विषय «जात-धर्म»

दलित स्त्रियांची आत्मकथने : एक ऐतिहासिक दस्तऐवज

व्यक्ती आणि समष्टी यांच्यातील गुंतागुंतीच्या नात्यांवरती समष्टीच्या अंतरंगातून प्रकाशकिरण टाकून, तिचे चिकित्सक समीक्षण करणारी आणि त्याचवेळी व्यक्तीच्या खासगी आयुष्याच्या व `स्व’रूपाच्या जडणघडणीचे आकलन इतरेजनांसमोर सार्वजनिक रीतीने मांडणारी कृती म्हणजे आत्मकथन होय. अशी कृती एकाच वेळी व्यक्ती आणि समष्टीच्या जडणघडणीत सातत्याने कार्यरत असणाऱ्या, बहुविध आणि परस्परावलंबी प्रियांशी स्वत:च्या समूहाला आणि त्याचबरोबर वाचकालाही, जोडून घेत असते. एका दृष्टीने आत्मचरित्रे म्हणजे इतिहासाच्या विस्तीर्ण अवकाशातील एका विशिष्ट भूप्रदेशाचा स्थलकाल – संस्कृतीविशिष्ट असा जिवंत नकाशा उलगडणारे पथदीपच आहेत असे मानले पहिजे.

व्यक्तीव्यक्तींनी मिळून समाज बनतो असे वरकरणी जरी वाटत असले तरी ते खरे नाही.

पुढे वाचा

कुठे नेऊन ठेवला विवेक तुमचा?

आजच्या अनिश्चिततेच्या सामाजिक, आर्थिक परिस्थिती सामान्य माणसाला असुरक्षित वाटते आहे. त्यामुळे त्याच्यात दैववादीपणा वाढत चालला आहे. आपले कोण? परके कोण? याबाबत संभ्रम वाढत चालला आहे. त्या भीतीतून सामान्य माणूस स्वतःभोवती वेगवेगळी कुंपणे तयार करायला लागला आहे. मग ती धार्मिक, जातिय, प्रादेशिक, भाषिक, आर्थिक कोणती का असेना. भीतीमुळे जे जुने, ओळखीचे आहे तेच धरून बसण्याची भावना व कृती नैसर्गिकच असते.

हे सांगायचे कारण की, नेमकी हीच अवस्था पुरोगामी, सामाजिक, विवेकी चळवळीतील लोकांची झालेली दिसत आहे. तोही अस्वस्थ होत आहे. ज्या कुंपणांमुळे माणूस माणसापासून दूर होत चालला आहे ती कुंपणे तितक्याच वेगाने तोडण्याचा प्रयत्न करत आहे.

पुढे वाचा

`हैदर’ आणि `डॉ. प्रकाश बाबा आमटे’

सुप्रसिध्द दिग्दर्शक विशाल भारव्दाज यांचा `हैदर’ आणि `समृद्धी’ पोरे यांचा `डॉ. प्रकाश बाबा आमटे’ हे चित्रपट आपल्या समाजापुढील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पुढे आणतात. जरी या चित्रपटांचा हेतू वेगळा असला तरी या चित्रपटांतून या विषयांची मांडणी अतिशय समर्थपणे पुढे येते. एक विषय काश्मीरमधील दहशतवादाचा, जो हैदरमध्ये हाताळला आहे. तर दुसरा नक्षलवादाचा, जो डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात हाताळला आहे. वर म्हटल्याप्रमाणे हे विषय या चित्रपटांचे मूळ विषय नाहीत. पण चित्रपटाच्या मुख्य विषयांच्या अनुषंगाने हे विषय अपरिहार्यपणे या चित्रपटात दाखल झाले आहेत आणि या प्रश्नांमुळेच या चित्रपटांना गांभीर्य आणि खोली प्राप्त झालेली आहे.

पुढे वाचा

स्वच्छता अभियान: गांधी, मोदी आणि लेनिन

जातिव्यवस्थेने व्यवसाय स्वातंत्र्य नाकारून प्रत्येक व्यवसायासाठी एक स्वतंत्र जात निर्माण केली. जिने जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्या जातीला ठरवून दिलेलेच काम केले पाहिजे असा दंडक घातला गेला. या व्यवस्थेनुसार सर्वात घाणेरडे काम, म्हणजे साफसफाईचे काम आणि तिन्ही वरच्या वर्णाच्या लोकांची सेवा करण्याचे काम शूद्र समजल्या जाणाऱ्या जातींवर सोपवण्यात आले. अशा प्रकारे स्वच्छतेची जबाबदारी अतिशूद्रांवर ज्यांना आपण अस्पृश्य जाती म्हणतो त्यांच्यावर सोपवून सगळ्या वरच्या जातींचा समाज निर्धास्त झाला. त्यामुळे `स्वच्छता’ हे आपले काम नाही. थे अमुक, अमुक जातींचे आहे ही मानसिकता आजतागायत रूजली गेली आहे.

पुढे वाचा

जातींची उपपत्ती : एक उपसिद्धान्त

जाती कश्या निर्माण झाल्या ह्याविषयी काही मते मांडली गेली आहेत आणि बहुतेकांची मते मनुस्मृती आणि तत्पूर्वी लिहिले गेलेले पुरुषसूक्त ह्यापलीकडे गेलेली नाहीत. मनुस्मृतीची भाषा पाहिली तर ती अर्वाचीन आहे. तिची रचना छंदोबद्ध आणि व्याकरण पाणिनीय आहे. त्यामुळे तिचा काळ फार प्राचीन असू शकत नाही. मनुस्मृति हा ग्रंथसुद्धा कोणा एका ‘मनु’ नावाच्या ब्राह्मणाने रचला असण्याची शक्यता नाही. मनु हे नाव कोणी मानवांचा आदिपुरुष कल्पून त्याला दिले आहे असे जाणवते. मानवाचा आदिपुरुष कोण? मनु. म्हणून मनूचे ते मानव. मनुस्मृति ह्या ग्रंथात त्या काळात प्रचलित असलेल्या समजुतींचा संग्रह आहे, असे म्हणायला पुष्कळ वाव आहे.

पुढे वाचा

पाचवा धर्म, धर्मनिरपेक्षता आणि त्यामधून उद्भवणारे काही प्रश्न

प्रस्तुत लेखाच्या प्रारंभी हिन्दू कोण नाही असा प्रश्न मी उपस्थित केला आहे. कारण हिन्दू कोण नाही हे नक्की ठरल्याशिवाय अल्पसंख्याक कोण व बहुसंख्याक कोण ह्याचा, त्याचप्रमाणे कोण कोणाचा अपमान करीत आहे ह्याही प्रश्नांचा उलगडा होत नाही. माझ्या मते कोणीच बहुसंख्याक नाहीत व त्यांचा अपमानही होत नाही. ‘तुमचा, तुम्ही बहुसंख्याक असून अपमान होत आहे’ अशी एक हूल उठवून गेली आहे व त्या आवईला आमचे भाबडे देशबान्धव बळी पडत आहेत.

हिन्दू कोण नाही हिन्दू कोण नाही असा मला पडलेला प्रश्न मी पुढे एका पद्धतीने सोडवून अशी दाखवीत आहे.

पुढे वाचा

जातिव्यवस्था आणि न्यूनगंड

भारतीय समाजामध्ये जातिव्यवस्था खूप खोलवर रुजली आहे. त्याचे दूरगामी परिणाम आपल्या व्यावहारिक जगण्यावर तसेच मानसिकतेवरही झाले याहेत. जातिनिर्मूलनाचे अनेक प्रयत्न व चळवळी ह्या देशात झाल्या, त्याने थोडाफार फरक पडला, पण निर्मूलन झाले नाही. इतकेच नव्हे तर सामाजिक परिवर्तनासाठी ज्या ज्या संघटना उभारण्यात आल्या, त्यांचे स्वरूप वरकरणी जरी जातिभेद न मानणारे दिसत असले, तरी जातिव्यवस्थेने घडविलेल्या मानसिकतेतूनच त्या मुळातून काम करीत असतात. ह्या मानसिकतेचे एक व्यक्त रूप म्हणजे तथाकथित खालच्या जातींना येणारा न्यूनगंड. ह्या न्यूनगंडाची कारणमीमांसा व परिणाम आपण ह्या लेखात पाहणार आहोत.

पुढे वाचा

पाचवा धर्म, धर्मनिरपेक्षता आणि त्यातून उद्भवणारे काही प्रश्न

मागच्या लेखात धर्म आणि धर्मनिरपेक्षता ह्यांविषयी हिन्दुनेतृत्व काय म्हणते आणि त्यांनी केलेल्या कृतीमध्ये कशी विसंगती निर्माण होते ते आपण पाहिले. ह्या लेखामध्ये त्यांच्या व्याख्येमध्ये मला बुचकळ्यात पाडणारे आणखी अनेक शब्द आहेत त्यांच्या विचार करावयाचा आहे, तसेच पूर्वीच्या लेखात ज्यांचा परामर्श घेता आला नाही असे मुद्दे विचारार्थ घ्यावयाचे आहेत व थोडे मागच्या लेखातील मुद्द्यांचे स्पष्टीकरणही करावयाचे आहे.

मला वाटते, हिन्दुनेतृत्वाच्या हिन्दूंच्या व्याख्येमुळे हिन्दु कोण आहे ते पुष्कळसे स्पष्ट होते, पण हिन्दु कोण नाही हा प्रश्न थोडा संदिग्ध राहतो. हिन्दुसंस्कृतीविषयी अभिमान ही हिन्दु होण्यासाठी असलेली अट कधीकधी शिथिल झाल्यासारखे मला जाणवते, आणि मग हिन्दु कोण नाही ते ठरविणे मला कठीण जाते.

पुढे वाचा

पाचवा धर्म, धर्मनिरपेक्षता, आणि त्यांमधून उद्भवणारे काही प्रश्न

नुकताच 16 मे रोजी निवडक निकाल जाहीर होऊन भारताची सोळावी लोकसभा सत्तेवर आली. भारतीय जनता पक्षाला निर्विवाद बहुमत मिळून तो निवडून आला. कोणत्याही एका पक्षाला इतके स्पष्ट बहुमत अनेक वर्षांनी मिळाले असेल. भारतासारख्या अनेक धर्मांचे नागरिक राहत असलेल्या आणि निधर्मी संविधान असलेल्या राज्यात तर हे प्रथमच घडले आहे. हे कशामुळे घडून आले व राजकीय परिप्रेक्ष्यात ह्याचा अर्थ काय होतो वगैरेबद्दल प्रसार माध्यमांमध्ये अनेक ठिकाणी लिहिले – बोलले वर्षात गेलेले आहे. आम्हाला मात्र त्यावरून आजचा सुधारक च्या दुसऱ्या 1991 मध्ये प्रकाशित झालेल्या दिवाकर मोहनी ह्यांच्या लेखाची आठवण झाली.

पुढे वाचा

पुरोहित राजा आणि राजधर्म

आज (२३ एप्रिल २०१४) सर्व पत्रपंडित आणि ‘पोल’पंडित एकमुखाने सांगत आहेत की येत्या १६ मे रोजी नरेंद्र मोदी यांना भारताच्या पंतप्रधानपदाची वस्त्रे मिळतील. मतभेद असलेच तर भाजपचे संख्याबळ, सरकार बनवण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून व आघाडीबाहेरून किती मदत लागेल, त्या मदतीसाठी काय मोल द्यावे लागेल, वगैरे तपशिलाबाबत आहेत.
इथपर्यंत पोचण्यासाठी मोदी, त्यांचा पक्ष भाजपा, त्यांचे ‘माहेर’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, या सर्वांनी गेले सहा महिने मोदींची जनमानसातील प्रतिमा बदलण्याचा चंग बांधला आहे. संघ प्रचारक, कट्टर हिंदुत्ववादी, तितकेच कट्टर मुसलमानद्वेष्टे, ही मोदींची प्रतिमा पुसून एक सेक्युलर विकासपुरुष अशी प्रतिमा रेखण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे.

पुढे वाचा