विषय «समाज»

गरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३

(क)

आता आपण विनिमयव्यस्थेच्या तात्तविक पायाची चिकित्सा करूया. यासंदर्भात तृष्णा, सुख आणि उपयोगिता या संज्ञाच्या अर्थाविषयी थोडा खुलासा करू. तृष्णा आणि सुख ह्या मानसशास्त्रातील संज्ञा आहेत; परंतु सुखवादी पंथाच्या (Hedonism school) लोकांनी त्यांचा नीतीशास्त्रात प्रयोग केला. मानवाला इच्छा-आकांक्षा, आशा, स्वप्ने असणे स्वाभाविक आहे आणि त्यांची पूर्तता झाली की मानव सुखी होतो, अशी आपली सुखाची संकल्पना असते. किंबहुना, परिपूर्तीची अवस्था गाठण्यासाठी मानवाने आधी सुखी असले पाहिजे, असेही बरेचदा ऐकण्यात येते. परंतु, सुखवाद्यांची सुखाची कल्पना काय होती?

मानवाला जीवन जगताना अपरिहार्यपणे कर्तव्ये करावीच लागतात; परंतु ही कर्तव्ये करताना त्याच्यासमोर काही प्रमुख समस्या उभ्या राहतात: 
१) मानवी जीवनाचे परमप्रातव्य कोणते? 

पुढे वाचा

भय इथले संपत नाही…

घटना पहिली
राजा आपल्या आईचा एकुलता एक मुलगा. तो चार वर्षांचा असताना त्याच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवले. आईने अतिशय काबाडकष्ट करून भावाच्या शेजारी राहून अनेक खस्ता खात राजाला लहानाचा मोठा केला. कामापुरते शिक्षण घेतल्यावर तो बऱ्यापैकी कमावू लागला. वयात येताच आईने त्याचे लग्नही लावून दिले. राजाला साजेशी पत्नीही मिळाली. सासूने खाल्लेल्या खस्तांची तिला जाणीव होती. त्यांच्या संसारवेलीवर दोन फुलेही उमलली. सारे सुरळीत असताना ४ एप्रिल २०२१ रोजी राजाला कोरोनाचे निदान झाले. तेथून पुढे १० दिवस दवाखान्यात भरती होऊन पाच लाख रुपये त्यांनी खर्च केले.

पुढे वाचा

करोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल !

२०१९ च्या नोव्हेंबरमध्ये संपूर्ण जगात करोना विषाणूचा उद्रेक झाला आणि जगाबरोबरच आपल्या देशातसुद्धा जानेवारी, फेब्रुवारी २०२० दरम्यान त्याची चाहूल लागू लागली. यापूर्वीसुद्धा जगात आणि आपल्या देशातसुद्धा महाभयंकर साथींचा उद्भव झाला होता आणि त्या त्या वेळी त्या रोगांमुळे अपरिमित मनुष्यहानीही झाली होतीच. पण त्या काळात त्या साथींचा उद्रेक एकाच वेळी संपूर्ण विश्वात कधीही झालेला नव्हता. पण आता हा करोनाचा उद्रेक एकाच वेळी संपूर्ण जगात झाला आणि अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे संपूर्ण विश्वात हाहाकार माजला. बरे या रोगाचा उद्भव नैसर्गिक जीवाणूमुळे नाही तर कृत्रिम विषाणूमुळे झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यावर औषधोपचार काय करायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला. 

पुढे वाचा

बोधकथा

आमचा वाद चालला होता.

विवेक म्हणाला, “बोधकथा पुस्तकात वाचायच्या असतात. थोर थोर लोक सांगतात आणि आपण भारावून जातो त्या बोधानं. पण त्यांचा बोध परलोकातला असतो. त्याचा प्रत्यक्ष जगण्याशी काही संबंध नसतो.”

“दमछाक कशाला करून घ्यायची पण? आपल्या बापजाद्यांच्या बोधकथांच्याच वाटेवर चालावं ना…. धोपट मार्गा सोडू नको…” किरण म्हणाला.

“बोधकथा ‘धोपट मार्गा सोडू नको’ असं नाही सांगत किरण्या.. त्या कधीही थेट बोलत नाहीत. साधं “रस्ता ओलांड” असं वाक्य असलं बोधकथेत, तरी तो रस्तादेखील बोधकथेतलाच असतो. आपल्याला साधा डेक्कनवरचा रस्ता ओलांडायचा तरी मोठं दिव्य करावं लागतं.

पुढे वाचा

कोरोना महामारीचे स्वरूप व व्याप्ती

आतापर्यंत कोरोना महामारीचे स्वरूप व व्याप्ती, सर्व नागरिकांच्या लक्षात आलेली असणार. सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांमध्ये यासंबंधी भरभरून लिहिले गेले आहे. त्यामुळे, कोरोना महामारी, त्याने बाधित असलेल्यांचे आकडे, त्याची लक्षणे, त्याचे आरोग्यावर, समाजव्यवस्थेवर, अर्थकारणावर, राजकारणावर होणारे परिणाम, तसेच या आजारापासून आपला बचाव कसा करायचा, असे सर्व व या अनुषंगाने अनुलग्न इतर सर्व बाबी सविस्तरपणे चर्चिल्या गेल्या आहेत. सबब, त्या तपशीलात मी जाणार नाही. पण, हे सर्व डोळ्यांसमोर आणले तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की, संपूर्ण प्रशासन यंत्रणा, मग ते प्रशासकीय अधिकारी असोत, राज्यकर्ते असोत, आरोग्यसेवा देणारे, कायदा-सुव्यवस्था राखणारे, स्वच्छताकर्मचारी इत्यादी असोत, सर्वच आपापल्या ताकतीने ही साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

पुढे वाचा

स्थलांतरित मजूर आणि झुंडशाही

बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल, ओरिसा, तेलंगणा इत्यादी राज्यांतील नागरिक स्थानिक सुरक्षा व्यवस्था आणि बेरोजगारी याला कंटाळून आपल्या राज्यांतून पलायन करतात. आज मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांत असणार्‍या रोजगाराच्या संधी या लोकांना तेथे आकर्षित करतात. मुंबई तर भारताचे व्यावसायिक उर्जास्थान आहे. परंतु शहरांच्या पायाभूत सुविधांवर ह्या लोंढ्यांचा प्रचंड दबाव येऊन ही शहरे लोकांच्या ओझ्याखाली गुदमरू लागली आहेत. अशा लोकांना थांबविणार कसे? 

एवढा रोजगार जर अन्य प्रदेशांत असेल, तर त्यांच्या स्वतःच्या राज्यात त्यांच्यासाठी रोजगार का नाही? आपण महाराष्ट्रात नेहमीच मराठी तरुणांना दोष देतो की त्यांची मेहनत करायची तयारी नसते.

पुढे वाचा

अफवा आवडे सर्वांना! – प्रभाकर नानावटी

जगभरातील अफवा आणि त्यांचे बळी

जगभरात ठिकठकाणी हैदोस घालत असलेल्या करोना विषाणूमुळे भीतीचे व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून जगातील एकूण एक राष्ट्र भांबावून गेलेले असताना या भीतीची तीव्रता वाढविण्यात समाजमाध्यमावरून पसरत असलेल्या अफवांना कसे अटकाव करावे हा मोठा प्रश्न सर्व संबंधितांच्या समोर उभा आहे. करोना संसर्गाला आटोक्यात आणून ठप्प झालेल्या जागतिक स्तरावरील सर्व व्यवहारांना पूर्वस्थितीवर आणण्यासाठी सर्व पातळीवरून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य, प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन इत्यादींसकट संपूर्ण यंत्रणा वेळ व श्रम खर्ची घालत असताना या अफवांमुळे त्यांच्या या प्रयत्नांना खीळ बसते आहे.

पुढे वाचा

सामाजिक अंतर नव्हे…. (गणेश देवी आणि कपिल पाटील

Social Distancing नका म्हणू, त्याचा इतिहास भयकारी आहे.

गणेश देवी आणि कपिल पाटील यांचे PM मोदी यांना पत्र

https://kapilpatilmumbai.blogspot.com/2020/04/social-distancing.html

आयुष्य वाचवण्याची किंमत काय? – एक मर्मभेदी प्रश्न – चेतन भगत

चेतन भगत यांचा वर्तमानपत्रीय  लेख

https://timesofindia.indiatimes.com/blogs/The-underage-optimist/the-question-confronting-us-whats-the-cost-of-saving-lives/

विनोबा विचार

मिलिंद बोकील ह्यांनी २००३ साली ‘ज्ञान ते सांगतो पुन्हा’ या पुस्तकासाठी लिहिलेली प्रस्तावना.

डॉ. जयंतराव पाटील यांनी विनोबांच्या या लेखसंग्रहाचे संकलन करून प्रस्तावना लिहिण्याचे काम मला जेव्हा सांगितले तेव्हा आयुष्यात पूर्वी कधीही नाही इतका प्रचंड संकोच वाटला. मन अतिशय दडपल्यासारखे झाले. संकलन करण्याचे काम अवघड नव्हते, पण प्रस्तावना लिहिणे? त्या कामाला आपण पात्र नाही एवढे आत्मज्ञान मला जरूर होते. अलंकारिक भाषेत बोलायचे झाले तर विनोबांसारख्या महात्म्याच्या लेखांची ओळख माझ्यासारख्याने करून देणे म्हणजे सूर्याला काजव्याने ओवाळण्यासारखे होय. पण डॉ. पाटील यांनी सांगितले की सध्याच्या पिढीतील एका माणसाला विनोबांबद्दल काय वाटते ते कळण्यासाठी हे काम तू करायला हवेस.

पुढे वाचा