आम्ही आणि ‘ते’! (भाग २)

मागच्या अंकामध्ये समाजाची चिकित्सक वृत्ती कोणत्याही एका जातीकडून कुंठित होत नसते हे सांगण्याचा प्रयत्न मी केला. ह्या अंकात बहुजनांचे शोषण करण्याचा मक्ता फक्त ब्राह्मणांकडे नव्हता हे सांगण्याचा यत्न करणार आहे.
अन्याय आणि शोषण ह्यांचा देशमुख त्याच वाक्यात पुढे उल्लेख करतात. त्यांच्या वाक्यातून अन्याय आणि शोषण फक्त ब्राह्मणांनीच केले असे सूचित होते. परंतु ते तसे नाही हे इतिहासाच्या कोणत्याही चिकित्सक वाचकाला समजण्यासारखे आहे. आमच्या देशात अन्याय आणि शोषण आम्ही सर्वांनीच एकमेकांचे केले. येथे म्हणजे भारतात महाराष्ट्रातल्या काही मोजक्या प्रदेशात शाहूचे मुख्यप्रधान म्हणून पेशव्यांनी राज्य केले असले तरी अन्यत्र कोठेही ब्राह्मण राज्यकर्ते नव्हते.

पुढे वाचा

“पैसा” उत्पत्ती आणि उत्क्रांती

प्रत्येक मनुष्याला आपल्या कामाचा/वस्तूचा/वेळेचा मोबदला हवा असतो. हा मोबदला सोयिस्कर स्वरूपात, दीर्घकाळ टिकेल असा, भविष्यासाठीही राखून ठेवता येईल असा आणि त्याबदल्यात काही मिळवून देईल असा असावा. पूर्वी अशा त-हेची काही सोय नव्हती. लोक रोखठोक व्यवहारात वस्तूंच्या अदलाबदली करत. परंतु हे फारच जिकिरीचे असे. अशा प्रकारची स्थानिक पातळीवरची देवाणघेवाण म्हणजे व्यापार नव्हे.
तेव्हा मग व्यापा-यांनी, सावकारांनी हुंड्या, हवाला, वचनचिठ्या देण्यास सुरुवात केली. त्या त्या व्यक्तीची पत आणि विश्वासार्हता यांवर हा व्यवहार चाले. परदेशी व्यापाराच्या वेळी सावकार-श्रेष्ठी गायी, शेळ्या-मेंढ्या अशा वस्तू तारण म्हणून ठेवून घेत.

पुढे वाचा

प्रिय वाचक

प्रिय वाचक,
१. ‘ब्राह्मणांचे गोमांस-भक्षण’ हा लेख छापून तुम्ही काय साधले? ब्राह्मण आता बदलले आहेत. बैदिक हिंदू आता पूर्वी होते तसे हिंसक राहिले नाहीत. समाजसुधारणा म्हणजे ऊठसूठ हिंदुधर्माला आणि ब्राह्मणांना झोडपणे असे तुम्ही समजता काय? ही एक प्रतिक्रिया.
२. पोपप्रणीत धर्मविस्तार ह्या लेखाचे प्रयोजन काय? उगाच धर्मा-धर्मात द्वेषबुद्धी जागृत करायची ही कुठली सुधारणा? ही दुसरी प्रतिक्रिया.
उत्तर इतकेच की, धर्माच्या नावावर मनुष्य किती वेडाचार करू शकतो हे दाखवावे. तो पूर्वी करत होता अन् आता नाही असेही नाही. अंधश्रद्धा निर्मूलनवार्तापत्राचा दिवाळी अंक (१९९९)पाहा.

पुढे वाचा

ईश्वर विनाकारण घोटाळ्यात पडायला नको

ईश्वराला अक्कल शिकवणारे लोकच प्रार्थना करीत असतात. पावसाकरतां प्रार्थना करणा-या लोकांची चेष्टा करण्याकरतां विन्स्टन चर्चिल यांनी एकदां वर्तमानपत्रांत एक पत्र प्रसिद्ध केले होते. त्यांत त्यांनी अशी शिफारस केली होती की, पावसाला व पिकांना सर्वांत सोयीचा वेळ कोणता हे ठरवण्याकरतां एक कमिटी नेमावी आणि त्यांनी निर्णय दिल्यानंतर त्याला धरून अमुक दिवशीं अमुक इतका पाऊस पाडण्याविषयी ईश्वराला सार्वजनिक प्रार्थना करावी, कारण प्रत्येकाने वेगवेगळ्या दिवशी प्रार्थना केल्याने ईश्वर विनाकारण घोटाळ्यांत पडण्याचा संभव आहे. अर्थात् युद्धांत दोन्ही बाजूच्या लोकांनी आपणास विजय मिळावा अशी प्रार्थना केल्यामुळे ईश्वर नेहमीच घोटाळ्यांत पडतो, पण पिकांचे बाबतीत कदाचित् एका देशांतल्या लोकांचे तरी कमिटीचे द्वारें एकमत होण्याचा संभव आहे, तेव्हा वेगवेगळ्या देशांत तसतसा पाऊस पाडून त्यांचे समाधान करणे शक्य आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

नोव्हेंबर ‘९९ चा आजचा सुधारकचा अंक वेगळा व लक्षणीय वाटला. लेखांचे विषय अधिक वैविध्यपूर्ण व समाजापुढील वेगवेगळ्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारे वाटले. अभिनंदन!
डॉ. सुभाष आठले
२५,नागाळा पार्क,
कोल्हापूर – ४१६००३

संपादक, आजचा सुधारक, यांस,
नोव्हेंबरचा अंक खूप माहितीपूर्ण वाटला. समान्यपणे १ ल्या पानांवर थोर व्यक्तींच्या लेखनातील एखादा महत्त्वाचा मुद्दा उद्धृत केलेला असतोच. यावेळच्या अंकातील हमीद दलवाईंचे मुस्लिम समाजाच्या सामाजिक सुधारणाबाबतचे विचार दिलेले आहेत. त्यातील शेवटचे वाक्य तर फारच महत्त्वाचे आहे.
पूर्वीच्या एका अंकातील ‘संपादकीया’ वर मी टीकाटिप्पणी कळवली होती व आपण ती छापलीही होती.

पुढे वाचा

महर्षी ते गौरी

मंगला आठलेकर यांनी स्त्री-स्वातंत्र्याची वाटचाल दाखविणारे ‘महर्षी ते गौरी’ हे पुस्तक लिहिले आहे. प्रस्तावनेतील पहिलेच वाक्य, “महर्षी कर्त्यांचं सारं घराणं स्त्रियांच्या उन्नतीसाठी काम करणारं!” असे आहे. यावरून लेखनाचा शिथिलपणा, लक्षात यावा. धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री-शिक्षणाचे मोठेच काम केले. त्यांचा मोठा मुलगा रघुनाथ धोंडो कर्वे यांनी विवेकवादाचा प्रसार आणि संततिनियमनाचा प्रचारच नव्हे तर प्रत्यक्ष कामही केले. त्या अर्थाने ते दोघे समाजसेवक आहेत. र. धों. चे दुसरे बंधू दिनकर धोंडो कर्वे आणि त्यांच्या पत्नी इरावती कर्वे यांचे स्त्रियांच्या उन्नतीचे काम प्रसिद्ध नाही.

पुढे वाचा

कच्च्या आहाराचा अनुभव

मनुष्य संवयीचा गुलाम असतो आणि संवयीच्या बाहेरचे काही करायचे झाले की ते जिवावर येते. आम्हीं सुमारे एक वर्षांपूर्वी ‘आधुनिक आहारशास्त्र नांवाचे पुस्तक लिहिले. अर्थात् ते अनेक वर्षांच्या अभ्यासावर आधारलेले आहे आणि कच्च्या आहाराचे महत्त्व आम्हास तात्त्विक दृष्ट्या पटल्यामुळेच त्या पुस्तकांत कच्च्या आहारावर विशेष भर दिलेला आहे. वास्तविक व्हिटॅमीनसंबंधी आधुनिक शोधांनंतर अशा आहाराचे महत्त्व सर्वांसच पटावे, कारण कच्च्या आहारांत व्हिटॅमीन पूर्णत्वाने सांपडतात आणि शिजवलेल्या अन्नांत त्यांचे प्रमाण वरेच कमी होते हे निर्विवाद आहे. ही गोष्ट अनेक प्रकारच्या प्रयोगांनी सिद्धही झालेली आहे. उदाहरणार्थ उंदरांच्या पिल्लांना अंड्यातील पिवळा भाग कच्चा खाऊ घातल्याने त्यांचे वजन ६० दिवसांत शेंकडा १४० नी वाढले, व त्याच वयाच्या इतर कांही पिल्लांस तोच पिवळा भाग शिजवून घातला, तेव्हा त्यांचे वजन फक्त शेकडा ७६ नी वाढले असे आढळले.

पुढे वाचा

आम्ही आणि ‘ते’! (भाग १)

खिलारे नानावटींनी निर्माण केलेला वाद संपुष्टात आला असे वाटत असतानाच मिलिंद देशमुख ह्यांचे पत्र आले. (पत्र पुढे येत आहे.) त्या पत्राच्या निमित्ताने आजचा सुधारकची जातिवादासंबंधीची भूमिका अधिक स्पष्ट होईल असे वाटले आणि जातिवाद म्हणजे फक्त ब्राह्मणब्राह्मणेतर वाद नाही हेही एकदा निःसंदिग्धपणे सांगता येईल असे मनात आले. त्याशिवाय संपत्ती कशी निर्माण होते, तिचा लाभ काही गटांनाच का होतो, तिचे सर्वत्र सारखे वाटप आजपर्यंत का होऊ शकलेले नाही, भविष्यात तसे व्हावे म्हणून काय करावे लागेल, ह्या प्रश्नांची चर्चा त्या पत्राच्या प्रकाशनातून सुरू करता येईल असे वाटले.|

पुढे वाचा

ब्राह्मणांचे गोमांसभक्षण

धार्मिक दृष्टीने गोहत्या हा विषय संवेदनशील असला तरी सत्यशोधन कोणालाही आक्षेपार्ह वाटू नये. वैदिकवाडमयाचे व प्राचीन संस्कृत, पालि-प्राकृत साहित्याचे जे विद्वान यांच्या संशोधनातून व खुद्द वेदांतून मूळ वचने देऊन प्रस्तुत निबंध सज्ज केला आहे.
रजनीकांत शास्त्री, साहित्य सरस्वती, विद्यानिधि –
(१) “ऋग्वेद के अध्ययनसे पता चलता है कि वैदिककाल में जौ और गेहूं खेतों की आज तत्कालीन हिन्दुओंके मुख्य खाद्य पदार्थ थे।… मांसभोजनभी उस कालमें बहुत प्रचलित था और आधुनिक हिन्दू जनता यह जानकर चौक उठेगी कि अन्य खाने योग्य पशुओंके मांस की तरह गोमांस भी खाद्य पदार्थों में सम्मिलित था”
(हिंदु जाति का उत्थान ओर पतन पृ.

पुढे वाचा

पोपप्रणीत धर्मविस्तार

भारतात आणि भारताबाहेर ख्रिस्ती नसलेल्या हजारो लोकांना पायांनी जिवंत जाळले आहे. पोप नववा ग्रेगरी ह्यांनी इ. स. १२३१ मध्ये ख्रिस्ती नसलेल्या पाखंडी लोकांना शोधून त्यांच्यावर खटले भरण्यासाठी पेपल इन्क्विझिशनची (म्हणजे पोपप्रणीत धार्मिक न्यायसभेची) स्थापना केली. इ.स. १४७८ मध्ये पोप (चवथा) सिक्स्टस् ह्यांनी स्पॅनिश इन्क्विझिशनला अधिकृतपणे मान्यता दिली. ह्या स्पॅनिश इन्क्विझिशनने आपल्या कारकिर्दीत सुमारे चार लाख लोकांचा अमानुष छळ करून वध केला! आमच्या धर्मशास्त्राचा हजारो पानांचा अनेक खंडी इंग्रजी इतिहास लिहिणा-या भारतरत्न डॉ. पां. वा. काणे ह्यांनी हे लिहिले आहे! त्यांच्या धर्मशास्त्राच्या इतिहासाचा पहिला खंड १९३० साली निघाला व शेवटचा १९६२ साली!

पुढे वाचा