आपले पूर्वज फार थोर होते, ज्ञानी होते, असे समजणारा समाज परंपरापूजक असतो. धर्माच्या नावाखाली जे चालत आले आहे त्याला चिकटून राहावे; स्वतंत्रबुद्धी चालवू नये, ही सामान्य माणसाची मनोवृत्ती. शिवाय आणखी एका कारणाने भारतीय माणूस पारंपरिक बनतो. चाणक्य इष्ट गोष्टी धर्माच्या नावाने प्रसृत कराव्यात असा सल्ला देतो. तो म्हणतो, कन्येला चांगल्या कुळात, पुत्राला विद्येत, शत्रूला संकटात आणि इष्ट गोष्टींना धर्माच्या आवरणात बसवावे. चालत आलेली रीत, परंपरा निरर्थक वाटली तरी हा ती पुढे चालवतो. कोणी सांगावे, पूर्वजांनी कोणत्या हेतूने अमुक धर्म सांगितला असेल?म्हणून,
प्रा. ठोसर, प्रा. एकल्स आणि ईश्वर
या मासिकाच्या जानेवारी ९७ च्या अंकात प्रा. बा. वि. ठोसर यांचा ‘कार्ल पॉपर आणि जॉन एकल्स यांमधील एक महत्त्वाचा मतभेद – आस्तिकतेविषयी’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात कार्ल पॉपर हे विज्ञानाचे तत्त्वज्ञानी आणि जॉन एकल्स हे विख्यात मज्जाशास्त्रज्ञ या दोघांनी मिळून लिहिलेल्या The Self and its Brain ह्या पुस्तकाचा उल्लेख करून प्रा. ठोसर म्हणतात की हे पुस्तक जरी या दोघांनी मिळून लिहिले असले तरी त्यांच्या मनांत एक मोठा भेद आहे. तो म्हणजे पॉपर पूर्ण नास्तिक आहेत, तर एकल्स आस्तिक आहेत.
जुलमी सरकार वाघांहून भयंकर
थाई पर्वताच्या बाजूने जाताना कन्फ्यूशसला एक स्त्री एका थडग्याजळ धाय मोकलून रडताना दिसली. प्रभू तिच्याकडे गेले आणि त्यांनी त्सेलूला तिची विचारपूस करण्यास सांगितले. तो त्या स्त्रीला म्हणाला, “तुझ्या विलापावरून तुझ्यावर दुःखाचा कडेलोट झाला आहे असे वाटते.’ ती म्हणाली, “खरे आहे. माझ्या नवर्याुचे वडील येथे वाघाने मारले. माझा नवराही तसाच गेला. आणि आता माझा मुलगाही त्याच प्रकारे मारला गेला आहे. प्रभूने विचारले, ‘मग तू ही जागा सोडून दुसरीकडे का बरे जात नाहीस?’ ‘इथे जुलमी सरकार नाही -‘ तिने उत्तर दिले. प्रभू नंतर म्हणाले, ‘मुलांनो, हे लक्षात ठेवा, जुलमी सरकार वाघापेक्षाही जास्त भयंकर असते.
समान नागरी कायद्याचा मसुदा : एक चिकित्सा (२)
श्री. सत्यरंजन साठे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती जया सागडे आणि श्रीमती वैजयन्ती जोशी ह्यांच्या चमूने जो नवीन, भारतातील सर्व नागरिकांसाठी समान, असा विवाहविषयक कायदा सुचविला आहे त्यामुळे विवाह एक अत्यन्त गंभीर असा विधी होण्याला, त्याचे ऐहिक स्वरूप स्पष्ट होण्याला त्याचप्रमाणे त्याचे पावित्र्य आणि मांगल्यसूचक पारलौकिकाशी आजवर असलेले नाते संपुष्टात यावयाला मदत होईल ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे हे मान्य करून त्याविषयीची चर्चा पुढे चालू ठेवू या.
(२)एकपतिपत्नीक विवाहालाच मान्यता देण्याच्या तरतुदीमध्ये असा विवाह सहसा कोणाला मोडूद्यावयाचा नाही हा विचार प्रामुख्याने कार्य करताना दिसतो.
पत्रव्यवहार
संपादक,
आजचा सुधारक,
जाने. ९७ चा अंक मिळाला. इंदुमती यार्दी ह्यांचे विचार योग्य असले तरी त्यांनी दिलेले गिलचे उदाहरण चूक आहे. एक ओली पार्टी होती. अशा पार्टीला बजाज ह्यांनी जावयासच नको होते. दारू प्यालेल्या गिलने त्यांना जवळ बोलाविल्यावर त्या गिलजवळ गेल्या व गिलने चापट मारली. बजाजांनी गिलजवळ जावयाचे नाही.
आम्ही पुरुषसुद्धा रस्त्यात दारू प्यालेला कोणी असेल तर लांबून जातो. जवळ गेले तर तो भटांना शिव्या देतो. हा अनुभव अनेकांना असेल. माझ्या मते गिल खुर्चीतून उठून बजाजकडे जाऊन त्यांनी चापट मारली असती तर ते दोषी ठरतात.
हुसेनसाहेबांचे अश्लील चित्र
सुप्रसिद्ध चित्रकार हुसेन साहेब ह्यांनी आपल्या धर्मातील देवदेवतांची विटंबना करणारे अश्लील चित्र रंगविले आहे. त्या चित्राची अस्पष्ट प्रतिमा ‘इंडियन एक्सप्रेस’च्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेली आहे. ती कृष्ण धवल आहे. त्यातून रंग संगती, रंगाचा तरलपणा, सुस्पष्ट होत नाही. चित्र परंपरावादी शैलीचे (क्लासिकल) नसून नूतन चित्रकलेचा नमुना आहे. या चित्रात गणपती वाटावा अशी आकृती आहे.
शंकराचे नुसते तोंड दर्शविले असून जटेतून प्रवाह दाखविला आहे. त्या प्रवाहात अवगाहन करणारी एक नग्न वाटणारी देवता बाजूला आहे आणि शेवटी एक सटवी रोग लागल्यासारखा वाकडा तिकडा कृष्ण आहे.
विरोध नेमका काय आणि कशाला आहे?
गेल्या काही दिवसांत दोन जाहीर कार्यक्रमांनी सार्वजनिक जीवनात बरीच खळबळ माजविली, मुंबईचा मायकेल जॅक्सन यांचा पॉप संगीताचा कार्यक्रम आणि बंगलोरचा विश्वसुंदरीचा स्पर्धात्मक कार्यक्रम. दोन्ही कार्यक्रमांचे आश्रयदाते १५०००-२०००० हे. रुपयांचे तिकीट सहज परवडू शकणारे होते. बिनधास्त, बेपर्वा अशा या बाजारू संस्कृतीच्या बटबटीत कार्यक्रमांना दोन्ही ठिकाणच्या राज्य सरकारांनी ठाम, निर्धारपूर्वक, करडा पाठिंबा दिला. ही दोन्ही सरकारे त्यांच्या राजकीय मतप्रणालीत दोन ध्रुवांइतकी दूर आहेत. परंतु खुल्या अनिर्बध बाजारपद्धतीबाबत त्यांच्यात एकमत दिसते.
ही खुली बाजारू संस्कृती व्यक्तीच्या बाबतीत किती संवेदनशून्य असू शकते याची दोन उदाहरणे इथे देण्यासारखी आहेत.
मुलांची नैतिक बुद्धिमत्ता
रॉबर्ट कोल्ज (Robert Coles) या हार्वर्डच्या मानसशास्त्रज्ञाचा विषय आहे ‘मुले’. त्याने या विषयावर बरीच पुस्तके लिहिली आहेत, व त्यापैकी एका पुस्तकाला पुलित्झर पारितोषिकही मिळाले आहे. त्याच्या मुलांची ‘नैतिक बुद्धिमत्ता’ (The Moral Intelligence of Children) या नव्या पुस्तकातील काही उतारे २० जाने. च्या ‘टाइम’ मासिकात उद्धृत केले आहेत. त्यातील काही कहाण्या –
(क) माझ्या नऊ वर्षांच्या मुलाला मी आणि माझ्या पत्नीने सुतारकामाच्या हत्यारांशी ‘खेळायला’ मना केले होते, तरी तो हत्यारांशी खेळला आणि त्याच्या हाताला जखम झाली. टाके पडणार यामुळे तर व्यथित होतोच, पण त्याने आम्ही घालून दिलेला नियमही मोडला होता.
विज्ञानवादिनी कमला सोहोनी
ब्रह्मवादिनी स्त्रियांबद्दल पुष्कळ ऐकले आहे. मुंबईच्या या खेपेत एका विज्ञानवादिनीचा वार्तालाप ऐकायला मिळाला. ब्रह्मवादिनींनी कोणाचे काय भले केले ते ठाऊक नाही. पण या विज्ञानवादिनीने मात्र लक्षावधी बालकांना मातेचे दूध, म्हशीच्या दुधावर प्रक्रिया करून उपलब्ध करून दिले. असंख्य कुटुंबांना निर्भेळ अन्न मिळण्याची सोय हाताशी ठेवून त्यांचे ऐहिक जीवन सुरक्षित करायचा प्रयत्न केला. भारतातील पहिल्या महिला वैज्ञानिक आपल्या मोठ्या बहिणीबरोबर जाहीर गप्पा मारतील अशी बातमी म.टा.मध्ये वाचली. २५ डिसेंबर हा ग्रंथालीचा वाचकदिन असतो. त्यानिमित्त ग्रंथालीने प्रकाशित केलेली पुस्तके ५० टक्के सवलतीत विक्रीला ठेवलेली आणि जोडीला ह्या दोघी बहिणींच्या गप्पा असे जबर आकर्षण होते.
कार्ल पॉपर आणि जॉन एकल्स यांमधील एक महत्त्वाचा मतभेद – आस्तिकतेविषयी
माझे विज्ञानविषयक तत्त्वज्ञानाचे आकर्षण हे मुख्यतः The Self and Its Brain या कार्ल पॉपर व जॉन एकल्स या उच्च दर्जाच्या दोन विद्वान तज्ज्ञांनी एकत्र मिळून लिहिलेल्या ग्रंथापासून सुरू झाले.
कार्ल पॉपर हे अर्वाचीन तत्त्वज्ञान्यांत, विशेषत: विज्ञानविषयक तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात, आघाडीवरचे तत्त्वचिंतक म्हणून आता सर्वमान्य झाले आहेत. The Logic of ScientificDiscovery या उद्बोधक ग्रंथाचे ते लेखक आहेत. जॉन एकल्स (Eccles) हे नोबेल पारितोषिक विजेते, प्राणिशास्त्र (Biology), वैद्यकशास्त्र, आणि मानवाच्या शरीरातील अत्यंत उन्नत भाग म्हणजे मेंद यांवर प्रायोगिक स्वरूपाचे संशोधन करणारे श्रेष्ठ दर्जाचे वैज्ञानिक आहेत.