
४) दलित दृष्टिप्रांत (perspective) फेब्रु. २००६
१९८१ साली प्रसिद्ध झालेला आरक्षण विशेषांक मंडल आयोगाच्या शिफारशी ओ.बी.सी.ना

पुढे वाचा

संपादकीय . . . आणि पर्याय

[गेल्या अंकातील सॉलिप्सिझममधले धोके या लेखाचा हा जोडलेख सं.] शंकाच नको!
दैनंदिन जीवनातले सर्व ‘ज्ञान’ आपल्याला केवळ इंद्रियांमार्फत होते. यासोबतच आपण काही बाबी अध्याहृत आहेत, धरून चालण्याजोग्या आहेत असेही मानत असतो. एक म्हणजे आपली इंद्रिये आपल्याला पद्धतशीरपणे फसवत नसतात. कोणाला वाटेल की हे वेगळे सांगायची गरज नाही पण तशी गरज आहे. आपण कधीकधी चुकीचे ऐकतो, चुकीचे पाहतो, व इतर ज्ञानेंद्रियांकडूनही चुका होतात. पण हे सदासर्वदा एकाच प्रकारचे चुकणे नसते. आपल्या चुका ‘पद्धतशीर’, ‘व्यवस्थित’, ‘सिस्टिमॅटिक’ नसतात. त्या स्वैर असतात. अपघाताने, योगायोगाने घडतात.

पुढे वाचा

‘फार्म बिल’ऐवजी अन्न कायदा

काही काळापूर्वी वॉशिंग्टन विद्यापीठातील एक संशोधक अॅडम टूनोस्की एका सुपरमार्केटात गेला. त्याचा विषय होता लठ्ठपणा ऊर्फ obesity. तो एक गूढ प्रश्न सोडवायच्या प्रयत्नात होता अमेरिकेत लठ्ठपणा हे दारिद्रयाचे भरवशाचे लक्षण का आहे ? इतिहासभर गरिबांना अन्नऊर्जा, उष्मांक calories नेहेमीच कमी पडल्या आहेत. मग आज अन्नावर सर्वांत कमी खर्च करू शकणाऱ्यांमध्ये लठ्ठपणा का आढळतो?
अॅडमने एका काल्पनिक डॉलरने जास्तीत जास्त कॅलरीज किती व कश्या विकत घेता येतात, हे तपासले. अमेरिकन सुपरमार्केटांमध्ये मध्यावरचे क्षेत्र शीतपेये आणि बऱ्याच प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांसाठी राखले जाते, तर दूधदुभते, मांस-मासे व ताज्या भाज्या, हे कडेकडेच्या कपाटांमध्ये मांडलेले असते.

पुढे वाचा

संस्कृतीचे पाच आधारस्तंभ

* समाज आणि कुटुंब (ह्या दोन संस्था इतक्या घट्ट विणीने सांधलेल्या आहेत की त्यांचा सुटा विचार करता येत नाही)
* उच्चशिक्षण
* विज्ञान आणि विज्ञानाधारित तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर. (पुन्हा एकदा, वीण इतकी घट्ट आहे की सुटा विचार शक्य नाही.)
* करभार व शासकीय सत्ता थेटपणे गरजा व शक्यतांच्या संपर्कात असणे.
* सुशिक्षित पेशांनी स्वतःच्या व्यवहारांवर देखरेख करत शुचिता राखणे.
[जेन जेकब्सच्या डार्क एज अहेड (रँडम हाऊस, २००४) मधून]

IPCC – AR – 4

पृथ्वीचे तापमान वाढते आहे आणि त्यामुळे भविष्यात हवामान बदलणार आहे, अशी चर्चा वैज्ञानिकांमध्ये अनेक वर्षे सुरू आहे. या चर्चेत एक महत्त्वाचा प्रश्न असा, की हे मानवी व्यवहारांमुळे घडते आहे की मानवेतर निसर्गातील बदलच यामागे आहेत.
हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण जर वाढणारे तापमान आणि बदलणारे हवामान अनिष्ट परिणाम घडवत असेल, तर त्याबाबतची जबाबदारी ठरवायला हवी, आणि उपाय ही सुचवायला हवेत. काही देशांच्या व्यवहारांमुळे सर्व मानवजातच नव्हे, तर सर्व सजीव सृष्टीही धोक्यात येते आहे, असे म्हणणारे वैज्ञानिक बराच काळ अल्पमतात होते.

पुढे वाचा

‘बेजवाडी’ शेती

गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या बऱ्याच प्रमाणात होत आहेत. एक आकडेवारी सांगते की दर बारा तासाला एक, इतक्या मोठ्या प्रमाणावर त्या होतात. त्याची दखल त्या मानाने फार कमी ठिकाणी घेतली जाते. सरकारपक्षाला अजून तरी ती त्यांची जबाबदारी वाटते हे नशीबच! सरकारपक्षाचे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीने झालेले प्राणहानी व वित्तहानी याबाबतचे आकडे नेहमी वृत्तसंस्थांच्या त्याच आकड्यांपेक्षा खूपच कमी असतात. याचे कारण आपल्याला समजू शकत नाही. आता सुनामीसारख्या आपत्तीने जर काही प्राण आणि अथवा वित्तहानी झाली तर त्याची जबाबदारी केवळ प्राणहानी कमी झाली असे दाखवून कशी कमी होणार ?

पुढे वाचा

भगवान गौतम बुद्धांचा वैज्ञानिक धर्म (पूर्वार्ध)

धर्माचे अधिष्ठान ‘विश्वास’ हे आहे अशी सर्वसाधारण समजूत असल्याचे आढळते. स्वतः कुठल्याही चिकित्सेच्या फंदात न पडता, धर्मग्रंथांचे आणि परंपरेने शिरोधार्य मानलेल्या ऋषिमुनींच्या वचनांचे प्रामाण्य जो निमूटपणे मान्य करतो तो धार्मिक मानला जातो. विवेक आणि अनुभव यांची कास धरून चालणारे विज्ञान आणि हे दोन निकष गैरलागू मानणारा धर्म यांच्या भूमिका अगदीच वेगळ्या आणि परस्परविरुद्ध आहेत असे मानले जाते. आप्तवचनावरील निरपवाद विश्वास हे रूढ अर्थाच्या धर्माचे अविभाज्य अंग आहे असे दिसते.
परंतु, धर्माच्या ह्या रूढ कल्पनेला आह्वान देऊन धर्माच्या क्षेत्रातदेखील विवेक आणि अनुभव यांची कास धरणारे बंडखोर सत्यशोधक काळाच्या ओघात होऊन गेले आहेत.

पुढे वाचा

सारं कसं शांत शांत

१९४५ सालानंतर युद्धे झालीच नाहीत असे नाही. तीनेकशे झाली आहेत. हे खरे आहे की जगभरात सगळीकडे लोक लढून मेले नाहीत. ते फक्त इंडोनेशिया, ग्रीस, व्हिएतनाम, भारत, बोलिव्हिया, पाकिस्तान, चीन, पाराग्वे, येमेन, मादागास्कर, इझरायल, कोलंबिया, कोस्टा रिका, कोरिया, इजिप्त, जॉर्डन, लेबेनॉन, सीरिया, ब्रह्मदेश, मलेशिया, फिलिपीन्स, थायलंड, ट्युनिशिया, केनिया, तैवान, मोरोको, ग्वाटेमाला, आल्जीरिया, कॅमेरून, हंगेरी, हैती, रवांडा, सुदान, ओमान, हाँडुरास, निकाराग्वा, मॉरिटानिया, क्यूबा, व्हेनेझुएला, इराक, झाईर, लाओस, बुरुंडी, गिनी-बिसाव, सोमालिया, फ्रान्स, सायप्रस, झांबिया, गबोन, यु.एस.ए., युगांडा, टांझानिया, ब्राझील, डोमिनिकन प्रजातंत्र, पेरु, नामिबिया, चाड, झेकोस्लोव्हाकिया, स्पेन, सोव्हिएत संघराज्य, ब्रिटन, एल साल्वादोर, कंबोडिया, इटली, श्रीलंका, बांगला देश, चिले, तर्कस्थान, इथिओपिया, पर्तुगाल, मोझांबीक, दक्षिण आफ्रिका, लिबिया, अफगाणिस्तान, जमेका, घाना, इक्वादोर, झिम्बाब्वे, बुर्कीना फासो, माली, पनामा, रुमानिया, सेनेगाल, कुवैत, आर्मेनिया, अझरबैजान, नायजर, क्रोएशिया, जॉर्जिया, भूतान, जिबूटी, मोल्डोवा, सिएर लिओन, बॉस्निया, ताजिकिस्तान, कांगो, रशिया, मेक्सिको, नेपाल, अल्बानिया, युगोस्लाव्हिया, एरिट्रिया, मॅसेडोनिया आणि पॅलेस्टाइन इथेच लढले आणि मेले आहेत.

पुढे वाचा

विज्ञानाने श्रद्धेशी बोलावे का?

क्राऊसःतुम्ही आणि मी दोघेही या विश्वाबद्दलच्या आपापल्या वैज्ञानिक आकलनासंबंधी आणि लोकांना विज्ञानात रस यावा या हेतूने बरेच बोलत-लिहीत असतो. यामुळे वैज्ञानिक धर्माबद्दल मते व्यक्त करताना त्यांचे उद्दिष्ट काय असते, हा प्रश्न विचारणे योग्य ठरते. कशाला जास्त महत्त्व द्यावे याबद्दल माझा जरा गोंधळ आहे, विज्ञान आणि धर्म यांच्यातला फरक सांगताना विज्ञानाबद्दल काही शिकवावे, की धर्माचे स्थान ठरवून द्यावे, ह्यांमध्ये. बहुधा माझा भर विज्ञान समजावून देण्यावर असतो, तर तुमचा धर्माची जागा दाखवून देण्यावर.
मी असे का म्हणतो ते सांगतो. लोकांना काही शिकवायचे असेल तर त्यांच्यापर्यंत पोचून त्यांच्या भूमिका, धारणा समजून घ्याव्या लागतात, आणि मगच त्यांना आपल्या भूमिकेकडे आकर्षित करून घेता येते.

पुढे वाचा