गेल्या वीस वर्षात महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी मोठी चळवळ झाली आहे, अंधश्रद्धेबद्दल महाराष्ट्रातील काही भागातील जनता जागरुकही झाली असेल. परंतु आजही काही आदिवासी समाजात कमालीची अंधश्रद्धा आहे. त्यापैकीच एक फासेपारधी समाज, या समाजामध्ये आजारपणात घरच्याघरी उपचार करण्याच्या अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. हा लेख लिहायच्या आठ दिवसांआधी माझ्या पुतणीचा कान एका रात्री अचानक खूप दुखायला लागला, आणि ती वेदनेने तळमळून रडायला लागली. माझ्या आजोबांनी खूप वर्षांपूर्वी दिघाडा मादी (मोर) पक्षी मारला होता, त्याचा पाय माझ्या आज्जीने आताही जपून ठेवला आहे. तो पाय फल्ली तेलात कढवून सोनालीच्या, माझ्या पुतणीच्या कानात आणून फिरवला.
विषय «सामाजिक समस्या»
मुस्लिम स्थळांच्या वादातून काय साध्य करणार?
देशात सध्या ज्ञानवापी मस्जिदीचे प्रकरण सर्वच प्रसारमाध्यमातून गाजवण्यात येत आहे. ही ज्ञानवापी मस्जिद नसून खरेतर ते शिवालय आहे, असे एका हिंदुत्ववादी गटाचे म्हणणे आहे. याबाबतचे प्रकरण वाराणसीच्या स्थानिक कोर्टात चालू आहे. सदर कोर्टाने या मस्जिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्याचे सर्वेक्षण झाले आहे आणि त्याचा अहवालही मा.कोर्टाकडे सादर करण्यात आला आहे. त्यासाठी जो आयोग नेमला होता त्या आयोगातील हिंदुत्ववादी सदस्यांनी या मशिदीतील वजू करण्याचा पाण्याचा साठा असलेल्या तलावामध्ये शिवाचे लिंग आढळले असल्याचा दावा केला आहे. वाराणसी कोर्टाने सदर जागेला ताबडतोब सील करून तेथे कोणीही जाऊ नये व त्या जागेला अथवा लिंगाला नुकसान पोहोचवू नये, असे आदेश दिले आहेत.
इतिहास – डावं.. उजवं..
इतिहास हा माणसाला शहाणपण शिकवणारा विषय आहे असे एका युरोपीयन विचारवंताने नोंदवले आहे. हे वाक्य जसेच्या तसे केवळ तेव्हाच लागू होऊ शकते जेव्हा इतिहास हा विषय वैयक्तिक आणि तत्संबंधित हितसंबंधापासून दूर ठेवण्याचे किमान शहाणपण लोकांच्या अंगवळणी पडेल. हे सहजासहजी घडून येणारच नाही. याचे स्पष्ट कारण म्हणजे इतिहास हा देशभरातील आणि जगभरातील बहुतेक लोकांच्या हितसंबंधाचा मुद्दा बनून राहिला आहे. त्यासंबंधित आवश्यक अशा सर्व रचना आणि प्रणाली जमवत हा हितसंबंधी समूह सतत जागता राहत असतो. कोणत्याही प्रकारे आपले हितसंबंध धोक्यात येणार नाहीत याची दक्षता अगदी काटेकोरपणे वाहत हा समूह ऐतिहासिक सत्यांची मोडतोड करत समाजातील आपले वर्चस्व राखत असतो.
ठिणगी
ए.सी.चे तिकीट न मिळाल्यामुळे मृदुलाला साधे स्लीपरचेच तिकीट काढावे लागले होते. रात्रभर प्रवास करून उद्या सकाळी घरी जाऊन सगळे आवरायचे आणि पुन्हा ऑफिस गाठायचे. ए.सी.चे तिकीट मिळाले असते तर एवढा शीण नसता जाणवला. तरीपण ट्रेनमध्ये बसल्यावर तिला जरा निवांत वाटले. दोन दिवस सारखी लोकांची, पाहुण्यांची ये-जा. आईला बरे नव्हते म्हणून दोन दिवस ती आईला भेटायला आली होती. आजच सकाळी आईला डिस्चार्ज मिळाला म्हणून तिला निघता आले. आईला काही दिवस तरी मुंबईला आपल्याकडे घेऊन यायची तिची खूप इच्छा होती, पण आपले मुंबईचे एकंदरीत आयुष्य बघता ती गोष्ट किती अशक्य आहे हेही तिला कळत होते.
हिंदुराष्ट्राच्या अमानुष परंपरेचे वाहक
भारताच्या आधुनिक लोकशाहीचा इतिहास आणि आज हिंदुराष्ट्राच्या स्वागतार्थ पडत चाललेली पावले पाहता लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्यांच्या मनात हे काहीतरी विपरीत, अनाकलनीय, अघटित घडते आहे असे वाटत राहते. विनाशाकडे नेणारे हे वास्तव आणि त्याच्या वेगासमोर वाटणारी प्रचंड असहाय्यता हा स्थायीभाव सतत चहूबाजूला जाणवत राहातो. आणि वाटत राहते की काल एवढे काही नव्हते ते आज कुठून आले? असे आणि एवढे विदारक?
इतिहासाच्या नजरेने पाहू लागल्यावर असेही लक्षात येते की आपण डोळे झाकले होते. पण त्यामुळे ते जे विदारक होते ते असत्याचे नव्हते होत नाही.
जग कुठे आणि भारत कुठे…
असं म्हटलं जातं, जगभरामध्ये सर्वांत शक्तिशाली देशांपैकी भारत हा तिसरा सगळ्यांत मोठा देश आहे. पण खरं वास्तव काय आहे आपल्या देशाचं? या देशातल्या शेवटच्या घटकांत राहणाऱ्या माणसांमधले भय अजूनही संपलेले नाही. इतिहासातल्या घटनांना वर आणून त्याला पुष्टी व पाठबळ देण्याचं काम आपल्या देशातली व्यवस्था सध्या करत आहे. त्यामध्ये सगळ्यात मोठं भय म्हणजे अंतर्गत सामाजिक सुरक्षेचं. या देशातले अल्पसंख्याक, इथले भटकन्ती करणारे आदिवासी माणसं सध्या सुरक्षित नाहीत. या बांधवांवर कुठेही झुंडीने हल्ले होतात. अश्या घटनांमुळे भारत सध्या जगामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
एका पुरुषावर बलात्कार होतो तेव्हा…
पुस्तक: एका पुरुषावर बलात्कार होतो तेव्हा…
लेखक: विजय पाष्टे
प्रकाशक: सिंधू शांताराम क्रिएशन्स
अशुद्ध लेखन, सदोष प्रूफ रीडिंग आणि ‘एका पुरुषावर बलात्कार होतो तेव्हा…’ असं भलंमोठं, भडक, अंगावर येणारं नाव हा या कादंबरीचा प्रथम नजरेत भरणारा दोष! त्याकडे दुर्लक्ष करून ही कादंबरी वाचावी का? हरकत नाही, वाचू. पण त्यावर समीक्षा लिहायची? का नाही लिहायची? लेखन अशुद्ध आहे, प्रूफ रीडिंग गलथान आहे, नाव भडक आणि अंगावर येणारं आहे म्हणून काय झालं? लेखनातला आशय हा अशुद्ध लेखन, सदोष प्रूफ रीडिंग, भडक आणि अंगावर येणारं नाव आहे म्हणून रद्दी समजायचा?
चेहऱ्यामागची रेश्मा
पुस्तक: चेहऱ्यामागची रेषा
मूळ लेखिका: रेश्मा कुरेशी
अनुवादक: निर्मिती कोलते
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग
अगदी अलिकडेच वाचनालयातून पुस्तक वाचण्यासाठी समोर असलेल्या पुस्तकांवर नजर फिरवत होते आणि ‘चेहऱ्यामागाची रेश्मा’ या पुस्तकावर नजर खिळली. रेश्मा कुरेशी नाव ओळखीचे. कारण ॲसिड हल्ला झाल्याने अनेकदा बातम्यांमधून, टीव्हीवरून समोर आलेले. असे असूनही वाचण्यासाठी घ्यावे की न घ्यावे पुस्तक? यातील हल्ला झालेल्या रेश्माची दाहकता आपल्याला झेपेल का पुस्तक वाचताना? असा विचार आला.
परंतु लगेचच दुसरा विचार मनात आला. ॲसिडमुळे हल्ला झालेल्या मुलीचे निव्वळ फोटो पाहून आपण पुस्तक घ्यावे की न घ्यावे या द्वंद्वात आहोत.
लोककल्याणाचे खाजगीकरण अजून झाले नाही
गेले अनेक दिवस राज्यातील एस.टी. कामगारांचा संप सुरू आहे. विलीनीकरण व्हावे म्हणून हा संप सुरू आहे. एस.टी. सरकारची आहे. विलीनीकरण सरकारमध्ये हवे आहे. म्हणजे एस.टी. कामगारांना आपण सरकारचा भाग आहोत असे वाटत नाही. त्यांना तसे वाटावे ही सरकारची जबाबदारी आहे. कामगारांना तसे का वाटत नाही? याचे उत्तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळाले. विलीनीकरण करता येणार नाही असे तीन सदस्यीय समितीने सांगितले. मंत्री त्याच्यापुढे गेले आणि एस.टी.चे खाजगीकरण करू या म्हणू लागले. आपण सरकारी नाही असे कामगारांना का वाटते याचे उत्तर मिळाले. एस.टी.चे खाजगीकरण आधीच सुरू झाले आहे असे सांगितले गेले.
महाकवी पीयूष मिश्रा आणि एक रविवार
एकाच दिवशीच्या वृत्तपत्री मथळ्यांनी इतकं अस्वस्थ व्हावं? लढाईचे दिवस नाहीत, बॉम्ब–वर्षाव नाही, त्सुनामी, महापूर, ज्वालामुखीचा उद्रेक नाही……सारं कसं शांत शांत! मग नेहेमीच्या मध्यमवर्गी स्वस्थतेचा आज मागमूसही का नाही? गुरु लोक म्हणतात तसा आपल्यात मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट तर नाही? असेल बाबा!
माझ्या गावाजवळचं, माझ्या ओळखीतलं गाव अमरावती. भारत स्वतंत्र व्हायच्या सत्तावीस वर्षे आधी ऑलिम्पिकला प्रतिनिधी पाठवणाऱ्या हनुमान आखाड्याचं गाव. श्रीकृष्ण–रुक्मिणीच्या प्रेमकथेचं गाव. दादासाहेब खापर्डे, सुदामकाका देशमुख, मोरोपंत जोशी, के.