मासिक संग्रह: जानेवारी, २०२४

शहाण्यांचा मूर्खपणा अथवा आमचे प्रेतसंस्कार

काही महिन्यांपूर्वी एका जीवश्चकंठश्च मित्राला अखेरचा निरोप देण्याचा दुर्दैवी अनुभव घेतला. त्यावेळी मनात आलेले विचार अस्वस्थ करून गेले. ते समविचारी बुद्धिमंतांसमोर ठेवण्यासाठी हा लेखनप्रपंच.

माझा मित्र अत्यंत श्रद्धाळू, देवभक्त आणि सर्व कर्मकांडांवर ठाम विश्वास ठेवणारा होता. त्यामुळे त्यांचे अंत्यसंस्कार पारंपरिक पद्धतीने होणार याविषयी मनात काही संदेह नव्हता. तरीही तो सर्व प्रकार पाहून गलबलून आले. मित्राच्या जाण्याचे दुःख बाजूला राहिले. त्याच्या पार्थिव देहाची विटंबना चालू होती आणि विधींच्या नावाखाली त्याच्या सुपुत्राकडून जे काही प्रकार करून घेतले गेले, ते पाहून उद्वेग वाटला. काही काळापूर्वी आद्य सुधारक आगरकरांचा ‘शहाण्यांचा मूर्खपणा अथवा आमचे प्रेतसंस्कार’ या शीर्षकाचा एक निबंध वाचल्याचे आठवले आणि गेल्या दीड शतकात आपल्या धर्मात आणि संस्कृतीत किती फरक झाला ते पाहाण्याची इच्छा झाली आणि तो लेख पुन्हा एकदा वाचला.

पुढे वाचा

विवेकवाद आणि नास्तिकता

आपण दररोजच्या व्यवहारात नास्तिकता आणि विवेक यांचा सर्रास वापर करतो. कोणत्याही गोष्टीबाबत सारासार विचार करण्याच्या वृत्तीला लोकभाषेत विवेक करणे असे म्हटल्या जाते. थोडक्यात, कोणत्याही गोष्टीची योग्यायोग्यता ठरविताना किंवा विशिष्ट कृती करताना विवेक बाळगला पाहिजे, असे नेहमी आपल्या कानावर येते. नास्तिकता या संज्ञेबाबत ईश्वराचे अस्तित्व अमान्य करणाऱ्याला लोक नास्तिक म्हणतात आणि ते बरेचसे बरोबरही आहे. परंतु या शब्दांचे नेमके अर्थ आणि त्यांचा इतिहास काय आहे, याचा सामान्य माणूस फारसा विचार करीत नाही. किंवा तसा विचार करून या शब्दांचा वापर करीत नाही. तसेच या दोन संकल्पनांचा परस्परात काय सबंध आहे, याचाही बारकाईने विचार करण्याचे कारण कोणाला वाटत नाही.

पुढे वाचा

श्रद्धा आणि श्रद्धा

आदरांजली : मेघश्याम पुंडलिक रेगे
(२४-१-१९२४ ते २८-१२-२०००)

महाराष्ट्राच्या तत्त्वज्ञानात्मक व वैचारिक क्षेत्रात गतशतकाच्या उत्तरार्धात ज्यांनी आपल्या वैचारिक व्यक्तिमत्वाने ठसा उमटविला, त्यांपैकी प्रा. मे.पुं. रेगे हे एक महत्त्वाचे विचारवंत होते. त्यांच्या जीवनाचे वर्णन करतांना प्रा. रा.भा. पाटणकरांनी लिहिले आहे, “प्रा. रेगे एक तत्त्वज्ञ, प्रबोधनकार आणि सॉक्रेटिक शिक्षक होते. त्यांचे जीवन म्हणजे समाजातील सर्व थरांवर काम करीत करीत मुक्त होण्याचा एक मूर्तिमंत प्रवास होय.”

तर, तत्त्वज्ञ दि.य.देशपांडे यांनी रेग्यांविषयी लिहिले आहे, “या व्यक्तीपुढे आपण सर्व खुजे आहोत हे सतत जाणवते.”

स्वत: ‘आजचा सुधारक’ परिवाराने त्यांच्याविषयी म्हटले आहे, “प्रा.

पुढे वाचा

अतिरेकी विचारपद्धती आणि त्यांचे अपरिहार्य डबके

‘आधुनिक’ या सदैव कालसुसंगत/कालनिरपेक्ष (?) असलेल्या संकल्पनेची सर्वंकष आणि निर्विवाद अशी सर्वमान्य व्याख्या अजूनही प्रलंबितच आहे. आणि त्यामुळे आधुनिक, उत्तराधुनिक, उत्तरोत्तराधुनिक, + + + × × × ….. असे फसवे व भ्रामक तथा अर्थदुष्ट(!) शब्दप्रयोग करून/वापरून ‘आधुनिक’ या निसर्गतःच स्वतंत्र व स्वायत्त संकल्पनेची ऐशीतैशी करण्यात आजची प्रचलित विचारशैली मश्गुल असल्याचे पदोपदी व सदैव आढळून येते. 

अशा या सांकल्पनिक उपपत्तींच्या सम्यक व समग्रग्राही आकलनाअभावी अतिसौम्य/शिथिलरित्या वापरल्या जाणाऱ्या प्रतिगामी व पुरोगामी या विचारपद्धतीसुद्धा आपापल्या रंगीबेरंगी वर्तुळात हळूहळू अतिरेकी रूप धारण करू लागतात. विचारपद्धती प्रतिगामी असो वा पुरोगामी ती अतिरेकी झाली की तिचे पर्यावसान शक्तिशाली नकारात्मक/विनाशात्मक परिणामाला कारणीभूत ठरण्यातच होते, हे सर्वविदित आहे.

पुढे वाचा

स्फुट

वैयक्तिक आयुष्यात देवावर, नियतीवर श्रद्धा असण्याला आक्षेप असण्याचे कारण नाही. पण सार्वजनिक, सामाजिक जीवनात तिची लुडबूड होते तेव्हा चिंता वाटते, वाढते. संघटित धर्मसंस्था सत्तापिपासू लोकांना हमखास आपल्याकडे खेचून घेते आणि मग त्यात राजकारणातील अनिष्ट गोष्टी शिरतात. पाश्चिमात्य राष्ट्रात चर्चचा इतिहास पाहा. आपल्याकडील रथयात्रेपासून सुरुवात झालेल्या घटना पाहून हेच दिसते की जास्त संख्येने लोक आकृष्ट होतात तेव्हा राजकारण्यांचे लक्ष तिकडे जाते आणि राममंदिर हा भक्तीचा नव्हे तर राजकारणाचा विषय होतो. राम हा दर्शनी किंवा ‘फ्रंट’ म्हणतात तसा दाखवायचा भाग बनतो आणि त्याच्या आडून राजकारणाची सूत्रे हलू लागतात.

पुढे वाचा

मध्यस्थ दर्शन-सहअस्तित्ववाद : एक सांप्रत दर्शन – परिचय 

‘आजचा सुधारक’च्या ऑक्टोबर-२३ च्या अंकातील श्रीधर सुरोशे यांचा ‘मार्क्सची अर्थमीमांसा : भाग २‘ हा लेख वाचला. त्यातील विचार आणि मी ज्या दर्शनाचा अभ्यास करीत आहे, यांतील साम्यस्थळे मला दिसली. त्यावरील माझ्या अभिप्रायांवर ‘आजच्या सुधारक’ने प्रोत्साहन दिले की ‘मध्यस्थ दर्शन-सहअस्तित्ववाद’ याविषयी मी काही लिहावे, ज्याने एक नवा मौलिक विचार लोकांसमोर येईल आणि संवादाचा एक मोठा अवकाश खुला होईल. मला लिहिते केल्याबद्दल ‘सुधारक’चे आभार.

भूमिका : 

सर्वप्रथम हे सांगणे आवश्यक आहे की मध्यस्थ दर्शन-सहअस्तित्ववाद या दर्शनाचा मी गेले काही वर्षे अभ्यास करतो आहे.

पुढे वाचा

मार्क्सची अर्थमीमांसा : भाग ३

निरनिराळ्या वस्तूंत जी अमूर्त वास्तवता शिल्लक राहते तिचा मार्क्सच्या विवेचनास अनुसरून एक अर्थ विशद करता येईल. तो असा :

वस्तूतील ही अमूर्त वास्तवता म्हणजे एकाच प्रकारच्या मानवी श्रमांचे, त्यांचा कोणत्या प्रकारे उपयोग केला जातो याचा विचार न करता जे शिल्लक राहते अशा निव्वळ श्रमांचे घन स्वरूप होय. या सर्व वस्तूंविषयी जे सामान्य तत्त्व मांडता येईल ते असे की, या सर्व वस्तूंच्या निर्मितीसाठी मानवी श्रमशक्ती खर्च झालेली असते. मानवी श्रमशक्तीचे त्या व्यक्त स्वरूप असतात. सारांश, सर्वांत समानतेने असणाऱ्या या सामाजिक गोष्टींची मूर्त स्वरूपे या दृष्टीने पाहता सर्व वस्तू मूल्ये असतात.

पुढे वाचा

पुस्तक परिचय – सह्याचला आणि मी – एक प्रेमकहाणी

लेखक: माधव गाडगीळ
प्रकाशक: राजहंस प्रकाशन

परवाच ‘सह्याचला आणि मी – एक प्रेमकहाणी’ हे माधव गाडगीळ यांचे पुस्तक हातात पडले; आणि मी ते आधाशासारखे वाचून काढले. एक निसर्गप्रेमी, पद्मभूषण, पर्यावरणवादी चळवळीतला एक आधारस्तंभ आणि भटनागर प्रशस्ती पुरस्कार मिळालेला एक विद्वान म्हणून मी त्यांना ओळखून होतोच. तशा आमच्या गाठीभेटीही झाल्या होत्या. माझ्या ‘अनर्थ’ पुस्तकासाठी त्यांनी ब्लर्बही दिला होता. पण तरीही त्यांचे हे पुस्तक वाचल्यावर मला माधव गाडगीळ ही काय असामी आहे हे खऱ्या अर्थाने कळले. 

या माणसाने निसर्गावर प्रेम केले. सर्व प्राणी, वनस्पती, किडे, भुंगे – सर्व कीटक, दगड, धोंडे, पर्वत, नद्या, समुद्र, त्यातले मासे, हत्ती, वाघ, सिंह, एवढेच काय इथल्या शेवाळ्यावरही याने प्रेम केले!

पुढे वाचा