Author archives

विज्ञानाचे रूपांतरण

कालिदासाच्या ‘शाकुंतला’त एक प्रसंग आहे. दुष्यंत शिकारीच्या नादात कण्वाच्या आश्रमाजवळ येऊन हरणावर बाण रोखतो तेव्हा आश्रमवासी त्याला सांगतात की तसे करू नये, कारण पवित्र वनांत प्राण्यांची व झाडांची हिंसा निषिद्ध आहे. 1801 सालानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा फ्रान्सिस बुकॅनन कारवारच्या देवरायांबाबत लिहितो की देवरायां-मधील झाडे तोडायला गावप्रमुखामार्फत देवाची परवानगी घ्यावी लागते. परवानगी फुकट मिळते, पण ती न घेतल्यास देवाचा कोप होतो. पुढे तो म्हणतो की सरकारने ती मालमत्ता (देवराई) काबीज करू नये यासाठी घडवलेली ही क्लृप्ती आहे.
मला देवराया, देवतळी, पवित्र पशुपक्षी यांच्याबद्दल कालिदासाची भूमिका बुकॅननच्या भूमिकेपेक्षा कितीतरी श्रेष्ठ वाटते.

पुढे वाचा

मानवतेविरुद्ध गुन्हा (लेख-३)

शासकीय संगनमत

“गोध्र्यानंतरचा गुजरातेतील हिंसाचार हा राज्याच्या मुख्यमंत्र्याने व शासनाने केलेला संघटित गुन्हा आहे. सरकार व त्याचे अधिकारी यांनी जे केले, व जे केले नाही, त्यावरून हे उघड होते’.

गोध्र्यामागे काही पूर्वतयारी होती व ती एका मोठ्या कटाचा भाग होती, असे सिद्ध होण्याची वाट न पाहता मोदी व त्यांच्या मंत्रिगणाने बेजबाबदार विधाने करून ते सिद्धच झाल्यासारखे चित्र उभे केले. ओळखता न येणारी जळकी प्रेते ‘समारंभाने’ अहमदाबादेस नेणे, नंतरच्या हिंसेचे समर्थन करणे, हेही हिंसेचे मूळ ठरले, आणि त्याचा दोष ठामपणे मोदींकडेच जातो.

पुढे वाचा

विवेकवादी मनुष्याला कधी हसू येते काय?

विवेकवादाविषयी प्रचलित असलेल्या अनेक विलक्षण आक्षेपांपैकी एक आक्षेप असा आहे की विवेकवादी माणसे भावनाहीन असतात. हा आक्षेप इतका विपरीत आहे की सामान्यपणे शहाणी असणारी माणसेही जेव्हा त्याचा पुरस्कार करतात, तेव्हा हसावे की रडावे हे कळेनासे होते. वस्तुतः विवेकवाद ही एक अतिशय शहाणपणाची भूमिका असून तिचे स्वरूप नीट लक्षात घेतल्यास तिच्यात शंकास्पद किंवा विवाद्य असे काही शोधूनही सापडणार नाही अशी आमची समजूत होती. तिच्याविषयी अनेक खोटेनाटे, सर्वथा गैरलागू, असमंजस आक्षेप कोणी का घ्यावेत हे अनाकलनीय आहे. या (कु)प्रसिद्ध आक्षेपांपैकी या लेखाच्या शीर्षकात व्यक्त झालेला आक्षेप एक आहे.

पुढे वाचा

करायला गेलो एक !

ज्ञानाचा आग्रह जेवढा हिंदुधर्मात धरण्यात आला तेवढा विचार इतर कोणत्याही धर्मात नाही; परंतु अज्ञानी जन जेवढे हिंदु धर्मात आहेत तेवढे इतर धर्मांत नाहीत.
इमानदारीचा जेवढा आग्रह इस्लाम धर्मात आहे तेवढा इतर कोणत्याही धर्मात नाही; परंतु बेइमानीच्या जेवढ्या गोष्टी मुस्लिम राजकारणात आहेत तेवढ्या इतर कोणत्याही धर्मात नाहीत.
अपरिग्रहाचा जेवढा आग्रह जैन धर्मात आहे तेवढा इतरांचे ठायी आढळणार नाही; परंतु परिग्रहाच्या मूर्ती जेवढ्या जैनांमध्ये आहेत तेवढ्या इतरत्र दिसत नाहीत.
प्रेमाचा आग्रह जेवढा ख्रिश्चन धर्मात आहे तेवढा इतर धर्मांत नाही; परंतु धर्माच्या नावावर जेवढी युद्धे ख्रिश्चन धर्मीयांनी केली तेवढी अन्यत्र झाली नाहीत.

पुढे वाचा

पत्रसंवाद

गांधींना छोटा करणारा नथुराम मोठा कसा?
एप्रिल 2003 चा आजचा सुधारक वाचला त्यातील शांताराम कुलकर्णी यांच्या पत्रावर माझ्या प्रतिक्रिया देत आहे.
‘महात्मा’ही गांधींना मिळालेली पदवी त्यांच्या महान कार्याविषयीची पोहोच पावती होती. ‘अहिंसा’, ‘सत्याग्रह’ यासारख्या प्रभावी हत्यारांनी, शांततामय मार्गांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अध्यात्माचा आधार घेऊन गांधींनी नैतिकतेतून सामान्य माणसाला स्वातंत्र्यलढ्यासाठी तयार केले. म्हणूनच स्वातंत्र्य-प्राप्तीनंतर हाच महात्मा स्वतंत्र भारताचा ‘राष्ट्रपिता’ झाला.
आपल्या पित्याविषयीसुद्धा वाईट विचार व्यक्त करताना मुलगा आपल्या घराण्याच्या संस्कृतीचा चांगल्या विवेकी जीवनमूल्यांचा विचार करतो. ‘पिता’ हा कुटुंबाचा पालक असतो, म्हणूनच कुटुंबीय त्याला गुणदोषासहित स्वीकारीत असतात.

पुढे वाचा

कुटुंबाच्या मर्यादेत वृद्धांचा सांभाळ

आठ पंधरा दिवसांपूर्वी माझ्या सासूबाई हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या 83 व्या वर्षी निवर्तल्या. गेली 8-10 वर्षे त्या आमच्याचकडे होत्या. आणि त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांची एकुलती एक मुलगी-माझी पत्नी–वारल्यानंतरही मी त्यांना प्रेमाने सांभाळले, हवे नको पाहिले, दवापाणी काटेकोरपण बघितले. यात जगावेगळे मी काही करीत आहे अशी माझी भावना नव्हतीच. पण त्या निवर्तल्यानंतरच्या ज्या प्रतिक्रिया माझ्याजवळ व्यक्त झाल्या त्या मात्र धक्कादायक वाटतात.
“काय, म्हातारीचा बोजा उतरला? सुटलात तिच्या …ला.’ ही त्यातली एक प्रतिक्रिया. “काही बोलू नका हो तुम्ही, वस्तुस्थिती हीच होती.” हे वर. हे बोलणारे माझे मित्र एरवी मनाने मायाळू आहेत.

पुढे वाचा

समाजरचना–विचार

समाजरचनेचा विचार करताना तळागाळातील व्यक्तीपासून ‘उच्च’ वर्गातील व्यक्तींसकट सर्वांच्या हितासाठी नेमके काय हवे याचे भान हवे. जोडणारे बंध व्यक्ती-व्यक्तीमध्ये वा एकूण समाजामध्ये वितुष्ट आणणारे असल्यास त्यांचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. सामान्यपणे कुठलाही वाद व विशेषकरून टोकाचा राष्ट्रवाद व अशा राष्ट्रवादांच्या संकेत-संज्ञा वापरण्यावर दुराग्रह या कुठल्याही सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या समाजाला हितावह ठरणाऱ्या नाहीत. भावनांचा उद्रेक होणार नाही याची काळजी घेणारी सक्षम यंत्रणा असणे गरजेचे आहे. समाजातील अभिजन वर्गाकडे role-model म्हणून इतर बघतात. त्यांचे सही सही अनुकरण करतात. म्हणून या अभिजनवर्गाने आपले आचार-विचार, वर्तणूक, सोई-सुविधा, छंद-सवयी इत्यादींबद्दल जास्त जागरूक व संयमित असणे गरजेचे आहे.

पुढे वाचा

‘बुश-बटन’ साम्राज्यवाद

इराकी मोहिमेचे वैशिष्ट्य दोन प्रतिमांच्या रूपांत नजरेसमोर येते. बगदादच्या फिरदौस चौकातील सद्दाम हुसेनचा पुतळा उखडून टाकणे ही पहिली प्रतिमा. एका जुलमी राजवटीचा होत असलेला अंत आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखाली जगात प्रस्थापित होत असलेली एक नवी व्यवस्था (World Order) ह्यांचे प्रतीक म्हणजे जणू ही प्रतिमा. दुसरी प्रतिमा आहे इराकी वस्तुसंग्रहालयाची आणि अमेरिकन तैनाती फौजांच्या नजरेसमोर गुंड तिथे करीत असलेल्या लुटीची. “अमेरिकाप्रणीत शांती’ (Pax Americana) ह्याच्या यश-अपयशावर ह्या दोन प्रतिमा फार अचूक टिप्पणी करतात : जबाबदारीशिवाय सत्ता! बुशचे पाठिराखे ह्या ‘बुश तत्त्वज्ञानाचे’ वर्णन साम्राज्यवादाचे पुनरागमन म्हणून करत नाहीत.

पुढे वाचा

विरोधकांबाबतचा अभिमान (राजर्षि शाहू गौरव ग्रंथातून)

छत्रपतींनी “आमच्या स्वराज्यातील कोणत्याही धर्मपीठावरील अधिपती नेमण्याचे अधिकार छत्रपतींचे आहेत. त्याचप्रमाणे चालावे,’ असा लेखी हुकूम जारी केला. “काय जाधवराव, तुम्ही तर कानांवर हात ठेवले होतेत, पण कोदंडाने दिलाच ना पुरावा काढून!” महाराजांच्या या टोमण्यावर जाधवरावादी आम्ही सगळेच हसलो. संध्याकाळी पन्हाळा लॉजवर पुराव्याचे पुस्तक पाठवून दिले.
या घटनेपूर्वी करवीर शंकराचार्यांच्या पीठावर महाराजांनी डॉ. कुर्तकोटींची स्थापना केली होती आणि त्याबद्दल केवळ भारतातूनच नव्हे, तर इंग्लंड अमेरिकेतून शाहूमहाराजांवर अभिनंदनाचा वृत्तपत्री वर्षाव झाला होता. पण वरील प्रश्न नेमका काय हेतूने त्यांनी विचारला, त्याचे इंगित मात्र माझ्या, जाधवरावांच्या किंवा दिवाणसाहेबांच्या अटकळीत त्या वेळी मुळीच आले नाही.

पुढे वाचा

इराक युद्ध आणि जागतिक व्यवस्था

१९९१ मध्ये पश्चिम आशियात पहिले आखाती युद्ध भडकले. इराकने आपल्या दक्षिणेकडे असलेल्या कुवैत नावाच्या टीचभर देशावर हल्ला करून तो प्रदेश गिळंकृत केल्याचे निमित्त झाले, आणि अमेरिकाप्रणीत आघाडीने इराकवर हल्ला करून कुवैतला मुक्त केले. दोन महिन्यांपूर्वी याच प्रदेशात दुसरे आखाती युद्ध झाले. इराककडे सर्वसंहारक शस्त्रास्त्रे (weapons of mass destruction), म्हणजे अण्वस्त्रे, रासायनिक अस्त्रे, जैविक अस्त्रे प्रचंड प्रमाणात आहेत; ही शस्त्रास्त्रे दहशतवादी संघटनांच्या हाती लागण्याची शक्यता आहे; यामुळे सगळ्या जगाच्या सुरक्षिततेला धोका आहे; असा कांगावा करीत अमेरिकेने इराकवर हल्ला केला. संयुक्त राष्ट्रसंघटनेने अशा आततायी युद्धाला केलेला स्पष्ट विरोध सरळ धाब्यावर बसवून अमेरिकेने जगावर आणखी एक युद्ध लादले.

पुढे वाचा