(अंधश्रद्धा निर्मूलन-विधेयक आणि वारकरी या मुद्द्यावरून काही जण वाद निर्माण करायचा प्रयत्न करत असले तरी वारकरी ज्याला अनुसरतात त्या भागवत धर्मात कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला थारा नाही. उलट समाजातल्या अशा अपप्रवृत्तीवर घाला घालण्याचे कामच या धर्माने शतकानुशतके केले आहे. त्या संदर्भातले विवेचन. )
राज्यातील अंधश्रद्धेचा मुद्दा कायद्याच्या कक्षेत यावा, या चांगल्या उद्देशाने अंधश्रद्धा-निर्मूलन समितीने कायद्याचा मुद्दा लावून धरला. सुरुवातीस त्याचे नाव अंधश्रद्धा निर्मूलन-विधेयक असेच होते. मात्र नंतर ते महाराष्ट्र नरबळी व अन्य अमानवीय अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम या नावे आणण्यात आले.