दीर्घकालीन वार्षिक वाढ/विकास अल्पकालीन वार्षिक वाढ/विकास
काळ १९९०/९१ ते २००३/०४ वार्षिक% काळ२००२/०३ ते २००३/०४ वार्षिक%
रस्त्यांची लांबी “ १.७ “ ०.७
ट्रक्सची संख्या ,, ८.१ “ ८.४
बसेसची संख्या ,, ६.७ ,, ६.६
वाहनांची विक्री २००२/०३ ते २००६/०७ २००५/०६ ते २००६/०७
क) कार-जीप “ १८.७ “ २२.०
ख) मध्यम भारवाहक “ १९.८ “ २२.६
ग) जड भारवाहक “ २४.८ “ ३२.८
घ) दुचाकी ,, ११.९
ङ) तिचाकी “ १४.९ “ १२.२
रेल्वे १९९०/९१ ते २००५/०६ २००४/०५ ते २००५/०६
क) टन-किमी मालवाहतूक ७.९
ख) प्रवासी-किमी वाहतूक ६.९
ग) टन-किमी भाडे ,,
घ) प्रवासी-किमी भाडे ,,
विमान वाहतूक २००५/०६ ते२००६/०७
क) प्रवासी २८.२
ख) माल
लोकसंख्या १९९०-२००८ १.७८
२००७-२००८ १.३२
[आधारः स्टॅटिस्टिकल आऊटलाइन ऑफ इंडिया २००७-०८ टाटा सर्व्हिसेस लि.
नका देऊ मला इतक्या दूर बाबा
बाबा, नका देऊ मला इतक्या दूर
जिथं मला भेटायला यायला
तुम्हाला घरातील बकऱ्या विकाव्या लागतील.
नका करू माझं लग्न त्या देशात
जिथं माणसापेक्षा जास्त
ईश्वरच राहतात.
नसतील जंगल नदी डोंगर
तिथं नका करू माझी सोयरीक
जिथल्या रस्त्यांवरून
मनापेक्षाही जास्त वेगाने धावतात मोटारी,
आहेत जिथं उंच उंच घरं आणि
मोठ मोठी दुकानंच नुसती
त्या घराशी नका जोडू माझं नातं
जिथं मोठं मोकळं अंगण नाही
कोंबड्याच्या आरवण्यानं होत नाही
जिथली सकाळ अन् संध्याकाळी मावळणारा सूर्य दिसत नाही.
नका निवडू असा वर
जो पारावर अन् गुत्त्यात असेल कुंबलेला
सतत कामचुकार, ऐदी
जो चतुर असेल जत्रेत पोरी फिरविण्यात
असा वर नका निवडू माझ्यासाठी.
फक्त हवा उपभोग, नवा नवा उपभोग
या वर्षीचे केंद्रीय अंदाजपत्रक दूरदृष्टीचे नव्हते. त्यात जगापुढील नव्या, परिणामांनी भीषण आणि एकमेकांशी निगडित अशा आह्वानांचा विचार नव्हता. अन्नाच्या किंमती वाढत जाणार भारतातही त्या वाढताहेत आणि जगात अनेक ठिकाणी अन्नासाठी दंगे झाले आहेत. दुसरे म्हणजे खनिज तेलाच्या किंमती वाढत जाणार मध्ये त्या बॅरलला १४० डॉलर्सला गेल्या होत्या. सध्या उतरल्या आहेत, पण कधीही चढू शकतात. तिसरे अंग आहे जागतिक हवामानबदलाचे पाण्याच्या तुटवड्याने पिकांची उत्पादकता घटते आहे. अकाली पाऊस व त्याच्याशी निगडित नैसर्गिक आपत्ती वाढताहेत. आणि चौथी बाब अमेरिकाप्रणीत जागतिक मंदी, ही.
कंपन्या, बँका बुडताहेत.
हवामानबदलाचे नीतिशास्त्र
हवामानबदलाबाबत आपण काय करावे, हा नैतिक प्रश्न आहे. विज्ञान, त्यात अर्थशास्त्रही आले, हे आपल्याला हवामानबदलाची कारणे आणि परिणाम सांगू शकेल. आपण काय केल्याने काय होईल, हेही विज्ञान सांगू शकेल. पण काय करणे इष्ट आहे, हा मात्र नीतीच्या क्षेत्रातला प्रश्न आहे.
अशा प्रश्नांच्या विचारी उत्तरांत वेगवेगळ्या मानवसमूहांच्या इच्छा-आकांक्षांमधल्या संघर्षांचा विचार करावा लागतो. जर हवामानबदलाबाबत काही करायचे असेल तर आजच्या माणसांपैकी काहींना (विशेषतः सुबत्ता भोगणाऱ्यांना) त्यांच्यामुळे होणारी हरितगृहवायूंची (यापुढे GHG उर्फ ग्रीनहाऊस गॅसेस) उत्सर्जने कमी करावी लागतील नाहीतर भावी पिढ्यांना सध्यापेक्षा गरम जगात भकास जिणे जगावे लागेल.
एक क्रान्ती : दोन वाद (भाग १)
प्रस्तावना:
इसवी अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत जगातील बहुतांश माणसे शेती व पशुपालन ह्यांवर जगत असत. त्यांच्या जीवनपद्धतीचे वर्णन अन्नोत्पादक असे केले जाते. त्यामागील राजकीय-आर्थिक-सामाजिक व्यवस्थेचे वर्णन सामंती , फ्यूडल (feudal) असे केले जाते. अठराव्या शतकाच्या मध्यावर मात्र एक नवी जीवनपद्धती उद्भवली. आधी इंग्लंडात उद्भवलेली ही पद्धत पुढे युरोप, अमेरिका, आशिया, आफ्रिका, अशी पसरत आज जगाच्या बहुतेक भागांपर्यंत पोचली आहे. आजही जगातली अनेक माणसे शुद्ध अन्नोत्पादक जीवनपद्धतीने जगतातच, पण बहुसंख्येचे बळ मात्र नव्या औद्योगिक जीवनपद्धतीने जगणाऱ्यांकडेच आहे.
औद्योगिक जीवनपद्धतीचा उद्भव औद्योगिक क्रांती, The Industrial Revolution, या आर्नल्ड टॉयन्बीने सुचवलेल्या नावाने ओळखला जातो.
पर्यायांचा ‘निष्फळ’ शोध
जर भांडवलवादाला व्यवहार्य पर्याय असता, तर आजचे संकट जास्त गंभीर होणे शक्य होते. असे म्हणता येईल, की १९३०-४० मधील स्थिती यामुळेच महामंदी ठरली. सोविएत यूनियन तेव्हा अ-भांडवलवादी पद्धतीने औद्योगिकीकरण करत होती, राज्य-समाजवादी अर्थव्यवस्थेने. भांडवलवादी औद्योगिक देशांत सबळ समाजवादी चळवळी होत्या, आणि त्या व्यवस्थाबदल करू पाहत होत्या. १९८० तील राज्य-समाजवादी व्यवस्थांच्या पतनाने आणि समाजवादी चळवळी क्षीण होण्याने ते पर्याय आज शिल्लक नाहीत.
जगभरात भांडवलवादच प्रभावी असल्याने त्या व्यवस्थेला पर्याय शोधणे निष्फळ आहे. पर्यावरणी आपत्ती वगळता कोणतेही अंतिम संकट’ दृष्टिपथात किंवा कल्पनेतही नाही.
वित्तव्यवस्थेतील ‘सुनामी’ ?
एकमेकांवर विश्वास, पारदर्शक व्यवहार, वारंवार होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाणीकरण, अशा आपल्या गुणांचा अमेरिकनांना रास्त गर्व असतो. नव्या गावात नोकरी लागलेला माणूस रीअल-इस्टेट एजंटाच्या मदतीने आणि वेतनाच्या प्रमाणपत्राच्या आधाराने बँकेकडून कर्ज घेऊन स्वतःचे घर किती सहजपणे विकत घेऊ शकतो, याच्या कहाण्या अनिवासी भारतीय सांगतात, ते उगीच नव्हे.
अशा व्यवहारांमागे काही धारणा असतात. नव्याने घर घेणाऱ्याची नोकरी टिकेल, त्याला नोकरी देणारी संस्था टिकेल, कर्ज देणारी बँक टिकेल, घरासारख्या टिकावू वस्तूची किंमत फार बदलणार नाही, अशा ह्या अनुल्लेखित धारणा असतात हिशेबशास्त्रात ‘चालू धंदा संकल्पना’ (Going Concern Concept) या नावाने त्या ओळखल्या जातात.
मुंबई मेरी जान’
‘डोंबिवली फास्ट’सारखा चांगला सिनेमा पाहायला मिळेल, एवढ्याच अपेक्षेने ‘मुंबई मेरी जान’ पाहायला गेलो नि एक अप्रतिम सिनेमा पाहिल्याचे समाधान घेऊन परतलो. हल्लीच्या मल्टिप्लेक्समध्ये पूर्वीप्रमाणे एक नि एकच सिनेमा दाखवत नाहीत म्हणून.. नाहीतर, तिथल्या तिथे बसून पुन्हा, वेगळ्या दृष्टीने, पाहावेत अशा सिनेमांची वानवा असताना अशा एखाद्या सिनेमाचा लाभ म्हणजे पर्वणीच.
योगेश विनायक जोशी नि उपेंद्र सिधयेंनी लिहिलेल्या ह्या चित्रपटाला नायक नाही, नायिका नाही, खलनायक नाही, कथावस्तू नाही, सलग सूत्र नाही, उत्कंठावर्धक प्रसंग नाहीत, व्यक्तिरेकांचे संघर्ष नाहीत, नाच-गाणी, हाणामाऱ्या नाहीत. आहेत ती फक्त सपाट, सामान्य माणसे नि त्यांच्या करुण-विदारक कहाण्या, फारशा पुढे न सरकणाऱ्या, कारण त्यांना अगतिकतेचा शाप आहे.
व्यवस्थेच्या प्रश्नांना राजकीय उत्तर नसते
शोषण व स्पर्धा यांसाठी उपयुक्त असलेल्या भांडवलप्रधान उत्पादनतंत्रांवर आधारलेल्या व्यवस्थेने महागाईचा प्रश्न निर्माण केलेला आहे. सरकारचे, ते कोणत्याही पक्षाचे असो, व्यवस्थेला संरक्षण देण्याचे कर्तव्य असल्याने, महागाईच्या प्रश्नाला राजकीय उत्तर मिळणार नाही. राजकीय पक्षांना सर्वस्वीपणे जबाबदार धरता येणार नाही.
स्वातंत्र्यचळवळीच्या नेतृत्वाने, तीन बाबींचा विचार करणे आवश्यक होते. व्यक्ती ही समूहाच्या विकासासाठी स्वातंत्र्य आवश्यक असते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विकासासाठी तंत्रज्ञान म्हणजे ‘स्व’तंत्र आवश्यक असते. ‘स्व’तंत्रातून जी व्यवस्था निर्माण होते, तिचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वराज्य (गव्हर्नन्स) आवश्यक असते. स्वराज्यव्यवस्थेला आज्ञा देण्यासाठी सरकार आवश्यक असते. यातील स्वातंत्र्य व सरकार या बाबींचा विचार झालेला होता.
‘एक विश्व एक स्वप्न’
काल (८ ऑगस्ट २००८) संध्याकाळी दूरदर्शनवर बीजिंग ऑलिंपिक्सचा मंत्रमुग्ध करणारा उद्घाटनसोहळा पाहिल्यापासून मनात अनेक विचारांनी गर्दी केली आहे.
दोन वर्षांपूर्वी सुमारे याच सुमारास एक महिनाभर मी चीनमध्ये थोडीफार भटकंती केली. दक्षिण, मध्य आणि पूर्व चीनच्या काही शहरांतून मी फिरलो. दुभाष्या-मार्गदर्शकांच्या (सर्व तरुण मुली) सहाय्याने चीनचा सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक चीनसंबंधीची सरकारी धोरणे आणि त्यासंबंधीची लोकमते समजून घेण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण अविस्मरणीय अनुभव होता.
१९६२ च्या युद्धाच्या वेळी मी शाळेत होतो. त्यावेळी दुर्गम हिमालयातील थंडीत कुडकुडणाऱ्या आपल्या जवानांच्या मदतीसाठी आम्ही घरी स्वेटर आणि मफलर विणून आर्मीकडे पाठवले होते.