(Abstract
Historic Perspective of Relevance and Impact of Dr. Babasaheb Ambedkar’s thought in The Contemporary Age)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेची ऐतिहासिकता आणि समकालीन संदर्भात त्याचे उपयोजन व मूल्यांकन करण्याच्या दृष्टीने काही पैलूंवर मी माझे काही विचार आपल्यासमोर ठेवतो आहे.
१. बाबासाहेबांच्या प्रतिमा व प्रतीकाचे सापेक्ष विश्लेषण करणे गरजेचे आहे. भारतीय जातिसमाजात त्यांची प्रतिमा – (१) एका अस्पृश्य जातीचे म्हणजे महार जातीचे, (२) अस्पृष्य जातिसमूहाचे आणि (३) भारताला राष्ट्र-राज्य म्हणून घडविण्यासाठी योगदान करणारे राष्ट्रीय नेते या तीन प्रकारांत पाहिली जाते. १९९०-२०००च्या कालखंडात जागतिकीकरणानंतर ही प्रतिमा विश्वमहामानवाची झाली आहे.