विषय «पत्र-पत्रोत्तरे»

पत्रव्यवहार

संपादक आजचा सुधारक यांस, स. न. वि. वि.
श्री. प्रमोद सहस्रबुद्धे यांनी ‘मनस्मृती व विवेक’ (आजचा सुधारक, फेब्रु. ९४) या लेखात म्हटले आहे त्याप्रमाणे मनुस्मृतीचा त्याग करणे जेवढे महत्त्वाचे तेवढेच तिचा विसर न पडू देणे हेही महत्त्वाचे, कारण तिच्यासंबधीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन पुनरुज्जीवनवादी शक्ती तिच्या समर्थनार्थ पुढे येत राहतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, पण त्याकडे बऱ्याच सुधारणावादी लोकांचे पुरेसे लक्ष जात नाही. हिटलरच्या जर्मनीचा विसर पडू न देण्याचा इझराएल व अनेक यहुदी संस्था यांचा जसा सारखा प्रयत्न असतो तसा काही प्रमाणात तरी आपणही मनुस्मृतीबाबत दृष्टिकोन ठेवायला हरकत नाही.

पुढे वाचा

प्रा. श्रीनिवास दीक्षित यांना उत्तर

प्रा. दीक्षितांनी ‘विज्ञानाला उद्गामी विज्ञान म्हणतात’ या माझ्या वाक्यातील एका अडचणीवर बोट ठेवले आहे. ते वाक्य विश्लेषकही आहे आणि संश्लेषकही आहे असे म्हणावे लागेल ही ती अडचण. प्रा. दीक्षितांचे म्हणणे मला स्थूलपणे मान्य आहे. माझ्या नीतिशास्त्राचे प्रश्न या पुस्तकात त्यांना अभिप्रेत असलेला भेद मी केला आहे. परंतु खरे म्हणजे खुद्द इंग्रजीत (आणि मला वाटते जर्मन भाषेतही) ‘Science’ या शब्दाचा उपयोग अजून बराच शिथिल आहे. उदा. द्वाकच्या तर्कशास्त्रावरील एका पुस्तकाचे नाव ‘Introduc- tion to Logic and the Methodology of Deductive Sciences’ असे आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

आजचा सुधारकच्या चौथ्या वर्षाच्या पहिल्या व दुसऱ्या (एप्रिल-मे १९९३) जोड अंकाच्या संपादकीयातील मला महत्त्वाची वाटलेली वाक्ये उद्धृत करून त्यांना अनुलक्षून मी काही सूचना करू इच्छितो. ही वाक्ये अशी- “बालमृत्यू घडवून आणणाऱ्या कारणांना न सुदृढ होत जुमानता आजचा सुधारक ज्या चिवटपणाने उभा आहे त्यावरून हे बाळ असेच जाईल आणि दीर्घायुषी होईल असा विश्वास आम्हाला वाटतो आहे. परंतु ते अजून स्वावलंबी होण्याइतके सुदृढ झालेले नाही हेही सांगितलेच पाहिजे.”

(अ) मासिकात प्रसिद्ध होणाऱ्या मजकुराविषयीच्या सूचना

१) कोणताही लेख जास्तीत जास्त एक हजार शब्दांचा म्हणजे मासिकाच्या तीन पानांइतकाच राहील याची सर्व लेखकांनी कटाक्षाने काळजी घेतली पाहिजे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

मा. संपादक, आजचा सुधारक, नागपूर. स.न.वि.वि.
आजचा सुधारक मध्ये आपण लिहिलेले विवेकवादावरील लेख, माझ्या पत्रांना व इतरही व्यक्तींच्या (उदा. दाभोलकर) प्रतिक्रियांना आपण दिलेली उत्तरे यांमुळे माझे समाधान झाले नाही. म्हणून पुन्हा हा पत्र लिहिण्याचा उपद्व्याप करीत आहे.
१. विवेकवाद्यांच्या मतानुसार “विश्वाचे ज्ञान मिळवण्याचे वैज्ञानिक पद्धतीहून अन्य साधन मानवाजवळ नाही असा विज्ञानाचा दावा आहे.” (आजचा सुधारकनोव्हेंबर १९९०). मी स्वतः विज्ञानाशी संबंधित शाखेचा स्नातक आहे व असा दावा विज्ञानाने वा वैज्ञानिकाने केल्याचे माझ्या तरी वाचनात आले नाही. पत्रलेखकाच्या प्रत्येक विधानास संदर्भ मागणाऱ्या देशपांडेसाहेबांनी कृपया याचा एखादा संदर्भ असेल तर तो उद्धृत करावा.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री. प्र. ब. कुळकर्णी यांसी
स.न.वि.वि.
ऑगस्ट १९९३ (आजचा सुधारक) च्या अंकात ‘रक्तपहाट’ ह्या पुस्तकावरील आपले परीक्षण वाचले. ह्यांतील काही उद्धरणे खालीलप्रमाणे आहेत:
तळवलकर म्हणतात, ‘पं. नेहरू वेगळ्या त-हेने (रीतीने) तत्त्वभ्रान्त होते. धर्माच्या प्रेरणेचा प्रभाव पाकिस्तान अव्यवहार्य ठरविण्यासाठी विचारात घेतला नाही. लोकसंख्येची पद्धतशीर अदलाबदल झाली असती तर जिनांना आणखी चार कोटी मुसलमानांचा भार सहन करावा लागला असता. पण नेहरूंनी विरोध का करावा ? त्यांचा पाकिस्तानच्या संबंधातला तत्त्वभ्रान्तपणा या रीतीने पुन्हा एकदा प्रकट झाला. तात्पर्य राजकारण्यांच्या सत्तालोभाने आणि वार्धक्यातील टुबळेपणाने त्यांनी जो उतावळेपणा केला तो केला नसता तर हिंदुमुसलमान प्रजेची प्राणहानि टळली असती.’

पुढे वाचा

चर्चा

श्री. मा. श्री. रिसबूड यांना उत्तर
स.न.
आपले दि. १५-७ चे पत्र आणि आपले पुस्तक ‘फलज्योतिष दोन्ही मिळाली. त्याबद्दल आभारी आहे.
आधी आपल्या पत्राला उत्तर देतो, मग आपल्या पुस्तकातील ‘बुद्धिवादाचा एक पंथ होऊ नये या परिशिष्टाविषयी लिहितो.
प्रथम विवेकवाद्याच्या तोंडी आपण जो युक्तिवाद घातला आहे त्यात थोडी दुरुस्ती सुचवितो.
आपण म्हणता की ‘सृष्टीचे आदिकारण म्हणजे एक अज्ञेय अशी शक्ति हा आजच्या घटकेला तरी दुर्भेद्य स्तर आहे. यावर माझे म्हणणे पुढीलप्रमाणे आहे असे आपण म्हणता. ‘त्या दुर्भेद्य स्तरापर्यंत जायचेच कशाला? थोडे आधीच थांबावे, म्हणजे सृष्टीला आदिकारण नसून हे सर्व आपोआप चालले आहे असे मानावे.’

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक , आजचा सुधारक,
स.न.वि.वि.
भारतातून जे लोक अमेरिकेला जातात त्यांच्याबद्दल एक गोष्ट प्रकर्षाने मला फार जाणवते, ती अशी की हे सर्वजण उच्च शिक्षित आहेत. ते हुशार आहेत. ते ज्या काळांत उच्च शिक्षित झाले त्या काळांत कॅपिटेशन फीची कॉलेजेस् नव्हती.
साहजिकच हे सर्वजण शासकीय शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षित झाले. तेथे शुल्क अत्यल्पच होते. त्या शुल्कामधून मिळणाऱ्या पैशातून कोणतीही शिक्षणसंस्था चालविता येणार नाही. साहजिकच ह्या उच्च शिक्षणाच्या संस्था सरकारी अनुदानावर चालविण्यात येतात. जे. जे., के. ई. एम. किंवा पवईचे आय. आय. टी.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

प्रा. दि.य. देशपांडे यांस, स.न.
आपले दि. ३ मार्चचे पत्र पोचले. त्यापूर्वीच एक आठवडा आजचा सुधारकच्या जास्तीच्या प्रती मिळाल्या होत्या व मी त्या काही निवडक मंडळींना माझ्या पत्रासह पाठविल्याही होत्या. सोबत त्या पत्राची प्रत आपणास माहितीसाठी पाठवीत आहे. त्यांपैकी दोघांचा (नरेन तांबे व ललिता गंडभीर) वर्गणी पाठवीत असल्याबद्दल फोन आला. (एकाचे ‘माझा आजकाल अशा लेखनाचा समाजावर काही परिणाम होऊ शकतो यावरचा विश्वास उडाला आहे’ असेही नकारात्मक पत्र आले.) आणखीही काही जणांकडून वार्षिक वर्गणी निश्चितच येईल असे वाटते. मध्यंतरी काही कामामुळे ‘बृहन्महाराष्ट्रवृत्तासाठी अर्धवट लिहून ठेवलेला मजकूर पूर्ण करून पाठविणे जमले नाही, ते या महिन्यात पूर्ण करीन.

पुढे वाचा

निसर्ग आणि मानव – परिसंवाद

निसर्ग आणि मानव – परिसंवाद
साधना साप्ताहिकाच्या १८ जुलै १९९२ च्या अंकात श्री. ना. ग. गोरे यांचा ‘निसर्ग आणि मानव हा लेख प्रसिद्ध झाला. त्यात गांधीवादी पर्यावरणविचाराविषयी काही प्रतिकूल मते व्यक्त केली होती. त्या लेखाला २९ ऑगस्ट ९२ च्या साधनेत श्री वसंत पळशीकर यांनी उत्तर दिले. या उत्तराला मी साधनेत (नोव्हेंबर ९२) दिलेले उत्तर आजचा सुधारक (नोव्हेंबर-डिसेंबर १९९२) मध्ये पुनर्मुद्रित झाले. या लेखावर दोन प्रतिक्रिया आमच्याकडे आल्या आहेत. एक आहे प्रा. सु.श्री. पांढरीपांडे यांची, आणि दुसरी अर्थात् श्री. पळशीकरांची. या दोन्ही प्रतिक्रियांचे प्रतिपादन असे आहे की ज्या विज्ञानाच्या आधारे मी श्री पळशीकरांना उत्तर दिले होते ते विज्ञान आता जुने झाले असून, आज वैज्ञानिक पद्धतीचा एक नवाच आदर्श (paradigm) निर्माण झाला आहे, आणि त्यानुसार माझे म्हणणे आता जुने आणि कालबाह्य झाले आहे.

पुढे वाचा

चर्चा- डॉ. के. रा. जोशी यांना उत्तर

डॉ. के. रा. जोशी यांच्या मूळ आक्षेपांना दिलेले माझे उत्तर त्यांना पटलेले नाही. आणि त्यांनी अनेक आक्षेप घेणारा एक लेख पाठविला आहे. त्याला यथामति उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.
त्यांचा पहिला आक्षेप असा आहे मी कांट आणि उपयोगितावाद यांची सांगड घालण्याच्या केलेल्या प्रयत्नावर. ते म्हणतात की त्या दोन उपपत्ती तमःप्रकाशवत् परस्परविरुद्ध असून त्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करणारा एकही नीतिमीमांसक झाला नाही. हे त्यांचे म्हणणे मान्य केले तरी त्यावरून असा समन्वय कोणाला जमणारच नाही असे सिद्ध होत नाही. निदान त्यांनी माझ्या प्रयत्नात काय दोष आहे ते सांगायला हवे होते.

पुढे वाचा