विषय «समाज»

प्रश्न शिक्षणाच्या गुणवत्तेचा!

शालेय शिक्षणाची गुणवत्ता म्हणजे नेमके काय या बाबत बरीच मतमतांतरे असली तरी, सध्या ती फारशी बरी नाही, याबाबत तज्ज्ञ आणि सामान्य या दोघांतही एकवाक्यता असल्याचे दिसते. गेल्या काही दशकांत राज्यातली शाळांची यंत्रणा फार वेगाने विस्तारली आहे. काही अतिदुर्गम भागांचा अपवाद वगळला तर जवळ शाळा नाही म्हणून शिक्षण मिळत नाही अशी स्थिती नक्कीच नाही. ग्रामीण भागात शिक्षक आणि विद्यार्थी यांचे गुणोत्तरही बऱ्याच वेळा एका शिक्षकामागे तीस पस्तीस मुले, म्हणजे आदर्श म्हणावे, असे असते. एकूणच शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आपण बरीच मजल मारली आहे.

पुढे वाचा

भोंदू ‘भगवान’, भोळे भक्त!

‘त्यांच्या’ चेहऱ्यावर एक निरागस बाल्य विलसत असते. डोळ्यांत मायेचा अपार सागर दडलेला दिसतो. त्यांनी हात उचलताच तेजस्वी प्रकाशकिरणांनी आसमंत उजळून निघाल्याचा भास होतो आणि त्यांच्या हास्यातून प्रेमाचे झरे ओसंडू लागतात. तोच विश्वाचा निर्माता, पालनकर्ता आणि संहारक आहे असे भासू लागते. त्याच्या चमत्कारांनी असंख्य आजार बरे होतात, त्याच्या कृपाप्रसादाने निपुत्रिकांना संतानप्राप्ती होते, निर्धनांना धनलाभ होतो. भौतिक समस्यांचे सारे डोंगर भुईसपाट होतात. त्याच्या दैवी शक्तीचा सर्वत्र बोलबाला सुरू होतो आणि संसारतापाने पोळलेल्यांची त्यांच्या दारी मुक्तीसाठी रीघ लागते. त्यांचा एक कृपाकटाक्ष व्हावा, यासाठी ताटकळण्याचीही त्यांची तयारी असते.

पुढे वाचा

पुरुष: एक वाट चुकलेला मित्र

स्त्री मुक्ती चळवळ, स्त्रीवाद याकडे सुजाण पुरुष नेहमीच आपुलकीनं आणि मैत्रीपूर्ण नजरेनं पाहात आला आहे. पण असं मी म्हणालो, की माझ्या स्त्रीवादी मैत्रिणी म्हणतात ”आहे कोठे तो सुजाण पुरुष?”
हा काय तुमच्या समोर उभा आहे, असं गंमतीत त्यांना सांगावसं वाटतं. पण त्यांचा हा प्रश्न हसण्यावारी नेण्यासारखा नाही, त्यामागे त्याचं अनुभवसिद्ध निरीक्षण आहे याची मला जाणीव आहे. सुजाण पुरुषांची संख्या अजाण पुरुषाच्या तुलनेनं कमी आहे हे त्यांना यातून सुचवायचं होतं हे उघड आहे. आणि त्याचं निरीक्षण चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही.

पुढे वाचा

भारतातलं राजकारण पाकिस्तानच्या दिशेनं?

गणपती गेले. आता देव्या येतील.
गणपती आले होते तेव्हां प्रत्येक गणपती मंडळाच्या बाहेर राजकीय पक्षांचे फलक होते. गणेश भक्तांचं स्वागत करणारे. बहुतेक फलकांवर त्या त्या पक्षाच्या गल्लीनिहाय पुढाऱ्यांचे फोटो होते. गणपतीचं विसर्जन झालं तेव्हां गणपतींना निरोप देणारे फलक लागले.
नवरात्रात असे किती फलक लागतात ते पहावं लागेल. कारण नवरात्र असेल तेव्हां महाराष्ट्रात निवडणुका असल्यानं आचार संहिता असेल. फलकांवर झालेला खर्च उमेदवाराच्या खर्चात सामिल होईल.
गणपती उत्सव सुरू झाला तोच मुळी राजकीय कारणांसाठी. टिळकाना जनजागृती करायची होती. स्वातंत्र्यासाठी. टिळकांच्या काळात उत्सवाचा खर्च कमी असे.

पुढे वाचा

‘पब्लिक’ विचारवंतांचे महत्त्व : रोमिला थापरांच्या तोंडून

आणीबाणीच्या काळात भाजपचे लाल कृष्ण अडवानी माध्यमांबाबत म्हणाले, ‘‘त्यांना वाकायला सांगितले तर ते रांगू लागले”. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानल्या गेलेल्या माध्यमांनी आपले स्वातंत्र्य आणि सचोटी कसे घालवले, यावरचे अडवानींचे भाष्य भाजपेतरांना आणि विचारवंतांनाही कौतुकास्पद वाटले होते.
आज माध्यमेच नव्हे तर शिक्षण, सांस्कृतिक व्यवहार, आरोग्यसेवा, विधिव्यवस्था वगैरे क्षेत्रांतील मान्यवरही राष्ट्रीय स्वयंसेवक संघापुढे रांगू लागले आहेत; आणि त्यांना कोणी वाकायलाही सांगितलेले नाही.
१२ ऑक्टोबरला रा.स्व.संघाच्या दिल्ली प्रांत प्रमुखांनी साठ मान्यवरांना सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत दुपारच्या जेवणासाठी बोलावले. जागा होती, दिल्ली-पंजाब-हरियाना चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज.

पुढे वाचा

सांप्रदायिकतेचा जोर की सामाजिक सुधारणांचा असमतोल ?

देशाचा राजकीय चेहरा झपाट्याने बंदलत आहे हे सांगायला कोणा तज्ज्ञांची गरज नाही. राजकीय पक्षांची पडझड होत आहे. नवीन संयुक्त आघाड्या बनत आहेत. जुन्या मोडत आहेत. अखिल भारतीय पातळीवर परिणामकारकरीत्या काम करणाऱ्या पक्षांची संख्या घटत आहे. भ्रष्टाचार, हिंसाचार वाढत आहेत. गुन्हेगार जग व राजकीय पुढारी यांची जवळीक वाढतच आहे, व अनेक गुन्हेगार, आरोपी, भ्रष्टाचारी समाजात उजळ माथ्याने वावरत आहे. या खेरीज आणखी एका क्षेत्रातही राजकीय चित्र झपाट्याने बदलत आहे. देशातील धार्मिक असहिष्णुता, कडवेपणा वाढत आहे. जातीयता, सांप्रदायिकता फोफावत आहे.

राजकारणात एका वर्षात घडून आलेला एक मोठा फरक ताबडतोब जाणवतो.

पुढे वाचा

दहशतवाद आणि धर्म

स्वातंत्र्योत्तर भारताला ज्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले त्यातील दहशतवादाची समस्या ही अत्यंत महत्त्वाची मानावी लागते. सद्यःपरिस्थितीतील दहशतवादाचे स्वरूप व व्याप्ती देशाच्या एकतेला आणि अखंडतेलाच आव्हान देऊ लागली आहे. निरपराध व्यक्तींचे शिरकाण हे ह्या समस्येचे एक प्रभावी अंग आहे. ह्यामुळेच दहशतवादाच्या समस्येचे विश्लेषण करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच दहशतवादी कृत्यांशिवाय कोणत्याही समस्येकडे शासनाचे लक्ष जात नाही, म्हणून अशी कृत्ये करावी लागतात, असाही समज बळावत चालला आहे. दहशतवादाच्या मागे नेहमीच राजकीय, आर्थिक कारणे असतात व म्हणून आर्थिक संपन्नता हेच दहशतवादाला खरे उत्तर आहे असे मतही व्यक्त केले जाते.

पुढे वाचा

खरा सुधारक कोण? प्रा. य. दि. फडके ह्यांच्या भाषणाचा सारांश

सुधारक कोणाला म्हणावे हा एक मूलभूत मुद्दा आहे. शंभर वर्षापूर्वीच्या ज्या अनेक प्रश्नांना आजही उत्तर दिले गेलेले नाही त्यापैकी हा एक प्रश्न आहे. १८९३ साली प्रार्थनासमाजात दिलेल्या एका व्याख्यानात न्या.मू. रानड्यांनी “सुधारक कोण?” असा प्रश्न उपस्थित केला होता. लोकांना राजकारणात भाग घेण्याची हौस असते. अशा वाचाळवीरांची सामाजिक सुधारणेच्या वेळी मात्र दातखीळ बसते. राजकारणाच्या वेळी आणलेला ताव पार नाहीसा होतो. त्या काळी केला जाणारा एक सवाल सुधारणाविरोधी आजही करतात. “सगळ्या सुधारणा हिंदू समाजालाच तेवढ्या का?” असा प्रश्न लोक विचारीत. त्यावेळी जे पाच जणांना जमवू शकत नसत असे वक्ते हा प्रश्न करीत.

पुढे वाचा

साम्यवादी जगातील घडामोडी : काही निरीक्षणे

रशियात गोर्बाचेव्ह यांनी गेल्या पाच वर्षांपासून सुरू केलेल्या ग्लासनोस्त व पेरिस्रोयको नामक परिवर्तनपर्वाने आता चांगलेच मूळ धरले असून जगात सर्वत्र खळबळ गाजवली आहे. ‘सर्वत्र’ हा शब्द इथे मुद्दामच वापरला आहे कारण त्याचे परिणाम आता साम्यवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांपुरते मर्यादित राहिलेले नसून कथित लोकशाही व अलिप्ततावादी या सर्वांना आज नव्याने विचार करण्याची गरज भासू लागली आहे. नुकतीच जेव्हा रशियात साम्यवादी पक्षाच्या सामुदायिक नेतृत्वाची परिसमाप्ती होऊन समावेशक सत्तांचा धारक राष्ट्राध्यक्ष म्हणून गोर्बाचेव्हविरोधकांचे पारडे जड होऊन समजा गोर्बाचेव्ह उद्या सत्ताभ्रष्ट झाले तरी एक गोष्ट वादातीत राहील की त्यांनी केलेली कामगिरी युगप्रवर्तक आहे आणि ते या शतकाचे नायक आहेत.

पुढे वाचा