गॉड इज डेड असे कुणीतरी हट्टी तत्त्ववादी मागेच सांगून गेला म्हणे. असेलही कदाचित हे सपशेल खरे किंवा धादान्त खोटेही अथवा अर्धे खरे अर्धे खोटे. पण ज्या काळी तू खऱ्या अर्थाने जिवंत होतास तेव्हा तरी काय दिवे लावलेस? सोळा सहस्र गवळणींसह नाचलास आपल्या बायकोसह वनात
चालता झालास रोजच घडणारे आम रस्त्यावरचे इन-मिन-तीन सीन बघून सारा संसार असार म्हणत महाशून्यात पसार झालास किंवा सर्वांगावर खिळे ठोकून घेत शेवटी आपलीच मान खाली घातलीस वा स्वतःचाच देह चरकात पिळून घेत त्याचे सताड चिपाड केलेस: आणि ज्या क्षणी हा तुझा पवित्र-पीडित अन्तरात्मा चाबुकराणीचा रोग लागलेल्या उसागत शेंड्यावर निमूळ होत होत दिवंगत झाला तेव्हा तुझ्या ह्या ग्यानी अनुगामी भक्तांनी तुलाच आकाशात व पाताळात समुद्रात नी पहाडात ढकलून दिले (आगामी सिसिफसच्या गड चढणीसाठी) इतकेच नव्हे तर म्हातारी मेली उन्हाळ्यात नी रड आला पावसाळ्यात या म्हणीनुसार त्याच बिलंदर बुकींनी इहलोकाशी विचित्र फिक्सिंग करून तुझ्या अज्ञात व अदृष्ट गढी-मढी वर मोठमोठाली देवळे — रावळे पुतळे व मकबरे उभारलेत, कला आणि साहित्य याचे उदंड पीक अशाच मूठ मातीतून तरारलेत असे नंतरचे शोधकर्ते सांगतात: आणि आजकाल तर सारा आनंदी आनंदच परमेश्वरा!
Category «इतर»
सांस्कृतिक नेतृत्व?
महाराष्ट्रातील सांस्कृतिक नेतृत्वाने (पत्रकार, विचारवंत, संपादक, लेखक, कवी इत्यादी) या बदलत्या जगाचे, माध्यममाहितीच्या क्रांतीचे, विज्ञान-तंत्रज्ञानाचे, दोलायमान मनःस्थितीचे आणि बहुसांस्कृतिकतेचे आव्हान विचारा तही घेतलेले नाही. आपल्या मानसिकतेच्या भौतिक (जातीय आणि भाषिक) कक्षा रुंदावल्या नाहीत. आफ्रिकेपासून अमेरिकेपर्यंत आणि अर्जेटिनापासून ऑस्ट्रेलिया-पर्यंत जे नवे प्रवाह साहित्य-संस्कृतीत येत होते, लोकांचे दैनंदिन जीवन बदलत होते, नवी मूल्ये तयार होती, नाती बदलत होती, त्यांची दखल घेतलेली नाही.
या सर्व जगडव्याळ घटनांचा संस्कार साहित्यातून प्रगट व्हायला ‘साहित्याचे राजकीय जागतिकीकरण’ होण्याची गरज नाही. अगदी कौटुंबिक, सामाजिक कथेतून वा राजकीय कादंबरीतूनही बदलणाऱ्या मानसिकतेचे चित्र रेखाटता येते.
अक्कलखाते
यूनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ही संस्था लहान आणि मध्यम गुंतवणूकदारांना देशातील उद्योगांमध्ये ‘थेट’ गुंतवणूक करता यावी यासाठी घडली. सरकारी नियंत्रणाखाली आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली या संस्थेत गुंतवलेले पैसे उद्योगांचे समभाग (शेअर्स) घेण्यासाठी वापरुन ही गुंतवणूक होत असते. बँका उद्योगांना कर्जे देतात तर युनिट ट्रस्ट थेट मालकीचा भाग विकत घेते, असा हा प्रकार असतो. सध्या यू.ट्र.ऑ.इं.ची यूएस ६४ ही योजना चर्चेत आहे. हिच्यात गुंतवणूक होती १४० अब्ज रुपये, आणि आज हिचा तोटा आहे ४५ अब्ज रुपये. काही उद्योगांचे समभाग अवास्तव किमतींना विकत घेतले गेले, व नंतर ते उद्योग अकार्यक्षम (किंवा फसवणूक करणारे) असल्याने तोटा आला, हे आता जगजाहीर झाले आहे.
हक्क केवळ मातेचाच
वसंत पळशीकर यांच्या लेखात (आ.सु. सप्टें. २००१) पुढील विधान आहे. “मुलांना जन्म देणे, अर्भकावस्थेत त्यांचे पोषण व संगोपन करणे हे कार्य सामान्यपणे माता बनणाऱ्या स्त्रीचे राहावे हे स्वभाविक व इष्टही आहे. ते अटळही आहे.”
“एकदा मुलाचा जन्म झाल्यावर त्याचे पोषण व संगोपन करणे हे मातेचे काम व ते स्वाभाविक व इष्टही आहे” ह्या वसंत पळशीकरांच्या भूमिकेला माझा विरोध आहे. आपल्या मुलांचे संगोपन कुणी करावे हा मातेचा निर्णय आहे. आपल्या मुलांसाठी काय इष्ट आहे हे ठरवण्याचा हक्क फक्त मातेला आहे. तीच स्वतःची कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक परिस्थिती जाणून घेऊन स्वतःच्या व मुलांच्या हिताचा विचार करू शकते.
‘मातृत्व’च्या निमित्ताने (Pair-bonding and Parenting)
नव्हें २००१ च्या आ.सु.च्या अंकात ललित गंडभीर यांनी लिहिलेला ‘मातृत्व’ हा विचारांना चालना देणारा लेख वाचला. त्यावर सुचलेले काही विचार असे —-
मातृत्व म्हणजे काय केवळ मुलांना जन्म देणे? पालनपोषणही त्यात येते का? वडलांचा त्यात किती भाग असावा? मुलांचे संगोपन करत असताना मातेची बौद्धिक भूक कशी पुरी करावी? आजच्या समाजाला पडलेल्या प्रश्नांपैकी हे काही प्रश्न आहेत.
आपण काळात मागे जाऊन आपला समाज कसा उत्क्रांत झाला ते थोडक्यात पाहू. माणूस पाचेक लाख वर्षात अग्नीपासून अग्निबाणापर्यंत कसा पोचला याची कहाणी नाट्यमय आहे. पण आज धोका संभवत आहे की या सर्वाने दिपून जाऊन माणूस विसरेल की झिलईदार पृष्ठमागाखाली तो एक कपीच आहे.
मुलांच्या बुद्धिमत्तेची जोपासना . . .
महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे ह्यांनी असे नमूद केले आहे की इसवी सनाच्या आठव्या शतकापर्यंत भारतात पदार्थ-विज्ञान, रसायन-शास्त्र, वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र आणि गणित इत्यादी क्षेत्रात प्रगती होत होती. त्याचे प्रमुख कारण असे आहे की त्या काळात गुरुशिष्य परंपरा होती आणि शिष्य प्रत्येक बाबतीत गुस्ता अनेक शंका विचारीत असे, आणि गुरु शिष्याचे शंकानिरसन करीत असे. कपिल, कणाद, पाणिनी, पतंजली, चरक, सुश्रुत, चाणक्य इ. त्या काळातील अनेक नावे प्रसिद्ध आहेत. गीतासुद्धा अर्जुन-कृष्णाच्या प्रश्नोत्तरांतूनच निर्माण झाली. अर्थात गीतेतील संस्कृत भाषा ज्याप्रमाणे लिहिली गेली आहे त्यावस्न गीता इसवी सनाच्या चौथ्या शतकात लिहिली गेली असे प्रा.
सामाजिक विकृतिविज्ञान
[शिवसेनेचे नेते आनंद दिघे ठाण्याजवळ एका अपघातात जखमी झाले. इस्पितळात उपाय योजना होत असतानाच ते वारले. ह्यात वैद्यांचा हलगर्जीपणा आहे असे मत बनवून शिवसैनिकांनी ते अद्ययावत खाजगी इस्पितळ नष्ट केले. ह्या घटनेबद्दल डॉक्टर जोशी लिहितात . . .]
वैद्यकक्षेत्रातील लोक व इतर विचारवंत यांनी शिवसैनिकांचा फक्त निषेध करणे पुरेसे नाही. सामाजिक विकृती व त्यांवरील उपाय शोधणे व ते अंमलात आणणे हा वैद्यकीय पेशांचा हेतूच असायला हवा.
काही वर्षांपूर्वी आजचा संतप्त भारतीय या मथळ्याच्या एका (मासिकातील) लेखात असे सुचवले होते की सामाजिक राग व असंतोषाचे नियमन करणाऱ्या पारंपारिक ‘सुरक्षा झडपा’ नष्ट होत असल्याने आजचे तणावपूर्ण जीवन हिंसाचाराच्या उद्रेकांपर्यंत जाऊन पोचते.
मध्यरात्रीनंतर पाच मिनिटे
माणसे धान्य पेरतात, पण त्यातून उगवणारी पिके मात्र कीटकांना आणि इतर जीवाणूंनाही आवडतात. अशा किडींपासून पिकांचे रक्षण करणे, हा शेतीच्या कामाचा अविभाज्य भाग आहे. वेगवेगळे नैसर्गिक व कृत्रिमरीत्या घडवलेले पदार्थ वापरून माणसे किडींचा नायनाट करू पाहतात. कधी किडी ह्या पदार्थांना ‘पचवू’ लागतात, तर कधी हे पदार्थ माणसांना व त्यांच्या परिसराला हानिकारक असल्याचे लक्षात येते. माणसांना त्रासदायक नसणारी, पण किडींना नष्ट करणारी रसायने घडवण्यात रसायनउद्योगाचा एक मोठा भाग गुंतलेला असतो. यूनियन कार्बाइड या बहुराष्ट्रीय कंपनीच्या शास्त्रज्ञांनी १९५४ साली अशी काही रसायने तपासली.
उदारीकरणामुळे शिक्षणातही असमतोल!
गेल्या दशकाच्या प्रारंभापासून देशात सुरू झालेल्या रचनात्मक सुधारणा प्रक्रियेचा भारतीय अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांवर नेमका कोणता परिणाम होईल, याबाबत आजवर विस्तृत विश्लेषण झाले आहे. मात्र या ऊहापोहात, या प्रक्रियेचा शैक्षणिक क्षेत्रावर आणि विशेषतः विद्यापीठीय व्यवस्थेवर काय प्रभाव पडेल याकडे मात्र दुर्लक्ष झालेले दिसते. कार्यक्रमाचे यश हे प्रामुख्याने तांत्रिक प्रगती, उत्पादकता आणि मनुष्यबळ विकास या तीन घटकांवर अवलंबून असते. या तीनही कारक घटकांच्या संदर्भात विद्यापीठीय व्यवस्थेची भूमिका केंद्रवर्ती स्वरूपाची आहे. असे असूनही या चर्चेतून शिक्षणक्षेत्र आणि विद्यापीठ व्यवस्था वगळली जावी, हा विरोधाभास जाणवणारा आहे.
रोजगार आणि पैसा
खादी आणि रोजगार यांच्या संबंधाने आपण मागच्या लेखांकात काही चर्चा केली. या अंकात रोजगार आणि पैशाची उपलब्धता यांचा विचार करावयाचा आहे. पैसा आणि रोजगार यांचे संबंध समजून घेण्यासाठी आधी आपण पैसा म्हणजे काय हे तपासून पाहू.
मला स्वतःला पैसा आणि परमेश्वर यांच्यात अत्यंत साम्य जाणवते. आजचा सुधारक च्या वाचकाला परमेश्वर नाही, पण तो आहे असे गृहीत धरून आपले सारे व्यवहार चालतात हे चांगले ठाऊक आहे. पण पैसा देखील मुळात कोठेही नसून तो आहे इतकेच नव्हे तर देवासारखाच सर्वशक्तिमान आहे असे गृहीत धरून चालल्यामुळे आपले आर्थिक व्यवहार होतात हे माहीत आहे की नाही याविषयी शंका वाटते.