स्वावलंबन म्हणजे काय?
मागच्या लेखांकामध्ये दोनतीन महत्त्वाचे मुद्रणदोष राहिले आहेत, त्याचप्रमाणे त्याची भाषा निष्कारण बोजड झाली आहे. हा विषय लिहिताना तो कसा मांडावा ह्याची स्पष्ट कल्पना नसल्यामुळे, फार विस्तार करण्याची इच्छा मुळांत नसल्यामुळे आणि डोक्यांत विचारांची गर्दी झालेली असल्यामुळे लेखनात बांधेसूदपणा नाही, विस्कळीतपणा आहे ह्याची मला जाणीव आहे. लेखनातील ह्या दोषांकडे लक्ष न देता त्याच्या आशयाकडे पाहावे अशी वाचकांना नम्र विनन्ती आहे. पुस्तकाचा कच्चा खर्डा वाचकांपुढे ठेवल्यासारखे हे सारे लिखाण झाले आहे. आणखीही एक गोष्ट. लेखांक संपविताना जे मुद्दे पुढच्या लेखांकात येतील असे म्हटलेले असते त्यांऐवजी निराळेच मुद्दे अगोदर घ्यावे अशी इच्छा होते.