मासिक संग्रह: नोव्हेंबर, २०००

पत्रसंवाद

हर्षवर्धन निमखेडकर
माहूर, २९, देवतळे ले-आऊट नागपूर — ४४० ०१०
सुधारकने वेबसाईट उघडावी का?
आजचा सुधारक या मासिकाची इंटरनेटवर ‘वेब-साईट’ काढावी असा आग्रह मी अनेक दिवसांपासून संपादकांकडे करतो आहे. कधी ना कधी तरी ही इच्छा पूर्ण होईल, अशी मला आशा आहे. दरम्यान, याबाबत माझेच मला पडलेले काही प्र न मी येथे मांडतो. वेब-साईट उपयुक्त आहे की नाही, या विषयावर थोडी चर्चा व्हावी, या हेतूने. वेब-साईट सुरू करणे म्हटले तर फारसे खर्चाचे नाही—-पण तिचे संगणकीय आरेखन/आलेखन करणे व सातत्याने तिच्या मजकुरात बदल करणे—-यासाठी मात्र तंत्रज्ञांची मदत घ्यावी लागणार असल्याने ही बाब खर्चिक ठरते.

पुढे वाचा

पुस्तक परीक्षण

‘ग्यानबाचा सहकार’

मराठी मध्यमवर्गाच्या मनातील सहकारी साखर कारखान्यांची प्रतिमा मुख्यतः भ्रष्टाचाराशी निगडित आहे. ऊस लावणारा शेतकरी, त्या उसाची साखर करणारे कारखानदार, ह्यांना सरसकट भ्रष्ट म्हणून मानण्याची पद्धत आहे. अशा विचारामध्ये एका महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष होते, की शेतीमाल-प्रक्रियेचे उद्योग सहकारी तत्त्वावर चालवणे हा भारताने केलेला एक अभिनव आणि यशस्वी आर्थिक प्रयोग आहे. महाराष्ट्रातील तीसेक टक्के जनता या ना त्या स्पात सहकारी संस्थांची सदस्यसंख्या घडवते! ह्या सर्व सहकारी संस्थांमधून रु. ३५,०००/- कोटींची वार्षिक उलाढाल होते —- राज्याच्या अंदाजपत्रकाच्या जवळपास दुप्पट आहे, ही रक्कम!

पुढे वाचा

‘खरी’ ब्रेन ड्रेन

आर्थिक दृष्ट्या दुर्बल देशांना कुशल आणि प्रशिक्षित मानवी भांडवलाची गरज असते, तर श्रीमंत देशांकडे अशा तंत्रज्ञांचा मुळातच भरपूर साठा असतो. अशा परिस्थितीत प्रशिक्षित माणसांचा गरीब देशांकडून श्रीमंत देशांकडे वाहणारा जो ‘ओघ’ असतो, त्याला सध्या ‘ब्रेन ड्रेन’ म्हणतात. ह्या सोबतच अभियंत्यांनी मोठ्या प्रमाणात व्यवस्थापकीय आणि प्रशासनिक कामांकडे वळणे, याला ‘अंतर्गत’ ब्रेन ड्रेन म्हणतात. एखाद्या अभियंत्याला त्याचे तांत्रिक शिक्षण देण्यात खर्ची पडलेली भांडवली आणि मानवी संसाधने अशा माणसांच्या व्यवस्थापनासारख्या क्षेत्रात जाण्यामुळे वाया जातात, अशी ही विवाद्य कल्पना आहे.
‘द रिअल ब्रेन ड्रेन’ (ओरिएंट लॉगमन्स, १९९४) ह्या पुस्तकाचे लेखक डॉ.

पुढे वाचा

दुर्दशा

१. संगणकासारख्या अत्याधुनिक विषयात भारतीय अग्रेसर दिसतात व त्यात भारताचे काही लोक लक्षाधीश, कोट्यधीश व अब्जाधीशही होऊ लागले आहेत.
२. भारताचे अन्नधान्य उत्पादन वाढत्या प्रमाणावर आहे व त्यात भारत निर्यातक्षम होणार आहे.
भारताचे संरक्षणसामर्थ्य कमी लेखण्यासारखे नाही व भारताची विदेशी चलनाची गंगाजळी समाधानकारक आहे अशा काही मोजक्या बाबी भारताच्या जमेच्या बाजूने असल्या तरी भारताचे केंद्रशासन हिंदुत्वाच्या अहंकाराकडे झुकलेले, विस्कळीत, दुर्बळ व अकार्यक्षम झाले आहे.
राज्य-सरकारे अर्धशिक्षित व स्वार्थी मंत्र्यानी भरलेली आहेत, देशभर शिक्षण-क्षेत्रात भयानक दुरवस्था आहे. सर्व शासकीय व निमशासकीय पातळ्यांवर पराकोटीचा भ्रष्टाचार माजलेला आहे.

पुढे वाचा

आडनाव हवेच कशाला?

नावाच्या आड येणारे ‘आडनावच नको’ हे म्हणणे आडमुठेपणाचे वाटेल; परंतु सखोल विचारांती ते आपणास पटेल. ‘लग्नानंतर स्त्रीचे नाव बदलावे का?’ या लेखात सुरेखा बापट यांनी स्त्री-पुरुष समानतेत येणारे अडथळे यांची चर्चा केली आहे. परंतु ‘आडनाव हवेच कशाला?’ याचे विवेचन पुढीलप्रमाणे देत आहे.
आडनावामुळे येणारे अडथळे खालीलप्रमाणे —-
१. भारतीयांच्यात असलेला धर्मभेद, जातिभेद आडनावामुळे चटकन लक्षात येतो. उदा. कांबळे—मागासवर्गीय, पाटील—मराठा इ.
२. आडनावात प्राणी, पक्षी, यांची नावे येतात. तेव्हा माणसांनासुद्धा नावात प्राणिमात्रांची गरज आहे हे दिसून येते. परंतु गाढवे, विंचू, कोल्हे, लांडगे इ.

पुढे वाचा

सखोल लोकशाही

[रल्फ नेडर (Ralph Nader) हा ग्राहक चळवळीचा एक प्रणेता. ‘अन्सेफ ॲट एनी स्पीड’ हे पुस्तक लिहून अमेरिकन मोटर-कार उद्योगाला ‘वळण’ लावणारा, ही त्याची ख्याती. २५ जून २००० रोजी ‘हरित पक्ष’ (Green Party) या नव्या अमेरिकन राजकीय पक्षाने नेडरला २००० सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत आपला उमेदवार म्हणून नेमले. ही नेमणूक स्वीकारताना नेडरने केलेल्या भाषणाचा सारांश सोबत देत आहोत.
हरित पक्ष हा पर्यावरणवादी आणि सामान्य माणसांचे हित पाहणारा पक्ष असणार आहे. येती निवडणूक हा पक्ष नक्कीच हरेल! पण जर्मनीसकट अनेक युरोपीय देशात असले हिरवे पक्ष आज दहा-दहा टक्के मते खेचत आहेत.

पुढे वाचा

धर्मप्राय श्रद्धेची सार्थकता

निसर्गसृष्टीतील घडमोडींविषयीचे वैज्ञानिक अज्ञान, त्यापोटी वाटणारे भय आणि येणारे दुबळेपण, निसर्गाच्या अनाकलनीय शक्तींना ‘संतुष्ट’ करून स्वतःचे जीवन आश्वस्त, सुरक्षित व समृद्ध करण्याची कांक्षा व धडपड यामधून ‘धर्म’ या गोष्टीचा उदय झाला, ही एक ‘बुद्धिप्रामाण्यवादी’ वर्तुळातील प्रतिष्ठित व शिष्टमान्य मांडणी आहे.
आधुनिक विज्ञानाच्या युगाच्या उत्कर्षाने ज्ञानाची प्रभा सर्वदूर पसरल्या-नंतर, ज्ञानांधकारात भरभराटलेल्या धर्माची व धर्मसंस्थेची गरज संपुष्टात आलेली आहे. भौतिक विज्ञानांच्या जोडीला, सतराव्या शतकापासून, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानवस्वभावप्रकृतिशास्त्र, समाजशास्त्र अशी मानवी व्यापारांचे नियम, त्यांचे गतिशास्त्र यांची उकल करणारी शास्त्रे उत्कर्ष पावली आहेत. जे जसे वास्तवात आहे, वास्तवात जे घडते त्यांचा वैज्ञानिक (शास्त्रीय) विचारपद्धतीचा अवलंब करून अभ्यास करून निष्पन्न झालेले ज्ञान (‘पॉझिटिव्ह नॉलेज’) यावर ही सर्व मानवीय शास्त्रे रचलेली आहेत.

पुढे वाचा

नैतिक प्राणी (भाग २)

“We should probe our commonsense reactions to evolutionary theories carefully before concluding that the commonsense itself isn’t a cognitive distortion created by evolution” —- (‘द मॉरल अॅनिमल’ — रिचर्ड राईट).
प्र न : व्यक्तींच्या आनुवंशिक गुणांपैकी जगण्याला आणि प्रजोत्पादनाला मदत करणारे गुण साऱ्या जीवजातींत पसरतात आणि असे अनेक पिढ्यांमध्ये घडून जीवजातीच्या गुणांचा संच बदलतो. नैसर्गिक निवडीतून होणाऱ्या उत्क्रांतीचे हे वर्णन आपण पाहिले. ह्याचा एक अर्थ असा की स्वार्थीपणाने स्वतःचा आणि स्वतःच्या प्रजेचाच विचार करणाऱ्या व्यक्ती टिकून राहायची शक्यता जास्त आहे, तर उलटपक्षी स्वार्थत्याग, परोपकार, असे गुण असलेल्या व्यक्तींची प्रजा आणि गुण ह्यांचा प्रसार व्हायची शक्यता कमी.

पुढे वाचा

जातींचा उगम — एक दृष्टिकोन

कोठेही केव्हाही जा, बापाचा धंदा मुलानें उचलला नाही, असें क्वचित् दृष्टीस पडते. बहुतेक ठिकाणी व प्रसंगी असेंच पाहाण्यांत येते की बाप वैद्य असला तर मुलगाही बापाची गादी चालवितो. बापाचा कारकुनी किंवा शिपाई पेषा असला तर मुलगाही कलमबहाद्दर किंवा तरवारबहादर होण्याची ईर्षा धरितो. लक्षावधि धंदे अस्तित्वांत असतांना व त्यांत हरघडी शतशः भर पडत असतांना आणि ते शिकण्याची साधनें व सोयी विपुल व मुक्तद्वार असतांना जर आज आपणाला असे स्पष्टपणे दिसते की, मुलाचा ओढा बहुधा बापाच्या धंद्याकडे असतो, मुलाने आपला धंदाच पुढे चालवावा असा मनोदय बापाचाही असतो, आणि त्याप्रमाणे उभयपक्षी तयारी करतात; तर जेव्हां धंदे थोडे आणि त्यांचे ज्ञान मिळविण्याची सार्वजनिक साधने व सोयीही थोड्या व एक घरी होत्या, अशा प्राचीन काळांत बापाच्या धंद्याची माळ मुलाच्या गळ्यांत सर्रास पडे, ह्यांत नवल ते कोणतें?

पुढे वाचा