‘नॉट ओन्ली मिसेस् राऊत’ हा इंग्रजी शीर्षक असलेला मराठी चित्रपट. दिग्दर्शिका अदिती देशपांडे. नुकताच हा चित्रपट पाहिला आणि त्याच्या झालेल्या प्रभावातून पुरतेपणी भानावरही आले नव्हते, तर एक प्रतिक्रिया कानावर आली, ‘चावून चावून चोथा झालेला विषय आहे’ प्रतिक्रिया व्यक्त करणारा अर्थात पुरुष! ज्याला मिसेस् राऊतच्या वेदनांशी आपली नाळ जोडता येईल, तो कोणीही अशी प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही. मिसेस् राऊत ज्या परिस्थितीतून गेली आहे तिथे तुम्ही स्वतःला ठेवा अन् मग आपण काय केले असते, ह्याचा विचार करा. मेंदूला झिणझिण्या येतील. “एखादी स्त्री जी कोणाचीच नसते ती सर्वांचीच असते का?’
Author archives
विवेकवाद – भाग ३
(प्रथम प्रकाशन जून १९९० अंक १.३)
कर्मसिद्धान्त, पूर्वजन्म आणि पुनर्जन्म
या लेखमालेच्या दुसऱ्या लेखांकाच्या शेवटी आपण ‘कर्मसिद्धान्त’ नावाच्या एका प्रसिद्ध उपपत्तीचा उल्लेख केला. तेथे आपण ईश्वराच्या अस्तित्वाचा आणि त्याच्या स्वरूपाचा विचार करीत होतो, आणि आपण असा युक्तिवाद केला होता की जगात जे प्रचंड अशिव आढळते म्हणजे भयानक दुःख, क्रौर्य, अज्ञान, दुष्टाचार, रोगराई इत्यादि जे आढळते ते सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वथासाधु अशा ईश्वराच्या अस्तित्वाला बाधक आहे. या युक्तिवादाला दिल्या गेलेल्या अनेक उत्तरांचे आपण परीक्षण केले आणि शेवटी कर्मसिद्धान्तापाशी येऊन ठेपलो. कर्मसिद्धान्तानुसार जगातील अशिवाचे कारण आपण मानवच आहोत आणि त्याकरिता ईश्वराला जबाबदार धरणे चूक आहे.
भीती आणि विचार
लेखिकेच्या शब्दचित्रातून तिचा अनुभव माझ्यातही साकारला. माझ्या मनावरूनही भीतीची लाट गेली. अशा अनुभवांकडे कसे बघावे, ते कसे घ्यावेत, या पृच्छेवरून तिची या अनुभवामागची प्रक्रिया जाणून घेऊन तो संगणकीय भाषेत भीतीच्या फाईलमधून विचाराच्या ‘फाईल’ मध्ये सामील करण्याचा प्रयत्नही समजला.
मानसशास्त्रीय संस्कारांमुळे माझ्या मनात ‘अतींद्रिय’ असे काही आलेच नाही. मनात आले ते असे : मूल बौद्धिक क्षमता असलेल्या मेंदूसकट जन्मते. त्यावर मुळाक्षरे उमटवतात पालक, शिक्षक, मित्रमंडळ, पुस्तके, प्रसारमाध्यमे आणि एकूण वातावरण ! त्यातून बऱ्या-वाईटाचे भान येते. धोक्यांची जाणीव होते. बचाव कसा करावा, समजू लागते.
व्यक्तिविशिष्ट रसायनांचा मेळ
अंशतः विश्लेषणः पद्मजाचा अनुभव दुर्मिळ आहे खरा, पण त्याला गूढ किंवा अमानवी मानायचे कारण नाही. उपलब्ध शास्त्रीय ज्ञान वापरून त्याचे स्पष्टीकरण इथे थोडक्यात देता येईल.
माणसासकट सर्व प्राण्यांना काही व्यक्तिविशिष्ट रसायने अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म प्रमाणात उपलब्ध असली तरी त्यांची तीव्र जाणीव होऊ शकते. याची अगदी ठळक आणि व्यवहारातली उदाहरणे म्हणजे केवळ वासावरून काही तासांपूर्वी पळालेल्या गुन्हेगाराचा, पुरून टाकलेल्या बळीचाही माग काढू शकणारे कुत्रे, मादीच्या वासाने दोन-तीन किलोमीटर्सपर्यंत तिला शोधत जाणारे भुंगे, औषधाच्या प्रत्येक गोळीत औषधाचे अगदी थोडेच रेणू असतील-नसतील तरी लागू पडणारी होमियोपॅथिक औषधे आणि एखाद्या विशिष्ट पदार्थाची (हिंग, लसूण, शेंगदाणे, अंडी, विशिष्ट प्रकारचे गवत, ऑईल पेन्ट, इ.)
नागरी-जैविक विविधता (भाग २)
नागरीकरणामुळे जैविक वैविध्यावर होणारे आघात आणि ते रोखण्यासाठी आवश्यक असणारे संवर्धन धोरण
५. जैवविविधता जपणाऱ्या ‘नव्या’ नगरांचे नियोजन:
५.१. वस्ती, खेडे, गाव, नगर, महानगर, मोठे नागरी प्रदेश अशी मानवी वस्त्यांची एक श्रेणी असते. कधीकधी एखाद्या ठिकाणी अचानकपणे नवे नगर वसविण्याचे ठरते. त्यामागे काही सामाजिक-राजकीय कारणे असतात. वेगाने नगरनिर्माण करण्याच्या धडपडीमध्ये नियोजन करायला पुरेसा वेळही दिला जात नाही. साध्या नागरी सेवांचा विचार पुरेशा प्रमाणात होत नाही तेथे पर्यावरणाचा विचार तर दूरच राहतो. असे असले तरी स्थानिक जैवविविधता नष्ट होणे हे अपरिहार्यच असते असे मात्र नाही.
ग्राम-नागरी संबंध आणि विकासाची परस्परावलंबी प्रक्रिया (भाग २)
या लेखाच्या पहिल्या भागात ग्रामीण-नागरी प्रक्रियेमधील लोकांचे स्थलांतर आणि मालांची देवाण-घेवाण यांची चर्चा केली होती. या ‘उपयोगी’ मालाच्या आणि/सक्षम, कष्टकरी लोकांच्या स्थलांतर प्रक्रियेला जोडूनच इतर काही महत्त्वाची देवाणघेवाण ग्राम-नागरी विभागांमध्ये होत असते. त्यांचा विचार या भागात केला आहे. ७) निरुपयोगी गोष्टींचे प्रवाह (Flows of wastes):
नागरी क्षेत्रांचे, विशेषतः मध्यम आणि मोठ्या आकाराच्या शहरांचे परिणाम केवळ त्यांच्या ‘सीमांकित’, नागरी भूक्षेत्रापुरते कधीच मर्यादित नसतात. त्यांचे पर्यावरणविषयक परिणाम तर पुष्कळ मोठ्या भौगोलिक क्षेत्रावर होत असतात. ‘नगरांचे पर्यावरण ठसे’ (Ecological footprints) हे आजूबाजूच्या ग्रामीण समजल्या जाणाऱ्या प्रदेशांवरही पडत असतात.
आधुनिकोत्तरवाद, हिंदू राष्ट्रवाद व वैदिक विज्ञान (३)
पाश्चात्त्य देशांनी इतरांचे शोषण करण्यासाठी विज्ञानाचा गैरवापर केला. ‘नेटिव्हां’ना कमी लेखणे विज्ञानाच्या मदतीने घडले. परकी परंपरांच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी प्रबोधन-काळातल्यासारखा विज्ञानाचा वापर केला. हे सर्व नाकारता येत नाही. पण हे नोंदण्यामुळे, यावर टीका करण्यामुळे आधुनिकोत्तर विचारवंत धर्माधिष्ठित ‘उजव्या’ विचारवंतांचे सहकारी, दोस्त होत नाहीत. पण आधुनिकोत्तर विचारवंत विज्ञानाच्या राजकीय गैरवापरावरील टीका करून थांबत नाहीत. ते वस्तुनिष्ठ ज्ञानाची कल्पना हेच एक मिथक आहे, आणि हे मिथक सत्ताधारी पाश्चात्त्यांनी मतलबीपणे ‘सत्य’ म्हणून इतरांवर लादले आहे, असे म्हणतात. ते विज्ञानाचे पाश्चात्त्य साम्राज्यवादाशी असलेले संबंध दाखवून थांबत नाहीत.
चिरतरुण जातिव्यवस्था
इंग्रजी शिकलेल्या उच्चभ्रू वर्गातील एखाद्यासमोर ‘जात’ या शब्दाचा उच्चार केला तरी तो अस्वस्थ होईल. रागाने लालबुंद होईल. पूर्वग्रहदूषित म्हणून हिणवेल व तुम्हाला चक्क वेड्यात काढेल. त्याच्या मते ‘ते’ जातपात मानत नाहीत. कधी कुणाची जात विचारत नाहीत, जातीवर आधारित व्यवहार करत नाहीत वा कुठलेही निर्णय घेत नाहीत, अशांना आपण फक्त एकच प्रश्न विचाराः ‘तुमचे लग्न जातीतच झाले आहे ना ?’ उत्तर बहुधा ‘होय’ असेल व त्याला पुष्टी म्हणून ‘आयुष्यात फक्त एकदाच मी लग्नाच्या वेळी जात पाळली होती’, असे गर्वाने सांगतील. परंतु ही एकच गोष्ट जातिव्यवस्थेला जिवंत ठेवत आहे, तिला चिरतारुण्य व अमरत्व बहाल करत आहे, याची कदाचित त्यांना कल्पना नसेल.
संपादकीय
विशिष्ट शहरे आणि त्यांच्या विशिष्ट समस्या यांच्यावरील लेख मराठी नियतकालिकांमध्ये आढळतात. काही वर्षांपूर्वी मराठी विज्ञान परिषदेने मुंबईच्या स्थितीवर एक दस्तऐवजही घडवला होता. पण नागरीकरणाची प्रक्रिया, नगररचना आणि नगर व्यवस्थापन, यावरील तात्त्विक लिखाण मराठीत अपवादानेच आढळते. ही परंपराही जुनीच आहे. कौटिलीय अर्थशास्त्रातील काही फुटकळ संदर्भ आणि जैनांच्या बहात्तर कलांच्या यादीत नगररचनेचा समावेश सोडता या विषयाकडे भारतीयांचे लक्ष फारसे गेलेले दिसत नाही.
मोहेंजोदडोच्या काळापासून भारतात नगरे रचली जात आहेत व त्यांचे व्यवस्थापनही होत आहे. आज नगरशासकांच्या व्यवहारात मात्र शास्त्र कमी जाणवते, तर लालफीत व भ्रष्टाचाराचीच ‘याद राखली’ जाते.
नागरीकरण: प्रक्रिया, समस्या आणि आव्हाने
गेल्या दशकात भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात महानगरे, नगरे आणि वाढणारी नागरी लोकसंख्या यांच्याबद्दल चर्चा सुरू झाली. वर्तमानपत्रांमध्ये महाराष्ट्रातील अनेक नगरांबद्दल, (इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळाबद्दल) सातत्याने लिहिले गेले. त्या निमित्ताने अनेक नगरांचे प्राचीन काळापासूनचे अस्तित्वही अभिमानाने शोधले गेले. परंतु अशा लिखाणामध्ये नागरीकरणाच्या, मानवांची नगरे निर्माण करण्याच्या प्रक्रियेकडे मात्र क्वचितच लक्ष वेधले गेले. नगरे का निर्माण होतात? कशी वाढतात? कशी टिकतात? कशी आणि कशामुळे हास पावतात? असा विचार सहसा केला जात नाही, किंवा केला गेला तरी अतिशय वरवरचे विश्लेषण केले जाते. नागरीकरण ही मानवाची मूलभूत प्रेरणा असावी का?