Monthly archives: जुलै, 2006

पत्रसंवाद

ग.प्र.प्रधान, द्वारा महाराष्ट्र आरोग्य मंडळ, हडपसर, पुणे ४११ ०२८.
आजचा सुधारक चा अंक आला. “दि.य. देशपांडे ह्यांची तत्त्वज्ञानात्मक भूमिका’ हा जोगिन्दर कौर महाजन यांचा लेख अप्रतिम आहे. तो लेख मी दोनदा वाचला आणि मला नानांची भूमिका बढेशाने समजली. शुभंकरणाचे तत्त्व यावर लिहिताना त्यांनी, प्रा. दि.य. देशपांडे यांनी कांटचे मत आणि उपयोगितावादी मत यांची सांगड घालण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्याचे स्वरूप माझ्यासारख्या सामान्य वाचकाला समजेल अशा रीतीने स्पष्ट केले आहे. श्रीमती महाजन यांना माझे मनःपूर्वक धन्यवाद.
जॉन स्टुअर्ट मिलच्या Utlitarianism चे प्रा.

पुढे वाचा

समूहाची बुद्धिमत्ता

कॉमनसेन्स हा व्यक्तीच्या पातळीवरसुद्धा सहसा आढळत नाही, हा नेहमीचा अनुभव असताना समूहामध्ये त्याचा शोध घेणे हास्यास्पद ठरेल असे वाटण्याची शक्यता आहे. एखादी गर्दी उपयुक्त विचाराला जन्म देऊ शकते हे कधीच अपेक्षित नाही. गर्दीतील बहुमत व अविचारीपणा अनेक वेळा एकट्यादुकट्याला तोंडघशी पाडतात. जातीपंचायतीतील निर्णयाविरुद्ध एक शब्द जरी उच्चारला तरी आयुष्यातून उठावे लागते. श्रेष्ठींचा दबाव व दहशत, ही तर शाळाकॉलेजमधील तरुण-तरुणींना कायमचीच भेडसावणारी समस्या असते.
परंतु समूहाला शहाणपणाचा विचार अजिबात करता येत नाही अशी परिस्थिती नक्कीच नसावी. नोकरशाहीचा पाया सर्व छोट्या-मोठ्या समूहांच्या विचारांच्या देवाण-घेवाणीवर व त्यास अनुसरून घेतलेल्या निर्णयावर अवलंबून आहे.

पुढे वाचा

जुनाच भ्रष्टाचार बरा?

इंटरनॅशनल हेरल्ड ट्रिब्यून च्या एका वार्ताहराने मला अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात वापरत असलेल्या ‘आधुनिक लॉबीइंगच्या प्रकारां’वर माझे मत विचारले. [लॉबीइंग, lobbying म्हणजे कोणत्याही दबावगटाने राष्ट्रीय धोरण आपल्या गरजांनुसार व्हावे, यासाठी केलेले प्रयत्न आपल्याकडे आज या अर्थी ‘फील्डिंग लावणे’ हा शब्दप्रयोग केला जातो. अमेरिकेत लॉबीइंग ‘ऑफिशियल’ व कायदेशीर आहे. सं.] माध्यमांमध्ये ‘स्टोऱ्या’ पेरणे, वैज्ञानिक व विचारवंतांशी ‘संवाद’ साधणे, आमदार-खासदारांचे थेट लॉबीइंग, अशी जी तंत्रे आज अमेरिकन कंपन्या भारतात वापरत आहेत, त्यांवर तो वार्ताहर अहवाल तयार करत होता.
माझे उत्तर होते की थेट लाच देणे आजही आहेच, पण जरा ‘दडवून’ ; आणि माझे मत विचारलेच तर मला जुना भारतीय नमुन्याचा भ्रष्टाचार नव्यापेक्षा बरा वाटतो.

पुढे वाचा

ईश्वराची प्रार्थना तारक की मारक?

असंख्य माणसे रोज अगदी नियमितपणे ईश्वराची प्रार्थना करीत असतात. मात्र अशा माणसांना ईश्वराची प्रार्थना का करावीशी वाटते, याची अनेक कारणे संभवतात. कोणी भाविक माणसे म्हणतील, की आम्ही अमुक एका धर्माचे प्रामाणिक अनुयायी असल्यामुळे, आमच्या ईश्वराची प्रार्थना करणे, हे आमचे पवित्र कर्तव्यच आहे. दुसरी कोणी माणसे म्हणतील, की आमच्या मनातील अनेक कामना ईश्वराची आराधना करून यथावकाश सफळसंपन्न होतील, अशी आमची श्रद्धा असल्यामुळे, आम्ही त्याची प्रार्थना करतो. तर अन्य कोणी माणसे असे म्हणतील, की आम्हाला या आयुष्यात पुण्यसंचय करून, इहलोकीची यात्रा संपल्यावर स्वर्गप्राप्ती करून घ्यावयाची आहे, म्हणून आम्ही निरतिशय प्रेमाने ईश्वराची प्रार्थना करीत करीत, या भूलोकीचा मार्ग आक्रमित असतो.

पुढे वाचा

मेंदूतील ‘देव’

देव ही एक संकल्पना आहे, धर्म ही एक संकल्पना आहे, असे असेल तर मग ‘देव भेटला’ असे संत का सांगतात ? प्रत्येक धर्माचा देव आहेच. आजकाल ‘देवाचा अवतार’ म्हणवून घेणारे ‘महाराज’ अवतरले आहेत. ‘देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा आता’ असे म्हणत धार्मिक अनुभव घेणाऱ्या लाखो भक्तांचा हा अनुभव म्हणजे नेमके काय असावे ? ते मानणारे भ्रमात असतात काय?
देव डोक्यात असतो असे समजले जायचे. पण मग मेंदूत त्याचे अस्तित्व सापडावयास हवे. किमान अनुभवांची मेंदूत काही क्रिया होत असेल तर ती दिसावयास हवी.

पुढे वाचा

शेतकऱ्याच्या दुरवस्थेची वास्तविकता

गेल्या २५-३० वर्षांतील शेतीचा अनुभव आजच्या शेवटच्या टप्प्यात मात्र कटु वाटू लागला. सन १९७२ च्या दुष्काळापासून शेतीउत्पादनातील चढउतार पाहावे लागले. शेती निसर्गावर अवलंबून की नशिबावर हेच आज कळेनासे झाले आहे.
माझे वडील ‘अण्णा’ यांनी कराड तालुक्यातील शेतांत १९५२ नंतर दोन विहिरी पाडल्या. जमिनीस बांध घातले. शेतीतील अनपेक्षिततेचे ओझे सहन केले. बँका- सोसायट्यांच्या कर्ज-थकबाकीबद्दल अनेक वेळा अपमानास्पद घटना विसरून शेती-व्यवसाय चालू ठेवला. वरील दोन्ही विहिरींत मात्र दुर्दैवाने पाणी लाभले नाही. त्याकाळी बागायत जमिनीतून उत्पन्न बरे मिळत होते, परंतु जिवंत बारमाही पाणी नसल्यामुळे त्यांचे शेतीतील आयुष्य अत्यंत कष्टप्रद होते.

पुढे वाचा

शेतीची सद्यःस्थिती व पर्यायी दिशा

शेती व शेतकरी यांची सद्यःस्थिती सामान्य नागरिकांनीदेखील समजून घेणे, या प्रश्नाविषयी संवेदनशील होणे व यावर स्थायी उपाय सुचविण्यासाठी आपलाही वाटा उचलणे गरजेचे आहे.
१.०. शेतीची सद्यःस्थितीः १.१. शेतजमीनधारणाः
आपल्या देशातील लागवडीखाली असलेल्या जमीनधारणेचा विचार करता खाली चित्र दिसते.
जमीनधारणा प्रकार जमीनधारक कुटुंबांची संख्या % त्यांच्याकडील जमिनीचे क्षेत्रफळ %
अत्यल्प (१ हेक्टर खालील) ५९.४ १५.०
अल्प (१-२ हेक्टर) १८.८ १७.४
अर्ध-मध्यम (२-४ हेक्टर) १३.१ २३.३
मध्यम (४-१० हेक्टर) ७.१ २७.१
मोठे (१० हेक्टरच्या वर) १७.३
१००.० १००.०
यावरून असे लक्षात येते की आपल्या देशातील बहुसंख्य शेतकरी (७२.२%) ‘अत्यल्प व अल्प’ या गटातील आहेत व त्यांच्या हातात कसण्यासाठी देशातील लागवडीखाली असलेल्या शेतजमिनीपैकी केवळ (३२.४%) जमीन आहे.

पुढे वाचा

उपयोगितावादः जॉन स्टुअर्ट मिल् (४)

[२००६ हे जॉन स्टुअर्ट मिल्चे द्विशताब्दी वर्ष आहे. आजचा सुधारक चे संस्थापक संपादक दि.य. देशपांडे यांनी मिलच्या णीळश्रळीरीळरपळीी चे केलेले भाषांतर या लेखमालेतून देत आहोत. विवेकवादाच्या मांडणीत मिल्चे स्थान व त्याचा आगरकरांवरील प्रभाव सर्वश्रुत आहे.]
प्रकरण ४: उपयोगितेच्या सिद्धान्ताची कोणत्या प्रकारची सिद्धी शक्य आहे? अंतिम साध्यांविषयीच्या प्रश्नांची सामान्यपणे स्वीकृत अर्थाने सिद्धी शक्य नसते असे यापूर्वीच म्हटले गेले आहे. युक्तिवादाने सिद्धी अशक्य असणे ही गोष्ट सर्व मूल सिद्धान्तांना समान आहे, ज्ञानाच्या आदिसिद्धान्ताला तसेच आचाराच्या आदिसिद्धान्तालाही. परंतु यांपैकी पहिले वास्तवविषयक असल्यामुळे त्यांच्याविषयी वास्तवविषयक अवधारणांच्या शक्तींना इंद्रिये आणि आंतरसंज्ञा यांना साक्षात् आवाहन करणे शक्य आहे.

पुढे वाचा

हे भाकरीचे युग

हे माहितीचे युग नाही
हे माहितीचे युग नाहीच
बातम्या विसरा रेडिओ विसरा
आणि तो धूसर चौकोनी पडदाही
हे भाकरीचे आणि तोंडी लावण्यांचे युग आहे.
लोक भुकेले आहेत.
आणि एक सुंदर शब्द आहे, भाकरी हजारोंसाठी
[Natural Capitalism या पुस्तकाच्या दर्शनी पानावरील ही कविता. (पॉल हॉकेन, अमरी लव्हिन्स, एल. हन्टर लव्हिन्स; लिटल, ब्राऊन, २०००)]