लेखनांतील अराजक: परिणाम व उपाय ह्या शीर्षकाचे दोन लेख १५.५ व १५.६ अंकांत प्रसिद्ध झाले. त्या लेखांवर प्रतिक्रिया जितक्या अपेक्षित होत्या तितक्या आल्या नाहीत. हा लेख लिहिण्याचा हेतू छापलेल्या भाषेत प्रमाणीकरण (standardization) यावें (प्रमाणीकरण अशासाठी की त्यामुळे सर्वांच्या वाचनाची गति वाढेल, द्रुतवाचन शक्य होईल) हा होता. शब्दाचें लिखित रूप डोळ्यांना जितकें पूर्वपरिचित असेल तितकें तें वाचण्यास, म्हणजे ओळखण्यास वेळ कमी लागतो आणि द्रुतवाचन शक्य होते, ह्याकडे मला त्या लेखांतून लक्ष वेधायचे होते. मराठीत एकेक जोडाक्षर तीनचार प्रकाराने लिहितां येतें तें असें प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लिहिल्यामुळे त्याकडे जास्त निरखून पाहावे लागते आणि वाचकाचा कालापव्यय होतो ही गोष्ट वाचकाच्या लक्षात आणून द्यावयाची होती.
विषय «इतर»
अमेरिकेला ‘घरचा आहेर’
बिोलिंग फॉर कोलंबाइन या वृत्तपटादावारे त्याने अमेरिकेच्या शस्त्रनियंत्रण कायद्यातील त्रुटी दाखवून गिल्या. स्टुपिड व्हाईट मेन आणि एडन्साईज धिस या पुस्तकांद्वारे अमेरिकेच्या धोरणांमधला वंशवाद आणि कामगारविरोध उघडा पाडला. फॅरनहाइट ९-११ या वृत्तपटातून अमेरिकेच्या इराकबाबतच्या धोरणातील खोटारडेपणा ‘बाहेर’ काढला. हा आहे मायकेल मूर, अमेरिकेतील ‘बुशबाबा’चा आणि रिपब्लिकन स्थितीवादीवृत्तीचा सर्वात उपरोधिक आणि निर्भिड टीकाकार. काही अंशी तो ‘गावरान नोम चोम्स्की’ आहे!
तर मायकेल मूरच्या ड्यूड, व्हेअर्स माय कंट्री या (वार्नर बुक्स २००३) पुस्तकातील हाऊ टु स्टॉप टेररिझम ? स्टॉप बीइंग टेररिस्ट्स!’, या प्रकरणाचा हा संक्षेप
आजी आणि भावी दहशतवादी हल्ले कसे थांबवावे यावरच्या माझ्या सोप्या आणि झटपट अभ्यासक्रमात तुमचे स्वागत!
मोठ्या गाड्यांचे व्यसन
मोटर-कारचा शोध लागण्याआधीचे आयुष्य कल्पनेत आणा. आज गरीब देशांमध्ये जसे मर्यादित हालचालीचे आयुष्य असते, तसेच तेव्हा श्रीमंत राष्ट्रांतही असायचे. कुटुंब, फारतर मोहल्ला-पेठ-वेटाळ या सीमेतच ते बांधले जायचे. मग खनिज तेलाचा व्यापारी वापर करू देणारे तंत्रज्ञान आले आणि सीमा विस्तारून ‘मुक्ती’ मिळाली. जेव्हा हे तंत्रज्ञान पंखांशीही जोडले गेले तेव्हा तर जग झपाट्याने लहान झाले. माझे आईवडील कधी विमानात बसले नाहीत माझी मुले दोन वर्षांची व्हायच्या आतच त्यांचे ५०,००० हवाई किलोमीटर झाले होते.
पण ११ सप्टेंबर २००१ ला जगाला खनिज तेलही धोकादायक असल्याची आठवण झाली.
‘कोषबद्धते’ला थारा नाही!
अमेरिका एका कारमध्ये बसून लांबच्या प्रवासाला निघाली आहे. आतली माणसे एकमेकांच्या जिवावर उठत नाही आहेत कारण प्रत्येकाची खानपानाची व्यवस्था, बसायचे आसन आणि मनोरंजनाची व्यवस्था इतरांपासून सुटी केली गेली आहे. बाबा उपग्रह रेडिओ ऐकताहेत, आईच्या हातात मासिक आहे आणि मुलांसाठी डीव्हीडी, एम्पी-थ्री म्यूझिक सिस्टिम्स आणि व्हिडिओ गेम्स आहेत.
वस्तूंचे प्रेम, वस्तूंमध्ये आश्चर्यकारक विविधता उपलब्ध असणे, आणि यांच्या मिश्रणातून प्रत्येकाने स्वतःचे इतरांपासून सुटे असे ‘विश्व’ घडवणे, यामुळे अमेरिका शांत आहे. इथल्या उपभोक्ता संस्कृतीत लोकांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असणे नुसतेच ‘हवेसे’ नाही, तर थेट आवश्यक आहे.
दगडविटांवर नको तेवढा: माणसांवर अपुरा!
पूर्व व पश्चिम जर्मनी जेव्हा एकत्र झाले तेव्हा चॅन्सेलर हेल्मुट कोल यांनी उत्साहाने पूर्व जर्मनीच्या पुनरुत्थानाच्या घोषणा केल्या. “बहरणारी क्षेत्रे काम करण्याला आणि जगण्याला सार्थ ठरवतील”, असे पूर्व जर्मनीला आश्वासन दिले गेले. वचनपूर्तीसाठी पश्चिम जर्मनीने मानवी इतिहासातील सर्वात मोठा संपत्तीचा ओघ पूर्वेकडे वळवला. सुमारे दीड हजार अब्ज डॉलर्स (सुमारे सत्तर हजार अब्ज रुपये) गेल्या चौदा वर्षांत पश्चिमेतून पूर्वेकडे गेले आहेत. जीवनमान सुधारणे आणि अजस्र सार्वजनिक कामे (रस्ते, धरणे, वीजकेंद्रे) उभारणे यांसाठी हे पैसे वापरले गेले. महामार्गांचे जाळे, हे एक महत्त्वाचे अंग होते.
भाडेनियंत्रण कायद्याचा परामर्श
भाडे नियंत्रण कायदा हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अस्तित्वात आला. आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये निर्माण झालेला हा कायदा त्यानंतरही अस्तित्वात राहिला. १९८७ च्या नॅशनल अर्बन कमिशनने या कायद्याच्या उगमासंबंधीची माहिती अहवालामध्ये दिली आहे.
“दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नागरी घरांच्या मागणीवर दुहेरी दबाव पडत होता. लढाईमुळे सैनिकांच्या वास्तव्यासाठी घरांची मागणी वाढती होती. पण त्याचवेळी लढाई-संलग्न मालाच्या टंचाईमुळे घरांची निर्मिती करण्यात अडथळे असल्याने पुरवठा कमी झाला होता. ब्रिटिश सरकारने, केवळ आपत्कालीन धोरण म्हणून भाडे नियंत्रण कायद्याची योजना केली होती. परंतु आणीबाणी संपल्यावरही राज्य सरकारांनी सदर भाडेनियंत्रण कायदा तसाच ठेवला.
शेवटी जबाबदारी आपलीच आहे
हा पक्ष निवडून आला की तो पक्ष, याला फारसे महत्त्व नाही, कारण मुद्दे तेच आहेत, आव्हाने तीच आहेतगेल्या वर्षी होती, तीच. मी योजना आयोगाच्या विकासाबद्दलच्या अहवालाकडे पाहतो. छान वाटते. अर्थव्यवस्था चांगल्या पायावर उभी आहे. अडचणी, अडथळे असूनही अर्थव्यवस्था पुढे जायला तयार आहे. परदेशी गुंतवणूक वाढते आहे. नव्या भाग भांडवल उभारण्यांना प्रतिसाद चांगला मिळतो आहे. पैसे असल्याची खूण आहे, ती विश्वासही असल्याची. परदेशी गंगाजळीही सव्वाशे अब्ज डॉलर्स आहे. गर्व वाटण्यासारखी स्थिती आहे, ही. प्रश्न असा की आपण या पैशांच्या वापराची योजना काय करतो आहोत?
रोजगार हमी कायदा – न्याय्य नियम
केंद्रात काँग्रेस व डाव्यांचे ण.झ.अ. सरकार आले. त्याच्या किमान समान कार्यक्रमात रोजगार हमी कायद्याचा मुद्दा असल्याने अनेक जण हुरळून गेले. ज्या ‘नव-उदार’ धोरणामुळे अशा कायद्याची गरज उत्पन्न झाली, त्याच धोरणाचे पुरस्कर्ते आता पुस्त्या-पुरवण्या जोडून रोजगार हमी विधेयकाला खच्ची करत आहेत. आणि नव-उदार धोरणाचा उत्साहाने पाठपुरावा करणारे आधीच्या छ.ऊ.अ. सरकारमध्ये होते तसेच सध्याच्या ण.झ.अ. सरकारातही आहेत.
ढोबळमानाने रोजगार हमी कायद्याबद्दल तीन भूमिका आढळतात. एक मत असे की अशा कायद्याने व्यापक आणि न्याय्य विकासाला चालना मिळेल. मागणी वाढून शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन साधले जाईल.
शिडी
प्रत्येक व्यक्तीची क्षमता मर्यादित असते. ती शक्य तितकी टोकापर्यंत ताणणे, आपली दृष्टी जास्तीतजास्त विस्तारणे हे त्यांचे संशोधनाचे ध्येय होते. या दृष्टिकोनाचे प्रतीक असे एक छायाचित्र त्यांच्या खोलीच्या भिंतीवर टांगलेले होते. पिएरो बोरेलो या चित्रकाराच्या ‘एका व्यक्तीचे स्वतःचे दर्शन (शिडीवरील माणूस)’ या चित्राची ती प्रत होती.
यात एक मोठी भिंत असून तिला टेकविलेल्या शिडीवर एक माणूस चढत आहे; तो शिडीच्या अर्ध्यावर पोहोचलेला आहे. भिंतीवर छत नाही, त्यामुळे त्यापलीकडे आकाशाचा तुकडा आणि बाहेरील जगाचे थोडेफार दर्शन होत आहे. माणसाची भिंतीवर पडलेली सावली त्याच्यापेक्षा खालच्या अंगाला आहे.
विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा
हे प्रा. मे. पुं. रेगे ह्यांचे शेवटचे पुस्तक. वस्तुतः ते नवे पुस्तक नव्हे, ते रेग्यांच्या १९७८ ते २००० या काळात, दोन निबंध सोडल्यास, नवभारत मासिकात प्रसिद्ध झालेल्या निवडक लेखांचा संग्रह आहे. पण ते सर्व लेख मुख्यतः नवभारत मासिकात आणि अन्य दोन तीन मासिकांत प्रसिद्ध झाल्यामुळे मासिकांतील लेखांचे दुर्भाग्य त्यांच्याही वाट्याला आलेले होते. विशेषतः त्या लेखांतील विचारांत हळूहळू दूरगामी बदल घडला असल्यामुळे त्यांचे एकत्रित चित्र वाचकाच्या मनात सहसा उतरत नाही. त्यामुळे आता त्या लेखांचा संग्रह प्रसिद्ध झाला ही गोष्ट स्वागतार्ह आहे. रेग्यांचे विचार कसे कसे बदलत गेले आणि शेवटी ते काय होते हे सांगणे आता शक्य झाले आहे.