साहेबराव राठोड - लेख सूची

ही माणसं सालोसाल मागास होत आहेत

ही माणसं सालोसाल मागास होत आहेत, हे सरकारच्या लक्षात येत नाही? कॉलेजमध्ये शिकत असताना समाजशास्त्र, अर्थशास्त्र हे विषय अभ्यासाला आले तेव्हा मला बाहेरच्या जगाची खरी ओळख व्हायला लागली आणि तांडा-बेड्यावर राहणाऱ्या माणसांचे प्रश्न त्या अभ्यासक्रमाशी जुळत असतात हे समजलं. मी विचार करायला लागलो. पहिल्यांदा शेतकऱ्यांसोबत होणारा भेदभाव, गरीब मजुरांचं होणारं स्थलांतर, आणि त्या त्या ठिकाणच्या …

मुलांमधली सर्जकता ओळखण्याचे प्रयोग शिक्षणात व्हावे

मुलांमधली सर्जकता ओळखण्याचे प्रयोग शिक्षणात व्हावे,तेव्हाच बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकेल. !!  मागच्या वर्षी अकोला जिल्ह्यात पोलिसशिपाई पदासाठीच्या ३७७ जागांसाठी चाळीस हजार पदवी, पदव्युत्तर झालेल्या युवक-युवतींनी अर्ज भरले होते. अकोला पोलिसविभाग रोज १५०० युवकांना मैदानात बोलावून भरतीप्रक्रिया राबवून घेत होता. आणि यावर्षी तलाठी भरतीच्या बातम्या तुमच्या वाचण्यात आल्या असतील. तलाठी भरतीमध्ये अकरा लाखांहून अधिक अर्ज भरले …

समाजमाध्यमांचा ग्रामीण, आदिवासी समुदायात शिरकाव…

२०१३ मध्ये मी फेसबुक उघडलं तेव्हा, आदिवासी समुदायातला एखादा दुसराच फेसबुक वापरणारा युवक असेल. परंतु गेल्या आठ दहा वर्षामध्ये माध्यमांचा जो शिरकाव मानवी समाजात झाला आहे ना, त्याचे परिणाम ग्रामीण आणि आदिवासी समुदायातली मुलंही भोगत आहेत. व्हॉट्सॲप, फेसबुक, टीक्टॉक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, ही सगळी समाजमाध्यमे आदिवासींच्या मुलांना आता परिचयाची झाली आहेत. चॅटजीपीटीही जास्त दूर नाही. आणि …

अंधश्रद्धा आणि आदिवासी समुदाय

गेल्या वीस वर्षात महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी मोठी चळवळ झाली आहे, अंधश्रद्धेबद्दल महाराष्ट्रातील काही भागातील जनता जागरुकही झाली असेल. परंतु आजही काही आदिवासी समाजात कमालीची अंधश्रद्धा आहे. त्यापैकीच एक फासेपारधी समाज, या समाजामध्ये आजारपणात घरच्याघरी उपचार करण्याच्या अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. हा लेख लिहायच्या आठ दिवसांआधी माझ्या पुतणीचा कान एका रात्री अचानक खूप दुखायला लागला, आणि …

दुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… ?

भारतात बहुतांश आदिवासी समुदाय आहेत. त्यापैकी फासेपारधी हा एक समाज. हा समाज महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणात आहे. फासेपारधी समाजातल्या माणसांवर आत्ताही हल्ले होतात. पोलिसांकडून आणि न्यायव्यवस्थेकडून वेळोवेळी छळवणूक होत राहते. त्यात आता आणखी भर म्हणजे बेड्या-तांड्यांपासून जवळ असणाऱ्या गावातल्या लोकांकडून होणारा अत्याचार. चार महिन्यांपूर्वीची एक घटना आहे. टिटवा बेड्यावरच्या दोन पारधी तरुणांना बाजूच्या …

जग कुठे आणि भारत कुठे…

असं म्हटलं जातं, जगभरामध्ये सर्वांत शक्तिशाली देशांपैकी भारत हा तिसरा सगळ्यांत मोठा देश आहे. पण खरं वास्तव काय आहे आपल्या देशाचं? या देशातल्या शेवटच्या घटकांत राहणाऱ्या माणसांमधले भय अजूनही संपलेले नाही. इतिहासातल्या घटनांना वर आणून त्याला पुष्टी व पाठबळ देण्याचं काम आपल्या देशातली व्यवस्था सध्या करत आहे. त्यामध्ये सगळ्यात मोठं भय म्हणजे अंतर्गत सामाजिक सुरक्षेचं. …

तांड्यावरच्या मुलांचं शिक्षण आणि प्रश्न

विदर्भातल्या अकोला, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांत फासेपारधी समाज मोठ्या प्रमाणात राहतो. फासेपारधी समुदायाच्या मुलांच्या शिक्षणावर काम करताना काही गोष्टी प्रकर्षाने मला दिसल्या. पहिली गोष्ट म्हणजे फासेपारधी समाजाचा परंपरागत शिकार व्यवसाय आणि त्यांचं स्थलांतर! १९७२च्या वन्यजीवसंरक्षण कायद्यानुसार शिकार करणं हे जरी कायदेसंमत नसलं तरी आत्ताही काही भागांत फासेपारधी समुदायाकडून लपून शिकार केली जाते. आणि हा व्यवसाय …