Author archives

सतीची चाल, पुनर्विवाह बंदी, बालविवाह आणि . . . जातिभेद??

एकोणिसाव्या व विसाव्या शतकात जातिभेदावर बऱ्याच चर्चा झाल्या आणि त्याची जरूरही होती, कारण अस्पृश्यतेने त्यापूर्वी धुमाकूळ घातला होता. ब्रिटिश राज्यात जगभर त्याला कुप्रसिद्धी मिळून एकूण हिंदू धर्मीयांची निंदा झाली. हिंदू म्हटले की ‘काहीतरी किळसवाणे’ असा सर्वत्र समज झाला. तसे पाहता सर्वच समाजात class consciousness किंवा काही त-हेची गुलामी होती. परंतु जन्मतःच जातिभेदाने फुटीर होणारा समाज भारताशिवाय जगाच्या पाठीवर कोठेच नव्हता. येथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती ही की 1945 सालच्या सुमारास प्रसिद्ध विदुषी कै. इरावतीबाई कर्वे यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जातीतील लोकांच्या चेहऱ्यावर 19 मोजमापे घेऊन जातीनुसार त्यात काही फरक आढळतो का ते पाहिले होते व संख्याशास्त्रानुसार असा निष्कर्ष काढला की त्यात फरक नव्हता.

पुढे वाचा

महाराष्ट्रातील पोरके पाणी (लेख-१)

“पाणी नसेल तर आपले जीवन अशक्य होईल एवढी महती असूनही मुबलक उपलब्ध पाण्याला बाजारात किंमत नाही आणि यत्किंचित उपयोगी नसलेल्या हिऱ्याला अतोनात किंमत आहे.”
—- अॅडम स्मिथ
मराठवाड्यातील 43 तालुके (एकंदर 76 पैकी) टंचाईग्रस्त घोषित झाले आहेत. सध्या 1200 गावांना पाण्याची टंचाई असून पावसापूर्वी या यादीत आणखी 600 गावांची भर पडण्याची शक्यता आहे. लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांची अवस्था भीषण आहे. नमुन्यादाखल लातूर जिल्ह्याची स्थिती पाहता येईल. एकूण 943 गावांपैकी प्रत्येक वर्षी 450 ते 580 गावांना पाण्याची टंचाई असतेच. यंदा सगळीच गावे ग्रासलेली आहेत.

पुढे वाचा

मानवतेविरुद्ध गुन्हा (लेख-२)

स्त्रियांवरील अत्याचार

“गोध्यातील मदतछावणीतील एका बलात्कारितेची कहाणी एक वारंवार घडलेला घटनाक्रम नोंदते. तिचे मूल तिच्यासमोर मारले गेले, तिला मारहाण केली, जाळले व मृत समजून सोडून दिले. कुठेकुठे वैविध्यासाठी अॅसिड टाकले गेले.” “प्रांताभरातील लैंगिक हिंसेच्या घटनांची संख्या तर अचंबित करणारी आहेच, पण मुख्यमंत्री, मंत्री, गुजरातेतील अधिकारी व सर्वात वाईट म्हणजे भारत सरकारचे मंत्री यांनी ज्या थातुर-मातुर आणि उपेक्षागर्भ (trivial and dismissive) त-हेने हे हाताळले, त्याने अचंबित होणे दुणावते.”
“जॉर्ज फर्नाडिस लोकसभेत म्हणाले (30 एप्रिल 2002), ‘गुजरातेतील हिंसेत काही नवीन नाही … गर्भार बाईचे पोट फाडणे, आईच्या पुढ्यात मुलीवर बलात्कार करणे, हे नवीन नाही.’

पुढे वाचा

उत्क्रांतीची तोंडओळख (लेख-२)

19 व्या शतकात पा चात्त्य जगातही धर्म, कर्मकांड, अंधश्रद्धा यांचे साम्राज्य होते. खरे तर डार्विनने 1838 मध्येच उत्क्रांतीची उपपत्ती (theory of cvolution) मांडणारा Origin of Specics नावाचा ग्रंथ लिहिला होता. परंतु डार्विनची ‘उत्क्रांतीची उपपत्ती’ पारंपारिक पा चात्त्य मनाला रूचणारी नव्हती. केवळ यासाठीच त्याने हा ग्रंथ उपपत्ती सुचल्यावर लगेच प्रकाशित केला नाही. एव्हढेच नव्हे, तर त्याने आपल्या पत्नीलाही सांगितले होते की उत्क्रांतीवरचे आपले लेखन अपेक्षेप्रमाणे आपल्या हयातीत झाले नाही, तर या विषयावरची आपली हस्तलिखिते आपल्या मृत्यूनंतरच प्रकाशित करण्यात यावी. ख्रिश्चन धर्मानुसार ईश्वरानेच सर्व काही घडवून आणले आहे.

पुढे वाचा

तव्य (ought) आणि कर्तव्य (duty)

नीतिशास्त्रातील प्रमुख संकल्पना म्हणजे ‘साधु’ (good) आणि ‘तव्य-कर्तव्य’ (ought-duty) या. त्यांपैकी ‘साधु’ म्हणजे काय याविषयी मी अनेक लेखांत (विशेषतः गेल्या दोन लेखांत) लिहिले आहे. परंतु ‘तव्याविषयी मात्र फारसे स्पष्टीकरण झाले नाही अशी माझी समजूत आहे. ती चर्चा या लेखात करण्याचा मानस आहे.
‘कर्तव्य’ किंवा ‘तव्य’ म्हणजे काय? प्रथमदर्शनी उत्तर सुचते ते म्हणजे त्या कल्पनेत बंधकत्वाची, एखादे कर्म करण्यास बद्ध करण्याची, कल्पना प्रामुख्याने समाविष्ट आहे असे दिसते. ‘अमुक कर्म माझे कर्तव्य आहे’ म्हणजे ते कर्म करण्यास मी बांधील आहे, ते मला आवडो की न आवडो, ते कर्म करण्याची इच्छा असो की नसो.

पुढे वाचा

“धोकादायक पाणी!”

पण मौजेची गोष्ट अशी, की पाणी जरी थंडगार, मधुर आणि पारदर्शक असले तरी त्याच्या मालकीचा किंवा वाटपाचा प्रश्न मात्र अत्यंत स्फोटक, कडवट आणि गुंतागुंतीचा होऊ शकतो, एवढेच नाही तर समाजव्यवस्थेत फार मोठी उलथापालथ त्यामुळे होऊ शकते. प्राचीन इराकमधली वैभवशाली संस्कृती पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे जमीन उजाड होऊन नष्ट झाली, असे मत एरिक एकहोल्म ह्या पर्यावरणशास्त्रज्ञाने मांडले आहे. सिंधू संस्कृतीचा नाश परकीय आक्रमणामुळे झाला नसून त्यांचे पाणी व्यवस्थापनाचे तंत्र बिघडल्यामुळे झाला असे मत नवीन संशोधनाद्वारे सध्या पुढे येत आहे. शाक्य आणि कोलीम या दोन गणराज्यांमधल्या ‘रोहिणी’ नदीच्या पाणीवाटपाच्या संघर्षाचे निमित्त होऊन गौतम बुद्धाला राजत्याग करावा लागला, असे डॉ.

पुढे वाचा

पत्रसंवाद

एप्रिल 2003चा आजचा सुधारक वाचला. दि. 13.9 च्या आजचा सुधारक या अंकातील श्री. मधुकर देशपांडे यांचा ‘मी नथुराम बोलतोय’ हा लेख वाचून श्री. शांताराम कुळकर्णी, पुणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नथुराम नाटकाला सर्व प्रेक्षक नथुराम विचाराचे होते असे कळते आणि नथुराम संख्या आताच का वाढली असा प्रश्न श्री कुळकर्णी यांनी केला आहे. मला असे वाटते या नाटका-अगोदर ही नथुराम म्हणजे नथुराम विचार होतेच पण ते छुपे होते कारण उघडपणे उदात्तीकरण (त्या विचाराचे) करण्याची धास्ती वाटत होती. आता केन्द्र सरकारात नथुरामप्रणीत सरकार असल्यामुळे त्यांना उघडमाथ्याने प्रचार करण्याची संधी मिळत आहे आणि संख्या नथुरामधर्माची वाढत आहे, पण ती संधीसाधूंच्या रूपात.

पुढे वाचा

क्रिकेट हा खेळ की स्वार्थाचा बाजार

दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या काही घटनांचे अस्तित्व आपल्या देशात आज ही कायम आहे. ब्रिटिशांनी जाता जाता आपल्या देशाची फाळणी केल्यामुळे न भरून निघणाऱ्या जखमांचे व्रण आजही आपल्याला त्रास देत आहेत. तसेच ब्रिटिशांनी आपल्या देशाला क्रिकेट या खेळाची देणगी दिल्यामुळे या खेळाने सध्या कहर माजविला आहे. 1975 पासून सुरू झालेल्या विश्वचषकामुळे अलिकडच्या काळात क्रिकेटच्या स्पर्धा ह्या खेळाडू वृत्तीने खेळण्याच्या स्पर्धा न राहता त्यामध्ये व्यावसायिक व धंदेवाईक प्रवृत्तीने शिरकाव केला आहे. क्रिकेटच्या वेडाने शालेय विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, शासकीय कार्यालयातील शिपायापासून ते वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत, तसेच लहान मोठ्या विविध व्यावसायिकांना झपाटून टाकले आहे.

पुढे वाचा

. . . जर परवडत असला तर . . .

ज्या ऐतिहासिक प्रक्रियेने भारताला तरल, नाजुक, नखरेल दर्शने, धर्मशास्त्र, वास्तुकला आणि संगीत दिले; त्याच प्रक्रियेने उपाशी, मरगळलेली खेडी, संधीसाधू आणि हावरट ‘सुसंस्कृत’ (नागर) वर्ग, नाराज कामगार, ढासळती मूल्ये, अंधश्रद्धा यांनाही जन्म दिला. एक अंग दुसऱ्या अंगाचा परिणाम आहे. एक अंग दुसऱ्याची अभिव्यक्ती आहे.

अगदी अनघड, प्राथमिक हत्यारांमुळे अतिरिक्त उत्पादन तुटपुंजे राहिले, आणि तेही (तंत्रज्ञानाला) समरूप अशा जुन्यापुराण्या समाजव्यवस्थेने हिरावून घेतले. बहुसंख्यकांच्या दारिद्र्यावर आपला ऐषारामी सुसंस्कृतपणा रचलेला आहे, हे विसरून उच्च वर्गाला आपला उच्चपणा अंगभूत श्रेष्ठतेतून आला, असे वाटू लागले. इतिहास म्हणजे स्वैर, विस्कळीत घटनांची माळ नव्हे.

पुढे वाचा

न्यायपालिका की अन्यायपालिका?

गेल्या काही वर्षांतील वृत्तपत्रांत किंवा नियतकालिकांत प्रसिद्ध होणाऱ्या न्यायपालिकेतील निरनिराळ्या न्यायाधीशांबद्दलच्या बातम्या बघा—–
1. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या कार्यकलापांवर राम जेठमलानींचे पुस्तक
2. पंजाब उच्च न्यायालयाच्या तब्बल तीन न्यायमूर्तीवर लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये आपल्या संबंधितांना उत्तीर्ण करून घेऊन नोकरी लावून घेतल्याचा आरोप; त्यांच्याकडील न्यायालयीन कामकाज काढून घेतले
3. राजस्थान उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तीची एका स्त्रीला तिच्या बाजूने निकाल देण्यासाठी त्यांची लैगिक भूक भागवण्याची मागणी; चौकशी सुरू
4. कर्नाटक उच्च न्यायालयाचे काही न्यायमूर्ती निर्दोष
5. महाराष्ट्रात न्यायदान करणाऱ्या शेकडो न्यायाधीशांची नेमणूक करणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर पैसे खाऊन नोकऱ्या देण्याचा आरोप.

पुढे वाचा