आधुनिक भारताचे नाव अख्ख्या जगात पसरविणारा एक महान प्रज्ञा-पुरुष (ओशो) म्हणतो, ‘बुद्ध हा भारतमातेचा सर्वोत्तम पुत्र असन त्याच्या विचाराची गंगोत्री ही जगातील बहतेक तत्त्वज्ञानांची जननी ठरली आहे’. आंग्लतत्त्वज्ञ बरटाँड रसेल म्हणतो. ‘माझा स्वतःचा कुठलाही अंगीकृत धर्म नाही. परंतु मला जर एखाद्या धर्माचा स्वीकारच करावयाचा झाला तर मी बुद्धाच्या धर्माचाच अंगीकार करेन. प्रसिद्ध वैज्ञानिक आईन्स्टाईन यांनी तर आपल्या सापेक्षतावाद (रिलेटिव्हिटी) या सिद्धान्ताच्या संशोधनात बौद्धतत्त्वज्ञानाला बरेचसे श्रेय देऊन कृतज्ञता व्यक्त केली आहे. जुंग(युग) नावाच्या मानसशास्त्रज्ञाने बौद्धधर्मातील तत्त्वांच्या आधारावर ‘अभि-धर्म पर्सनॅलिटी’ या शब्दांत व्यक्तिमत्त्व-विकासाचे विश्लेषण केले आहे.
जनाधिकार आणि “प्रत्यक्ष सहभागाची लोकशाही” (Empowerment & Participatory Democracy)
१. आजचा सुधारकच्या एका अंकात श्री. मोहन हिराबाई हिरालाल ह्यांचा ते करत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींच्या मेंढा-लेखा क्षेत्रातल्या प्रयोगाचे वर्णन आहे. “आमच्या गावात आम्ही सरकार, मुंबई-दिल्लीत आमचे सरकार” अशा तर्हेची घोषणा देऊन हे काम होत आहे त्यावेळी असा प्रश्न उपस्थित केला गेला होता की अशा तर्हेच्या “प्रत्यक्ष सहभागी लोकशाहीच्या’ (direct participatory democracy) लोकसंख्यीय मर्यादा काय असतील? रोमन रिपब्लिक्स आकाराने फार लहान होती आणि तीही पुढे ती टिकली नाहीत. स्वतः श्री मोहन यांनाही असे वाटते की साधारण १००० लोकसंख्येच्यावर हा प्रयोग कार्यप्रवण राहणार नाही.
जीवाचे पीळदार कथासूत्र
येत्या काही महिन्यांत माणसाच्या संपूर्ण जेनोमचा (genom) कच्चा आराखडा आपल्या हातात येईल. या घटनेबद्दलच्या बातम्या तिला वैद्यकीय आणि (बहुधा) नैतिक महत्त्व देतात. माझ्या मते एवढ्याने भागत नाही. मला वाटते की हा माणसाच्या इतिहासातील निरपवादपणे सर्वाधिक बौद्धिक महत्त्वाचा क्षण असेल. कोणी म्हणेल की एखादा माणूस म्हणजे केवळ त्याचे (किंवा तिचे) जीन्स नव्हेत, तर इतरही काही आहे मी हे नाकारत नाही. आपल्या सर्वांमध्ये केवळ जेनेटिक कोडपेक्षा बरेच काही आहे. पण आजवर मानवी जीन्सबाबत जी गूढता होती, जे अज्ञान होते, ते उल्लंघणारी आपली पिढी पहिली असेल.
घोंगे यांच्या संशोधनातील भकासपणा
१. प्रा. ह. चं. घोंगे यांचा गोमांसभक्षण : एक ऐतिहासिक वास्तविकता या शीर्षकाचा आजचा सुधारकमध्ये (मार्च २०००) प्रसिद्ध करण्यात आलेला लेख वाचून बरीच करमणूक झाली. त्यामुळे सध्या काही विद्वानांचे प्राचीन इतिहासाचे संशोधन आणि त्याची अभिव्यक्ती कोणत्या दर्जेदार रीतीने चालते याचा एक नमुना उपलब्ध झाला आहे. प्रस्तुत लेख घोंगे यांनी ‘मित्रवर्य’ डॉ. भाऊ लोखंडे यांच्या ब्राह्मणांचे गोमांसभक्षण या लेखाच्या समर्थनार्थ लिहिला आहे. परंतु, तो मूळ प्रतिक्रिया समजून न घेता ‘पूर्ण ग्रंथ पाहिल्यावीण’ लिहिला आहे.
[१. आपली करमणूक व उद्बोधनही झाले असावे. आपण एकच कबूल केले तरी दुसरे झाकत नाही.
वृद्धांच्या समस्या (२)
बऱ्याच वेळी पुढारलेल्या पा चात्त्य देशांत ज्या विषयांची चर्चा चालत असते त्याच विषयांची चर्चा सहाजिकच भारतातही चालते. भारतासारख्या गरीब देशाशी तुलना करता ह्या संपन्न देशात आर्थिक प्रश्न वेगळे किंवा जवळजवळ सुटलेले आहेत. त्यांच्याकडे कुटुंबसंस्था, स्त्रियांच्या घराबाहेर जाऊन केलेल्या नोकऱ्या, व्यक्तिस्वातन्त्र्य, व्यक्तिमत्त्वाचा विकास व त्यामुळे असणारी किंवा वाढणारी स्वयं-केन्द्रितता हे प्रश्न जास्त प्रकर्षाने जाणवतात. त्यातच वृद्ध होरपळत असले तर त्यांच्या समस्या चर्चेला येतात. वृद्ध म्हणजे सामान्यपणे साठ वर्षे वयावरील लोक असे गृहीत धरले जाते. संपन्न देशांत आज सरासरी आयुर्मान ७८ वर्षांपर्यंत गेलेले आहे.
प्रेम हाच खरा देव आहे (२) आंद्रे पॅरी यांच्या फ्रेंच लेखावरून
धर्माच्या शृंखलांतून आपणांस मुक्त समजणाऱ्या लोकांत देखील बराच धार्मिक मूर्खपणा शिल्लक असतो. उदाहरणार्थ फ्रान्समध्ये जरी धर्माला सरकारी दृष्टीने अस्तित्व नाही, तरी तेथील कायदे पाहिले तर ते अजून धार्मिकच आहेत. ख्रिस्ती धर्मांत लैंगिक ज्ञान लील समजतात, यामुळेच लैंगिक शिक्षणाकडे कायदाहि लक्ष देत नाही आणि पालकहि देत नाहीत. यामुळेच मुलांच्या डोक्यांत याविषयी भलभलत्या कल्पना शिरतात. विवाहबाह्य समागमाला धर्माची आडकाठी, पण धर्मा पासून अलिप्त मानलेले कायदे देखील अनौरस मुलांना कमीपणा देतात, अविवाहित आयांचे हाल करतात आणि व्यभिचाराला गुन्हा समजतात. ही कायद्याची गोष्ट झाली. सामाजिक छळ तर कायद्याचेहि पलीकडे आहे आणि यामुळे इतर बाबतींत लोक कितीहि क्रांतिकारक मतांचे असले तरी लैंगिक बाबतीत मात्र त्यांना समाजाला भ्यावे लागते कारण समाजाविरुद्ध जाण्याचे धैर्य फार थोड्या लोकांत असते.
प्रिय वाचक
सुधारकात काय यावे आणि काय येऊ नये याबद्दल बरेच वाचक सल्ला देत असतात. अनेक विषयांवर साहित्य आम्हाला हवे असते, परंतु ते हाती येतेच असे नाही. तसेच काही विषयांवर आम्ही जे लिखाण देतो ते अनेकांना स्चत नाही. सर्वांना संतुष्ट राखणे आणि तेही सर्वदा, शक्य नसते. ‘आमच्या प्राचीन धर्मग्रंथांतले शेण तेवढे तुम्हाला दिसते, सोने मात्र दिसत नाही’ असा एका वाचकाने संतापाने टोमणा मारला. त्यावर आम्हाला प्रश्न इतकाच पडतो की अमुक एक पूर्वमत सोने आहे हे कसे ठरवावे? आणि कोणी? एक साधे उत्तर असे की सोने किंवा शेण ठरविण्याची कसोटी ही शेवटी आपल्या बुद्धीला अनुसरून आपण लावणार.
मनुष्यनिर्मित दुःखे आणि मी
. . . . ज्या वेळी स्वतःच्या कर्तृत्वाविषयी मनात विचार येतात त्या वेळी मी हे मानवसमूह नजरेसमोर आणतो. त्या विचारांची स्वतःलाच लाज वाटू लागते. एखाद्या यंत्रमाग-कामगाराच्या पोटी जन्मलो असतो आणि वयाच्या पाचव्या वर्षापासून वही-फणीच्या कामाला जुंपला गेलो असतो तर? किंवा कामाठीपुऱ्यातल्या एखाद्या वेश्येपोटी जन्मलो असतो तर? या समूहांमध्ये जन्मणाऱ्या बहुतेकांच्या वाढण्याला केवढ्या मर्यादा असतात! … .
एखाद्या भीषण खुनाची बातमी वाचल्यावर आपण किती हादरतो! पण असे या परिस्थितीच्या दडपणाखाली चिरडून होणारे माणूसपणाचे खून किती सहजपणे आपण पाहू शकतो, किंवा पाहायचे नाकारू शकतो.
प्रिय वाचक,
गेल्या महिन्यात वॉटर चित्रपट निर्मितीला विरोध करणारी निदर्शने झाली. चित्रिकरण जबरदस्तीने बंद पाडण्यात आले. व्हॅलेंटाइन डे निमित्त प्रेमिकांनी एकमेकांना छुपे संदेश देऊन प्रेम व्यक्त करण्याची पाश्चात्त्यांची पद्धत आहे. आपल्या तरुण- तरुणींनी तिचे नकळत अनुकरण सुरू केले आहे. हळूहळू छापील संदेश-पत्रे, त्यांच्या जाहिराती यांनी भव्य रूप घेतले आणि तो प्रकार डोळ्यात भरण्याइतका मोठा झाला. ज्यांना ह्या प्रघाताचा प्रसार व्हायला नको आहे त्यांनी त्याला विरोध करायला हरकत नाही. ज्या पद्धतींनी प्रसार झाला त्याच पद्धतींनी विरोध होऊ शकतो. प्रसारमाध्यमांचाही वापर केला जाऊ शकतो. पण दुकानांची तोडफोड केली गेली.
सावर.. रे !
भारत सासणे यांच्या ‘एका प्रेमाची दास्तान’ ह्या कथेचे नाट्यरूपांतर केलेले सावर रे! हे नाटक नुकतेच पाहिले. नाटक वैचारिक, संवादप्रधान आहे. विषय प्रौढ अविवाहित स्त्रीसंबंधीचा आहे. नायिका इंदू ही बुद्धिमान असल्यामुळे लहानपणापासूनच ‘तू इतरांपेक्षा वेगळी आहेस’ हे तिच्या मनावर बिंबवलेले. एरवी, ‘तू मुलगी आहेस, परक्याचे धन आहे’ वगैरे, वगैरे चाकोरीबद्ध विचारांपासून तिला जाणीवपूर्वक दूर ठेवलेले. इंदूदेखील यशाचा एक एक टप्पा सहज गाठत जाते. मेरीट मध्ये येणे, इंग्रजीत एम्. ए. करणे, प्राध्यापक म्हणून सफल होणे, पीएच. डी. होणे, संशोधनपर लेख लिहिणे, चर्चासत्राला जाणे इ.