प्रत्येक व्यक्तीची क्षमता मर्यादित असते. ती शक्य तितकी टोकापर्यंत ताणणे, आपली दृष्टी जास्तीतजास्त विस्तारणे हे त्यांचे संशोधनाचे ध्येय होते. या दृष्टिकोनाचे प्रतीक असे एक छायाचित्र त्यांच्या खोलीच्या भिंतीवर टांगलेले होते. पिएरो बोरेलो या चित्रकाराच्या ‘एका व्यक्तीचे स्वतःचे दर्शन (शिडीवरील माणूस)’ या चित्राची ती प्रत होती.
यात एक मोठी भिंत असून तिला टेकविलेल्या शिडीवर एक माणूस चढत आहे; तो शिडीच्या अर्ध्यावर पोहोचलेला आहे. भिंतीवर छत नाही, त्यामुळे त्यापलीकडे आकाशाचा तुकडा आणि बाहेरील जगाचे थोडेफार दर्शन होत आहे. माणसाची भिंतीवर पडलेली सावली त्याच्यापेक्षा खालच्या अंगाला आहे.
विषय «इतर»
विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा
हे प्रा. मे. पुं. रेगे ह्यांचे शेवटचे पुस्तक. वस्तुतः ते नवे पुस्तक नव्हे, ते रेग्यांच्या १९७८ ते २००० या काळात, दोन निबंध सोडल्यास, नवभारत मासिकात प्रसिद्ध झालेल्या निवडक लेखांचा संग्रह आहे. पण ते सर्व लेख मुख्यतः नवभारत मासिकात आणि अन्य दोन तीन मासिकांत प्रसिद्ध झाल्यामुळे मासिकांतील लेखांचे दुर्भाग्य त्यांच्याही वाट्याला आलेले होते. विशेषतः त्या लेखांतील विचारांत हळूहळू दूरगामी बदल घडला असल्यामुळे त्यांचे एकत्रित चित्र वाचकाच्या मनात सहसा उतरत नाही. त्यामुळे आता त्या लेखांचा संग्रह प्रसिद्ध झाला ही गोष्ट स्वागतार्ह आहे. रेग्यांचे विचार कसे कसे बदलत गेले आणि शेवटी ते काय होते हे सांगणे आता शक्य झाले आहे.
एक जेवतानाची मुलाखत
माझी जगदीश बारोटियांशी ओळख नव्हती, पण ओळख करून घ्यायची इच्छा होती. मला शत्रू मानणारा भेटावा; तो मला शत्रू का मानतो, स्वतःपेक्षा वेगळ्यांना शत्रू का मानतो, हे समजून घ्यायची इच्छा होती. सन २००० मध्ये ‘हिंदू युनिटी’ नावाच्या एका वेबसाईटवर हिंदू भारताच्या शत्रूची एक यादी झळकली आणि त्यात माझे नाव होते. नवजागृत, डाव्यांना विरोध करणाऱ्या, जहाल राष्ट्रवादी अशा त्या गटांना माझ्यासारख्या ‘गद्दार’ हिंदूंबद्दल खास द्वेष होता.
त्याच सुमाराला न्यूयॉर्क टाईम्स मध्ये एक बातमी आली की मुस्लिमांविरुद्ध हिंसेला आवाहन केल्यामुळे एका हिंदू वेबसाईटला सेवा पुरवणे तिच्या ‘सर्व्हर’ने थांबवले.
डॉ. लागू-एक ‘लमाण’?
‘लमाण’ नुकतेच प्रसिद्ध झाले. रूढार्थाने ज्याला आत्मचरित्र म्हटले जाते, तसे प्रस्तुत ग्रंथाचे स्वरूप नसून ‘मनोगता’त म्हटल्याप्रमाणे त्यांच्या एकूण नाट्यप्रवासाचा तो धावता आढावा आहे. आपले खाजगी जीवन चित्रित करण्यात लेखकाला स्वारस्य नाही. साडेतीनशेहून अधिक पृष्ठसंख्या असलेल्या ह्या पुस्तकात कौटुंबिक उल्लेख अपवादात्मकच आहेत. नाट्यक्षेत्राशी संबंधित व्यावसायिक जीवन शब्दबद्ध करण्यासाठी, सुहृदांच्या आग्रहानुसार ‘लमाण’ची निर्मिती झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या जडणघडणीत किंवा व्यक्तिमत्त्व समृद्ध होण्यासाठी ज्यांचा हातभार लागला, त्यांच्याविषयीच्या आठवणींनी पुस्तकाची सुरुवात होते. आई-वडिलांपासून निघून भालबा केळकर, प्रा. दीक्षित, वसंत कानेटकर, इंदिरा संत, पु.शि. रेगे, जी.ए.
भ्रष्टाचार: कारणे व उपाय (भाग ३)
भ्रष्टाचार निर्मूलनाचे उपाय
आतापर्यंत आपण भ्रष्टाचाराची विशिष्ट कारणे, स्वरूप व परिणाम यांच्याविषयी विचार केले. त्यावरून भ्रष्टाचाराचे निर्मूलन ही आजच्या समाजापुढील सर्वांत मोठी समस्या असल्याचे आपणास जाणवते. सदर समस्या सोडविणे हे समाजाच्या भवितव्याच्या दृष्टीने अपरिहार्य आहे, हेही आपणास पटण्यासारखे आहे. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कोणते उपाय योजावेत, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. भ्रष्टाचाराचे स्वरूप गुंतागुंतीचे असल्याने व त्याची कारणेही सामाजिक, आर्थिक, नैतिक अशी अनेकविध असल्याने त्यावरील उपायांचा विचार विवेकावर आधारित असणे आवश्यक आहे. उपायांचा विचार करताना भ्रष्टाचाराची कारणे समोर ठेवल्यानेच त्याचे सम्यक् आकलन आपणास होऊ शकेल.
“तलाक’ स्त्रियांना का देता येऊ नये?
सुमारे पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट. माझ्या बालपणी एक घटना माझ्या मनावर कोरली गेली. आम्ही वाड्यात राहत होतो. आमच्या घरी काही नातेवाईक मंडळी मुक्कामाला आलेली होती. खरे तर त्यांचा काश्मीरदर्शनासाठी जाण्याचा बेत होता. त्या निमित्ताने घरून रवाना होण्याआधीचा वेळ सत्कारणी लावण्यासाठी कॅरम खेळण्याची टूम निघाली.
माझे वडील कॅरम खेळत असत. तेव्हा पाहण्यांपैकी वयस्काबरोबर, प्रतिस्पर्धी भिडू म्हणून माझ्या वडिलांना बोलावले गेले. खेळ सुरू होण्याआधी पाहुणे मंडळींनी कॅरम खेळण्याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या नियमांसारखे अनेक नियम सांगितले. माझ्या वडिलांनी ते सर्व ऐकून आणि समजून घेतले. मग पाहुण्यांनी माझ्या वडिलांना पृच्छा केली की, तुमचे काही नियम असल्यास सांगा.
बदलते समाज, उर्फ सोशल डायनॅमिक्स
पृथ्वीवर विखुरलेल्या मानवी समाजांचा शास्त्रीय अभ्यास शक्य आहे या विश्वासातून समाजशास्त्र निर्माण झाले. अस्तित्वात असलेल्या समाजांचे तपशीलवार निरीक्षण व असित्वात नसलेल्या समाजांचा इतिहास, असा विषय उपलब्ध होऊ शकतो. इ.स. पूर्व ३००० ते इ.स. २००० असा सुमारे ५००० वर्षांचा काळ इतिहासाचा काळ समजता येईल, कारण त्याबाबतची वस्तुनिष्ठ दृष्टीने टिपून ठेवलेली वर्णने मिळू शकतात. त्या आधीच्या काळात झालेल्या घडामोडी भूस्तरशास्त्र (जिऑलाजी) व पुरामानववंशशास्त्र (पॅलिओअॅन्थ्रॉपॉलाजी) यांचा विषय होतात.
भौतिकशास्त्रात स्टॅटिक्स व डायनॅमिक्स असे दोन भाग आहेत, त्याचप्रमाणे समाजांची स्थिती व त्यांची गति अभ्यासणारे दोन भाग पडू शकतात.
विवेकवाद – भाग ५ (प्रथम प्रकाशन ऑगस्ट १९९० अंक १.५, लेखक – दि. य. देशपांडे)
या लेखमालेच्या पहिल्या लेखांकात आपण कशावर विश्वास ठेवावा ? असा प्रश्न आपण विचारला होता, आणि त्याचे उत्तर अर्थात् सत्य विधानांवर असे एका वाक्यात दिले होते. परंतु यावर एक आक्षेप असा घेतला जाऊ शकेल की सत्य विधानावर विश्वास ठेवावा हे उत्तर पूर्णपणे बरोबर नाही. सत्यावर विश्वास ठेवणे नेहमीच इष्ट असेल असे नाही. कित्येकदा सत्यदर्शन अनिष्टही असू शकते. उदा. एखाद्या मनुष्याला जर गंभीर आजार झाला असेल तर पुष्कळदा रोग्याला डॉक्टर ते सांगत नाही. रोगी कदाचित मानसिक धक्क्याने आणि निराशेने हातपाय गाळील, आणि रोगाला प्रतिकार करण्याची त्याची शक्तीच नाहीशी होऊ शकेल.
‘अंतिम’ इतिहास
भावी पिढ्यांतील इतिहासकार ‘अंतिम’ इतिहासाची अपेक्षा ठेवणार नाहीत. त्यांचे संशोधनाचे काम वारंवार नवनव्या संशोधनाने मागे पडणार आहे, हे त्यांना अपेक्षितच असेल. त्यांना जाणीव असेल, की भूतकाळाचे ज्ञान आपल्यापर्यंत काही माणसांमार्फत, त्यांनी केलेल्या प्रक्रियांमधूनच येते. त्या ज्ञानात मूलभूत, व्यक्तिनिरपेक्ष, अपरिवर्तनीय असे काही मानता येत नाही.
काही उतावळे अभ्यासक तर अशा साशंक भूमिकेला येऊन पोचतील, की ऐतिहासिक ज्ञानाचे निष्कर्ष माणसे व दृष्टिकोन यांतूनच आपल्यापर्यंत येत असल्याने एक मांडणी व पर्यायी मांडणी यांतील कोणतीही मानायला हरकत नाही, कारण वस्तुनिष्ठ ऐतिहासिक सत्य असे काही नसतेच.
विवेक आणि अंतःप्रेरणा (Reason and Intuition)
Choose Life या पुस्तकाचे मलपृष्ठावरील अवतरण खालीलप्रमाणे : (टाइम साप्ताहिक, अमेरिका यांच्या अंकातून ): अर्नोल्ड टॉयन्बी यांचेवर टीका करणारे आहेतच. पण त्यांची गणना आइन्स्टाइन, श्वाइट्झर किंवा बरट्रांड रसेल, यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय संतांच्या मालिकेत होते. अनेकानेक विषयांवरील त्यांच्या मतांची चौकशी केली जात असे. डाइसाकु इकेडा त्यांच्या इतर ग्रंथांतून, व्याख्यानांतून आणि लेखांतून इकेडा यांनी ‘जागतिक अन्न बँक’, ‘संरक्षण खर्चात कपात’ व ‘आण्विक शस्त्रांचा त्याग’ याविषयी ऊहापोह केला आहे. त्यांचा सर्वाधिक ओढा मात्र मानवी समूहांतील युद्धविरोधी भावनांची वाढ या विषयांकडे आहे. इकेडा (इ) : अंतःप्रेरणा (Intuition) आणि विवेक (reason) एकमेकांस पूरक असतात.