“कॉल ए डॉग मॅड अँड शूट इट” अशी म्हण इंग्रजीत आहे. याचा अर्थ असा की कुत्र्याला मारायचे आहे ना? मग तो पिसाळलेला आहे असे म्हणा, आणि त्याला गोळी घाला.
जनुकबदल पिकांबद्दल (genetically modified crops) हेच चालू आहे. भीती पसरवण्यात आनंद मानणारा एक तथाकथित पर्यावरणवादी/समाजवादी/पुरोगामी म्हणवून घेणारा कंपू भारतात कार्यरत आहे. त्यांनी का कोण जाणे पण जनुकबदल पिकांना गोळी घालावयाचे ठरवले आहे. त्यासाठी मग जनुकबदल पिकांचे सर्व गुण नाकारून त्यांना विषारी, धोकादायक, पर्यावरणाला धोकादायक, शेतकऱ्यांना परावलंबी बनवण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बनवलेले हत्यार, वगैरे विशेषणे बहाल केली आहेत.
तापमानवाढीच्या गोष्टी
माणसांना वेगवेगळ्या वस्तू, घटनांच्या ध्वनिचित्रफिती, प्रत्यक्ष घटना वगैरे दाखवून त्या ऐकण्या-पाहण्याने मेंदूंत काय क्रिया घडतात; हे तपासायचे शास्त्र-तंत्र आता विकसित झाले आहे. त्याच्या वापरातून एक मजेदार निष्कर्ष निघाला. माणसांपुढे घडणाऱ्या दृश्यांत माणसे मनाने (मेंदुव्यवहाराने) सहभागी होतात! सिनेमे पाहताना नायक-नायिकांच्या मनांत असतील तसे व्यवहार प्रेक्षकांच्याही मनांत होतात. गोष्टी वाचताना-ऐकतानाही असे घडते. सापाचे चित्र पाहणेही साप पाहण्याला समांतर अशा शारीरिक-मानसिक प्रतिसादाला जागवते, इ.
यावरून एक मत घडते आहे, की माणसे उत्क्रांतीतून गोष्टी अनुभवण्याला अनुरूप झाली आहेत. लहान मुले गोष्टी अत्यंत मन लावून वाचतात–ऐकतात, दूरचित्रवाणी व चित्रपटांना जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद देतात.
ग्रामीण अर्थव्यवस्था व शेतकरी
आपण गेल्या २-३ वर्षांत विशेषतः शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल बऱ्याच बातम्या वाचल्या व त्यावरचे विचारवंतांचे, राजकीय पक्षांच्या धुरीणांचे लेख वाचले. समित्या नेमलेल्या ऐकल्या. त्यांचे अहवाल वाचले. पण अजूनही परिस्थितीत फारशी सुधारणा नाही. याचे एक कारण असे की राज्यकर्ते नेहमीप्रमाणे या अरिष्टावर काही तरी मलमपट्टी उपाय करू पाहत आहेत व या सर्व गोष्टींच्या मागे जो मूळ प्रश्न आहे त्याच्याकडे त्यांनी नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केलेले आहे. या आत्महत्यांचा सरकारवर झालेला दृश्य परिणाम म्हणजे केंद्र व राज्य सरकारने केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी! कर्जमाफीसाठी असलेले अनेक निकष फारसे योग्य नाहीत.
पुराव्यांनी धारणा बदलतात
पण माणसांचे विश्वास, त्यांच्या धारणा सहज बदलू शकतात, विशेषतः धोका पुढ्यात उभा असला की. म्हणूनच माणसे पुरावे पाहून धारणा बदलतात. याचे अभिजात उदाहरण मला भेटले. १९९०-२००० च्या मध्याजवळ मला वार्ताहर विचारत, की माझा तापमानवाढीवर विश्वास आहे का, आणि मी माझ्या विश्वासाचा उघडपणे बचाव देईन का.
आज मात्र तेच मला विचारतात, की परिस्थिती किती बिघडेल ! [मार्क मॅस्लिनच्या अ व्हेरी शॉर्ट इंट्रोडक्शन टु ग्लोबल वॉर्मिंग (ऑक्स्फर्ड युनि. प्रेस, २००४) या पुस्तकातून]
पत्रसंवाद
पत्रसंवाद
मोरेश्वर वडलकोंडावार, मूल-४४१२२४ (मोबाईल – ९४२१८७८००५) अर्थशास्त्र्यांनी गरिबीत गाडलेल्यांचाही अभ्यास करावा!
‘मारक खाजगीकरण’ या शीर्षकाने इंडियन एक्सप्रेस/प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया यातील एका बातमीकडे लक्ष वेधण्यात आले. ऑक्सफर्ड विद्यापीठ, केंब्रिज विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रापिकल मेडिसिन या संस्थांनी सोवियत युनियनची छकले व पूर्व युरोपातील इतर देश अशा पंचवीस देशांचा नव्वदच्या दशकातील मृत्युदराचा अभ्यास केला. निष्कर्ष असा की तो दर १३% नी जास्त आहे. त्यावर टिप्पणी करताना आयुमर्यादा झपाट्याने कमी झाली असून, होणाऱ्या मृत्युदराला/बेकारीला खाजगीकरणाला जबाबदार मानले आहे. लागलीच आघाडीच्या वृत्तपत्रांची ती मुख्य बातमी बनली.
अमेरिकन बँकांचे राष्ट्रीयीकरण
भांडवलवादाचा सर्वांत जास्त स्वीकार केलेला देश म्हणजे अमेरिका (यूएसए), आणि भांडवल हाताळणाऱ्या कळीच्या संस्था म्हणजे बँका. अर्थातच पूर्णपणे अनियंत्रित बँकिंग व्यवस्था, हा अमेरिकन अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असेल, नाही का? नाही! इ.स. १७९१ मध्ये (अमेरिका स्वतंत्र झाल्यानंतर १५ वर्षांनी) अलेक्झंडर हॅमिल्टन या राष्ट्राध्यक्षाने बह्वशी सरकारी मालकीची बँक ऑफ द यूनायटेड स्टेट्स सुरू केली. ती १८११ मध्ये बंद केली गेली. इ.स. १८६४ मध्ये वित्तव्यवस्थेच्या नियंत्रणासाठी कॉम्प्ट्रोलर ऑफ द करन्सी हे पद घडवले गेले. इ.स. १९१३ मध्ये, महामंदीच्या (द ग्रेट डिप्रेशन) काळात अमेरिकन काँग्रेसने (लोकसभेने) बुडणाऱ्या बँकांच्या ठेवीदारांना संरक्षण देण्यासाठी फेडरल रिझर्व्ह इन्शुअरन्स कॉर्पोरेशन (FDIC) ही संस्था घडवली.
पेटंटशाही व आपण (पुस्तक परीक्षण)
पेटंटशाही व आपण हे डॉ. सुनीती धारवाडकरांचे पुस्तक समीक्षणासाठी म्हणून जेव्हा मिळाले तेव्हा त्याचे आकर्षक व समर्पक मुखपृष्ठ व समर्पण-पत्रिका ह्यांनी प्रथमदर्शनीच लक्ष वेधून घेतले. नावावरून असे वाटले की ह्यात पेटंटबद्दल सविस्तर माहिती मिळेल परंतु ‘शाही’ ह्या शब्दाचे महत्त्व पुस्तक वाचायला लागल्यावर लक्षात आले. ह्या पुस्तकाचे कंसातील (शेती व जीवनाची कोंडी) हे सहशीर्षकही सयुक्तिक आहे.
हे पूर्ण पुस्तकच माहितीपूर्ण आहे, ज्ञानवर्धक व चिंतनीय (म्हणजे काळजी करायला लावणारे) आहे. परंतु सर्व पुस्तक ललित-लेखनासारखे एका बैठकीत वाचून होत नाही. ते अर्थातच पुस्तकातील मजकूर ओघवता नाही म्हणून नव्हे तर ते वाचकाला बऱ्याच गोष्टींची माहिती देणारे आहे म्हणून.
राष्ट्रीय विद्यापीठे
भारतात केंद्रीय तसेच राष्ट्रीय विद्यापीठे सुरू होणार असल्याचे वृत्त १९ ऑगस्टच्या लोकसत्ते त (पृ.२) वाचले, आणि आठवण झाली डॉ. वीणा पुनाचा यांची. देशात चौदा नवीन राष्ट्रीय विद्यापीठे स्थापन करण्याला त्यांचा तसेच डॉ. वीणा मजुमदार, डॉ. सुकांता चौधरी इत्यादी अन्य मान्यवरांचा तत्त्वतः विरोध नसला, तरी समाजात होऊ घातलेल्या बदलांची दखल घेऊन त्यावर विचारमंथन होणे अवश्य आहे, हा विचार त्या कळकळीने मांडतात. शिक्षणक्षेत्रातील ह्या स्थित्यंतराविषयी काहीसा नाराजीचा सूर तीन्ही विदुषींनी लावलेला दिसतो. भारतातील ३७८ विद्यापीठे आज १४,३२३.६ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. जात-पात, धर्म, लिंग, मासिक/वार्षिक उत्पन्न ह्यांपैकी कुठलीही बाब शिक्षणाच्या आड न येता.
इतिहास
इतिहास म्हणजे भूतकाळात जे घडले त्या विषयीची माहिती, ज्ञान, आकडे (data), इ. इ. सर्व. भूतकाळाशी संबंधित वस्तू (भांडी, शस्त्रे, नाणी, कपडे, दागिने, इ.), वास्तू (भवने, राजवाडे, किल्ले, रस्ते , इमारती, शिलालेख, इ.) आणि माहिती, आकडे, ज्ञान (दस्तावेज, पत्रव्यवहार, लेख, विचार, इ.) या सर्वांची जुळवाजुळव करून भूतकाळात काय घडले असावे हे वर्तमानात सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना इतिहासकार किंवा इतिहासतज्ज्ञ म्हणतात.
जगाचा आद्य इतिहासकार म्हणून महर्षी व्यासांकडेच पाहता येईल. ज्याकाळी लिहून ठेवण्याच्या सोयीच नव्हत्या त्या इ.पू. जवळपास १०,००० वर्षांपासून विभिन्न ऋषिमुनींनी जे श्लोक रचले त्यांत त्या काळातील अनेक घटनांचे वर्णन व ज्ञान, कला, इ.
सकारात्मक दृष्टीतून इतिहासलेखन
इतिहास लिहिण्याच्या पद्धतींमागच्या भूमिकांचा आढावा घेणारा रा.ह.तुपकरींचा लेख या अंकात आहे. त्यांच्या आगामी ग्रंथातील इतिहास या प्रकरणाचा तो संक्षेप आहे. इतिहासकार व त्याचा वर्तमानकाळ यांचा त्याने लिहिलेल्या इतिहासावर परिणाम होणारच. पण व्यक्तिसापेक्षता मान्य करूनही ते कल्पकतेतून लावलेला अर्थ आणि बुद्धिपुरस्सर केलेली मोडतोड…… (यांतील) सीमारेषा फार पुसट असतात, असा महत्त्वाचा इशारा देतात.
कथाकथनात्मक, मार्क्सवादी, आधुनिकतावादी व आधुनिकोत्तरवादी अशा चार भूमिका तुपकरी नोंदतात. कथाकथनात्मक, मार्क्सवादी व आधुनिकतावादी भूमिकांमध्ये त्रुटी तर आहेतच. परंतु त्या कोणत्याही भूमिकेत व्यक्तिसापेक्षता हा गुण मानून त्याला मान्यता दिली जात नाही.