मासिक संग्रह: जुलै, २००५

संपादकीय विशेषांकासंबंधी

येत्या काही महिन्यांत काही विशेषांक काढायचा प्रयत्न सुरू आहे. पाणी-जमीन-माणूस यांच्यातले परस्परसंबंध, भारतातील आरोग्यसेवा, कुशिक्षण, स्वयंसेवी संस्था, विविधांगी विषमता, असे अनेक विषय सुचत आहेत. काहींसाठी अतिथी संपादकही योजले गेले आहेत.
ज्येष्ठ साहित्य-समीक्षक म.वा. धोंड आपल्या जाळ्यातील चंद्र या पुस्तकाच्या प्रास्ताविकात लिहितात, “एखादे पुस्तक वाचताना मला काही प्रश्न पडतात, काही उणिवा जाणवतात, काही दोष खटकतात. त्या दोषांचे निराकरण कसे करता येईल उणिवा कश्या भरून काढता येतील आणि प्रश्नांचा उलगडा कसा करता येईल, यांचा मी विचार करू लागतो आणि त्यात मन गुंतते. हा गुंता सहजी सुटत नाही.

पुढे वाचा

खऱ्या बदलाचा प्रयत्न

भ्रष्ट लालूप्रसाद यादवांच्या विरोधातील संसद-बहिष्काराने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी विधेयक रखडले आहे. आज त्याचे भवितव्य एका भाजप खासदाराच्या अध्यक्षतेखालील समितीच्या हाती आहे, आणि त्याने काम न करायचे ठरवले आहे. भ्रष्टाचार भारतात अनेक रूपे घेतो.
डिसेंबर २००४ मध्ये विधेयक संसदेपुढे मांडले गेले तेव्हा लक्षावधी गरिबांना रोजगार पुरवण्यासाठीच्या पैशावर बरीच ‘हाथापायी’ करावी लागली होती. शेवटी एक क्षीण केलेले विधेयक घडवण्यात आले अकुशल काम करायची तयारी असलेली प्रौढ माणसे ज्या घरात असतील, त्या घरांमधील एका व्यक्तीला एका आर्थिक वर्षात शंभर दिवसांचा रोजगार देण्याची हमी हे विधेयक देणार.

पुढे वाचा

विवेकवाद – भाग ८(२): अध्यात्म आणि विज्ञान (प्रथम प्रकाशन नोव्हेंबर १९९० अंक १.८, लेखक – दि. य. देशपांडे)

[पायवा’च्या (भाग ८(१) मध्ये विज्ञान, अध्यात्म, तत्त्वज्ञान व त्याचे निकष आणि निष्कर्ष इ. वर चर्चा करण्यात आली. या भागात श्याम कुलकर्णीचे पत्र व त्याला दि.य. देशपांड्यांची प्रतिक्रिया सं.]
एवढ्या प्रस्तावनेनंतर आता आपण प्रा. श्याम कुळकर्त्यांच्या पत्राकडे वळू शकतो.
संपादक, नवा सुधारक यांस,
आपण म्हणता त्याप्रमाणे, व आगरकरही म्हणतात त्याप्रमाणे, विश्वासावलंबी कल्पनांची जागा विवेकवादाने घेणे इष्ट आहे हे उघडच; पण सर्वसाधारण माणसांस विवेकवाद हे आपल्या अपकृत्यांचे समर्थन करण्याचा मार्ग वाटू नये. मी खून केला तर मला त्याचे प्रायश्चित मिळेल ही भावना माणसास खून न करण्यास प्रवृत्त करते.

पुढे वाचा

मूलतत्त्ववाद

ए. श्रीनिवास: तुम्ही मूलतत्त्ववादाची व्याख्या कशी करता? सलमान अख्तर: मूलतत्त्ववाद म्हणजे पाच वैशिष्ट्ये असलेली धर्मव्यवस्था.
१)एखाद्या पोथीचा किंवा धर्मग्रंथाचा संकुचित आणि शब्दशः अर्थ लावणे. २) आपला ग्रंथ किंवा श्रद्धा यावरील आग्रहातून वंशकेंद्री विचारांचा पुरस्कार करणे. ३) जगाच्या स्थितीचे अतिसुलभीकरण केल्याने आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली आहेत, अशी अतिअहंभावी विकृती (megalomania) असणे. ४) याच नाण्याची दुसरी बाजू म्हणून आपल्यावर सतत अन्याय होत असल्याचा समज होणे. आणि ५) अशा समजावरच संघटन बेतून जरूर पडेल तसा त्या संघटनाचा हिंसक वापर करणे.
ही पाच वैशिष्ट्ये आली की मूलतत्त्ववाद आला.

पुढे वाचा

करण्याची कला

वंदिता मिश्राः मूलभूत लोकशाही (रिवळलरश्र वशोलीरलू) याचा तुम्ही काय अर्थ लावता?
सी. डग्लस लुमिसः लोकशाही या शब्दातच त्याची व्याख्या आहे. राजकीय समूहातले, ते लोक आणि शाही म्हणजे बळ किंवा सत्ता. तर लोकांपाशी राजकीय बळ किंवा सत्ता असणे म्हणजे लोकशाही. आपण जे निवडणुका, द्विपक्षीय व्यवस्था, संविधान वगैरेंना लोकशाही मानतो, ती खरे तर लोकशाही नाही ती लोकशाहीची साधने आहेत. त्यात एक गृहीतक दडलेले आहे की निवडणुकी व्यवस्था घडवल्याने लोकांची सत्ता घडेल.
ॲरिस्टॉटल लिहितो की अधिकाऱ्यांची निवड चिठ्या टाकून करणे म्हणजे लोकशाही, आणि निवडणुकीद्वारे करणे ही अभिजनसत्ता, aristocracy.

पुढे वाचा

गरीबी हटाओ

पण आपली पिढी-अमेरिकेतलीही आणि जगभरातली ही पिढी-२०२५ पर्यंत तीव्र दारिद्र्य संपवू शकते. त्यासाठी नव्या पद्धती लागतील. चांगले निदानीय (clinical) वैद्यक आणि चांगले विकासाचे अर्थशास्त्र या दोन्हींशी साम्य असलेले ‘निदानीय अर्थशास्त्र’ वापरावे लागेल. गेल्या पाव शतकात श्रीमंत देशांनी गरीब देशांवर लादलेले अर्थशास्त्र अठराव्या शतकातील वैद्यकासारखे होते जळवा लावून ‘दूषित रक्त’ काढा, रोगी मेला तरी चालेल. आज आधुनिक वैद्यकासारख्या काटेकोरपणाची, मर्मदृष्टीची आणि व्यवहार्यतेची निकड आहे.
दारिद्र्याची कारणेही अनेक, आणि त्यावर उपायही अनेक. पण माझ्या मताने शुद्ध पाणी, सकस जमीन आणि कार्यक्षम आरोग्यसेवा या बाबींना परकीय चलनाच्या विनिमय-दरांइतकेच महत्त्व आहे.

पुढे वाचा

इतिहासाचे विज्ञान

इतिहास ही ज्ञानशाखा सामान्यपणे विज्ञानात न धरता मानव्यशास्त्रांजवळची मानली जाते फारतर सामाजिक शास्त्रांपैकी एक, पण त्यांतही सर्वांत अवैज्ञानिक. शासनव्यवहाराचे ते ‘राज्यशास्त्र’, अर्थव्यवहाराबाबतचे नोबेल पारितोषिक ‘अर्थ-विज्ञान’चे, पण इतिहास विभाग मात्र स्वतःला ‘इतिहास-विज्ञानाचे विभाग’ म्हणत नाहीत. इतिहासाला तपशिलांची जंत्री मानण्याकडे कल दिसतो, जसे “शोभादर्शकात (घरश्रशळवीलेशि) दिसणाऱ्या आकृत्यांमागे जसा नियम नसतो तसाच इतिहासामागेही नसतो.”
ग्रहांच्या हलचालींमध्ये जी नियमितता असते ती इतिहासात आढळत नाही, हे नाकारता येत नाही. पण मला यातील अडचणी इतिहासाला मारक वाटत नाहीत. खगोलशास्त्र, हवामानशास्त्र, परिसरशास्त्र, उत्क्रांतिजीवशास्त्र, भूगर्भशास्त्र, पुराजीवशास्त्र वगैरे निसर्गविज्ञानाच्या ऐतिहासिक शाखांमध्येही इतपत अडचणी आहेत.

पुढे वाचा

ध्यानधारणा किंवा मेडिटेशन: वास्तव काय आहे?

‘ध्यानधारणा’ हा आज परवलीचा शब्द बनला आहे. आजच्या गतिमान आणि धकाधकीच्या जीवनात डोके थंड करण्यासाठी आणि ठेवण्यासाठी प्रत्येक जण कसून प्रयत्न करतो आहे. यासाठी आज ‘मेडिटेशन’ किंवा ध्यान करण्याकडे कल वाढत आहे. ध्यानाने ब्लडप्रेशर, हार्टअॅटॅक, मधुमेह, संधिवात इ. अनेक रोग बरे करू असे सांगणाऱ्या अनेक संस्था आज फैलावल्या आहेत. असे रोग ध्यानाने बरे झाल्याचा दावा करणारे अनेक ध्यानस्थही आपणांस दिसून येतात. ध्यानधारणा किंवा मेडिटेशन यात खरेच एवढी ताकद आहे ? ध्यानाने अमुक-अमुक बरे होते या म्हणण्यात तथ्य किती आहे? ध्यानाचे दुष्परिणाम काही होतात काय ?

पुढे वाचा

संमतीचे उत्पादन: प्रसारमाध्यमांचे राजकीय अर्थशास्त्र (पूर्वार्ध)

प्रसारमाध्यमे म्हणजे सर्वसामान्य जनतेला संदेश व प्रतीके यांचे संज्ञापन करून देणारी एक व्यवस्था. समाजाच्या संस्थात्मक रचनांमध्ये एकात्मता पावण्यासाठी जी मूल्ये, श्रद्धा व संकेत माणसाला आवश्यक असतात ती रुजवण्यासाठी तसेच त्याला माहिती व ज्ञान देण्यासाठी आणि त्याचे मनोरंजन करण्यासाठी माध्यमे काम करतात. वर्गहिताचे तीव्र संघर्ष आणि एकवटलेली अर्थसत्ता यांच्या जगात माध्यमांना हे कार्य करण्यासाठी पद्धतशीर प्रसार करावा लागतो. नोकरशाहीच्या ताब्यात ज्या देशाची सत्तासूत्रे असतात तेथे माध्यमांवरील एकछत्री अंमल सरकारी सेन्सॉरशिपच्या मदतीने एका प्रभुत्वशाली अभिजनवर्गाची पाठराखण करायला सज्ज असतो. त्यामुळे जेथे प्रसारमाध्यमे खाजगी असतात आणि सेन्सॉरशिप औपचारिकरीत्या अस्तित्वात नसते तेथे प्रचारतंत्र स्पष्ट दिसायला अडचण होते.

पुढे वाचा

इथले बाहेरचे

‘इथले’ लोक कोण आणि परके कोण हे ठरवणे अशक्य आहे. या उपखंडाचे पहिले निवासी कोण हेही ठरवता येत नाही. आजच्या इथल्या-बाहेरच्या अशा विभाजनाची प्राचीन काळातील स्थितीशी सांगड घालता येत नाही. खरे तर अनेक लोकांचे आणि कल्पनांचे इथे मिश्रण झाले आहे आणि नेमक्या या मिश्रणाच्या अभ्यासातूनच संस्कृतीची घडण तपासता येते.
वर्गीकरणाचे वाद आजच्या सत्तेच्या व अधिकारांबाबतच्या आस्थांमधून उद्भवलेले आहेत, इतिहासाच्या अभ्यासातून नव्हे. रोिमिला थापर यांच्या द पेंग्विन हिस्टरी ऑफ अर्ली इंडिया : फ्रॉम द ऑरिजिन्स टू ए.डी. १३०० (पेंग्विन, २००२) या पुस्तकातून.

पुढे वाचा