विषय «विज्ञान»

वेगाची संस्कृती आणि मानसिक थकवा

रोहन आणि सानिका दोघे दोन वेगवेगळ्या खंडात राहून आपापले करिअर आणि त्यांचे दूरस्थ वैवाहिक जीवन सांभाळत होते. पण एक दिवस त्यांनी समन्वयाने घटस्फोट घ्यायचे ठरवून सुटकेचा श्वास घेतला. 

पुण्यात शिकायला आला एका छोट्या गावातून. नवीन भाषा, नवीन जीवनशैली, गतिमान वाहतूक ह्यांच्याशी जुळवून घेता घेता आता फ्लॅट घेतलाय, ज्याचा EMI भरतोय; पण गावाकडे मागे सोडलेले घर आठवून मन उदास होते. असा हा “महादेव” हल्ली नाव फक्त “देव” सांगतो – कारण सुटसुटीत आणि कूल आहे ते. 

नाईक आजीआजोबा आताच कॅनडामधून मुलीच्या मुलाला सहा महिने सांभाळून परत आलेत.

पुढे वाचा

विज्ञान – एक अनंत कथा

आपण गोष्टी ऐकत लहानाचे मोठे होतो. इसापनीती, रामायण, महाभारत, टारझन ह्यांसारख्या कथांमधून आपले बालपण फुलत जाते. लहानपणीच्या संस्कारामुळे पुढील आयुष्यात आपण गोष्टवेडे (Gossip Lover) होतो. कोणत्याही वयात रहस्यकथा, भयकथा, प्रेमकथा व विज्ञानकथा वाचाव्याश्या वाटतात. टीव्हीवर कौटुंबिक मालिकांमध्ये सासू-सून भांडणे, प्रेम-द्वेष चक्र, हास्यविनोद ह्यांचा मसाला वापरून मालिकांचे भाग वाढवले जातात. ‘चार दिवस सासूचे’ ही मालिका ३१४७ भागांपर्यंत चालली. रामायण चालू असताना रस्ते ओस पडत. आयपीएल ही क्रिकेटमालिका कथांसारखीच लोकप्रिय झाली आहे. हे सर्व कथाप्रकाराच्या यशाचे नमुने आहेत.

आपल्या जगण्याचा मोठा काळ कल्पित कथांमध्ये रमण्यात जातो.

पुढे वाचा

जिज्ञासा म्हणजे नेमके काय?

जिज्ञासा ही मानवी मेंदूची सर्वांत मूलभूत, परंतु अत्यंत गुंतागुंतीची आणि उत्क्रांतीदृष्ट्या अत्यावश्यक अशी प्रवृत्ती मानली जाते. माणूस हा केवळ जगण्यासाठी लढणारा प्राणी नाही तर स्वतःला आणि विश्वाला समजून घेण्यासाठी सतत धडपडणारा जीव आहे. ‘जिज्ञासा’ ह्या शब्दाचा अर्थ जरी भाषिक पातळीवर जिद्द, ज्ञान आणि साहस ह्यांची एकत्रित अभिव्यक्ति वाटत असला, तरी मेंदूविज्ञान, संज्ञानशास्त्र, उत्क्रांतिविज्ञान आणि मानसशास्त्र ह्यांच्या चौकटीतून पाहिल्यास ती एक बहुआयामी, जैविक, सामाजिक, आणि सांस्कृतिक यंत्रणा आहे. ही यंत्रणा मेंदूच्या रचनेशी, माहितीप्रक्रियेशी, बक्षीसप्रणालीशी आणि जगण्याच्या रणनीतीशी घनिष्ठपणे जोडलेली आहे. जरी व्युत्पत्तीशास्त्रीयदृष्ट्या हा शब्द जिज्ञा (ज्ञात करू इच्छितो) ह्या धातूपासून निर्माण झाला असला, तरी त्यात जिद्दीचा आग्रह, ज्ञानाची भूक आणि साहसाची तयारी हे तीनही भावार्थ अंतर्भूत होतात.

पुढे वाचा

मेंढा लेखा: जैव-सामाजिक प्रणाली विज्ञानाचा उत्कृष्ट नमुना!

मुख्य शब्द: जैव-सामाजिक प्रणाली (social-ecological system), बहुकेन्द्रित शासन (polycentric governance), अनुकूलन क्षमता (adaptation), स्वसंघटन (self-organization), संश्लेषण (synthesis), तंत्रविचार (systems thinking), एलिनोर ओस्ट्रॉम, Tragedy of Commons, सह-उत्क्रांती (coevolution), Panarchy, Anthropocene.

प्रस्तावना आणि विषय प्रवेश
गडचिरोलीतील मेंढा-लेखा गावात झालेला ग्रामस्वराज्याचा विलक्षण प्रयोग, आणि एकंदरच विकेंद्रीकरणाच्या धोरणांमुळे जेव्हा माणसांच्या समूहांमध्ये स्व-संघटन[A] होऊन काहीतरी नव-सर्जन घडते, ते बघून मानवी मन सुखावते, आनंदी होते. असे सर्जन बघून मन का सुखावते? गोष्ट मेंढा गावाची[1] ह्या पुस्तकात मिलिंद बोकील लिहितात – “विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने प्रगती झाली असली तरी मानवी जीवन स्वस्थ आणि सुरक्षित नाही.

पुढे वाचा

वैज्ञानिक अभ्यासपद्धती

रूढ अर्थाने प्रयोग आणि/किंवा निरीक्षणावर आधारित केलेला अभ्यास हा वैज्ञानिक अभ्यास म्हणता येईल. अशा अभ्यासात एक शिस्त असावी लागते. निरीक्षणे घेणारा वा प्रयोग करणारा हा कोणताही पूर्वग्रह न ठेवता प्रामाणिकपणे व तटस्थ राहून निरीक्षणे घेणारा असावा ही अशा अभ्यासाची पूर्व अट आहे. तरीदेखील या निरीक्षणांकडे कायम कठोर संशयवृत्तीने (scepticism) बघितल्या जाते; कारण मानवी आकलन आणि दृष्टिकोण हे बहुदा पूर्वग्रहयुक्त असतात. याहून महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारे घेतलेली निरीक्षणे वा प्रयोगातील अनुभव यांच्या नोंदी इतरांना समजतील अश्या रीतीने ठेवाव्यात जेणेकरून दुसऱ्या अभ्यासकाला कामाची पुनरावृत्ती करून पूर्वी घेतलेल्या निरीक्षणाची वा अनुभवाची सत्यासत्यता तपासून पाहता येईल.

पुढे वाचा

मैं और मेरी नास्तिकता

मैँ बहुत आभारी हूं कि आप लोगों ने मुझे यहां, इस जलसे में बुलाया. यहां आकर मुझे बहुत खुशी है कि इतने अंधेरे में भी लोग दीये जलाये हुए हैं.  और गम इस बात का है कि २१वीं सदी में नास्तिकता पर चर्चा हो रही है. एक ऐसा विषय जिसका फैसला १८वीं सदी में ही हो जाना चाहिए था. सच्ची बात तो यह है कि नास्तिकता तो ऐसी होनी चाहिए थी, जैसे ऑक्सीजन. हम सांस लेते हैं, तो सोचते थोड़े हैं कि हम सांस में ऑक्सीजन ले रहे हैं.

पुढे वाचा

नास्तिकता कशासाठी?

आस्तिकता आणि नास्तिकता ह्या दोन स्वतंत्र विचारधारा आहेत. आपल्या आजूबाजूच्या समाजातील माणसे काही प्रमाणात आस्तिक तर काही प्रमाणात नास्तिक असतात. पण उघडपणे आपण आस्तिक आहोत असे सांगणाऱ्यांपेक्षा नास्तिक आहोत असे सांगणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे. ज्यांची धर्मग्रंथ, श्रुती-स्मृती, मंत्रसंहिता, उपनिषदे ह्यांवर परमश्रद्धा आहे आणि ज्यांना वेदाच्या दिव्यतेबाबत आस्था आहे अशांना आस्तिक म्हणतात. तर ज्यांचा वेदावर विश्वास नाही, जे वैदिक सिद्धांताबाबत तर्क-वितर्क करतात किंवा धर्मग्रंथांची चिकित्सा करतात ते नास्तिक आहेत. मात्र नास्तिकता म्हणजे एवढेच असे नव्हे. नास्तिकता म्हणजे विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी चिकित्सक दृष्टिकोन होय.

पुढे वाचा

कृत्रिम बुद्धिमत्तेचा आईन्स्टाईन

आज ताऱ्यांचे आणि तारकाविश्वांचे वर्गीकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाते आहे. जनुकांमधील DNA च्या घटकक्रमानुसार कुठल्या आकाराची प्रथिने बनतील हे कृत्रिम बुद्धिमत्ता शोधते आहे. जगभरातील हवामानखात्यांच्या उपकरणांकडून, उपग्रहांकडून मिळणाऱ्या प्रचंड माहितीच्या आधारे हवामानाचा अंदाज बांधण्याचे काम कृत्रिम बुद्धिमत्ता करते आहे. ड्रोनने, उपग्रहांनी घेतलेल्या हजारो छायाचित्रांच्या आधारे स्थलांतर करणारे पक्षी, प्राणी यांच्या गणनेचे काम कृत्रिम बुद्धिमत्ता करते आहे. आकाशगंगेतील परग्रहांचे वर्गीकरण कृत्रिम बुद्धिमत्ता करते आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि त्याची क्षमता दिवसागणिक वाढते आहे. उद्याचा डार्विन किंवा आईन्स्टाईन कृत्रिम बुद्धिमत्तेचा असेल का?

पुढे वाचा

नैनान् विसंगतयः छिन्दति कुंभोजकर

पुणे येथे १८ डिसेंबर २०२२ ला ‘ब्राईट्स सोसायटी’तर्फे आयोजित नास्तिक परिषदेच्या निमित्ताने हरिहर कुंभोजकर यांनी लिहिलेल्या लेखावर मी दिलेल्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया म्हणून लेख लिहिल्याबद्दल कुंभोजकरांचे आभार. मी कुंभोजकरांचे किंवा कुंभोजकर माझे मतपरिवर्तन करू शकतील अशी फारशी आशा माझ्या मनात नाही. त्यामुळे, ‘आजचा सुधारक’च्या वाचकांचे मतपरिवर्तन करणे (किंवा, जे आधीच आपल्या विचारांशी अनुकूल आहेत त्यांचे मत प्रतिपक्षाकडे वळण्यापासून वाचवणे) हाच आम्हा दोघांच्या प्रयासांचा मुख्य उद्देश असू शकतो, तो खासगी चर्चेने साध्य होणारा नाही.

प्रसिद्धीसाठी आलेल्या लेखांवर प्रकाशनपूर्व प्रतिक्रिया मिळवून ती लेखासोबतच छापणे हे ‘आजचा सुधारक’मध्ये नवे नाही.

पुढे वाचा

श्री. जोशींना दिसलेल्या विसंगतींचे पोस्ट-मॉर्टम

निखिल जोशी ह्यांनी माझ्या लेखाची इतकी सविस्तर दखल घेतली याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. त्यांचे उत्तर माझ्या लेखाबरोबरच प्रसिद्ध झाले याचा अर्थ माझा लेख प्रसिद्धीपूर्वीच त्यांना उपलब्ध झाला होता हे उघड आहे. लेखाच्या शेवटी माझा फोन नंबर आणि ई-मेल ID असल्याने त्यांनी माझ्याशी संपर्क साधला असता तर अधिक सविस्तर चर्चा होऊ शकली असती. त्यांच्या लेखाचे स्वरूपही काहीसे वेगळे झाले असते. कदाचित, त्यानंतर त्यांना आपले उत्तर लिहिण्याची आवश्यकताही भासली नसती. माझेही काही श्रम वाचले असते. पण झाले ते एका अर्थाने फार चांगले झाले.

पुढे वाचा