मृदसंधारण, गरजा आधारित पीक पद्धती, नैसर्गिक शेती
—————————————————————————–
तीन दशकांपासून स्वावलंबी, पर्यावरणस्नेही शेती करणाऱ्या ‘कर्त्या’ विचारकाने मराठवाड्यातील दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करून लिहिलेला हा लेख दुष्काळाच्या भीषणतेचे चित्रण करून त्यामागील राजकीय-आर्थिक-पर्यावरणीय राजकारणही उलगडून दाखवितो. सोबतच ह्या आपत्तीच्या निवारणासाठी कंटूर बांधबंदिस्ती आणि कंटूर पेरणी, पीकपद्धतीत बदल असे उपायही सुचवितो.
—————————————————————————–
पाण्याशिवाय माणूस, पशुपक्षी कसे जगतील? मराठवाड्यातील तांबवा (ता. केज. जि. बीड) गावात याची प्रचीती आली. एका अध्यापकाच्या तरुण मुलाने चहासाठी बोलावले होते. त्याच्या घरासमोर ३०० फूट खोल ट्यूबवेल होती. दिवसभरात ३-४ घागरी पाणी मिळते म्हणे.