समाजरचनेचा विचार करताना तळागाळातील व्यक्तीपासून ‘उच्च’ वर्गातील व्यक्तींसकट सर्वांच्या हितासाठी नेमके काय हवे याचे भान हवे. जोडणारे बंध व्यक्ती-व्यक्तीमध्ये वा एकूण समाजामध्ये वितुष्ट आणणारे असल्यास त्यांचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. सामान्यपणे कुठलाही वाद व विशेषकरून टोकाचा राष्ट्रवाद व अशा राष्ट्रवादांच्या संकेत-संज्ञा वापरण्यावर दुराग्रह या कुठल्याही सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या समाजाला हितावह ठरणाऱ्या नाहीत. भावनांचा उद्रेक होणार नाही याची काळजी घेणारी सक्षम यंत्रणा असणे गरजेचे आहे. समाजातील अभिजन वर्गाकडे role-model म्हणून इतर बघतात. त्यांचे सही सही अनुकरण करतात. म्हणून या अभिजनवर्गाने आपले आचार-विचार, वर्तणूक, सोई-सुविधा, छंद-सवयी इत्यादींबद्दल जास्त जागरूक व संयमित असणे गरजेचे आहे.
विषय «इतर»
कुटुंबाच्या मर्यादेत वृद्धांचा सांभाळ
आठ पंधरा दिवसांपूर्वी माझ्या सासूबाई हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या 83 व्या वर्षी निवर्तल्या. गेली 8-10 वर्षे त्या आमच्याचकडे होत्या. आणि त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांची एकुलती एक मुलगी-माझी पत्नी–वारल्यानंतरही मी त्यांना प्रेमाने सांभाळले, हवे नको पाहिले, दवापाणी काटेकोरपण बघितले. यात जगावेगळे मी काही करीत आहे अशी माझी भावना नव्हतीच. पण त्या निवर्तल्यानंतरच्या ज्या प्रतिक्रिया माझ्याजवळ व्यक्त झाल्या त्या मात्र धक्कादायक वाटतात.
“काय, म्हातारीचा बोजा उतरला? सुटलात तिच्या …ला.’ ही त्यातली एक प्रतिक्रिया. “काही बोलू नका हो तुम्ही, वस्तुस्थिती हीच होती.” हे वर. हे बोलणारे माझे मित्र एरवी मनाने मायाळू आहेत.
“धोकादायक पाणी!”
पण मौजेची गोष्ट अशी, की पाणी जरी थंडगार, मधुर आणि पारदर्शक असले तरी त्याच्या मालकीचा किंवा वाटपाचा प्रश्न मात्र अत्यंत स्फोटक, कडवट आणि गुंतागुंतीचा होऊ शकतो, एवढेच नाही तर समाजव्यवस्थेत फार मोठी उलथापालथ त्यामुळे होऊ शकते. प्राचीन इराकमधली वैभवशाली संस्कृती पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे जमीन उजाड होऊन नष्ट झाली, असे मत एरिक एकहोल्म ह्या पर्यावरणशास्त्रज्ञाने मांडले आहे. सिंधू संस्कृतीचा नाश परकीय आक्रमणामुळे झाला नसून त्यांचे पाणी व्यवस्थापनाचे तंत्र बिघडल्यामुळे झाला असे मत नवीन संशोधनाद्वारे सध्या पुढे येत आहे. शाक्य आणि कोलीम या दोन गणराज्यांमधल्या ‘रोहिणी’ नदीच्या पाणीवाटपाच्या संघर्षाचे निमित्त होऊन गौतम बुद्धाला राजत्याग करावा लागला, असे डॉ.
तव्य (ought) आणि कर्तव्य (duty)
नीतिशास्त्रातील प्रमुख संकल्पना म्हणजे ‘साधु’ (good) आणि ‘तव्य-कर्तव्य’ (ought-duty) या. त्यांपैकी ‘साधु’ म्हणजे काय याविषयी मी अनेक लेखांत (विशेषतः गेल्या दोन लेखांत) लिहिले आहे. परंतु ‘तव्याविषयी मात्र फारसे स्पष्टीकरण झाले नाही अशी माझी समजूत आहे. ती चर्चा या लेखात करण्याचा मानस आहे.
‘कर्तव्य’ किंवा ‘तव्य’ म्हणजे काय? प्रथमदर्शनी उत्तर सुचते ते म्हणजे त्या कल्पनेत बंधकत्वाची, एखादे कर्म करण्यास बद्ध करण्याची, कल्पना प्रामुख्याने समाविष्ट आहे असे दिसते. ‘अमुक कर्म माझे कर्तव्य आहे’ म्हणजे ते कर्म करण्यास मी बांधील आहे, ते मला आवडो की न आवडो, ते कर्म करण्याची इच्छा असो की नसो.
उत्क्रांतीची तोंडओळख (लेख-२)
19 व्या शतकात पा चात्त्य जगातही धर्म, कर्मकांड, अंधश्रद्धा यांचे साम्राज्य होते. खरे तर डार्विनने 1838 मध्येच उत्क्रांतीची उपपत्ती (theory of cvolution) मांडणारा Origin of Specics नावाचा ग्रंथ लिहिला होता. परंतु डार्विनची ‘उत्क्रांतीची उपपत्ती’ पारंपारिक पा चात्त्य मनाला रूचणारी नव्हती. केवळ यासाठीच त्याने हा ग्रंथ उपपत्ती सुचल्यावर लगेच प्रकाशित केला नाही. एव्हढेच नव्हे, तर त्याने आपल्या पत्नीलाही सांगितले होते की उत्क्रांतीवरचे आपले लेखन अपेक्षेप्रमाणे आपल्या हयातीत झाले नाही, तर या विषयावरची आपली हस्तलिखिते आपल्या मृत्यूनंतरच प्रकाशित करण्यात यावी. ख्रिश्चन धर्मानुसार ईश्वरानेच सर्व काही घडवून आणले आहे.
काहीतरी ओळखीचे वाटते आहे का?
सामाजिक सेवा आणि (पहिल्या महा-)युद्धासाठी (शत्रुराष्ट्रांना) द्यावा लागणाऱ्या नुकसान भरपाईसाठी सरकारने ‘पोकळ पैसा’ छापल्यामुळे प्रचंड भाववाढ झाली. पश्चिमी राष्ट्रांनी भाववाढ रोखण्यासाठी लादलेल्या उपयांमुळे अनेक जण बेकार झाले. लोकांच्या भ्रमनिरासातून मतदारांचे उजव्या व समाजवादी पक्षांमध्ये ध्रुवीकरण झाले. दोन्ही पक्ष पहिल्या युद्धातून वाचलेल्या युद्ध साहित्याने सज्ज अशा मोठाल्या खाजगी सेना बाळगू लागले. यांच्यातील झटापटींपासून दूर राहणे (टागीसारख्या) तरुण प्राध्यापकाला काही काळ शक्य होते.
दुभंगलेल्या लोकशाही ऐवजी टोटॅलिटेरियन हुकूमशाही ऑस्ट्रियात प्रस्थापित होणे हे नोकरशाही, सेना, कॅथलिक चर्च आणि उजव्या राजकीय पक्ष-यंत्रणांना
आ चर्यकारकपणे ‘रुचकर’ वाटले.
सर्व प्राणी समान आहेत
[1974 मध्ये प्रकाशित झालेल्या प्राध्यापक पीटर सिंगर यांच्या ‘All Animals are Equal’ या लेखाचा स्वैर अनुवाद व संक्षेप. सिंगर हे ऑस्ट्रेलिया-तील मेलबोर्न येथे मोनॅश युनिव्हर्सिटीत प्राध्यापक आहेत.]
अलीकडच्या काळात पीडित वर्गांनी विषमतेविरुद्ध जोराचे लढे दिले आहेत. त्यांचे एक अभिजात (classic) उदाहरण म्हणून अमेरिकी संस्थानांतील कृष्णवर्णीयांनी केलेल्या चळवळींचे देता येईल. काळ्या लोकांना दुय्यम नागरिक ठरविणाऱ्या पूर्वग्रह आणि पशुतुल्यव्यवहार या प्रवृत्तींचा उच्छेद झाला पाहिजे अशी या चळवळीची मागणी होती. तिच्या पाठोपाठ आपण अनेक अन्यही लढे पाहिले आहेत.
मोचक चळवळींची मागणी आपल्या नैतिक क्षितिजाच्या विस्तारांची आणि समानतेच्या मूलभूत तत्त्वाच्या पुनर्विवरणाची असते.
मानवतेविरुद्ध गुन्हा (लेख-१)
२२ फेब्रुवारी २००२ ला करसेवकांचा एक जथा साबरमती एक्स्प्रेसने अमदावादहून अयोध्येला गेला व २६-२७ फेब्रुवारीला परतला. दोन्ही प्रवास होत असताना जागोजागी करसेवकांनी इतर प्रवासी, स्थानकांवरील विक्रेते वगैरेंशी गैरवर्तन केले. विशेषतः मुस्लिमांशी हे वर्तन नारेबाजी व अरेरावीच्या बरेच पलिकडचे होते. फैजाबादच्या २५ फेब्रुवारीच्या वृत्तपत्रात अयोध्येकडील प्रवासातील गैरव्यवहाराची नोंदही झाली.
२७ फेब्रुवारीला सकाळी ७.३० ला गोध्रा स्थानकावर मुस्लिम स्त्रिया व विक्रेत्यांशी करसेवकांच्या दुर्वर्तनाच्या अनेक घटना घडल्या. गाडी सुटली व एखादा किलोमीटर जाऊन थांबली—-का थांबली हे कळलेले नाही. चालकाने बाहेरून एक जमाव गाडीवर गोटमार करताना पाहिला, पण ही गोटमार एस-६ डब्यावर होत नव्हती.
राष्ट्राचे आरोग्य मुलाखत
1986 मध्ये डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून सार्वजनिक आरोग्याची पदवी संपादन करून भारतात परतले. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यातील गडचिरोलीसारख्या अति मागास भागात त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. ग्रामीण आणि आदिवासी स्त्रियांच्या आरोग्याचा स्त्री-रोग-विज्ञानाच्या (gynaecological) दृष्टिकोनातून अभ्यास करायला डॉ. राणी बंग ह्यांनी सुरुवात केली. अशा प्रकारची चिकित्सा ही त्या क्षेत्रातील नवी पायवाट तर ठरलीच पण जागतिक पातळीवरही त्यांनी केलेले काम अनन्य स्वरूपाचे मानले गेले. ह्या अभ्यासाचा आधार घेऊनच भारत सरकारने आपले जननारोग्य आणि बालकांचे आरोग्य (Reproductive and Child Health – RCH) विषयी धोरण आखले.
शतखंडित शहरे
[शहरे टिकवावयाची असतील तर त्यासाठी शहरी प्रक्रियांकडे सर्वाधिक लक्ष द्यावे लागेल. कारण या प्रक्रियांचे प्रवाही स्रोतच शहराचे स्वरूप आणि भवितव्य ठरवितात.]
स्पिरो कोस्तोफ –1992
विसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकांत विकसित पश्चिमी जगांत मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या. त्यामागे लपलेल्या आर्थिक कारणांचा शोध पा चात्त्य अभ्यासक नानाविध प्रकारांनी घेत असतात. अमेरिकेतील रीगनचा अध्यक्षीय काळ आणि इंग्लंडमधील मार्गारेट थैचर यांची राजवट एकाच वेळी तेथील आर्थिक धोरणांना मोठेच क्रांतिकारी वळण देणारी होती. सर्वप्रथम खाजगीकरणाची हाक त्यांनी दिली आणि बघता बघता जगातील बहुसंख्य देशांत ती लाट पसरली.