वामन मल्हार जोशी यांच्या कादंबरी-वाड्मयाचा चिकित्सक अभ्यास करून त्यात वास्तववादाचा, गांधीवादाचा, समाजवादाचा शोध घेण्याचा प्रयत्न समीक्षकांनी केला. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी वा.म.जोशी यांना तात्विक कादंबरीचे जनक ठरविले आणि केवळ ‘तत्त्वप्रधान कादंबरी’ म्हणून रागिणीचा विचार करून चालणार नाही असा अभिप्रार डॉ. भालचंद्र फडके यांनी दिला. परंतु या तत्त्वचर्चेचे मूल्य कोणते या प्रश्नाचे उत्तर देण्याची जबाबदारी बहुतेक समीक्षकांनी टाळली आहे. अपवाद् प्रा. म.ग. नातू यांच्या ‘कै. वा. म. जोशी यांच्या स्त्रीजीवनविषयक चिंतनातील माघार’ या लेखाचा करावा लागेल. ( विवेकाची गोठी, अमेय प्रकाशन) वा. म.
विषय «पुस्तक/व्यक्ती परिचय»
सत्यशोधक वामन मल्हार जोशी
वा.म. जोशी ‘सत्यं, शिवं, सुंदरम’ या तत्त्वत्रयीचे निष्ठावंत उपासक आहेत. सत्यनिष्ठेने जीवनाला भरभक्कम आधार मिळतो. नीतिमत्तेने जीवनाला स्वास्थ्य लाभते, आणि सौंदर्याने जीवनात आनंद निर्माण होतो. मानवतेच्या सर्वांगीण हिताकरिता उपकारक अशी ही तत्त्वे आहेत.
वाड्मयकलाविषयक माझी दृष्टी या लेखात वामनराव जीवनवादी दृष्टीने कलेची मीमांसा करतात. ‘कला हे जीवनाचे एक अंग आहे, पण ते जीवनसर्वस्व नाही’ असे म्हणून नंतर ते सांगतात,’जीवनात कला नसेल तर ते बेचव, नीरस, कळाहीन होईल हे खरे, पण सत्य नसेल तर ते लुळे, आंधळे, पांगळे होईल आणि नीती नसेल तर ते रोगट, कुजके, नासके होईल.
प्रा. (श्रीमती) मनू गंगाधर नातू – विवेकवादाची साधना
३ एप्रिल ९० रोजी श्रीमती मनुताईंच्या मृत्यूला दोन वर्षे होतील. त्यांच्या वाट्याला जे सुमारे ६९ वर्षांचे आयुष्य आले ती एक विवेकवादाची प्रदीर्घ आणि खडतर साधना होती. खडतर अशासाठी म्हणावयाचे की, त्यांच्या जागी दुसरी एखादी स्त्री असती तर तिने विवेकवाद म्हणा किंवा बुद्धिप्रामाण्यवाद म्हणा या विचारसरणीची कास कधीच सोडली असती. एखाद्या चिकट आजारामुळे किंवा अपत्यसुखासारख्या सामान्य कौटुंबिक सुखाला वंचित झाल्यामुळे पुष्कळ उच्चविद्याविभूषित मंडळी मंत्र-तंत्र, व्रतवैकल्य अशा मार्गांकडे वळतात असे आपल्याला दिसते. लग्नाआधीचा ध्येयवाद लग्नानंतर जड ओझ्यासारखा दूर फेकला जातो. आपणही त्यांना दोष देत नाही.