नैतिक इहवादाच्या आड येणाऱ्या आस्तिकता नेमक्या कोणत्या?
राजकीय संदर्भात ‘सेक्युलॅरिझम’चा सरळ अर्थ इहवाद असा घेऊन, कायदे बनविताना कोणत्याच संप्रदायाचा आधार न घेणे आणि नागरिकाचा संप्रदाय कोणता ह्या आधारावर कोणताही भेदभाव न करणे, अशा स्वरूपात हा प्रश्न सोडविला गेलेला नाही. त्याऐवजी सर्वधर्मसमभाव हा संभ्रम वाढवणारा शब्द रुळला आहे. कोणताही जमातवाद हा ‘बाहेरच्यां’चे अधिकार नाकारणारा समूहवाद असतो व म्हणून त्याज्य असतो असे न मानले …