विषय «पत्र-पत्रोत्तरे»

पत्रव्यवहार

श्री दिवाकर मोहनींचे पत्रांना उत्तर
संपादक,
नवा सुधारक यांस,
सप्रेम नमस्कार
आपल्या ३ मे च्या अंकात माझ्या पत्राला उत्तरादाखल आलेली तीन पत्रे प्रकाशित झाली आहेत. डॉ. न. ब. पाटील, प्रा. म. ना. लोही, प्राचार्य ना. वि. करबेलकर, श्री. राम वैद्य आणि डॉ. विजय काकडे आदींनी मोठी पत्रोत्तरे पाठविली आहेत. त्याशिवाय श्री. वसंत कानेटकर, श्री. यदुनाथ थत्ते इत्यादींनीही आपापल्या प्रतिक्रिया कळविल्या आहेत. ती पत्रे आपण माझ्याकडे पाठविल्याबद्दल मी आपला आभारी आहे. पहिली गोष्ट अशी की कोठल्याही पूर्वग्रहाशिवाय ह्या प्रश्नाकडे बघितले जावे ह्यासाठीच मी माझे पत्र एखाद्या धर्माच्या कैवारी वृत्तपत्राला न लिहिता आपणांस लिहिले आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री. मोहनींच्या पत्रावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याची इच्छा आहे. ‘हिंदू असणे’ आणि ‘धार्मिक’ असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. खुद्द शंकराचार्यांनाही ‘प्रच्छन्न बौद्ध’ म्हटले गेले. (बुद्ध हा तर’ निरीश्वरवादी’आणि ‘आत्मा’ न मानणारा होता.) तरीही ते ‘हिंदू ‘च होते. ही सहिष्णुता हिंदुधर्मीयांशिवाय अन्यत्र कोठे दिसते?
‘हिंदू-मुसलमानांचे दंगे’ आणि ‘धर्म – त्यांतही वैदिक धर्म आणि विज्ञान’ यांतील वाद या वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांची गल्लत करण्यात अर्थ नाही.
हिंदू समाजात मी जन्मलो, घडलो, वाढलो म्हणून बर्‍या वाईट गोष्टींसह मी हिंदृच आहे. त्याबद्दल खंत कशासाठी?
ईश्वरविषयक ‘भाविकता’ ही आणखी एक वेगळीच ‘मनोव्यथा’?

पुढे वाचा

पत्रव्यवहार

सुधारकांचा सोवळेपणा?
‘नवा-सुधारका’च्या प्रकाशन समारंभी जी भाषणे झाली ती सर्व मननीय होती. पण एक गोष्ट खटकली, ती अशी: प्रा. दि. य. देशपांडे ‘नवा-सुधारक’च्या धोरणाबद्दल खुलासा करताना असे म्हणाले की, “आगरकरांच्या ‘सुधारका’चा ‘नवा सुधारक’ हा नवीन अवतार आहे. आमच्या नावावरूनच आमचे धोरण स्पष्ट व्हावे इ.” त्यानंतर मुख्य वक्ते प्रा. य. दि. फडके आपल्या भाषणात असे म्हणाले की, “अवतार हा शब्द मला आवडत नाही.” पुढे कै. श्रीमती मनुताईंच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “आगरकर हे जणू मनुताईंचे दैवत होते, पण विवेकवाद्याला दैवत नसते.” ते असेही म्हणाले की, “विवेकवादी बहुधा नास्तिक असतात, नाहीतर अज्ञेयवादी तरी असतात.”

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री. संपादक नवा सुधारक यांस स. न. वि. वि.
पुष्कळ दिवसांपासून माझ्या मनात एक प्रश्न घोळत आहे. त्या बाबतीत आपले मार्गदर्शन मिळावे ही विनंती. आपणांस इष्ट वाटेल तर ह्या प्रश्नाची आपण आपल्या नवीन मासिकातून प्रकट चर्चा करावी. त्यामुळे कदाचित इतर जिज्ञासूंनासुद्धा लाभ होईल. प्रश्न हिन्दू म्हणून माझी कर्तव्ये काय असा आहे.

मी जन्मतः वा परंपरेने हिन्दू आहे. हे हिन्दुत्व मी जसे विधिपूर्वक स्वीकारले नाही तसेच मी त्याचा विधिवत.त्यागही केलेला नाही; तसेच मी केवळ वेदोक्त धर्माचे पालन करणारा स्वामी दयानन्दानुयायी आर्यसमाजीही नाही.

पुढे वाचा