विषय «कायदा»

जागतिकीकरण, सामाजिक न्याय आणि दलित

जागतिकीकरणाच्या अंगभूत, उच्चभ्रू प्रवृत्तीमुळे समाजाच्या खालच्या थरांमध्ये अस्वस्थतेची जी लाट उसळली, त्याचबरोबर जागतिकीकरण आणि सामाजिक न्याय यांच्या परस्परसंबधांत प्रश्नचिह्न उफाळून वर आले. जागतिकीकरण सामाजिक न्यायाशी खरोखरच सुसंगत आहे का? जर असेल, तर मग बहुसंख्यकांना विपरीत अनुभव का? किती, केव्हा व कशा प्रकारे ते सामाजिक न्यायाशी सुसंगत असेल? जर ते नसेल, तर मग त्याच्या विरोधात त्या प्रमाणात प्रतिरोध का दिसत नाही, यांसारखे असंख्य प्रश्न त्यात गुरफटलेले असतात.

जागतिकीकरणाची प्रक्रिया तसे पाहता नवी नाही. प्रत्येक शासक वर्गाला जागतिकीकरणाच्या आकांक्षा होत्या व कालसापेक्षपणे त्या त्यांनी कार्यान्वित केल्या, हे आपल्याला संपूर्ण ज्ञात इतिहासातून सहजरीत्या पाहता येते.

पुढे वाचा

भारतीय नागरी विकासाला अडसर ठरलेले दोन कायदे

भाडे नियंत्रण कायदा
भांडे नियंत्रण कायद्याचे दुष्परिणाम * भाड्यासाठी होणाऱ्या घरबांधणीमधील गुंतवणूक आटली. * उपलब्ध घरे भाड्याने देण्यावर बंधने आली. * इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीअभावी अकाली मोडतोड वाढली. * नगरपालिकांना मिळणाऱ्या मालमत्ता करामध्ये साचलेपणा आला. * कर उत्पन्न कमी झाल्याने नागरी सेवांवर दुष्परिणाम झाले. * घरमालक आणि भाडेकरूंच्या न्यायालयीन भांडणाची प्रकरणे वाढली.
शहरांमधील झोपडपट्ट्या वाढण्यामागे भाडेनियंत्रण कायद्याचा मोठाच वाटा आहे. या कायद्यामुळे घरांच्या तुटवड्यामध्ये प्रचंड वाढ झाली. गरीब आणि मध्यम उत्पन्न गटांचे लोक प्रामुख्याने भाड्याच्या घरांवरच अवलंबून असतात, ही गोष्ट जगभर आढळते. यामुळेच भाड्याच्या घरांची गरज ही फार मोठी असते.

पुढे वाचा

समान नागरी कायद्याचा मसुदा : एक चिकित्सा (२)

श्री. सत्यरंजन साठे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती जया सागडे आणि श्रीमती वैजयन्ती जोशी ह्यांच्या चमूने जो नवीन, भारतातील सर्व नागरिकांसाठी समान, असा विवाहविषयक कायदा सुचविला आहे त्यामुळे विवाह एक अत्यन्त गंभीर असा विधी होण्याला, त्याचे ऐहिक स्वरूप स्पष्ट होण्याला त्याचप्रमाणे त्याचे पावित्र्य आणि मांगल्यसूचक पारलौकिकाशी आजवर असलेले नाते संपुष्टात यावयाला मदत होईल ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे हे मान्य करून त्याविषयीची चर्चा पुढे चालू ठेवू या.
(२)एकपतिपत्नीक विवाहालाच मान्यता देण्याच्या तरतुदीमध्ये असा विवाह सहसा कोणाला मोडूद्यावयाचा नाही हा विचार प्रामुख्याने कार्य करताना दिसतो.

पुढे वाचा

समान नागरी कायदा

६ डिसेंबर १९९२ ला धर्माच्या नावाखाली उसळलेल्या जातीय दंगली व हिंसाचारामुळे, स्त्री-संघटनांनी समान नागरी कायद्याच्या मागणीचा प्रश्न पुन्हा एकदा जोराने धसास लावण्याचा निर्णय ८ मार्चच्या निमित्ताने घेतला आहे. धार्मिक शक्तींनी सामाजिक जीवनावर जर वर्चस्व गाजवले तर त्याचा पहिला बळी ठरणार आहेत स्त्रिया! आणि म्हणूनच धर्माचे समाजातील स्थान निश्चित करण्याच्या दृष्टीने समान नागरी कायद्याच्या प्रश्नांची सांगोपांग चर्चा करणे सद्यःपरिस्थितीत महत्त्वाचे ठरते. वास्तविक समान नागरी कायद्याचा प्रश्न आज काही प्रथम चर्चेला आलेला नाही. परंतु तरीही समान नागरी कायदा म्हणजे काय? तो आणणे का जरुरीचे आहे?

पुढे वाचा

दाऊदी बोहरांना न्यायालयाचा दिलासा

धर्माच्या नावाखाली संविधानाने सर्व नागरिकांना धर्मनिरपेक्ष वृत्तीने दिलेले नागरी स्वातंत्र्याचे व मानवी अधिकार दाऊदी बोहरा धर्मगुरु सैयदना हे हिरावून घेत असताना त्यांच्या हातात त्यासाठी दोन शस्त्रे आहेत. एक रजा आणि दुसरे बारात. रजा म्हणजे अनुमती. अशी अनुमती असल्यावाचून नवरा-नवरी राजी असूनही लग्न करू शकत नाहीत. सैयदनांना भली मोठी खंडणी पोचवली म्हणजे अनुमती मिळते. बोहरा दफनभूमीत प्रेत पुरायलासुद्धा धर्मगुरूंची अनुमती लागते आणि त्यावेळीही पैसे उकळले जातात! जातीबाहेर टाकण्याची तलवार प्रत्येक बोहर्‍याच्या डोक्यावर टांगलेलीच असते. बारात म्हणजे जातीबाहेर घालविणे. बोहरा धर्मगुरूंनी अध्यात्माच्या क्षेत्रात आपली मनमानी खुशाल चालवावी, पण भारतीय गणराज्याला धार्मिक पोटराज्याचे आव्हान उभे करू नये, ही सुधारणावादी बोहर्‍यांची साधी मागणी आहे.

पुढे वाचा

यमद्वितीयायाः उपायनम्

१९५७ मध्ये संसदेमध्ये हिन्दु-दाय-वितरण-विधेयक Hind code Bill मांडले गेले. त्याच्या योगाने महिलांना पूर्वी कधीही न मिळालेले हक्क प्राप्त होणार होते. त्या विधेयकाचे रचनाकार डॉ. वा. शि. बारलिंगे (त्याकाळचे राज्यसभेचे सदस्य) ह्यांनी त्यानिमित्ताने काही श्लोक रचले ‘ हिन्दु कोड बिला’ ने स्त्रियांना प्राप्त होणारे अधिकार हीच जणू भाऊबीज अशी कल्पना करून त्यांनी त्या श्लोकांना यमद्वितीयायाः उपायनम’ असे संबोधिले. ते पाच श्लोक आम्ही खाली देत आहोत. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या देशामधून दारिद्र्य हटवावयाचे असल्यास धनाचे वा मुद्रेचे प्रमाण वाढवीत नेऊन तिचे वितरण करण्याऐवजी उपभोग्य वस्तूंचे वितरण करणे योग्य होईल असा विचार सांगणारे सात श्लोक त्यांनी रचले आहेत.

पुढे वाचा