गांधी, भगतसिंग, फाशीची शिक्षा
—————————————————————————————
महात्मा गांधींनी भगतसिंगला वाचवायला पुरेसे प्रयत्न केले नाहीत किंवा त्यांना भगतसिंगला वाचविण्यात फारसे स्वारस्य नव्हते अशी टीका अनेकदा केली जाते. ह्या लेखातून असे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे की गांधींचा सशस्त्र क्रांतीला जरी विरोध असला तरी त्यांनी भगतसिंगला वाचवायचा अखेरपर्यंत प्रयत्न केला होता.
—————————————————————————————
भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव ह्या तरुण क्रांतिकारकांना २३ मार्च १९३१ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली. त्याबरोबरच गांधी ह्यांना वाचवतील असे वाटणाऱ्या लोकांची निराशा झाली आणि त्या अनुषंगाने गांधीवर बरीच टीकाही करण्यात आली.