(तार्किकीय ज्ञान)
अनुमान शेवटी प्रत्यक्षावर म्हणजे ऐंद्रिय अनुभवावर आधारलेले असते हे आपण गेल्या लेखात पाहिले. जगात कुठे काय आहे, किंवा कुठे काय केव्हा घडले याचे ज्ञान आपल्याला प्रत्यक्षाशिवाय होऊ शकत नाही. अमुक दिवशी सहा महिन्यानंतर सूर्यग्रहण होईल हे आपणअनुमानाने सांगू शकतो. पण या अनुमानात वापरायची साधके शेवटी इंद्रियांनी झालेल्या सामग्रीवरच आधारलेली असतात. अनुमान हे प्रत्यक्षाहून भिन्न असे ज्ञानसाधन असले आणि ते अतिशय महत्त्वाचे असले, तरी ते स्वतंत्र प्रमाण नाही हे मान्य केले पाहिजे.
परंतु असेही काही ज्ञान आहे की जे शुद्ध तार्किकीय ज्ञान आहे.