नमस्कार मित्रांनो. आज या नास्तिक परिषदेसाठी तुम्ही मला आमंत्रण दिले, याबद्दल धन्यवाद. हा माझा व्यक्तिगत सन्मान नाही, तर हा मला आमच्या चळवळीचा सन्मान वाटतो. गेली अनेक वर्षे जवळजवळ ८० संस्थांचे मिळून FIRA हे संघटन आम्ही चालवतो आहोत. या माध्यमातून आम्ही खूप लोकांपर्यंत पोहोचतो. त्या कामाचाच हा सन्मान आहे असे मी समजतो.
मी गेले ६० वर्षांपासून नास्तिक आहे. मी नास्तिक म्हणून दोनदा जन्माला आलो. जन्माला येणारं प्रत्येक मूल नास्तिक म्हणून जन्माला येतं. वाढत्या वयात देव, धर्म या निरर्थक गोष्टी त्याच्या मेंदूत कोंबल्या जातात.