देव ताओवादी आहे का?
रेमंड स्मल्यन (Raymond Smullyan) याच्या ‘द ताओ इज सायलंट’ ह्या पुस्तकातील ‘इज गॉड अ ताओइस्ट?’ हा संवाद हाफस्टाटर आणि डेनेट यांनी संपादित केलेल्या The Mind’s I या पुस्तकात उद्धृत केला आहे. या संवादाचे हे स्वैर व बोली भाषेतील मराठी रूपांतर आहे.
मानव : म्हणून म्हणतो, परमेश्वरा, तू जर खरोखरच कृपाळू असशील तर मला इच्छास्वातंत्र्याच्या शक्तीतून मुक्त कर.
देव : काय, मी दिलेली सर्वात मोठी देणगी तू नाकारतोस?
मानव : जबरदस्तीने दिलेली ‘देणगी’ कशी होईल? मला इच्छास्वातंत्र्य आहे, पण माझ्या इच्छेमुळे नव्हे.