मासिक संग्रह: ऑगस्ट, 1994

संपादकीय

आमच्याकडे गेल्या महिन्यामध्ये दोन महत्त्वाची पत्रे आली. दोन्ही आमच्या चांगल्या मित्रांची आहेत. त्यांपैकी एक श्री. ग. य. धारप ह्यांचे; ते जुलै अंकात प्रकाशित झाले आहे. त्यानंतर आमच्याकडे पोचलेले, पण त्याहून महत्त्वाचे पत्र आहे श्री. वसंतराव पळशीकरांचे.
ह्या दोन पत्रांच्या निमित्ताने आमच्या संपादकीय धोरणाचा आम्हाला पुनरुच्चार करावा लागणार आहे. श्री. धारप ह्यांच्या पत्राचा परामर्श घेण्याच्या अगोदर श्री. पळशीकरांच्या पत्राचा विचार करू. श्री. पळशीकर ह्यांचे पत्र खाली देत आहोत :

संपादक, आजचा सुधारक
स.न.
जून १९९४ च्या अंकाच्या आरंभी बट्रँड रसेल ह्यांचे वचन छापले आहे.

पुढे वाचा

इतर

मे १९९४ च्या ‘आजचा सुधारक’च्या अंकात श्री. के. रा. जोशी यांचा संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ’ हा किंचित लेख प्रसिद्ध केला आहे. कदाचित जोशी यांनी मनू किंवा भृगू यांचे आडनाव जोशीच होतेअसा संदर्भ लावला तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
‘धारणाद्धर्म इत्याहुः’ या वचनाच्या संदर्भात जोशींना असेच म्हणायचे आहे की जे आचरण समाजधारणेची क्रिया करीत असेल तोच धर्म होय. असा धर्म याचा अर्थ होतो. पुढे जोशी म्हणतात ‘धारणाद्धर्म इत्याहुः’ ही धर्मसंस्थापक श्रीकृष्णांनी दिलेली व्याख्या लक्षात घेतली की धर्मचर्चा–सर्व समाजाला व्यापून असणार्याइ धर्मासंबंधीची चर्चा – ही प्राधान्याने ऐहिक सुस्थितीविषयी विचार करते हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट जाणवते.

पुढे वाचा

मनु घसरला आहेच

मनुस्मृतीवर टीका करणारी मंडळी मनुद्वेषाच्या विकृतीने पछाडलेली असल्यामुळे, मनूवर “सकारण व अकारण मनूला झोडपण्याचे पुरोगामी व्रत आचरीत असतात, असा आरोप श्री. जोशी यांनी केलेला आहे. या टीकाकारांना स्वतःला ग्रंथ समजण्याची क्षमता नसते असेही विधान ते करतात. (त्यांच्या लेखांतील शेवटचा परिच्छेद पाहावा.) मनूला “सकारण झोडपले तर त्याचा राग श्री जोशी यांना का यावा ते समजत नाही.“अकारण” झोडपले तर त्यांना राग यावा हे समजण्यासारखे आहे. मनूला अकारण झोडपण्यात येते असे श्री जोशी यांचे मत त्यांच्यासारख्या परंपराप्रिय लोकांचे आहे. परंपराप्रिय नसलेल्या लोकांना तसे वाटत नाही, आणि हेच वादाचे मूळ आहे.

पुढे वाचा

इतर

जून १९९४ च्या आजचा सुधारकमध्ये श्री. नी. र. व-हाडपांडे यांचा ‘श्रीरामकृष्ण परमहंस आणि साक्षात्कार’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यावर अनेक अंगांनी प्रतिक्रिया व्यक्त करणे आवश्यक आहे. एक मनोविकारतज्ज्ञ म्हणून त्यातील वैद्यकीय व मानसशास्त्रीय प्रतिपादनावर मत नमूद करावेसे वाटते. हे मत मांडताना श्रीरामकृष्णांबाबत श्री. व-हाडपांडे यांच्या लेखात दिलेली माहितीच मी विचारात घेत आहे. त्यांचे लिखाण त्यांचेच मुद्दे सिद्ध करण्यास अपुरे आणि सदोष वाटते.
मिर्गीच्या व्याधीमुळे होणारे भास
(१) श्री. वर्हा डपांडे यांच्या मते श्रीरामकृष्ण परमहंसाना होणारे देवीचे दर्शन व ‘भावानुभूती’ हा मिर्गीचाच प्रकार होता.

पुढे वाचा

चर्चा- साक्षात्कार आणि विवेकवाद १

जून १९९४ च्या आजचा सुधारकमध्ये श्री. नी. र. व-हाडपांडे यांचा ‘श्रीरामकृष्ण परमहंस आणि साक्षात्कार’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यावर अनेक अंगांनी प्रतिक्रिया व्यक्त करणे आवश्यक आहे. एक मनोविकारतज्ज्ञ म्हणून त्यातील वैद्यकीय व मानसशास्त्रीय प्रतिपादनावर मत नमूद करावेसे वाटते. हे मत मांडताना श्रीरामकृष्णांबाबत श्री. व-हाडपांडे यांच्या लेखात दिलेली माहितीच मी विचारात घेत आहे. त्यांचे लिखाण त्यांचेच मुद्दे सिद्ध करण्यास अपुरे आणि सदोष वाटते.
मिर्गीच्या व्याधीमुळे होणारे भास
(१) श्री. वर्हा डपांडे यांच्या मते श्रीरामकृष्ण परमहंसाना होणारे देवीचे दर्शन व ‘भावानुभूती’ हा मिर्गीचाच प्रकार होता.

पुढे वाचा

चर्चा- साक्षात्कार आणि विवेकवाद

जून १९९४ च्या अंकातील डॉ. नी. र. व-हाडपांडे यांचा ‘श्रीरामकृष्ण परमहंस आणि साक्षात्कार’ हा लेख वाचला. रामकृष्णांच्या उपलब्ध माहितीवरून साक्षात्काराचे अस्तित्व सिद्ध होते काय, हा या लेखाचा विषय आहे. ते तसे सिद्ध होत नाही या निष्कर्षाप्रत लेखक आलेला आहे. या निष्कर्षाप्रत येण्यासाठी लेखकाने, नाटकातील शिवाची भूमिका करतानाचा रामकृष्णांचा भावावेश, वेषांतर करून एका घरंदाज कुटुंबातील अंतःपुरात त्यांचे जाणे, विवेकानंदांची व त्यांची भेट, रामकृष्णांना होणारी कालीची दर्शने, रामकृष्णांची इस्लामची व येशूची उपासना, मंदिरात प्रापंचिक गोष्टींचा विचार मनात आणल्याबद्दल राणी रासमणीला मारलेली थप्पड ह्या घटनांचा आधार घेतला आहे.

पुढे वाचा

खरी स्त्रीमुक्ती कशात आहे?

साधना साप्ताहिकाच्या २८ मे १९९४ च्या अंकामध्ये श्रीमती शांता बुद्धिसागर ह्यांचा ‘खरी स्त्रीमुक्ति कोठे आहे?’ हा लेख प्रकाशित झाला आहे. त्यांनी चारचौघीह्या नाटकाची सविस्तर चर्चा करून शेवटी आपले मत व्यक्त केले आहे. त्यात त्या म्हणतात की, “काही मूल्येविचार हे शाश्वत स्वरूपाचे असतात. सध्या आपण अशा तर्‍हेची विचारधारा तरुणांच्या पुढे ठेवीत आहोत की स्त्रीपुरुष कोणत्याही जातिधर्माचे असोत, सुखी कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने एका वेळी एकाच स्त्री-पुरुषाचे सहजीवन होणे हीच आदर्श कुटुंबरचना असली पाहिजे.

पुढे वाचा

समान नागरी कायदा आणि शरीयत

न्यायमूर्ती हरिनाथ तिलहरी यांनी दि. १२ एप्रिल ९४ रोजी तलाकबाबत जो निकाल दिला त्याचे उलट सुलट पडसाद संपूर्ण मुस्लिम समाजात उमटत असून पूर्वीच्या शहाबानो प्रकरणाप्रमाणेच हे प्रकरणही गाजणार अशी चिन्हे दिसत आहेत. पुरोगामी विचारवंत श्री. असगरअली इंजीनीअर यांनी निकालाचे स्वागत केले असून सय्यद
शहाबुद्दीन व अन्य मुस्लिम विचारवंतांनी टीका केली आहे.
न्यायालयासमोर मूळ प्रश्न तलाकचा नसून जमिनीचा होता. जो प्रश्न मुळातच न्यायालयासमोर नाही त्यावर निकाल देण्याचा न्यायमूर्ती तिलहरी यांना अधिकार नाही; हा निकाल म्हणजे इस्लामी शरीयतला आव्हान आहे; मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात हस्तक्षेपआहे, इत्यादि मते मुस्लिम विचारवंतांनी व्यक्त केली आहेत.

पुढे वाचा

सहजप्रवृत्तीचे प्रशिक्षण

आपल्या स्वाभाविक प्रवृत्ती चांगल्याही नसतात आणि वाईटही नसतात; नैतिकदृष्ट्या त्या उदासीन असतात. त्यांना इष्ट वळण देणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट असावे. जुनी ख्रिस्ती लोकांना प्रिय असणारी पद्धत सहजप्रवृत्तींना प्रतिबंध करण्याची होती, परंतु नची पद्धत त्यांना प्रशिक्षित करण्याची आहे. उदाहरणार्थ सत्तेची इच्छा घ्या. ख्रिस्ती नम्रता (humility) शिकविणे व्यर्थ आहे; त्यामुळे ती प्रवृत्ती दांभिक रूपे धारण करते एवढाच तिच्यामुळे फरक पडतो. तिला प्रकट होण्याच्या हितकर वाटा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. मूळची सहजप्रवृत्ती हजार प्रकारांनी शांत होऊ शकते-परपीडन, राजकारण, व्यापार, कला, विज्ञान- या सर्व गोष्टी जर यशस्वीपणे हाताळल्या गेल्या तर ती शांत होते.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

स.न.वि. वि.
‘आजचा सुधारक’ च्या जून ९४ च्या अंकात प्रा. श्री. गो. काशीकर यांचे सातारच्या विचारवेध संमेलनाविषयी एक पत्र प्रकाशित झाले आहे. त्यातील सर्व मुद्द्यांचा परामर्श येथे घेत नाही. त्यांच्या शेवटच्या वाक्याविषयी थोडेसे लिहितो. ते वाक्य असे, “एकंदरीत हे विचारवेध संमेलन विचारवेधाऐवजी विचारवध करणारे व विकारव्याधी जडलेले संमेलन झाले, असे खेदाने म्हणावे लागेल.”
प्रा. काशीकरांच्या या विधानाची वस्तुनिष्ठता तपासून घेण्यासाठी वाचकांना मदत होऊ शकेल, अशा फक्त एका घटनेचा तपशील येथे देतो. या संमेलनात २० फेब्रुवारी रोजी एका परिसंवादात मी आणि श्री.

पुढे वाचा